< एज्रा 1 >
1 १ पारसाचा राजा कोरेश ह्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी यिर्मयाच्या तोंडून परमेश्वराने दिलेले वचन पूर्ण व्हावे याकरीता परमेश्वराने राजा कोरेश्याच्या आत्म्याला प्रेरणा दिली. कोरेशाने त्याच्या राज्यामध्ये घोषणा केली, त्याने जे सांगितले व लिहिले होते ते असे आहे.
and in/on/with year one to/for Cyrus king Persia to/for to end: destroy word LORD from lip Jeremiah to rouse LORD [obj] spirit Cyrus king Persia and to pass voice: message in/on/with all royalty his and also in/on/with writing to/for to say
2 २ “पारसाचा राजा कोरेश म्हणतो, स्वर्गातील परमेश्वर देवाने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली आहेत आणि यहूदातील यरूशलेमात त्याचे मंदिर बांधण्यासाठी त्याने मला निवडले आहे.
thus to say Cyrus king Persia all kingdom [the] land: country/planet to give: give to/for me LORD God [the] heaven and he/she/it to reckon: overseer upon me to/for to build to/for him house: home in/on/with Jerusalem which in/on/with Judah
3 ३ जो इस्राएलाचा देव परमेश्वर त्याच्या सर्व लोकांपैकी जो कोणी तुम्हामध्ये आलेला आहे, त्याचा देव तुम्हासोबत आहे. तुम्ही यहूदातील यरूशलेमास वर जाऊन, जो इस्राएलाचा व यरूशलेमेचा देव, त्या परमेश्वर देवासाठी मंदिर बांधावे.
who? in/on/with you from all people his to be God his with him and to ascend: rise to/for Jerusalem which in/on/with Judah and to build [obj] house: temple LORD God Israel he/she/it [the] God which in/on/with Jerusalem
4 ४ तसेच राज्यातील इतर भागात जे कोणी वाचलेले लोक आहेत, त्यांनी त्या भागातून यरूशलेमेत देवाच्या मंदिरासाठी स्वखुशीचे अर्पण देऊन सोने, चांदी व धन, गुरेढोरे इत्यादी गोष्टीचा त्यांना पुरवठा करावा.”
and all [the] to remain from all [the] place which he/she/it to sojourn there to lift: aid him human place his in/on/with silver: money and in/on/with gold and in/on/with property and in/on/with animal with [the] voluntariness to/for house: temple [the] God which in/on/with Jerusalem
5 ५ तेव्हा यहूदा व बन्यामिनाच्या घराण्यातील प्रमुखांनी, याजक व लेवी आणि प्रत्येकजण ज्यांना देवाने प्रेरणा दिली होती ते उत्साहाने परमेश्वराचे मंदीर बांधण्यासाठी यरूशलेमेला जाण्यास सिद्ध झाले.
and to arise: rise head: leader [the] father to/for Judah and Benjamin and [the] priest and [the] Levi to/for all to rouse [the] God [obj] spirit his to/for to ascend: rise to/for to build [obj] house: temple LORD which in/on/with Jerusalem
6 ६ जे लोक त्यांच्या सभोवती राहत होते, त्यांनी मंदिराच्या कामासाठी सोने व चांदीच्या वस्तू, धन, जनावरे, मौल्यवान वस्तू व खुशीचे अर्पण देऊन सहाय्य केले.
and all around them to strengthen: strengthen in/on/with hand their in/on/with article/utensil silver: money in/on/with gold in/on/with property and in/on/with animal and in/on/with precious thing to/for alone: besides upon all be willing
7 ७ यरूशलेम मधून परमेश्वराच्या मंदिरातील जी पात्रे नबुखद्नेस्सराने काढून आपल्या स्वतःच्या देव-घरात ठेवली होती, ती कोरेश राजाने बाहेर काढली.
and [the] king Cyrus to come out: send [obj] article/utensil house: temple LORD which to come out: send Nebuchadnezzar from Jerusalem and to give: put them in/on/with house: temple God his
8 ८ ती पारसाचा राजा कोरेशाने, आपला खजिनदार मिथ्रदाथ याच्या हाती दिली. त्याने ती शेशबस्सर या यहूदी अधिकाऱ्याला मोजून दिली.
and to come out: send them Cyrus king Persia upon hand: power Mithredath [the] treasurer and to recount them to/for Sheshbazzar [the] leader to/for Judah
9 ९ त्यांची संख्या याप्रमाणे होती: तीस सोन्याच्या पराती, एक हजार चांदीच्या पराती, एकोणतीस सुऱ्या,
and these number their basin gold thirty basin silver: money thousand knife nine and twenty
10 १० तीस सोन्याच्या वाट्या, चारशे दहा चांदीच्या वाट्या, आणि एक हजार इतर पात्रे,
bowl gold thirty bowl silver: money second four hundred and ten article/utensil another thousand
11 ११ सोन्याची व चांदीची सर्व मिळून एकूण पाच हजार चारशे पात्रे होती. तेव्हा शेशबस्सराने बाबेलमधून यरूशलेमेस गेलेल्या बंदीवासातील कैद्यांसोबत ही सर्व पात्रे आणली.
all article/utensil to/for gold and to/for silver: money five thousand and four hundred [the] all to ascend: establish Sheshbazzar with to ascend: establish [the] captivity from Babylon to/for Jerusalem