< लेवीय 9 >
1 १ आठव्या दिवशी मोशेने अहरोन, त्याचे पुत्र तसेच इस्राएलांचे वडील ह्यांना बोलावले.
Osmoga dana Mojsije pozva Arona, njegove sinove i starješine Izraelove
2 २ तो अहरोनाला म्हणाला, “पापार्पणासाठी एक निर्दोष गोऱ्हा व होमार्पणासाठी निर्दोष मेंढा आण आणि त्यांना परमेश्वरास अर्पण कर.
i reče Aronu: “Uzmi jedno tele za žrtvu okajnicu, jednoga ovna za žrtvu paljenicu, oboje bez mane, i dovedi ih pred Jahvu.
3 ३ आणि इस्राएल लोकांस असे सांग, ‘तुम्ही पापार्पणासाठी एक बकरा आणा व होमार्पणासाठी एक गोऱ्हा व एक कोकरु आणा; ही दोन्ही प्रत्येकी एक वर्षाची व निर्दोष असावीत;
A Izraelcima reci ovako: 'Uzmite jednoga jarca za žrtvu okajnicu, tele i janje od godine, oboje bez mane, za žrtvu paljenicu;
4 ४ आणि परमेश्वरासमोर शांत्यर्पणे करण्यासाठी बली म्हणून एक बैल, एक मेंढा व तेलात मळलेले अन्नार्पण आणा कारण आज परमेश्वर तुम्हास दर्शन देणार आहे.”
a junca i ovna za žrtvu pričesnicu da žrtvujete pred Jahvom; napokon prinosnicu, s uljem zamiješenu; jer će vam se danas Jahve ukazati.'”
5 ५ मग मोशेने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्व लोक आले व त्यांनी ते सर्व दर्शनमंडपाच्या दारापाशी आणले मग सर्वजण येऊन परमेश्वरासमोर उभे राहिले.
Dovedu oni pred Šator sastanka što je Mojsije naredio; naprijed stupi sva zajednica i stane pred Jahvu.
6 ६ तेव्हा मोशे म्हणाला, “परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही सर्वकाही करावे; मग परमेश्वराचे गौरव तुम्हास दिसेल.”
“Ovo je zapovijed”, reče Mojsije, “koju je Jahve izdao. Izvršite je, da vam se pokaže slava Jahvina.”
7 ७ मग मोशेने अहरोनाला सांगितले, “जा व परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्वकाही कर; वेदीजवळ जाऊन आपला पापबली व होमबली ह्यांचे अर्पण कर आणि स्वत: साठी व लोकांसाठी प्रायश्चित कर आणि लोकांकडील बलीही अर्पण करून त्यांच्यासाठी प्रायश्चित कर.”
Zatim Mojsije reče Aronu: “Stupi k žrtveniku, prinesi svoju žrtvu okajnicu i svoju žrtvu paljenicu i tako izvrši obred pomirenja za se i svoj dom; onda prinesi dar naroda i za nj izvrši obred pomirenja, kako je Jahve naredio.”
8 ८ तेव्हा अहरोन वेदीजळ गेला व त्याने स्वत: साठी पापार्पणाचा गोऱ्हा वधला.
Aron se primače žrtveniku i zakla tele žrtve za svoj vlastiti grijeh.
9 ९ मग अहरोनाचे पुत्र रक्त घेऊन त्याच्यापाशी गेले. तेव्हा त्याने आपले बोट त्यामध्ये बुडवून ते वेदीच्या शिंगांना लावले मग ते वेदीच्या पायथ्याशी ओतले.
Zatim mu Aronovi sinovi donesu krvi. On u nju zamoči svoj prst i stavi je na rogove žrtvenika. Potom ostalu krv izli podno žrtvenika.
10 १० त्याने पापार्पणाची चरबी, गुरदे व काळजावरील चरबीचा पडदा घेऊन त्यांचा वेदीवर परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणेच होम केला.
A loj, bubrege i privjesak s jetre žrtve okajnice sažeže u kad na žrtveniku, kako je Jahve naredio Mojsiju.
11 ११ मग अहरोनाने मांस व कातडे छावणीबाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकले.
Meso i kožu spali na vatri izvan tabora.
12 १२ नंतर त्याने होमबली वधला व त्याचे तुकडे केले; अहरोनाच्या मुलांनी त्या होमबलीचे रक्त अहरोनाकडे आणले तेव्हा त्याने ते वेदीवर व सभोवती शिंपडले.
Zakolje poslije toga žrtvu paljenicu, od koje mu sinovi Aronovi pruže krv. On njome zapljusne žrtvenik sa svih strana.
13 १३ नंतर अहरोनाच्या मुलांनी होमबलीचे तुकडे व त्याचे डोके अहरोनाकडे दिले आणि त्याने त्यांचा वेदीवर होम केला.
Dodaju mu i žrtvu paljenicu, dio po dio, a tako i glavu, i on je sažeže u kad na žrtveniku.
14 १४ त्याने त्याची आतडी व पाय धुवून त्यांचाही वेदीवर होम केला.
Drobinu i noge opere pa i njih na žrtveniku sažeže u kad povrh žrtve paljenice.
15 १५ मग त्याने लोकांचे अर्पण जवळ नेले व त्यांच्यासाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधला आणि पहिल्याप्रमाणेच तोसुध्दा पापार्पण म्हणून अर्पिला.
Zatim prinese dar naroda. Uze jarca žrtve okajnice za grijehe naroda, zakla ga i prinese kao žrtvu okajnicu, isto onako kao i prijašnju.
16 १६ त्याने होमबलीही जवळ नेऊन परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे तो अर्पिला.
Donese potom žrtvu paljenicu i prinese je prema propisu.
17 १७ मग त्याने अन्नार्पण वेदीजवळ नेले व त्यातले मूठभर घेऊन दररोज सकाळच्या होमार्पणासह तेही अर्पण केले.
Donijevši poslije toga žrtvu prinosnicu, od nje zagrabi pregršt i sažeže na žrtveniku u kad povrh jutarnje žrtve paljenice.
18 १८ लोकांसाठी शांत्यर्पणे म्हणून आणलेला बैल व मेंढा हे त्याने वधले आणि त्याच्या मुलांनी त्या बलींचे व मेंढ्याचे रक्त अहरोनाकडे आणले तेव्हा त्याने ते वेदीवर व सभोवती शिंपडले.
Napokon zakolje junca i ovna kao žrtvu pričesnicu za narod. Aronovi mu sinovi pruže krv, a on zapljusne žrtvenik sa svih strana;
19 १९ अहरोनाच्या मुलांनी बैलाची व मेंढ्याची चरबी, चरबीदार शेपूट, आंतड्यावरील चरबी, गुरदे आणि काळजावरील चरबीचा पडदा ही सर्व अहरोनाकडे आणली.
dodaju mu i loj s junca i ovna, pretili rep, loj oko drobine, bubrege i privjesak s jetre.
20 २० त्यांनी ती सर्व चरबी त्या बलींच्या ऊराच्या भागावर ठेवली; मग अहरोनाने त्या सर्वाचा वेदीवर होम केला.
Metnuvši te masne dijelove na grudi, sažga ih u kad na žrtveniku.
21 २१ अहरोनाने बलींचे ऊर व उजवी मांडी ही मोशेच्या सांगण्याप्रमाणे परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळली.
A grudi i desno pleće Aron prinese kao žrtvu prikaznicu pred Jahvom, kako je Mojsije naredio.
22 २२ मग अहरोनाने लोकांकडे वळून, हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला आणि ज्या वेदीवर त्याने पापार्पण, होमार्पण, व शांत्यर्पणे केली होती तेथून तो खाली आला.
Tada Aron podiže ruke spram naroda i blagoslovi ga. Pošto prinese žrtvu okajnicu, paljenicu i pričesnicu, siđe.
23 २३ मोशे व अहरोन दर्शनमंडपामध्ये गेले आणि बाहेर आल्यावर त्यांनी लोकांस आशीर्वाद दिला; तेव्हा परमेश्वराचे तेज सर्व लोकांस दिसले;
Poslije toga Mojsije i Aron uđoše u Šator sastanka. Kad iziđoše, blagosloviše narod. Slava Jahvina pokaza se svemu narodu.
24 २४ तेव्हा परमेश्वरासमोरून अग्नी निघाला व त्याने वेदीवरील होमार्पण व चरबी भस्म केली; हे पाहून सर्व लोकांनी जयजयकार केला व दंडवत घातले.
Ispred Jahve izbi oganj i sažga žrtvu paljenicu i masne komade na žrtveniku. A sav narod, vidjevši to, viknu od veselja i pade ničice.