< स्तोत्रसंहिता 76 >
1 १ मुख्य संगीतकारासाठी, तंतुवाद्यावरचे आसाफाचे स्तोत्र गीत. यहूदात देव कळाला आहे, इस्राएलामध्ये त्याचे नाव थोर आहे.
阿撒夫的詩歌。交與樂官,樂用絃樂。 天主在猶大地顯示了自己,在以色列廣揚了自己的名。
2 २ शालेममध्ये त्याचा मंडप आहे, आणि सियोनेत त्याची गुहा आहे.
他在撒冷支搭了自己的帳幕,他在熙雍建豎了自己的住處。
3 ३ तेथे त्याने धनुष्य बाण, ढाली, तलवारी आणि इतर शस्त्रे मोडून टाकली आहेत.
在那裏他打斷了弓上的火箭,他也打斷了槍柄、盾牌與刀劍。
4 ४ तू जेथे शत्रूंना ठार केलेस, त्या डोंगरावरून उतरताना तू तेजस्वी चमकतोस आणि तुझे वैभव प्रकट करतोस.
大能者,您大發光明,是來自遠古的山陵。
5 ५ जे हृदयाचे धाडसी ते लुटले गेले आहेत, ते झोपी गेले आहेत, सर्व योद्धे असहाय्य झाले आहेत.
膽大的人,全被剝奪,一睡不醒,那勇敢的將領,手臂麻木失靈。
6 ६ हे याकोबाच्या देवा, तुझ्या युद्धाच्या आरोळीने, रथ आणि घोडे दोन्हीपण झोपी गेलेत आहेत.
雅各伯的天主,因您的恐嚇,戰車戰馬都驚得麻木僵直。
7 ७ तू, होय तुच, ज्याचे भय धरावे असा आहेस. असा कोण आहे कि तू रागावतोस तेव्हा तुझ्या दृष्टीस उभा राहील?
您尊嚴可畏;您盛怒時,何人能在您面前站立?
8 ८ तुझा न्याय आकाशातून आला, आणि पृथ्वी भयभित व नि: शब्द झाली.
您由天上宣佈判案,大地戰慄默默無言。
9 ९ देवा, तू, पृथ्वीवरील खिन्न झालेल्यांना तारायला, न्याय अमलांत आणण्यास उठला आहे.
因為天主起來施行審判,是要救世上的一切貧賤。
10 १० खचित त्या लोकांविषयी तुझा क्रोधित न्याय, तुला स्तुती मिळवून देईल. तुझा क्रोध तू पूर्णपणे प्रगट केला आहे.
人 的狂怒成全您的光榮,幸免憤怒的人,向您祝頌。
11 ११ परमेश्वर तुमच्या देवाला नवस करून फेडा, ज्याचे भय धरणे योग्य आहे, जे तुम्ही त्याच्या सभोवती आहात, त्यास भेटी आणा.
您們許願要向上主您們的天主還願;他四周的人都要向可敬者供奉祭獻。
12 १२ तो अधिकाऱ्यांच्या आत्म्याला नम्र करतो. पृथ्वीच्या राजांना तो भयावह असा आहे.
他抑壓首領們的氣燄,他使地上的眾王抖顫。