< लूक 20 >
1 १ एके दिवशी येशू परमेश्वराच्या भवनात लोकांस शिक्षण देत असता व सुवार्ता सांगत असता, मुख्य याजक लोक, नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडीलजन एकत्र वर त्याच्याकडे आले.
A pewnego [dnia], gdy nauczał ludzi w świątyni i głosił ewangelię, nadeszli naczelni kapłani i uczeni w Piśmie wraz ze starszymi;
2 २ ते त्यास म्हणाले, “कोणत्या अधिकाराने तू या गोष्टी करत आहेस हे आम्हास सांग, तुला हा अधिकार कोणी दिला?”
I zapytali go: Powiedz nam, jakim prawem to czynisz? Albo kim jest [ten], kto dał ci tę władzę?
3 ३ तेव्हा त्याने त्यांना उत्तर दिले, “मीसुद्धा तुम्हास एक प्रश्न विचारतो, तुम्ही मला सांगा.
A on im odpowiedział: I ja was spytam o jedną rzecz. Powiedzcie mi:
4 ४ योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून होता की मनुष्यापासून होता?”
Chrzest Jana pochodził z nieba czy od ludzi?
5 ५ त्यांनी आपसात चर्चा केली आणि एकमेकांना म्हणाले, “जर आपण स्वर्गापासून म्हणावे, तर तो म्हणेल, ‘तर मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’
A oni zastanawiali się między sobą i mówili: Jeśli powiemy, że z nieba, zapyta: Czemu więc mu nie uwierzyliście?
6 ६ पण जर आपण मनुष्यांकडून म्हणावे, तर सर्व लोक आपणास दगडमार करतील कारण त्यांची खात्री आहे की, योहान हा एक संदेष्टा होता.”
Jeśli zaś powiemy, że od ludzi, wszyscy nas ukamienują, bo są przekonani, że Jan był prorokiem.
7 ७ म्हणून, “तो कोणापासून होता हे आम्हास माहीत नाही.” असे त्यांनी त्यास उत्तर दिले.
I odpowiedzieli, że nie wiedzą, skąd [pochodził].
8 ८ मग येशू त्यास म्हणाला, “मग मीही या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो हे मीसुद्धा तुम्हास सांगणार नाही.”
Wtedy Jezus im powiedział: To i ja wam nie powiem, jakim prawem to czynię.
9 ९ मग तो लोकांस हा दाखला सांगू लागला, “एका मनुष्याने द्राक्षमळा लावला व तो काही शेतकऱ्यांना मोलाने देऊन बऱ्याच दिवसांसाठी दूरदेशी गेला.
I zaczął mówić do ludzi taką przypowieść: Pewien człowiek założył winnicę, wydzierżawił ją rolnikom i wyjechał na dłuższy czas.
10 १० हंगामाच्या वेळी त्याने नोकराला शेतकऱ्यांकडे पाठवले. यासाठी की, त्यांनी द्राक्षमळ्यातील काही फळे द्यावित. पण शेतकऱ्यांनी त्या नोकराला मारले व रिकाम्या हाताने परत पाठवले.
A [we właściwym] czasie posłał sługę do rolników, aby mu dali [część] plonów winnicy. Lecz oni go pobili i odesłali z niczym.
11 ११ नंतर त्याने दुसऱ्या नोकराला पाठवले, पण त्यालासुद्धा त्यांनी मारले. त्या नोकराला त्यांनी लज्जास्पद वागणूक दिली आणि रिकाम्या हाताने परत पाठवले.
Ponownie posłał innego sługę, ale oni i tego pobili, znieważyli i odesłali z niczym.
12 १२ तेव्हा त्याने तिसऱ्या नोकराला पाठवले. पण त्यालाही त्यांनी जखमी करून बाहेर फेकून दिले.
Posłał jeszcze trzeciego, a oni również jego poranili i wyrzucili.
13 १३ द्राक्षमळ्याचा मालक म्हणाला, ‘मी काय करू? मी माझा स्वतःचा प्रिय पुत्र पाठवतो. कदाचित ते त्यास मान देतील.’
Wtedy pan winnicy powiedział: Co [mam] zrobić? Poślę mego umiłowanego syna, może go uszanują, gdy go zobaczą.
14 १४ पण जेव्हा शेतकऱ्यांनी मुलाला पाहिले, तेव्हा त्यांनी आपसात चर्चा केली आणि म्हणाले, ‘हा तर वारस आहे, आपण त्यास ठार मारू, म्हणजे वतन आपले होईल.’
Lecz gdy rolnicy go zobaczyli, naradzali się między sobą i mówili: To jest dziedzic. Chodźmy, zabijmy go, a dziedzictwo będzie nasze.
15 १५ त्यांनी त्यास द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकले व ठार मारले. तर मग द्राक्षमळ्याचा मालक काय करील?
I wyrzuciwszy go z winnicy, zabili. Cóż więc zrobi z nimi pan winnicy?
16 १६ तो येईल आणि त्या शेतकऱ्यांना ठार मारील व तो द्राक्षमळा दुसऱ्यांना सोपवून देईल.” त्यांनी हे ऐकले तेव्हा ते म्हणाले, “असे कधीही न होवो.”
Przyjdzie i wytraci tych rolników, a winnicę odda innym. Gdy oni to usłyszeli, powiedzieli: Nie daj Boże!
17 १७ येशूने त्यांच्याकडे पाहिले व म्हटले, “तर मग जो दगड बांधणाऱ्यांनी नाकारला तोच कोनशिला झाला.
Lecz on spojrzał na nich i zapytał: Cóż więc znaczy to, co jest napisane: Kamień, który odrzucili budujący, stał się kamieniem węgielnym?
18 १८ जो कोणी त्याच्यावर पडेल त्याचे तुकडे होतील परंतु ज्या कोणावर तो पडेल त्याचा चुराडा होईल.”
Każdy, kto upadnie na ten kamień, roztrzaska się, a na kogo on upadnie, zmiażdży go.
19 १९ नियमशास्त्राचे शिक्षक आणि मुख्य याजक लोक यांनी त्याचवेळी त्यास अटक करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना लोकांची भीती वाटत होती. त्यांना त्यास अटक करायचे होते, कारण त्यांना माहीत होते की, हा दाखला त्याने त्यांनाच उद्देशून सांगितला होता.
W tej właśnie godzinie naczelni kapłani i uczeni w Piśmie starali się dostać go w swoje ręce, ale bali się ludu. Zrozumieli bowiem, że przeciwko nim powiedział tę przypowieść.
20 २० तेव्हा त्यांनी त्याच्यावर पाळत ठेवली आणि त्यास बोलण्यांत धरून राज्यपालाच्या आणि अधिकाराच्या अधीन करावे म्हणून आपण प्रामाणिक धार्मिक आहोत असे भासविणारे हेर पाठवले.
Obserwowali go więc i posłali szpiegów, którzy udawali sprawiedliwych, aby go złapać za słowo, a potem wydać władzy i mocy namiestnika.
21 २१ म्हणून त्या हेरांनी त्यास प्रश्न विचारला. ते म्हणाले, “गुरुजी, आम्हास माहीत आहे की, जे योग्य ते तुम्ही बोलता व शिकविता आणि तुम्ही पक्षपात करीत नाही. तर सत्याने देवाचा मार्ग शिकविता.
I zapytali go: Nauczycielu, wiemy, że dobrze mówisz i uczysz, i nie masz względu na osobę, lecz drogi Bożej w prawdzie nauczasz.
22 २२ आम्ही कैसराला कर द्यावा हे योग्य आहे किंवा नाही?”
Czy wolno nam płacić podatek cesarzowi, czy nie?
23 २३ ते धूर्तपणे आपल्याला फसवू पाहत आहेत याची येशूला कल्पना होती. म्हणून तो त्यांना म्हणाला, “मला एक नाणे दाखवा.
Ale on, przejrzawszy ich podstęp, powiedział do nich: Czemu wystawiacie mnie na próbę?
24 २४ यावर कोणाची प्रतिमा व लेख आहे?” ते म्हणाले, “कैसराचा.”
Pokażcie mi grosz. Czyj nosi wizerunek i napis? I odpowiedzieli: Cesarza.
25 २५ तेव्हा तो त्यांना म्हणाला, “कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला द्या.”
Wtedy on im powiedział: Oddajcie więc cesarzowi to, co należy do cesarza, a Bogu to, co należy do Boga.
26 २६ तेव्हा लोकांसमोर तो जे काही बोलला त्यामध्ये त्यास धरणे त्यांना शक्य झाले नाही. त्याच्या उत्तराने ते आश्चर्यचकित झाले आणि निरुत्तर झाले.
I nie mogli [go] złapać za słowo w obecności ludu. Zdziwieni jego odpowiedzią, zamilkli.
27 २७ मग पुनरुत्थान नाही असे म्हणणारे काही सदूकी त्याच्याकडे आले. त्यांनी त्यास प्रश्न विचारला. ते म्हणाले,
Wówczas przyszli niektórzy z saduceuszy, którzy twierdzą, że nie ma zmartwychwstania, i pytali go:
28 २८ “गुरुजी मोशेने आमच्यासाठी लिहून ठेवले आहे की जर एखाद्याचा भाऊ मरण पावला व त्या भावाला पत्नी आहे पण मूल नाही, तर त्याच्या भावाने त्या विधवेशी लग्न करावे आणि भावासाठी त्यास मुले व्हावीत.
Nauczycielu, Mojżesz nam napisał: Jeśli czyjś brat umrze, mając żonę, a umrze bezdzietnie, to jego brat ma pojąć jego żonę i wzbudzić potomstwo swemu bratu.
29 २९ सात भाऊ होते. पहिल्या भावाने लग्न केले व तो मूल न होता मरण पावला.
Było więc siedmiu braci, z których pierwszy ożenił się i umarł bezdzietnie.
30 ३० नंतर दुसऱ्या भावाने तिच्याशी लग्न केले.
I ożenił się z nią drugi, lecz i ten umarł bezdzietnie.
31 ३१ नंतर तिसऱ्याने तिच्याशी लग्न केले. सातही भावांबरोबर तीच गोष्ट घडली. कोणालाही मुले न होता ते मरण पावले.
Potem ożenił się z nią także trzeci, podobnie aż do siódmego, a nie zostawiwszy dzieci, poumierali.
32 ३२ नंतर ती स्त्रीही मरण पावली.
W końcu umarła też ta kobieta.
33 ३३ तर मग पुनरुत्थानाच्या वेळी ती कोणाची पत्नी होईल? कारण त्या सातांनीही तिच्याबरोबर लग्न केले होते.”
Żoną którego z nich będzie więc przy zmartwychwstaniu? Siedmiu bowiem miało ją za żonę.
34 ३४ तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “या युगातले लोक लग्न करून घेतात व लग्न करून देतात. (aiōn )
Wtedy Jezus im odpowiedział: Dzieci tego świata żenią się i za mąż wychodzą. (aiōn )
35 ३५ परंतु जे लोक त्या येणाऱ्या युगामध्ये व मृतांच्या पुनरुत्थानामध्ये भाग घेण्यासाठी पात्र ठरतील, ते लग्न करून घेणार नाहीत आणि लग्न करून देणार नाहीत (aiōn )
Lecz ci, którzy są [uznani za] godnych dostąpienia tamtego świata i powstania z martwych, ani się żenić nie będą, ani za mąż wychodzić. (aiōn )
36 ३६ आणि ते मरणार नाहीत, कारण ते देवदूतासारखे आहेत. ते पुनरुत्थानाचे पुत्र असल्यामुळे ते देवाचे पुत्रही आहेत.
Nie mogą bowiem więcej umrzeć, bo są równi aniołom i będąc dziećmi zmartwychwstania, są dziećmi Bożymi.
37 ३७ जळत्या झुडुपाविषयी मोशेने लिहिले, तेव्हा त्याने परमेश्वरास ‘अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव’ असे म्हणले व मरण पावलेलेसुद्धा उठवले जातात हे दाखवून दिले.
A że umarli zmartwychwstaną, to i Mojżesz pokazał przy krzaku, gdy nazywa Pana Bogiem Abrahama, Bogiem Izaaka i Bogiem Jakuba.
38 ३८ देव मरण पावलेल्यांचा नाही तर जिवंतांचा देव आहे. सर्व लोक जे त्याचे आहेत ते जिवंत आहेत.”
Bóg przecież nie jest [Bogiem] umarłych, lecz żywych, bo dla niego wszyscy żyją.
39 ३९ तेव्हा काही नियमशास्त्राचे शिक्षक म्हणाले, “गुरुजी, उत्तम बोललात.”
Wtedy niektórzy z uczonych w Piśmie odezwali się: Nauczycielu, dobrze powiedziałeś.
40 ४० मग त्यास आणखी प्रश्न विचारण्याचे धाडस कोणी केले नाही.
I nie śmieli go już o nic pytać.
41 ४१ परंतु तो त्यांना म्हणाला, “ख्रिस्त दावीदाचा पुत्र आहे असे ते कसे म्हणतात?
On zaś powiedział do nich: Jak [to jest], że mówią, iż Chrystus jest synem Dawida?
42 ४२ कारण दावीद स्वतः स्तोत्राच्या पुस्तकात म्हणतो, ‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले,
A sam Dawid mówi w Księdze Psalmów: Powiedział Pan memu Panu: Siądź po mojej prawicy;
43 ४३ मी तुझ्या शत्रूला तुझ्या पादासन करीत नाही तोपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस,’
Aż położę twoich nieprzyjaciół jako podnóżek pod twoje stopy.
44 ४४ अशा रीतिने दावीद त्यास प्रभू म्हणतो, तर मग ख्रिस्त दावीदाचा पुत्र कसा?”
Jeśli więc Dawid nazywa go Panem, to jakże [może] być jego synem?
45 ४५ सर्व लोक हे ऐकत असतांना तो शिष्यांना म्हणाला,
A gdy wszyscy ludzie słuchali, powiedział do swoich uczniów:
46 ४६ “नियमशास्त्राच्या शिक्षकांविषयी सावध असा, त्यांना लांब झगे घालून फिरणे आवडते, त्यांना बाजारात नमस्कार घेण्यास, सभास्थानात महत्त्वाच्या आसनावर व मेजवानीच्या वेळी मानाच्या जागी बसणे आवडते.
Strzeżcie się uczonych w Piśmie, którzy lubią chodzić w długich szatach, kochają pozdrowienia na rynkach, pierwsze krzesła w synagogach i pierwsze miejsca na ucztach.
47 ४७ ते विधवांची घरे खाऊन फस्त करतात आणि देखाव्यासाठी लांब लांब प्रार्थना करतात. या मनुष्यांना अत्यंत वाईट शिक्षा होईल.”
Pożerają oni domy wdów i dla pozoru odprawiają długie modlitwy. Ci otrzymają surowszy wyrok.