< नीतिसूत्रे 25 >

1 ही शलमोनाची आणखी काही नीतिसूत्रे आहेत. यहूदाचा राजा हिज्कीया याच्या मनुष्यांनी याचा नक्कल केली.
以下也是所罗门的箴言,是犹大王希西家的人所誊录的。
2 काही गोष्टी गुपित ठेवणे यामध्ये देवाचे गौरव आहे, पण त्या गोष्टी शोधून काढणे यामध्ये राजाचे गौरव आहे.
将事隐秘乃 神的荣耀; 将事察清乃君王的荣耀。
3 जसे उंचीमुळे आकाशाचा आणि खोलीमुळे पृथ्वीचा, तसे राजाचे मन गूढ आहे.
天之高,地之厚, 君王之心也测不透。
4 रुप्यातला गाळ काढून टाक, आणि धातू कामगार रुप्याचा उपयोग त्याच्या कामासाठी करू शकेल.
除去银子的渣滓就有银子出来, 银匠能以做器皿。
5 त्याचप्रमाणे राजाच्या सानिध्यापासून दुष्टांना दूर कर म्हणजे त्याचे राजासन जे काही चांगले आहे त्यांनी भक्कम होईल.
除去王面前的恶人, 国位就靠公义坚立。
6 राजासमोर स्वत: ची प्रतिष्ठा मिरवू नको. आणि थोर अधिकाऱ्यांच्या जागी उभा राहू नको.
不要在王面前妄自尊大; 不要在大人的位上站立。
7 कारण तुझ्यासमोर येणाऱ्या अधिपतीपुढे तुझा पाणउतारा करण्यापेक्षा, “वर येऊन बस” असे तुला म्हणावे हे अधिक चांगले आहे.
宁可有人说:请你上来, 强如在你觐见的王子面前叫你退下。
8 फिर्याद करायला जाण्याची घाई करू नको. ती तू केलीस तर शेवटी तुझ्या शेजाऱ्याने तुला लज्जित केले तर परिणामी काय करू असे तुला होऊन जाईल.
不要冒失出去与人争竞, 免得至终被他羞辱, 你就不知道怎样行了。
9 तुमचे आणि तुमच्या शेजाऱ्याचे वाद आपसात चर्चा करून मिटव, आणि दुसऱ्याच्या गुप्त गोष्टी उघड करू नको.
你与邻舍争讼, 要与他一人辩论, 不可泄漏人的密事,
10 १० केली तर कदाचित ऐकणारा तुझी अप्रतिष्ठा करील, व हे दूषण तुला लागून राहील.
恐怕听见的人骂你, 你的臭名就难以脱离。
11 ११ जसे रुपेरी तबकात सोन्याचे सफरचंद, तसे निवडक चांगले शब्द बोलणे.
一句话说得合宜, 就如金苹果在银网子里。
12 १२ जसे सोन्याची अंगठी किंवा दागिना शुद्ध सोन्यापासून करतात, तसाच दोष देणारा सुज्ञ ऐकणाऱ्याच्या कानांना आहे.
智慧人的劝戒,在顺从的人耳中, 好像金耳环和精金的妆饰。
13 १३ कापणीच्या समयी जसे बर्फाचे पेय, तसा विश्वासू दूत त्यास पाठवणाऱ्याला आहे कारण तो आपल्या धन्याचा जीव गार करतो.
忠信的使者叫差他的人心里舒畅, 就如在收割时有冰雪的凉气。
14 १४ जे लोक भेटी देण्याचे वचन देतात पण देत मात्र कधीच नाहीत, ते पाऊस न आणणारे ढग आणि वारा यांसारखे आहेत.
空夸赠送礼物的, 好像无雨的风云。
15 १५ धीर धरल्याने राज्य करणाऱ्याचे मन वळते, आणि मऊ जीभ हाड फोडते.
恒常忍耐可以劝动君王; 柔和的舌头能折断骨头。
16 १६ जर तुला मध सापडला तर तुला पुरे इतकाच खा; जास्त खाल्ला तर तू ओकून टाकशील.
你得了蜜吗?只可吃够而已, 恐怕你过饱就呕吐出来。
17 १७ शेजाऱ्याच्या घरात सारखे जाऊ नका, जर गेलात तर तो कंटाळून तुमचा तिरस्कार करायला लागेल.
你的脚要少进邻舍的家, 恐怕他厌烦你,恨恶你。
18 १८ जो कोणी मनुष्य आपल्या शेजाऱ्याविरूद्ध खोटी साक्ष देतो. जसे युद्घात सोटा, तलवार किंवा तीक्ष्ण बाण वापरतात यांसारखा तो आहे.
作假见证陷害邻舍的, 就是大槌,是利刀,是快箭。
19 १९ संकटकाळी अविश्वासणाऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे, हे तुटलेल्या दाताने खाणे किंवा लचकलेल्या पायाने चालणे ह्यासारखे आहे.
患难时倚靠不忠诚的人, 好像破坏的牙,错骨缝的脚。
20 २० जो कोणी दु: खी हृदयापुढे गीत गातो, तो थंड हवामानात अंगावरील कपडे काढून टाकण्यासारखा, आणि सोड्यावर टाकलेल्या शिरक्यासारखा आहे.
对伤心的人唱歌, 就如冷天脱衣服, 又如硷上倒醋。
21 २१ तुमचा शत्रू जर भुकेला असला तर त्यास खायला अन्न दे आणि तो जर तान्हेला असला तर त्यास प्यायला पाणी दे;
你的仇敌若饿了,就给他饭吃; 若渴了,就给他水喝;
22 २२ असे केल्याने त्याच्या मस्तकावर तू जळत्या निखाऱ्याची रास ठेवशील, आणि परमेश्वर तुम्हास त्याचे प्रतिपळ देईल.
因为,你这样行就是把炭火堆在他的头上; 耶和华也必赏赐你。
23 २३ उत्तरेकडचा वारा पाऊस आणतो; त्याचप्रमाणे जो कोणी गुप्त गोष्टी सांगतो तो चेहरा क्रोधाविष्ट करतो.
北风生雨, 谗谤人的舌头也生怒容。
24 २४ भांडखोर पत्नीबरोबर मोठ्या घरात राहण्यापेक्षा, धाब्याच्या कोपऱ्यात राहाणे अधिक चांगले आहे.
宁可住在房顶的角上, 不在宽阔的房屋与争吵的妇人同住。
25 २५ तहानलेल्या जिवाला थंडगार पाणी, तसे दूर देशातून आलेले चांगले वर्तमान आहे.
有好消息从远方来, 就如拿凉水给口渴的人喝。
26 २६ जसा घाणेरडा झालेला झरा किंवा नासलेले कारंजे, तसा दुष्टाच्यासमोर भ्रष्ट झालेला नीतिमान आहे.
义人在恶人面前退缩, 好像趟浑之泉,弄浊之井。
27 २७ खूप मध खाणे चांगले नाही, सन्मानावर सन्मान शोधणे हे तसेच आहे.
吃蜜过多是不好的; 考究自己的荣耀也是可厌的。
28 २८ जर मनुष्य स्वत: वर ताबा मिळवू शकत नसेल, तर तो तटबंदी मोडून पडलेल्या शहरासारखा आहे.
人不制伏自己的心, 好像毁坏的城邑没有墙垣。

< नीतिसूत्रे 25 >