< होसी 9 >
1 ऐ इस्राईल, दूसरी क़ौमों की तरह ख़ुशी — ओ — शादमानी न कर, क्यूँकि तू ने अपने ख़ुदा से बेवफ़ाई की है। तूने हर एक खलीहान में इश्क से उजरत तलाश की है।
१हे इस्राएला, इतर लोकांसारखा आनंद करु नको, कारण तू आपल्या देवाला सोडून अविश्वासू झाला आहेस, तुला प्रत्येक खळ्यावर व्यभिचाराचे वेतन आवडते.
2 खलीहान और मय के हौज़ उनकी परवरिश के लिए काफ़ी न होंगे और नई मय किफ़ायत न करेगी।
२पण खळे आणि द्राक्षांचे कुंड त्यांना खाऊ घालणार नाही, नवा द्राक्षरस त्यांना निराश करेल.
3 वह ख़ुदावन्द के मुल्क में न बसेंगे, बल्कि इफ़्राईम मिस्र को वापस जाएगा और वह असूर में नापाक चीज़ें खाएँगे।
३ते परमेश्वराच्या देशात राहणार नाहीत, त्याशिवाय एफ्राईम मिसरात परत जाईल, आणि एके दिवशी ते अश्शूरात अमंगळ पदार्थ खातील.
4 वह मय को ख़ुदावन्द के लिए न तपाएँगे और वह उसके मक़बूल न होंगे, उनकी क़ुर्बानियाँ उनके लिए नौहागरों की रोटी की तरह होंगी। उनको खाने वाले नापाक होंगे, क्यूँकि उनकी रोटियाँ उन ही की भूक के लिए होंगी और ख़ुदावन्द के घर में दाख़िल न होंगी।
४ते परमेश्वरास द्राक्षरसाचे पेयार्पणे देणार नाही, व ते त्यास प्रसन्न करु शकणार नाहीत, त्यांचे बलीदान त्यांच्यासाठी शोकाची भाकर होईल जे ते खातील ते अशुद्ध होतील, कारण त्यांचे भोजन त्यांच्यापुरतेच असेल, ते परमेश्वराच्या मंदीरात आणता येणार नाही.
5 मजमा' — ए — मुक़द्दस के दिन और ख़ुदावन्द की 'ईद के दिन क्या करोगे?
५परमेश्वराच्या सणाच्या दिवशी नेमलेल्या उत्सवाच्या दिवशी तुम्ही देवासाठी काय कराल?
6 क्यूँकि वो तबाही के ख़ौफ़ से चले गए, लेकिन मिस्र उनको समेटेगा। मोफ़ उनको दफ़न करेगा। उनकी चाँदी के अच्छे ख़ज़ानों पर बिच्छू बूटी क़ाबिज़ होगी। उनके खे़मों में काँटे उगेंगे।
६कारण पहा, जर ते नाशापासून वाचले तर, मिसर त्यांना एकत्र करील आणि मोफ त्यांना मुठमाती देईल, वन्य झाडे त्यांचे सोने, रुपे मिळवतील आणि त्यांचे डेरे काट्यांनी भरून जातील.
7 सज़ा के दिन आ गए, बदले का वक़्त आ पहुँचा। इस्राईल को मा'लूम हो जाएगा कि उसकी बदकिरदारी की कसरत और 'अदावत की ज़्यादती के ज़रिए' नबी बेवक़ूफ़ है। रूहानी आदमी दीवाना है।
७शासन करण्याचे दिवस येत आहेत, प्रतिफळाचे दिवस येत आहेत, इस्राएल हे जाणणार, तुझ्या महापातकामुळे, वैरभावामुळे आता संदेष्टा मूर्ख बनला आहे.
8 इफ़्राईम मेरे ख़ुदा की तरफ़ से निगहबान है। नबी अपनी तमाम राहों में चिड़ीमार का जाल है। वह अपने ख़ुदा के घर में 'अदावत है।
८संदेष्टा जो माझ्या देवासोबत आहे, तो एफ्राईमाचा रखवालदार आहे, पण तो आपल्या सर्व मार्गात पारध्याचा पाश आहे आणि त्यामध्ये देवाच्या घराविषयी वैरभाव भरलेला आहे.
9 उन्होंने अपने आप को निहायत ख़राब किया जैसा जिब'आ के दिनों में हुआ था। वह उनकी बदकिरदारी को याद करेगा और उनके गुनाहों की सज़ा देगा।
९गिबात घडलेल्या गोष्टींच्या वेळी झाले त्यासारखा त्यांनी अती भ्रष्टाचार केला आहे. देव त्यांच्या अधर्माची आठवण करून त्यांना त्यांच्या पापासाठी शासन करणार आहे.
10 मैंने इस्राईल को बियाबानी अंगूरों की तरह पाया। तुम्हारे बाप — दादा को अंजीर के पहले पक्के फल की तरह देखा जो दरख़्त के पहले मौसम में लगा हो, लेकिन वह बा'ल फ़गूर के पास गए और अपने आप को उस ज़रिए' रुस्वाई के लिए मख़्सूस किया और अपने उस महबूब की तरह मकरूह हुए।
१०परमेश्वर म्हणतो, मला इस्राएल जेव्हा आढळला तेव्हा तो रानात द्राक्ष मिळाल्यासारखा होता, अंजीराच्या हंगामातल्या प्रथम फळासारखे तुमचे पुर्वज मला आढळले पण ते बआल-पौराकडे आले आणि लज्जास्पद मूर्तीस त्यांनी आपणास वाहून घेतले ते त्यांच्या मूर्तीसारखे घृणास्पद झाले.
11 अहल — ए — इफ़्राईम की शौकत परिन्दे की तरह उड़ जाएगी, विलादत — ओ — हामिला का बुजूद उनमें न होगा और क़रार — ए — हमल ख़त्म हो जाएगा।
११एफ्राईमाचे गौरव पक्षाप्रमाणे उडून जाईल तिथे जन्म, गरोदरपणा आणि गर्भधारणा होणार नाही.
12 अगरचे वह अपने बच्चों को पालें, तोभी मैं उनको छीन लूँगा, ताकि कोई आदमी बाकी न रहे। क्यूँकि जब मैं भी उनसे दूर हो जाऊँ, तो उनकी हालत क़ाबिल — ए — अफ़सोस होगी।
१२जरी त्यांच्या मुलांचे पालन पोषण होऊन ती मोठी झाली तरी मी ते हिरावून घेणार यासाठी की त्यामध्ये कोणी राहू नये. मी त्यांच्यापासून वळून जाईल तेव्हा त्यांच्यावर हाय हाय!
13 इफ़्राईम को मैं देखता हूँ कि वो सूर की तरह उम्दा जगह में लगाया गया, लेकिन इफ़्राईमअपने बच्चों को क़ातिल के सामने ले जाएगा।
१३मी एफ्राईमास पाहिले तेव्हा तो मला सोरासारखा, कुरणात लावलेल्या रोपटयासारखा दिसला पण तरी तो आपल्या मुलास बली देणाऱ्या मनुष्यासारखा होऊन जाईल.
14 ऐ ख़ुदावन्द, उनको दे; तू उनको क्या देगा? उनको इस्क़ात — ए — हमल और ख़ुश्क पिस्तान दे।
१४त्यास दे, परमेश्वरा, त्यास काय देशील? त्यांना गर्भपात करणारे गर्भाशय व सुकलेले स्तन त्यांना दे.
15 उनकी सारी शरारत जिल्जाल में है। हाँ, वहाँ मैंने उनसे नफ़रत की। उनकी बदआ'माली की वजह से मैं उनको अपने घर से निकाल दूँगा और फिर उनसे मुहब्बत न रख्खूँगा। उनके सब उमरा बाग़ी हैं।
१५कारण त्यांची सर्व अधमता गिल्गालात आहे, तेथेच मला त्यांच्याविषयी द्वेष निर्माण झाला. त्यांच्या पापकृत्यामुळे मी माझ्या घरातून त्यांना हाकलणार त्यांच्यावर प्रेम करणार नाही कारण त्यांचे सर्व अधिकारी बंडखोर आहेत.
16 बनी इफ़्राईम तबाह हो गए। उनकी जड़ सूख गई। उनके यहाँ औलाद न होगी और अगर औलाद हो भी तो मैं उनके प्यारे बच्चों को हलाक करूँगा।
१६एफ्राईम रोगी आहे त्यांचे मूळ सुकून गेले आहे, त्यास फळ येणार नाही, त्यांना जरी मुले झाली तरी मी त्यांची प्रिय मुले मारून टाकीन.
17 मेरा ख़ुदा उनको छोड़ देगा, क्यूँकि वो उसके सुनने वाले नहीं हुए और वह अक़वाम — ए — 'आलम में आवारा फिरेंगे।
१७माझा देव त्यांना नाकारेल कारण त्यांनी त्याचे ऐकले नाही, ते देशोदेशी भटकणारे होतील.