Preface
Read
+
Publisher
Nainoia, Inc.
PO Box 462, Bellefonte, PA 16823
(814) 470-8028
Nainoia Inc, Publisher
LinkedIn/NAINOIA-INC
Third Party Publisher Resources
Request Custom Formatted Verses
Please contact us below
Submit your proposed corrections
I understand that the Aionian Bible republishes public domain and Creative Commons Bible texts and that volunteers may be needed to present the original text accurately. I also understand that apocryphal text is removed and most variant verse numbering is mapped to the English standard. I have entered my corrections under the verse(s) below. Proposed corrections to the Marathi Bible, Ezra Chapter 1 https://www.AionianBible.org/Bibles/Marathi---Marathi-Bible/Ezra 1 १) पारसाचा राजा कोरेश ह्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी यिर्मयाच्या तोंडून परमेश्वराने दिलेले वचन पूर्ण व्हावे याकरीता परमेश्वराने राजा कोरेश्याच्या आत्म्याला प्रेरणा दिली. कोरेशाने त्याच्या राज्यामध्ये घोषणा केली, त्याने जे सांगितले व लिहिले होते ते असे आहे. 2 २) “पारसाचा राजा कोरेश म्हणतो, स्वर्गातील परमेश्वर देवाने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली आहेत आणि यहूदातील यरूशलेमात त्याचे मंदिर बांधण्यासाठी त्याने मला निवडले आहे. 3 ३) जो इस्राएलाचा देव परमेश्वर त्याच्या सर्व लोकांपैकी जो कोणी तुम्हामध्ये आलेला आहे, त्याचा देव तुम्हासोबत आहे. तुम्ही यहूदातील यरूशलेमास वर जाऊन, जो इस्राएलाचा व यरूशलेमेचा देव, त्या परमेश्वर देवासाठी मंदिर बांधावे. 4 ४) तसेच राज्यातील इतर भागात जे कोणी वाचलेले लोक आहेत, त्यांनी त्या भागातून यरूशलेमेत देवाच्या मंदिरासाठी स्वखुशीचे अर्पण देऊन सोने, चांदी व धन, गुरेढोरे इत्यादी गोष्टीचा त्यांना पुरवठा करावा.” 5 ५) तेव्हा यहूदा व बन्यामिनाच्या घराण्यातील प्रमुखांनी, याजक व लेवी आणि प्रत्येकजण ज्यांना देवाने प्रेरणा दिली होती ते उत्साहाने परमेश्वराचे मंदीर बांधण्यासाठी यरूशलेमेला जाण्यास सिद्ध झाले. 6 ६) जे लोक त्यांच्या सभोवती राहत होते, त्यांनी मंदिराच्या कामासाठी सोने व चांदीच्या वस्तू, धन, जनावरे, मौल्यवान वस्तू व खुशीचे अर्पण देऊन सहाय्य केले. 7 ७) यरूशलेम मधून परमेश्वराच्या मंदिरातील जी पात्रे नबुखद्नेस्सराने काढून आपल्या स्वतःच्या देव-घरात ठेवली होती, ती कोरेश राजाने बाहेर काढली. 8 ८) ती पारसाचा राजा कोरेशाने, आपला खजिनदार मिथ्रदाथ याच्या हाती दिली. त्याने ती शेशबस्सर या यहूदी अधिकाऱ्याला मोजून दिली. 9 ९) त्यांची संख्या याप्रमाणे होती: तीस सोन्याच्या पराती, एक हजार चांदीच्या पराती, एकोणतीस सुऱ्या, 10 १०) तीस सोन्याच्या वाट्या, चारशे दहा चांदीच्या वाट्या, आणि एक हजार इतर पात्रे, 11 ११) सोन्याची व चांदीची सर्व मिळून एकूण पाच हजार चारशे पात्रे होती. तेव्हा शेशबस्सराने बाबेलमधून यरूशलेमेस गेलेल्या बंदीवासातील कैद्यांसोबत ही सर्व पात्रे आणली. Additional comments?
Refresh Captcha
The world's first Holy Bible un-translation!