< ज़कर 9 >
1 बनी आदम और ख़ुसूसन कुल क़बाइल — ए — इस्राईल की आँखें ख़ुदावन्द पर लगी हैं। ख़ुदावन्द की तरफ़ से सर ज़मीन — ए — और दमिश्क़ के ख़िलाफ़ बार — ए — नबूव्वत;
१हद्राख देश आणि त्या देशाची राजधानी दिमिष्क यांच्याबद्दल परमेश्वराचे वचन: “कारण जशी इस्राएलाच्या वंशांवर तशी मानवजातीवर परमेश्वराची दृष्टी आहे;”
2 हमात के खिलाफ़ जो उनसे सूर और सैदा के खिलाफ़ जो अपनी नज़र में बहुत 'अक़्लमन्द हैं।
२तसेच सोर व सीदोन आणि हद्राखच्या सीमेवरील हमाथ याविषयीची भविष्यवाणी; कारण तेथील लोक अतिबुध्दिवान आहेत.
3 सूर ने अपने लिए मज़बूत क़िला' मिट्टी की तरह चाँदी के तूदे लगाए और गलियों की कीच की तरह सोने के ढेर।
३सोराने स्वतःसाठी एक मजबूत किल्ला बांधला आहे आणि धुळीएवढी चांदी आणि चिखलाप्रमाणे रस्त्यात शुद्ध सोन्याचे ढिग लावले आहेत.
4 देखो ख़ुदावन्द उसे ख़ारिज कर देगा, उसके ग़ुरूर को समुन्दर में डाल देगा: और आग उसको खा जाएगी।
४पाहा! परमेश्वर, तिला तिच्या भूमीवरून हाकलून लावेल आणि तो तिच्या सागरी शक्तीचा नाश करील; अशाप्रकारे तिला आगीत भस्मसात करील.
5 अस्क़लोन देखकर डर जाएगा ग़ज़्ज़ा भी सख़्त दर्द में मुब्तिला होगा, अक़रून भी क्यूँकि उसकी उम्मीद टूट गई और ग़ज़्ज़ा से बादशाही जाती रहेगी, अस्क़लोन बे चिराग़ हो जाएगा।
५“अष्कलोन हे पाहील आणि भयभीत होईल! गज्जाचे लोक भीतीने खूप थरथर कापतील, आणि एक्रोन शहराची आशा नष्ट होईल. गाझामधील राजा नाश पावेल व अष्कलोनात यापुढे वस्ती राहणार नाही.
6 और एक अजनबी ज़ादा अशदूद में तख़्त नशीन होगा और मैं फ़िलिस्तियों का ग़ुरूर मिटाऊँगा।
६अश्दोदात अनोळखी येवून आपली घरे वसवतील व पलिष्ट्यांचा गर्व नाहीसा करीन.
7 और मैं उसके खू़न को उसके मुँह से और उसकी मकरूहात उसके दाँतों से निकाल डाललूँगा, और वह भी हमारे ख़ुदा के लिए बक़िया होगा और वह यहूदाह में सरदार होगा और अक़रून यबूसियों की तरह होंगे।
७त्यांच्या मुखातले रक्त आणि दातांतले निषिध्द अन्न मी काढून टाकीन; यहूदाच्या वंशाप्रमाणे तेही आमच्या देवासाठी शेष असे एक घराणे म्हणून राहतील आणि एक्रोनचे लोक यबूस्यांसारखे होतील.
8 और मैं मुख़ालिफ़ फ़ौज के मुक़ाबिल अपने घर की चारों तरफ़ खै़माज़न हूँगा ताकि कोई उसमें से आमद — ओ — रफ़्त न कर सके; फिर कोई ज़ालिम उनके बीच से न गुज़रेगा क्यूँकि अब मैंने अपनी आँखों से देख लिया है।
८माझ्या देशातून कोणत्याही सैन्याने येवू-जाऊ नये म्हणून मी माझ्या भूमीभोवती तळ देईन, कोणीही जुलूम करणारा त्यांच्यातून येणारजाणार नाही. कारण आता मी स्वत: त्यांच्यावर आपली नजर ठेवीन.”
9 ऐ बिन्त — ए — सिय्यून तू निहायत शादमान हो! ऐ दुख़्तर — ए — येरूशलेम, ख़ूब ललकार क्यूँकि देख तेरा बादशाह तेरे पास आता है; वह सादिक है, नजात उसके हाथ में है वह हलीम है और गधे पर बल्कि जवान गधे पर सवार है।
९हे सियोनकन्ये, आनंदोत्सव कर! यरूशलेम कन्यांनो, आनंदाने जल्लोश करा! पाहा! तुमचा राजा तुमच्याकडे नीतिमत्त्वाने येत आहे; आणि तो तारण घेवून येत आहे. तो विनम्र आहे आणि एका गाढवीवर, गाढवीच्या शिंगरावर तो स्वार झाला आहे.
10 और मैं इफ़्राईम से रथ, येरूशलेम से घोड़े काट डालूँगा और जंगी कमान तोड़ डाली जाएगी और वह क़ौमों को सुलह का मुज़दा देगा और उसकी सल्तनत समुन्दर से समन्दर तक और दरिया — ए — फ़ुरात से इन्तिहाए — ज़मीन तक होगी।
१०त्यानंतर मी एफ्राईममधील रथांचा आणि यरूशलेमेतील घोडदळाचा नाश करीन आणि युध्दातील धनुष्यबाण मोडतील; कारण तो शांतीची वार्ता राष्ट्रांशी बोलेल, त्याचे राज्य सर्व समुद्रांवर आणि महानदीपासून ते पृथ्वीच्या शेवटापर्यंत असेल.
11 और तेरे बारे में यूँ है कि तेरे 'अहद के खू़न की वजह से, तेरे ग़ुलामों को अंधे कुंए से निकाल लाया।
११आणि तुझ्याविषयी म्हटले तर, तुझ्याशी मी केलेल्या माझ्या कराराच्या रक्तामुळे, निर्जल खड्ड्यांतून तुझ्या बंधकांना मुक्त केले आहे.
12 मैं आज बताता हूँ कि तुझ को दो बदला दूँगा, “ऐ उम्मीदवार, ग़ुलामों क़िले' वापस आओ।”
१२आशावान कैद्यांनो, मजबूत दुर्गांकडे परत या! मी आजही जाहीर करतो की मी तुम्हास दुप्पटीने प्रतिफळ देईन
13 क्यूँकि मैंने यहूदाह को कमान की तरह झुकाया और इफ़्राईम को तीर की तरह लगाया, और ऐ सिय्यून, मैं तेरे फ़र्ज़न्दों को यूनान के फ़र्ज़न्दों के ख़िलाफ़ बरअन्गेख़ता करूँगा, तुझे पहलवान की तलवार की तरह बनाऊँगा।
१३कारण मी यहूदाला धनुष्य म्हणून वाकवले आहे. एफ्राईमरूपी बाणांनी मी आपला भाता भरला आहे. हे सियोने, ग्रीसच्या पुत्रांशी लढायला मी तुझ्या पुत्रांना उत्तेजित केले आहे. त्यांना योद्ध्याच्या तलवारीप्रमाणे मी ग्रीसाच्याविरूद्ध वापरीन.
14 और ख़ुदावन्द उनके ऊपर दिखाई देगा उसके तीर बिजली की तरह निकलेंगे; हाँ ख़ुदावन्द ख़ुदा नरसिंगा फूँकेगा और दक्खिनी बगोलों के साथ खुरूज करेगा।
१४परमेश्वर त्यांना दर्शन देईल आणि विजेप्रमाणे आपले बाण सोडील. माझा प्रभू परमेश्वर, तुतारी फुंकेल आणि दक्षिणेकडून वावटळीप्रमाणे तो चालून येईल.
15 और रब्ब — उल — अफ़वाज उनकी हिमायत करेगा और वह दुश्मनों को निगलेंगे, और फ़लाख़न के पत्थरों को पायमाल करेंगे और पीकर मतवालों की तरह शोर मचायेंगे और कटोरों और मज़बह के कोनों की तरह मा'मूर होंगे।
१५सेनाधीश परमेश्वर त्यांचे रक्षण करील आणि ते दगड व गोफणीचा उपयोग करून शत्रूंचा पराभव करतील व त्यांना गिळतील व मद्यप्राशन केल्याप्रमाणे आरोळी करतील आणि ते वेदीच्या कोपऱ्यावरील कटोऱ्यांसारखे भरुन वाहतील.
16 और ख़ुदावन्द उनका ख़ुदा उस दिन उनको अपनी भेंड़ों की तरह बचा लेगा, क्यूँकि वह ताज के जवाहर की तरह होंगे, जो उसके मुल्क में सरफ़राज़
१६आपल्या कळपाप्रमाणे परमेश्वर देव त्यादिवशी त्यांचे संरक्षण करील; आपले लोक त्यास मुकुटातील रत्नांप्रमाणे त्यांच्या देशात उच्च होतील.
17 क्यूँकि उनकी खुशहाली 'अज़ीम और उनका जमाल खू़ब है, नौजवान ग़ल्ले से बढ़ेंगे और लड़कियाँ नई शराब से नश्व — ओ — नुमा पाएँगी।
१७हे सर्व किती मनोरम व किती सुंदर होईल! तरुण पुरुष धान्याने आणि कुमारी गोड द्राक्षरसाने पुष्ट होतील.