< रूथ 4 >
1 १ आता बवाज वेशीत जाऊन बसला; इतक्यात बवाज ज्या जवळच्या नातलगाबद्दल बोलला होता तोसुद्धा तेथे आला, तेव्हा हा त्यास म्हणाला, “मित्रा, येथे येऊन बस.” तेव्हा तो तेथे जाऊन बसला.
波阿斯到了城门,坐在那里,恰巧波阿斯所说的那至近的亲属经过。波阿斯说:“某人哪,你来坐在这里。”他就来坐下。
2 २ मग गावातील दहा वडील जनांना बोलावून तो म्हणाला, “तुम्ही इकडे येऊन बसा” आणि तेसुध्दा बसले.
波阿斯又从本城的长老中拣选了十人,对他们说:“请你们坐在这里。”他们就都坐下。
3 ३ मग तो त्या जवळच्या नातलगाला म्हणाला, “मवाब देशातून नामी आली आहे; ती तुझा माझा बंधू अलीमलेख याच्या शेताचा भाग विकत आहे,
波阿斯对那至近的亲属说:“从摩押地回来的拿俄米,现在要卖我们族兄以利米勒的那块地;
4 ४ आणि तुला हे कळवावे व येथे या बसलेल्यांसमोर आणि माझ्या वडीलजनांसमोर तू तो विकत घ्यावा. तो जर खंडणी भरून सोडवशील तर मला सांग, म्हणजे मला कळेल, कारण खंडून घेण्यास तुझ्याशिवाय कोणी नाही, तुझ्यानंतर मी आहे.” तो म्हणाला, “मी खंडून घेईन.”
我想当赎那块地的是你,其次是我,以外再没有别人了。你可以在这里的人面前和我本国的长老面前说明,你若肯赎就赎,若不肯赎就告诉我。”那人回答说:“我肯赎。”
5 ५ मग बवाज म्हणाला, “ज्या दिवशी ते शेत नामीच्या हातून विकत घेशील त्या दिवशी मृताची पत्नी मवाबी रूथ हिच्याकडूनही तुला ते विकत घ्यावे लागेल, ते अशासाठी की मृताचे नाव त्याच्या वतनाला चालावे.”
波阿斯说:“你从拿俄米手中买这地的时候,也当娶死人的妻摩押女子路得,使死人在产业上存留他的名。”
6 ६ तेव्हा तो जवळचा नातलग म्हणाला, “माझ्याच्याने ते वतन खंडणी भरून सोडवता येत नाही; सोडवले तर माझ्या वतनाचे माझ्याकडून नुकसान होईल, म्हणून माझा खंडून घेण्याचा अधिकार तू घे.”
那人说:“这样我就不能赎了,恐怕于我的产业有碍。你可以赎我所当赎的,我不能赎了。”
7 ७ वतन खंडणी भरून सोडविण्याची व त्याची अदलाबदल करून करार पक्के करण्याची पूर्वी इस्राएलात अशी पद्धत होती की मनुष्य आपल्या चपला काढून दुसऱ्याला देत असे.
从前,在以色列中要定夺什么事,或赎回,或交易,这人就脱鞋给那人。以色列人都以此为证据。
8 ८ तो जवळचा नातलग बवाजाला म्हणाला, “तूच ते विकत घे,” आणि असे म्हणून त्याने आपल्या चपला काढल्या.
那人对波阿斯说:“你自己买吧!”于是将鞋脱下来了。
9 ९ बवाज त्या वडीलजनांना व सर्व लोकांस म्हणाला, “आज तुम्ही साक्षी आहात की जे काही अलीमलेखाचे आणि खिल्लोन व महलोन यांचे होते ते सर्व मी नामीच्या हातून घेतले आहे.
波阿斯对长老和众民说:“你们今日作见证,凡属以利米勒和基连、玛伦的,我都从拿俄米手中置买了;
10 १० याखेरीज महलोनाची स्त्री मवाबी रूथ माझी पत्नी म्हणून मी तिचा स्वीकार करतो; ते यासाठी की मृताचे नाव त्याच्या वतनात कायम रहावे, मृताचे नाव त्याच्या भाऊबंदातून व गावच्या वेशीतून नष्ट होऊ नये, आज तुम्ही याविषयी साक्षी आहात.”
又娶了玛伦的妻摩押女子路得为妻,好在死人的产业上存留他的名,免得他的名在本族本乡灭没。你们今日可以作见证。”
11 ११ तेव्हा वेशीतील सर्व लोक व वडील जन म्हणाले, “आम्ही साक्षी आहो, ही जी स्त्री तुझ्या घरी येत आहे तिचे परमेश्वर इस्राएल घराण्याची स्थापना करणाऱ्या राहेल आणि लेआ ह्यांच्याप्रमाणे करो; एफ्राथा येथे भरभराट आणि बेथलहेमात कीर्ती होवो.
在城门坐着的众民和长老都说:“我们作见证。愿耶和华使进你家的这女子,像建立以色列家的拉结、利亚二人一样。又愿你在以法他得亨通,在伯利恒得名声。
12 १२ आणि तामारेच्या पोटी यहूदापासून झालेल्या पेरेसाच्या घराण्यासारखे तुझे घराणे या नववधूच्या पोटी परमेश्वर जे संतान देईल त्याच्याद्वारे होवो.”
愿耶和华从这少年女子赐你后裔,使你的家像她玛从犹大所生法勒斯的家一般。”
13 १३ मग बवाजाने रूथशी लग्न केले व ती त्याची पत्नी झाली. तो तिच्यापाशी गेला तेव्हा परमेश्वराच्या दयेने तिच्या पोटी गर्भ राहून तिला पुत्र झाला.
于是,波阿斯娶了路得为妻,与她同房。耶和华使她怀孕生了一个儿子。
14 १४ तेव्हा तेथील स्त्रिया नामीला म्हणाल्या, “परमेश्वर धन्यवादित असो, कारण त्याने तुला जवळच्या नातलगाशिवाय राहू दिले नाही, त्याचे नाव इस्राएलात प्रसिद्ध होवो.
妇人们对拿俄米说:“耶和华是应当称颂的!因为今日没有撇下你,使你无至近的亲属。愿这孩子在以色列中得名声。
15 १५ तो तुला पुन्हा जीवन देणारा व वृद्धापकाळी सांभाळणारा असा होईल, कारण जी सून तुझ्यावर प्रीती करते, जी सात मुलांपेक्षा तुला अधिक आहे, तिला तो झाला आहे.”
他必提起你的精神,奉养你的老,因为是爱慕你的那儿妇所生的。有这儿妇比有七个儿子还好!”
16 १६ तेव्हा नामीने ते बालक घेतले आणि आपल्या उराशी धरून ती त्याची दाई झाली.
拿俄米就把孩子抱在怀中,作他的养母。
17 १७ “नामीला पुत्र झाला” असे म्हणून शेजारणींनी त्याचे नाव ओबेद ठेवले. तो इशायाचा पिता व दावीदाचा आजोबा झाला.
邻舍的妇人说:“拿俄米得孩子了!”就给孩子起名叫俄备得。这俄备得是耶西的父,耶西是大卫的父。
18 १८ पेरेशाची वंशावळ: पेरेस हेस्रोनाचा पिता झाला,
法勒斯的后代记在下面:法勒斯生希斯 ;
19 १९ हेस्रोन रामचा पिता झाला, राम अम्मीनादाबाचा पिता झाला,
希斯 生兰;兰生亚米拿达;
20 २० अम्मीनादाब नहशोनाचा पिता झाला, नहशोन सल्मोनाचा पिता झाला,
亚米拿达生拿顺;拿顺生撒门;
21 २१ सल्मोन बवाजाचा पिता झाला, बवाज ओबेदाचा पिता झाला,
撒门生波阿斯;波阿斯生俄备得;
22 २२ ओबेद इशायाचा पिता झाला आणि इशाय दाविदाचा पिता झाला.
俄备得生耶西;耶西生大卫。