< शास्ते 1 >
1 १ यहोशवाच्या मृत्यूनंतर, इस्राएल लोकांनी परमेश्वरास असे म्हणून विचारले, “कनानी लोकांशी लढावयास आम्ही जाऊ तेव्हा आमच्या वतीने पहिल्याने कोणी स्वारी करावी?”
约书亚死后,以色列人求问耶和华说:“我们中间谁当首先上去攻击迦南人,与他们争战?”
2 २ परमेश्वर म्हणाला, “यहूदा तुमचे नेतृत्व करील; पाहा, हा देश मी त्याच्या हाती दिला आहे.”
耶和华说:“犹大当先上去,我已将那地交在他手中。”
3 ३ यहूदाच्या लोकांनी आपले भाऊ, “शिमोन याच्या लोकांस म्हटले, आमच्याबरोबर आमच्या प्रदेशात वर या, म्हणजे आपण एकत्र मिळून कनान्यांविरुद्ध लढाई करू, त्याप्रमाणे तुमच्या प्रदेशात आम्हीही तुम्हामध्ये येऊ;” तेव्हा शिमोनाचा वंश त्यांच्याबरोबर गेला.
犹大对他哥哥西缅说:“请你同我到拈阄所得之地去,好与迦南人争战;以后我也同你到你拈阄所得之地去。”于是西缅与他同去。
4 ४ मग यहूदाचे लोक वर चढून गेले, या प्रकारे परमेश्वराने कनानी व परिज्जी ह्यांच्यावर त्यांना विजय दिला व त्यांनी बेजेक शहर येथे त्यांच्या दहा हजार लोकांस ठार मारले.
犹大就上去;耶和华将迦南人和比利洗人交在他们手中。他们在比色击杀了一万人,
5 ५ बेजेक येथे त्यांना अदोनी-बेजेक सापडला आणि तेव्हा त्यांनी त्याच्याशी लढाई केली व कनानी व परिज्जी यांचा पराभव केला.
又在那里遇见亚多尼·比色,与他争战,杀败迦南人和比利洗人。
6 ६ पण अदोनी-बेजेक पळून गेला, तेव्हा त्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यास पकडले आणि त्यांच्या हातांचे व पायांचे अंगठे कापून टाकले.
亚多尼·比色逃跑;他们追赶,拿住他,砍断他手脚的大拇指。
7 ७ तेव्हा अदोनी-बेजेक म्हणाला, “हातांचे व पायांचे अंगठे कापून टाकलेले सत्तर राजे माझ्या मेजाखाली अन्न वेचीत होते; जसे मी केले तसे देवाने माझे केले आहे.” त्यांनी त्यास यरूशलेमेस आणले; तेथे तो मेला.
亚多尼·比色说:“从前有七十个王,手脚的大拇指都被我砍断,在我桌子底下拾取零碎食物。现在 神按着我所行的报应我了。”于是他们将亚多尼·比色带到耶路撒冷,他就死在那里。
8 ८ यहूदाच्या लोकांनी यरूशलेम नगराविरुद्ध लढाई करून ते घेतले, आणि तलवारीच्या धारेने त्यावर हल्ला करून त्या नगराला आग लावली.
犹大人攻打耶路撒冷,将城攻取,用刀杀了城内的人,并且放火烧城。
9 ९ नंतर यहूदाचे लोक डोंगराळ प्रदेश, नेगेब आणि पश्चिमेकडील तळवटीच्या डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या कनान्यांशी लढावयाला खाली गेले.
后来犹大人下去,与住山地、南地,和高原的迦南人争战。
10 १० मग हेब्रोनात राहणाऱ्या कनान्यांविरुद्ध यहूदा पुढे चालून गेला. (हेब्रोनाचे पूर्वीचे नाव किर्याथ-आर्बा होते) आणि त्यांनी शेशय, अहीमान व तलमय यांचा पराभव केला.
犹大人去攻击住希伯 的迦南人,杀了示筛、亚希幔、挞买。希伯 从前名叫基列·亚巴。
11 ११ तेथून यहूदाचे लोक दबीरच्या रहिवाश्यांवर पुढे चालून गेले. (दबीरचे पूर्वीचे नाव किर्याथ-सेफर होते)
他们从那里去攻击底壁的居民;底壁从前名叫基列·西弗。
12 १२ कालेब म्हणाला, “जो कोणी लढून किर्याथ-सेफर काबीज करील त्यास मी आपली मुलगी अखसा पत्नी म्हणून देईन.”
迦勒说:“谁能攻打基列·西弗,将城夺取,我就把我女儿押撒给他为妻。”
13 १३ तेव्हा कालेबाचा धाकटा भाऊ कनाज अथनिएल ह्याचा मुलगा ह्याने दबीर नगर काबीज केले आणि म्हणून कालेबाने आपली मुलगी अखसा त्यास पत्नी करून दिली.
迦勒兄弟基纳斯的儿子俄陀聂夺取了那城,迦勒就把女儿押撒给他为妻。
14 १४ ती आली तेव्हा आपल्या पित्यापासून काही शेतजमीन मागून घेण्यासाठी तिने त्यास गळ घातली. ती गाढवावरून उतरली तेव्हा कालेबाने तिला विचारले, “मी तुझ्यासाठी काय करू शकतो?”
押撒过门的时候,劝丈夫向她父亲求一块田。押撒一下驴,迦勒问她说:“你要什么?”
15 १५ ती त्यास म्हणाली, “मला आशीर्वाद द्या; तुम्ही मला नेगेब प्रदेशात स्थायिक केले आहे तेव्हा मला पाण्याचे झरेही द्या” आणि कालेबाने तिला वरचे व खालचे झरे दिले.
她说:“求你赐福给我,你既将我安置在南地,求你也给我水泉。”迦勒就把上泉下泉赐给她。
16 १६ मोशेचा मेहुणा जो केनी त्यांचे वंशज यहूदाच्या लोकांबरोबर खजुरीच्या नगराहून अरादाजवळील यहूदातले (जे नेगेबात आहे) रान आहे तेथे चढून गेले; आणि तेथे जाऊन यहूदा लोक अराद जवळ त्या लोकांबरोबर राहिले.
摩西的内兄是基尼人,他的子孙与犹大人一同离了棕树城,往亚拉得以南的犹大旷野去,就住在民中。
17 १७ आणि यहूदाची माणसे त्यांचा भाऊ शिमोन ह्याच्या मनुष्यांबरोबर गेली आणि त्यांनी सफाथ येथे राहणारे कनानी यांच्यावर हल्ला करून त्यांचा पूर्णपणे नाश केला; त्या नगराचे नाव हर्मा असे म्हटले होते.
犹大和他哥哥西缅同去,击杀了住洗法的迦南人,将城尽行毁灭,那城的名便叫何珥玛。
18 १८ यहूदाच्या लोकांनी गज्जा व त्याच्या सभोवतालची जमीन, अष्कलोन व त्याच्या सभोवतालची जागा आणि एक्रोन व त्याच्या सभोवतालची जागा ही नगरे घेतली.
犹大又取了迦萨和迦萨的四境,亚实基伦和亚实基伦的四境,以革伦和以革伦的四境。
19 १९ यहूदाच्या लोकांबरोबर परमेश्वर होता आणि त्यांनी डोंगराळ प्रदेश ताब्यात घेतला, पण खोऱ्यात राहणाऱ्या लोकांजवळ लोखंडी रथ असल्याने त्यांना घालवून देणे त्यांना जमेना.
耶和华与犹大同在,犹大就赶出山地的居民,只是不能赶出平原的居民,因为他们有铁车。
20 २० मोशेच्या सांगण्याप्रमाणे हेब्रोन कालेबाला देण्यात आले व त्याने तेथून अनाकाच्या तिघा मुलांना घालवून दिले.
以色列人照摩西所说的,将希伯 给了迦勒;迦勒就从那里赶出亚衲族的三个族长。
21 २१ पण बन्यामिनाच्या लोकांनी यरूशलेमेत राहणाऱ्या यबूसी लोकांस बाहेर घालवले नाही, म्हणून आजपर्यंत यबूसी लोक यरूशलेमेत बन्यामिनाच्या लोकांबरोबर राहत आहेत.
便雅悯人没有赶出住耶路撒冷的耶布斯人。耶布斯人仍在耶路撒冷与便雅悯人同住,直到今日。
22 २२ योसेफाच्या घराण्यानेही बेथेलावर हल्ला करण्याची तयारी केली; आणि परमेश्वर त्यांच्याबरोबर होता.
约瑟家也上去攻打伯特利;耶和华与他们同在。
23 २३ योसेफाच्या घराण्याने हेरगिरी करण्यास बेथेल येथे माणसे पाठवली. त्या नगराचे पूर्वीचे नाव लूज होते.
约瑟家打发人去窥探伯特利(那城起先名叫路斯)。
24 २४ त्या हेरांनी नगरातून एक मनुष्य बाहेर निघताना पाहिला; आणि त्यांनी त्यास म्हटले, “नगरात कसे जायचे ते आम्हांला दाखव म्हणजे आम्ही तुझ्यावर दया करू.”
窥探的人看见一个人从城里出来,就对他说:“求你将进城的路指示我们,我们必恩待你。”
25 २५ तेव्हा त्याने त्यांना नगरात जाण्याचा मार्ग दाखवला आणि त्यांनी त्या नगरावर तलवार चालवली, पण त्या मनुष्यास व त्याच्या सर्व परिवाराला त्यांनी सुखरूप जाऊ दिले.
那人将进城的路指示他们,他们就用刀击杀了城中的居民,但将那人和他全家放去。
26 २६ त्या मनुष्याने हित्ती लोकांच्या देशात जाऊन एक नगर बांधले व त्याचे नाव लूज ठेवले. त्याचे नाव आजपर्यंत तेच आहे.
那人往赫人之地去,筑了一座城,起名叫路斯。那城到如今还叫这名。
27 २७ मनश्शेच्या लोकांनी बेथ-शान व त्याची खेडी, तानख व त्याची खेडी, दोर व त्याच्या खेड्यात राहणाऱ्यांना, इब्लाम व त्याची खेडी यामध्ये राहणाऱ्यांना आणि मगिद्दो व त्याची खेडी यामध्ये राहणाऱ्यांना बाहेर घालवून दिले नाही. कारण त्या कनान्यांनी त्या प्रदेशात राहण्याचा निश्चय केला.
玛拿西没有赶出伯·善和属伯·善乡村的居民,他纳和属他纳乡村的居民,多珥和属多珥乡村的居民,以伯莲和属以伯莲乡村的居民,米吉多和属米吉多乡村的居民;迦南人却执意住在那些地方。
28 २८ जेव्हा इस्राएल लोक सामर्थ्यवान झाले तेव्हा त्यांनी कनानी लोकांस कठोर परिश्रमाचे काम करायला लावले; पण त्यांना कधीच पूर्णपणे घालवून दिले नाही.
及至以色列强盛了,就使迦南人做苦工,没有把他们全然赶出。
29 २९ एफ्राइमने गेजेर येथे राहणाऱ्या कनान्यांना घालवून दिले नाही, ते कनानी गेजेर येथे त्यांच्यामध्येच राहिले.
以法莲没有赶出住基色的迦南人。于是迦南人仍住在基色,在以法莲中间。
30 ३० जबुलूनाने कित्रोन व नहलोल येथील रहिवाश्यांना घालवून दिले नाही; पण जबुलूनाने कनान्यांवर बळजबरी करून कठोर परिश्रमाच्या कामास नेमले.
西布伦没有赶出基伦的居民和拿哈拉的居民。于是迦南人仍住在西布伦中间,成了服苦的人。
31 ३१ आशेराने अक्को यातले राहणारे आणि सीदोन व अहलाब व अकजीब व हेल्बा, अफीक व रहोब येथील रहिवाश्यांना घालवून दिले नाही;
亚设没有赶出亚柯和西顿的居民,亚黑拉和亚革悉的居民,黑巴、亚弗革与利合的居民。
32 ३२ म्हणून आशेराचे वंशज त्या देशाच्या कनानी रहिवाश्यांमध्ये राहिले; कारण त्यांनी त्यांना घालवून दिले नाही.
于是,亚设因为没有赶出那地的迦南人,就住在他们中间。
33 ३३ नफतालीच्या वंशजांनी बेथ-शेमेश व बेथ-अनाथ येथील रहिवाश्यांना घालवून दिले नाही; नफताली त्या देशाच्या कनानी रहिवाश्यांमध्ये राहिले; पण बेथ-शेमेश व बेथ-अनाथ येथील रहिवासी नफताली लोकांची कठीण कष्टाची कामे करू लागले.
拿弗他利没有赶出伯·示麦和伯·亚纳的居民,于是拿弗他利就住在那地的迦南人中间;然而伯·示麦和伯·亚纳的居民成了服苦的人。
34 ३४ अमोरी लोकांनी दानाच्या वंशजांना डोंगराळ प्रदेशात राहण्यास भाग पाडले. ते त्यांना खाली मैदानात उतरू देईनात;
亚摩利人强逼但人住在山地,不容他们下到平原;
35 ३५ अमोऱ्यांनी हेरेस डोंगरावर अयालोन व शालबीम येथे राहण्याचा निश्चय केला; पण योसेफाचे घराणे प्रबळ झाल्यावर त्यांनी त्यांना जिंकले आणि कठीण कष्टाचे काम करण्यास त्यांना भाग पाडले.
亚摩利人却执意住在希烈山和亚雅 并沙宾。然而约瑟家胜了他们,使他们成了服苦的人。
36 ३६ अमोऱ्यांची सीमा अक्रब्बीमाचा चढावापसून आणि सेला येथून डोंगराळ प्रदेशावर गेली होती.
亚摩利人的境界,是从亚克拉滨坡,从西拉而上。