< नाहूम 3 >
1 ख़ूँरेज़ शहर पर अफ़सोस, वह झूट और लूट से बिल्कुल भरा है; वह लूटमार से बाज़ नहीं आता।
१पूर्ण रक्ताने भरलेल्या नगरीला धिक्कार असो! ती पूर्ण लबाडीने आणि चोरलेल्या मालमत्तेने भरली आहे; तिच्यात नेहमी बळी आहेत.
2 सुनो, चाबुक की आवाज़, और पहियों की खड़खड़ाहट और घोड़ों का कूदना और रथों के हिचकोले!
२परंतु आता तेथे चाबकांच्या फटकाऱ्यांचे आवाज, चाकांच्या खडखडाटाचे ध्वनी, घोड्यांच्या टापांचे आणि रथाच्या घडघडाटाचे आवाज तुम्ही ऐकता.
3 देखो, सवारों का हमला और तलवारों की चमक और भालों की झलक और मक़्तूलों के ढेर, और लाशों के तूदे; लाशों की इन्तिहा नहीं, लाशों से ठोकरें खाते हैं।
३लढाई करणाऱ्या घोडेस्वाराचे दृष्य, तलवारीचे चकाकणे, भाल्याची चमक, प्रेतांचा ढीग आणि मृतांची मोठी रास पडली आहे. शवांचा काही अंतच नाही; त्याचे हल्लेखोर त्यांच्या शवाला अडखळून पडत आहेत.
4 ये उस ख़ूबसूरत जादूगरनी फ़ाहिशा की बदकारी की कसरत का नतीजा है, क्यूँकि वह क़ौमों को अपनी बदकारी से, और घरानों को अपनी जादूगरी से बेचती है।
४हे सर्व सुंदर वेश्येच्या वासनामय कृतीमुळे घडले आहे, जी निपुण चेटकी आपल्या व्यभिचारांनी राष्ट्रांना आणि चेटकीण कृतीने लोकांस विकते.
5 रब्ब — उल — अफ़वाज फ़रमाता है, देख, मैं तेरा मुख़ालिफ़ हूँ और तेरे सामने से तेरा दामन उठा दूँगा, और क़ौमों को तेरी बरहनगी और ममलुकतों को तेरा सत्र दिखलाऊँगा।
५पाहा, मी तुझ्याविरुद्ध आहे. असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी तुझी वस्त्रे तुझ्या तोंडापर्यंत वर उचलीन आणि राष्ट्रांना तुझे गुप्त भाग, राजांना तुझी लाज दाखवीन.
6 और नजासत तुझ पर डालूँगा, और तुझे रुस्वा करूँगा, हाँ तुझे अन्गुश्तनुमा कर दूँगा।
६मी तुझ्यावर चिखल फेकून तुला तुच्छ करीन आणि तुला लाजिरवाणे करीन. प्रत्येकजण तुझ्याकडे पाहतील असे मी तुला करीन.
7 और जो कोई तुझ पर निगाह करेगा, तुझ से भागेगा और कहेगा, नीनवा वीरान हुआ; इस पर कौन तरस खाएगा? मैं तेरे लिए तसल्ली देने वाले कहाँ से लाऊँ।
७असे होईल की, जो कोणी तुला पाहील तो तुजपासून पळेल आणि म्हणेल, निनवेचा नाश झाला आहे; तिच्यासाठी कोण रडणार? कोठून मी तुझ्यासाठी सांत्वन करणारे शोधू?
8 क्या तू नोआमून से बेहतर हैं, जो नहरों के बीच बसा था और पानी उसकी चारों तरफ़ था; जिसकी शहरपनाह दरिया-ए-नील था, और जिसकी फ़सील पानी था?
८निनवे तू थेबेस, जी नील नदीच्यावर बांधली आहे, तिचे सभोवती पाणी होते, महासमुद्र तिचा संरक्षण होता, समुद्र स्वतः तिचा कोट होता तिच्यापेक्षा उत्तम आहेस काय?
9 कूश और मिस्र उसकी बेइन्तिहा तवानाई थे; फ़ूत और लूबीम उसके हिमायती थे।
९कूशी व मिसरी यांचे तिला बल होते व ते अमर्याद होते; पूटी व लुबी यांची तिला मदत होती.
10 तोभी वह जिलावतन और ग़ुलाम हुआ; उसके बच्चे सब कूचों में पटक दिए गए, और उनके शुर्फ़ा पर पर्चा डाला गया, और उसके सब बुज़ुर्ग ज़ंजीरों से जकड़े गए।
१०तरी थेबेसला पाडाव करून नेण्यात आले, ती बंदीवासात गेली तिची तरुण मुले प्रत्येक मुख्य रस्त्यात आपटून तुकडे करून मारण्यात आली. तिच्या शत्रूंनी प्रतिष्ठीत मनुष्यांवर चिठ्ठ्या टाकल्या आणि त्यांनी तिच्या सर्व महान मनुष्यांना साखळ्यांनी बांधून नेले.
11 तू भी मस्त होकर अपने आप को छिपाएगा, और दुश्मन के सामने से पनाह ढूँडेगा।
११तू सुध्दा दारूड्या होशील. तू लपण्याचा प्रयत्न करशील. तूही शत्रूपासून तुझी आश्रयाची जागा शोधशील.
12 तेरे सब क़िले' अंजीर के दरख़्त की तरह हैं, जिस पर पहले पक्के फल लगे हों, जिसको अगर कोई हिलाए तो वह खाने वाले के मुँह में गिर पड़ें।
१२तुझे सर्व दुर्ग प्रारंभी पिकलेल्या अंजिराच्या झाडाप्रमाणे होतील. जर ते हालविले, तर ते खाणाऱ्याच्या तोंडात पडतात.
13 देख, तेरे अन्दर तेरे मर्द 'औरतें बन गए, तेरी मम्लुकत के फाटक तेरे दुश्मनों के सामने खुले हैं; आग तेरे अड़बंगों को खा गई।
१३पाहा, तुझे लोक तुझ्यामध्ये स्त्रियांप्रमाणे आहेत. तुझ्या देशाचे दारे तुझ्या शत्रूंना सताड उघडली आहेत. दारांचे लाकडी अडसर आग्नीने खाऊन टाकले आहेत.
14 तू अपने घिराव के वक़्त के लिए पानी भर ले, और अपने क़िलों' को मज़बूत कर; गढ़े में उतरकर मिट्टी तैयार कर, और ईंट का साँचा हाथ में ले।
१४वेढा पडणार म्हणून तू पाणी ओढून काढ; तुझे किल्ले मजबूत कर; चिखलात उतर आणि पायांनी चुना तुडव; विटांची भिंत दुरूस्त कर.
15 वहाँ आग तुझे खा जाएगी, तलवार तुझे काट डालेगी। वह टिड्डी की तरह तुझे चट कर जाएगी। अगरचे तू अपने आप को चट कर जाने वाली टिड्डियों की तरह फ़िरावान करे, और फ़ौज — ए — मलख़ की तरह बेशुमार हो जाए।
१५तुला आग खाऊन टाकील, आणि तलवार तुला कापून काढील. ती तुला चाटून खाणाऱ्या टोळाप्रमाणे खाऊन टाकील. चाटून खाणाऱ्या टोळाप्रमाणे आपली संख्या वाढीव, झुडींनी येणाऱ्या टोळाप्रमाणे बहुतपट हो.
16 तू ने अपने सौदागरों को आसमान के सितारों से ज़्यादा फ़िरावान किया। चट कर जाने वाली टिड्डी, ख़राब करके उड़ जाती है।
१६आकाशातल्या ताऱ्यांपेक्षा तुझे व्यापारी पुष्कळ आहेत. परंतु ते चाटून खाणाऱ्या टोळासारखे आहेत; ते सर्व देश लुटून आणि नंतर दूर उडून जातील.
17 तेरे हाकिम मलख़ और तेरे सरदार टिड्डियों का हुजूम हैं, जो सर्दी के वक़्त झाड़ियों में रहती हैं; और जब आफ़ताब निकलता है तो उड़ जाती हैं, और उनका मकान कोई नहीं जानता।
१७तुझे राजपुत्रही झुंडीने येणाऱ्या टोळांसारखे आहेत आणि तुझे सेनापती टोळ्याच्या झुंडीप्रमाणे आहेत; ते थंडीच्या दिवसात कुंपणांमध्ये तळ देतात, पण जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा ते कोठे उडून जातात ते कोणालाच माहीत नाही.
18 ऐ शाह — ए — असूर, तेरे चरवाहे सो गए; तेरे सरदार लेट गए। तेरी रि'आया पहाड़ों पर बिखर गई, और उसको इकठ्ठा करने वाला कोई नहीं।
१८अश्शूराच्या राजा तुझे मेंढपाळ झोपले आहेत. तुझे सत्ताधारी विसावा घेत आहेत. तुझे लोक पर्वतांवर पांगले आहेत. आणि त्यांना जमविण्यास कोणीही नाही.
19 तेरी शिकस्तगी ला'इलाज है, तेरा ज़ख़्म कारी है; तेरा हाल सुनकर सब ताली बजाएँगे। क्यूँकि कौन है जिस पर हमेशा तेरी शरारत का बार न था?
१९तुझी जखम बरी होणे शक्य नाही. तुझी जखम असाह्य आहे. तुझी बातमी ऐकणारे प्रत्येकजण टाळ्या वाजवतात. तुझ्या नित्य दुष्टतेतून कोण निसटला आहे?