< अनुवाद 33 >
1 १ देवाचा भक्त मोशे याने इस्राएल लोकांस आपल्या मृत्युपूर्वी असा आशीर्वाद दिला, तो असाः
以下是神人摩西在未死之先为以色列人所祝的福:
2 २ “परमेश्वर सीनाय येथून आला. उष: कालच्या प्रकाशाप्रमाणे तो सेईर वरुन आला, पारान डोंगरावरुन प्रकाशला, दहा हजार देवदूतांसमवेत आला देवाचे समर्थ सैनिक त्याच्याबरोबर होते.
他说:耶和华从西奈而来, 从西珥向他们显现, 从巴兰山发出光辉, 从万万圣者中来临, 从他右手为百姓传出烈火的律法。
3 ३ परमेश्वराचे आपल्या लोकांवर खरेच फार प्रेम आहे. त्याची पवित्र प्रजा त्याच्या हातात आहे. ते लोक त्याच्या पायाशी बसून त्याच्याकडून शिकवण घेतात.
他疼爱百姓; 众圣徒都在他手中。 他们坐在他的脚下, 领受他的言语。
4 ४ मोशेने आम्हास नियमशास्त्र दिले. ती शिकवण याकोबाच्या लोकांची ठेव आहे.
摩西将律法传给我们, 作为雅各会众的产业。
5 ५ इस्राएलचे सर्व वंश आणि त्यांचे प्रमुख आले तेव्हा परमेश्वर यशुरुनचा राजा झाला.
百姓的众首领, 以色列的各支派, 一同聚会的时候, 耶和华在耶书 中为王。
6 ६ रऊबेनचे लोक मोजकेच असले तरी ते जगोत, त्यांना मरण न येवो.”
愿吕便存活,不致死亡; 愿他人数不致稀少。
7 ७ मोशेने यहूदाला हा आशीर्वाद दिला: “परमेश्वरा, यहूदा तुझ्याकडे मदत मागेल तेव्हा त्याचे ऐक. त्याच्या लोकांची व त्यांची गाठभेट करून दे. त्यास शक्तीशाली कर आणि शत्रूला पराभूत करण्यात त्यास साहाय्यकारी हो.”
为犹大祝福说: 求耶和华俯听犹大的声音, 引导他归于本族; 他曾用手为自己争战, 你必帮助他攻击敌人。
8 ८ लेवीविषयी मोशे असे म्हणाला: “लेवी तुझा खरा अनुयायी आहे. तो थुम्मीम व उरीम बाळगतो. मस्सा येथे तू लेवीची कसोटी पाहिलीस. मरीबाच्या झऱ्याजवळ, ते तुझेच आहेत याची तू कसोटी करून घेतलीस.
论利未说: 耶和华啊,你的土明和乌陵 都在你的虔诚人那里。 你在玛撒曾试验他, 在米利巴水与他争论。
9 ९ हे परमेश्वरा, आपल्या कुटुंबियांपेक्षाही त्यांनी तुला आपले मानले. आपल्या आईवडीलांची कदर केली नाही. भाऊबंदांना ओळख दाखवली नाही. पोटच्या पोरांची पर्वा केली नाही. पण तुझ्या आज्ञांचे पालन केले. तुझा पवित्र करार पाळला.
他论自己的父母说: 我未曾看见; 他也不承认弟兄, 也不认识自己的儿女。 这是因利未人遵行你的话, 谨守你的约。
10 १० ते तुझे विधी याकोबाला, नियमशास्त्र इस्राएलाला शिकवतील. तुझ्यापुढे धूप जाळतील. तुझ्या वेदीवर होमबली अर्पण करतील.
他们要将你的典章教训雅各, 将你的律法教训以色列。 他们要把香焚在你面前, 把全牲的燔祭献在你的坛上。
11 ११ परमेश्वरा, जे जे लेवीचे आहे त्यास आशीर्वाद दे. ते जे करतील त्याचा स्विकार कर. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा संहार कर. त्यांच्या शत्रूंना पार नेस्तनाबूत करून टाक.”
求耶和华降福在他的财物上, 悦纳他手里所办的事。 那些起来攻击他和恨恶他的人, 愿你刺透他们的腰, 使他们不得再起来。
12 १२ बन्यामीन विषयी मोशे म्हणाला, “बन्यामीन परमेश्वरास प्रिय आहे. तो परमेश्वरापाशी सुरक्षित राहील. देव त्याचे सदोदित रक्षण करील. आणि परमेश्वराचे वास्तव्य त्याच्या देशात राहील.”
论便雅悯说: 耶和华所亲爱的必同耶和华安然居住; 耶和华终日遮蔽他,也住在他两肩之中。
13 १३ योसेफाविषयी तो म्हणाला, “योसेफाच्या भूमीवर परमेश्वराची कृपादृष्टी असो. परमेश्वरा, त्यांच्या देशात आकाशातून पावसाचा वर्षाव कर आणि त्यांच्या भूमीतून मुबलक पाणी दे.
论约瑟说: 愿他的地蒙耶和华赐福, 得天上的宝物、甘露, 以及地里所藏的泉水;
14 १४ सूर्यामुळे उत्कृष्ट फलित त्यांच्या पदरात पडो. आणि प्रत्येक महिना आपली उत्कृष्ट फळे त्यास देवो.
得太阳所晒熟的美果, 月亮所养成的宝物;
15 १५ टेकड्या आणि पुरातन पर्वत यांच्यातील अमूल्य जिन्नस त्यांना मिळोत.
得上古之山的至宝, 永世之岭的宝物;
16 १६ धरतीचा उत्तमातील उत्तम ठेवा योसेफाला मिळो. योसेफाची आपल्या भाऊबंदापासून ताटातूट झाली होती. तेव्हा जळत्या झुडूपातल्या, परमेश्वराचा दुवा त्यास मिळो.
得地和其中所充满的宝物, 并住荆棘中上主的喜悦。 愿这些福都归于约瑟的头上, 归于那与弟兄迥别之人的顶上。
17 १७ प्रथम जन्मलेल्या गोऱ्हासारखा त्याचा प्रताप आहे. त्याचे शिंगे रानबैलाच्या शिंगांप्रमाणे आहेत. ते लोकांवर चढाई करून त्यांना पृथ्वीच्या सीमेपर्यंत ढकलतील. असे मनश्शेचे हजारो आणि एफ्राइमचे लाखो आहेत.”
他为牛群中头生的,有威严; 他的角是野牛的角, 用以抵触万邦,直到地极。 这角是以法莲的万万, 玛拿西的千千。
18 १८ मोशे जबुलूनबद्दल म्हणाला, “जबुलूना, बाहेर जाल तेव्हा आनंद करा. इस्साखारा आपल्या डेऱ्यात आनंदाने राहा.
论西布伦说: 西布伦哪,你出外可以欢喜。 以萨迦啊,在你帐棚里可以快乐。
19 १९ ते लोकांस आपल्या डोंगरावर बोलावतील. तेथे ते योग्य यज्ञ करतील. समुद्रातील धन आणि वाळूतील खजिना हस्तगत करतील.”
他们要将列邦召到山上, 在那里献公义的祭; 因为他们要吸取海里的丰富, 并沙中所藏的珍宝。
20 २० गादविषयी मोशे म्हणाला, “गादाचा विस्तार करणारा देव धन्य होय. गाद सिंहासारखा आहे. तो आधी दबा धरून बसतो. आणि सावजावर हल्ला करून त्याच्या चिंधड्या करतो.
论迦得说: 使迦得扩张的应当称颂! 迦得住如母狮; 他撕裂膀臂,连头顶也撕裂。
21 २१ स्वतःसाठी तो उत्तम भाग ठेवतो. राजाचा वाटा स्वतःला घेतो. लोकांचे प्रमुख त्याच्याकडे येतात. जे परमेश्वराच्या दृष्टीने न्यायाने, ते तो करतो. इस्राएलाच्या लोकांसाठी जे उचित तेच करतो.”
他为自己选择头一段地, 因在那里有设立律法者的分存留。 他与百姓的首领同来; 他施行耶和华的公义 和耶和华与以色列所立的典章。
22 २२ दान विषयी मोशे म्हणाला, “दान म्हणजे सिंहाचा छावा. तो बाशान मधून झेप घेतो.”
论但说: 但为小狮子, 从巴珊跳出来。
23 २३ नफताली विषयी मोशेने सांगितले, “नफताली, तू सर्व चांगल्या गोष्टीने समाधानी त्या तुला भरभरून मिळतील. तुझ्यावर परमेश्वराचा आशीर्वाद राहील. गालील तलावाजवळचा प्रदेश तुला मिळेल.”
论拿弗他利说: 拿弗他利啊,你足沾恩惠, 满得耶和华的福, 可以得西方和南方为业。
24 २४ आशेर विषयी मोशने असे सांगितले, “आशेरला सर्वात अधिक आशीर्वाद मिळोत. तो आपल्या बांधावांना प्रिय होवो. त्याचे पाय तेलाने माखलेले राहोत.
论亚设说: 愿亚设享受多子的福乐, 得他弟兄的喜悦, 可以把脚蘸在油中。
25 २५ तुमच्या दरवाजांचे अडसर लोखंडाचे व पितळेचे असोत. तुमचे सामर्थ्य आयुष्यभर राहो.”
你的门闩是铜的,铁的。 你的日子如何,你的力量也必如何。
26 २६ हे यशुरुना! परमेश्वर देवासारखा कोणी नाही. तुझ्या साहाय्यासाठी, मेघांवर आरुढ होऊन तो आपल्या प्रतापाने आकाशातून तुझ्या मदतीला येतो.
耶书 哪,没有能比 神的。 他为帮助你,乘在天空, 显其威荣,驾行穹苍。
27 २७ देव सनातन आहे. तो तुझे आश्रयस्थान आहे. देवाचे सामर्थ्य सर्वकाळ राहते! तो तुझे रक्षण करतो. तुझ्या शत्रूंना तो तुझ्या प्रदेशातून हुसकावून लावेल. शत्रूंना नष्ट कर असे तो म्हणतो.
永生的 神是你的居所; 他永久的膀臂在你以下。 他在你前面撵出仇敌, 说:毁灭吧。
28 २८ म्हणून इस्राएल सुरक्षित राहील. याकोबाची विहीर त्यांच्या मालकीची आहे. धान्याने व द्राक्षरसाने संपन्न अशी भूमी त्यांना मिळेल. त्या प्रदेशावर भरपूर पाऊस पडेल.
以色列安然居住; 雅各的本源独居五谷新酒之地。 他的天也滴甘露。
29 २९ इस्राएला, तू आशीर्वादीत आहेस. इतर कोणतेही राष्ट्र तुझ्यासारखे नाही. परमेश्वराने तुला वाचवले आहे. भक्कम ढालीप्रमाणे तो तुझे रक्षण करतो. परमेश्वर म्हणजे तळपती तलवार. शत्रूंना तुझी दहशत वाटेल. त्यांची महान ठिकाणे तू तुडवशील!
以色列啊,你是有福的! 谁像你这蒙耶和华所拯救的百姓呢? 他是你的盾牌,帮助你, 是你威荣的刀剑。 你的仇敌必投降你; 你必踏在他们的高处。