< लूक 19 >

1 येशूने यरीहोत प्रवेश केला आणि त्यामधून जात होता.
A [Jezus] wszedł do Jerycha i przechodził przez nie.
2 तेव्हा पाहा, जक्कय नावाचा कोणीएक मनुष्य होता, तो मुख्य जकातदार असून खूप श्रीमंत होता.
[Był tam] pewien człowiek, imieniem Zacheusz, przełożony celników, a był on bogaty.
3 येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता.
Pragnął on zobaczyć Jezusa, kto to jest, lecz nie mógł z powodu tłumu, bo był niskiego wzrostu.
4 तेव्हा तो सर्वांच्या पुढे पळत गेला आणि येशूला पाहण्यासाठी एका उंबराच्या झाडावर चढला कारण तो त्याच रस्त्याने पुढे जाणार होता.
Pobiegł więc naprzód i wszedł na drzewo sykomory, aby go zobaczyć, bo miał tamtędy przechodzić.
5 मग येशू त्याठिकाणी येताच दृष्टी वर करून त्यास म्हणाला, “जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे.”
A gdy Jezus przyszedł na to miejsce, spojrzał w górę, zobaczył go i powiedział: Zacheuszu, zejdź szybko, bo dziś muszę zatrzymać się w twoim domu.
6 तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत-स्वागत केले.
I zszedł szybko, i przyjął go z radością.
7 हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की, “पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे.”
A wszyscy, widząc to, szemrali: Do człowieka grzesznego przybył w gościnę.
8 तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, “प्रभूजी, पाहा, मी आपले अर्धे धन गरिबांस देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असले तर ते चौपट परत करतो.”
Zacheusz zaś stanął i powiedział do Pana: Panie, oto połowę mojego majątku daję ubogim, a jeśli kogoś w czymś oszukałem, oddaję poczwórnie.
9 येशू त्यास म्हणाला, “आज या घराचे तारण झाले आहे कारण हा मनुष्यसुद्धा अब्राहामाचा मुलगा आहे.
I powiedział Jezus do niego: Dziś zbawienie przyszło do tego domu, gdyż i on jest synem Abrahama.
10 १० कारण मनुष्याचा पुत्र जे हरवलेले ते शोधण्यास आणि तारण्यास आला आहे.”
Bo Syn Człowieczy przyszedł, aby szukać i zbawić to, co zginęło.
11 ११ ते या गोष्टी ऐकत असता त्याने त्यास एक दाखलाही सांगितला कारण तो यरूशलेम शहराजवळ होता आणि देवाचे राज्य आताच प्रकट होणार आहे असे त्यांना वाटत होते.
A gdy oni tego słuchali, opowiedział im dodatkowo przypowieść, dlatego że był blisko Jerozolimy, a oni myśleli, że wnet ma się objawić królestwo Boże.
12 १२ तो म्हणाला, “कोणीएक उमराव, आपण राज्य मिळवून परत यावे या उद्देशाने दूरदेशी गेला.
Mówił więc: Pewien człowiek szlachetnego rodu udał się do dalekiego kraju, aby objąć królestwo, a potem wrócić.
13 १३ त्याने आपल्या दहा दासांना बोलावले व त्यांना दहा नाणी देऊन सांगितले, ‘मी येईपर्यंत त्यावर व्यापार करा.’
A przywoławszy dziesięciu swoich sług, dał im dziesięć grzywien i powiedział do nich: Obracajcie [nimi], aż wrócę.
14 १४ त्याच्या नगरचे लोक त्याचा द्वेष करत म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितले, ‘ह्याने आमच्यावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही.’
Lecz jego poddani nienawidzili go i wysłali za nim poselstwo ze słowami: Nie chcemy, aby ten [człowiek] królował nad nami.
15 १५ मग असे झाले कि, तो राज्य मिळवून पुन्हा परत आल्यावर ज्यांना त्याने व्यापाराकरिता पैसा दिला होता, त्यावर किती नफा झाला हे समजावे म्हणून दासांना आज्ञा देऊन त्यांना बोलावीले.
A gdy wrócił po objęciu królestwa, rozkazał przywołać do siebie te sługi, którym dał pieniądze, aby się dowiedzieć, co każdy zyskał, handlując.
16 १६ पहिला पुढे आला आणि म्हणाला, ‘धनी तुम्ही दिलेल्या नाण्यावर मी आणखी दहा नाणी मिळवली आहेत.’
Wtedy przyszedł pierwszy i powiedział: Panie, twoja grzywna zyskała dziesięć grzywien.
17 १७ तेव्हा तो त्यास म्हणाला, ‘चांगल्या दासा, छान केलेस, तू थोडक्यांविषयी विश्वासू झालास, म्हणून तू दहा नगरांवर अधिकारी होशील.’
I powiedział do niego: Dobrze, sługo dobry, ponieważ byłeś wierny w małym, sprawuj władzę nad dziesięcioma miastami.
18 १८ मग दुसरा आला व म्हणाला, ‘धनी, तुमच्या पाच नाण्यांवर मी पाच नाणी आणखी मिळवली.’
Przyszedł też drugi i powiedział: Panie, twoja grzywna zyskała pięć grzywien.
19 १९ आणि तो त्यास म्हणाला, ‘तू पाच नगरांवर अधिकारी असशील.’
Również temu powiedział: I ty władaj pięcioma miastami.
20 २० मग आणखी एक दास आला आणि म्हणाला, ‘धनी, आपण दिलेले नाणे मी हातरुमालात बांधून ठेवले होते.
A inny przyszedł i powiedział: Panie, oto twoja grzywna, którą miałem schowaną w chustce.
21 २१ आपण कठोर आहात, जे आपण ठेवले नाही, ते आपण काढता आणि जे पेरले नाही, ते कापता. म्हणून मला तुमची भीती वाटत होती,’
Bałem się bowiem ciebie, bo jesteś człowiekiem surowym: bierzesz, czego nie położyłeś, i żniesz, czego nie posiałeś.
22 २२ धनी त्यास म्हणाला, ‘दुष्ट दासा, तुझ्याच शब्दांनी मी तुझा न्याय करतो. तुला ठाऊक होते की मी कडक शिस्तीचा मनुष्य आहे. मी जे दिले नाही ते घेतो आणि जे पेरले नाही त्याची कापणी करतो,
Wtedy mu odpowiedział: Na podstawie twoich słów osądzę cię, zły sługo. Wiedziałeś, że jestem człowiekiem surowym, który bierze, czego nie położył, i żnie, czego nie posiał.
23 २३ तर तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस? मग जेव्हा मी परत आलो असतो तेव्हा ते मला व्याजासह मिळाले असते.’
Dlaczego więc nie dałeś moich pieniędzy do banku, abym po powrocie odebrał je z zyskiem?
24 २४ त्याच्याजवळ उभे राहणाऱ्यांना तो म्हणाला, ‘त्याच्यापासून ते नाणे घ्या आणि ज्याच्याजवळ दहा नाणी आहेत, त्यास द्या.’
Do tych zaś, którzy stali obok, powiedział: Odbierzcie mu grzywnę i dajcie temu, który ma dziesięć grzywien.
25 २५ ते त्यास म्हणाले, ‘धनी, त्याच्याजवळ दहा नाणी आहेत.’
Odpowiedzieli mu: Panie, ma [już] dziesięć grzywien.
26 २६ धन्याने उत्तर दिले, ‘मी तुम्हास सांगतो, ज्याच्याजवळ आहे, त्यास अधिक दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही, त्याच्याकडे जे काही असेल तेसुध्दा काढून घेतले जाईल.
Zaprawdę powiadam wam, że każdemu, kto ma, będzie dodane, a temu, kto nie ma, zostanie zabrane nawet to, co ma.
27 २७ परंतु मी राज्य करू नये अशी इच्छा करणाऱ्यांचा माझ्या शत्रूंना येथे आणा आणि माझ्यासमोर ठार मारा.’”
Lecz tych moich nieprzyjaciół, którzy nie chcieli, abym nad nimi panował, przyprowadźcie tu i zabijcie na moich oczach.
28 २८ येशूने या गोष्टी सांगितल्यावर तो वर यरूशलेम शहरापर्यंत गेला.
A powiedziawszy to, ruszył przodem, zmierzając do Jerozolimy.
29 २९ तो वर जातांना, जेव्हा तो जैतून डोंगर म्हटलेल्या टेकडीनजीक असलेल्या बेथफगे आणि बेथानीजवळ आला तेव्हा त्याने आपल्या दोन शिष्यांना असे सांगून पाठवले,
A gdy przybliżył się do Betfage i Betanii, przy górze zwanej Oliwną, wysłał dwóch ze swoich uczniów;
30 ३० व म्हटले, “तुमच्यासमोर असलेल्या खेड्यात जा. तुम्ही प्रवेश करताच, ज्यावर कोणी बसले नाही असे शिंगरु तुम्हास बांधलेले आढळेल. ते सोडून येथे आणा.
Mówiąc: Idźcie do wioski, która jest naprzeciwko, a wchodząc do niej, znajdziecie oślątko uwiązane, na którym nigdy nie siedział żaden człowiek. Odwiążcie je i przyprowadźcie.
31 ३१ जर तुम्हास कोणी विचारले की, ‘तुम्ही ते का सोडता? तर म्हणा की, प्रभूला याची गरज आहे.’”
A gdyby was ktoś spytał: Dlaczego [je] odwiązujecie? tak mu powiecie: Dlatego, że Pan go potrzebuje.
32 ३२ ज्यांना पाठवले होते, ते गेले आणि त्याने सांगितल्याप्रमाणे त्यास आढळले.
Wtedy odeszli ci, którzy zostali posłani, i znaleźli [wszystko], jak im powiedział.
33 ३३ ते शिंगरु सोडीत असता त्याचा मालक त्यांना म्हणाला, “तुम्ही शिंगरु का सोडता?”
A gdy odwiązywali oślątko, zapytali ich jego właściciele: Dlaczego odwiązujecie oślątko?
34 ३४ ते म्हणाले, “प्रभूला याची गरज आहे.”
A oni odpowiedzieli: Pan go potrzebuje.
35 ३५ त्यांनी ते येशूकडे आणले. त्यांनी आपले झगे शिंगरावर घातले आणि येशूला त्याच्यावर बसविले.
I przyprowadzili je do Jezusa, położyli swoje szaty na oślątko i wsadzili [na nie] Jezusa.
36 ३६ येशू रस्त्यावरुन जात असता लोक आपली वस्त्रे रस्त्यावर पसरीत होते.
Kiedy jechał, słali swoje szaty na drodze.
37 ३७ तो जेव्हा जैतून डोंगराच्या उतरावर आला तेव्हा सर्व शिष्यसमुदाय, त्यांनी जे चमत्कार पाहिले होते त्याबद्दल मोठ्या आनंदाने देवाची स्तुती करू लागला.
A gdy się już zbliżał do podnóża Góry Oliwnej, całe mnóstwo uczniów zaczęło radować się i donośnym głosem chwalić Boga za wszystkie cuda, które widzieli:
38 ३८ ते म्हणाले, “प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो! स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव.”
Mówili: Błogosławiony król, który przychodzi w imieniu Pana! Pokój w niebie i chwała na wysokościach!
39 ३९ जमावातील काही परूशी येशूला म्हणाले, “गुरुजी, आपल्या शिष्यांना गप्प राहण्यास सांगा.”
Lecz niektórzy faryzeusze spośród tłumu powiedzieli do niego: Nauczycielu, zgrom swoich uczniów.
40 ४० त्याने उत्तर दिले, “मी तुम्हास सांगतो, जर ते शांत बसतील तर हे धोंडे ओरडतील.”
A on im odpowiedział: Mówię wam, jeśli oni będą milczeć, wnet kamienie będą wołać.
41 ४१ तो जेव्हा जवळ आला व त्याने शहर पाहिले, तेव्हा तो त्यासाठी रडला आणि म्हणाला,
A gdy się przybliżył i zobaczył miasto, zapłakał nad nim;
42 ४२ “कोणत्या गोष्टी तुला शांती देतील ते जर आज तू जाणून घेतले असते तर! परंतु आता त्या तुझ्या नजरेपासून लपवून ठेवण्यात आल्या आहेत.
Mówiąc: O gdybyś i ty poznało, przynajmniej w tym twoim dniu, co służy twemu pokojowi! Lecz teraz zakryte jest [to] przed twoimi oczami.
43 ४३ तुझ्यावर असे दिवस येतील की, तुझे शत्रू तुझ्याभोवती कोट उभारतील. तुला वेढतील आणि सर्व बाजूंनी तुला कोंडीत पकडतील.
Przyjdą bowiem na ciebie dni, gdy twoi nieprzyjaciele otoczą cię wałem, oblegną cię i ścisną zewsząd.
44 ४४ ते तुला, तुझ्या मुलांना तुझ्या भिंतीच्या आत धुळीस मिळवतील व दगडावर दगड राहू देणार नाही कारण तू देवाचा तुझ्याकडे येण्याचा समय तू ओळखला नाही.”
Zrównają z ziemią ciebie i twoje dzieci, [które są] w tobie, i nie zostawią w tobie kamienia na kamieniu, dlatego żeś nie poznało czasu twego nawiedzenia.
45 ४५ येशूने परमेश्वराच्या भवनात प्रवेश केला व विक्री करीत होते त्यांना बाहेर घालवू लागला.
A gdy wszedł do świątyni, zaczął wyganiać tych, którzy w niej sprzedawali i kupowali;
46 ४६ आणि त्यांना म्हणाला, “पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, माझे घर प्रार्थनेचे घर होईल, पण तुम्ही ते लुटारुची गुहा केली आहे.”
Mówiąc im: Jest napisane: Mój dom jest domem modlitwy, a wy zrobiliście z niego jaskinię zbójców.
47 ४७ तो दररोज परमेश्वराच्या भवनात शिकवीत असे. मुख्य याजक लोक, नियमशास्त्राचे शिक्षक, लोकांचे पुढारी त्यास ठार मारण्याचा प्रयत्न करीत होते.
I nauczał każdego dnia w świątyni. Naczelni kapłani zaś i uczeni w Piśmie oraz przywódcy ludu szukali [sposobności], aby go zabić;
48 ४८ पण तसे करण्यासाठी त्यांना काही मार्ग सापडत नव्हता कारण सर्व लोक त्याचे मन लावून ऐकत असत.
Ale nie wiedzieli, co mogliby zrobić, bo wszyscy ludzie słuchali [go] z zapartym tchem.

< लूक 19 >