< १ करि. 9 >
1 १ मी स्वतंत्र नाही काय? मी प्रेषित नाही काय? मी आपल्या प्रभू येशूला पाहिले नाही काय? प्रभूच्या ठायी तुम्ही माझे काम आहात ना?
Bin ich nicht frei? Bin ich nicht ein Apostel? Habe ich nicht Jesus Christus, unseren Herrn, gesehen? Seid ihr nicht mein Werk im Herrn?
2 २ जरी मी इतरांकरता प्रेषित नसलो, तरी निःसंशय मी तुमच्याकरता आहे कारण तुम्ही प्रभूमध्ये माझ्या प्रेषितपणाचा शिक्का आहात.
Bin ich anderen nicht Apostel, so bin ich es doch euch; denn das Siegel meines Apostelamtes seid ihr in dem Herrn.
3 ३ माझी चौकशी करणार्यांना हे माझे प्रत्युत्तर आहे:
Solches ist meine Verantwortung gegen die, so mich richten.
4 ४ आम्हास खाण्यापिण्याचा अधिकार नाही काय?
Haben wir nicht die Freiheit, zu essen und zu trinken?
5 ५ इतर प्रेषित, प्रभूचे भाऊ किंवा केफा, हे करतात त्याप्रमाणे आम्हास कोणी विश्वासी बहीण पत्नी करून घेऊन, बरोबर नेण्याचा अधिकार नाही काय?
Haben wir nicht auch das Recht, eine Schwester als Weib mit umher zu führen, wie auch die anderen Apostel und die Brüder des Herrn und Kephas tun?
6 ६ किंवा केवळ मला आणि बर्णबाला काम न करण्याचा अधिकार नाही काय?
Oder haben wir, ich und Barnabas, allein nicht das Recht, nicht zu arbeiten?
7 ७ स्वतःच्या खर्चाने सैनिक म्हणून सेवा करणारा असा कोण आहे? कोण द्राक्षमळा लावतो आणि त्याचे फळ खात नाही? किंवा कोण कळप राखतो आणि कळपाच्या दुधातून पीत नाही?
Wer zieht ins Feld mit eigener Beköstigung? Wer pflanzt einen Weinberg und ißt nicht von seiner Frucht? Oder wer hütet nicht eine Herde und genießt nicht von der Milch der Herde?
8 ८ मी या गोष्टी लोकरीतीस अनुसरून सांगतो काय? नियमशास्त्र हेच सांगत नाही काय?
Sage ich dies nur nach Menschenweise, oder sagt es nicht auch das Gesetz?
9 ९ कारण, मोशेच्या नियमशास्त्रात लिहिले आहे की, ‘मळणी करीत असलेल्या बैलाला मुसके घालू नको.’ देव केवळ बैलांची काळजी करतो काय?
In Moses Gesetz steht geschrieben: Du sollst dem Ochsen, der da drischt, nicht das Maul verbinden. Sorget Gott für die Ochsen?
10 १० किंवा सर्वस्वी आपल्याकरता तो हे म्हणतो? हे निःसंशय आपल्याकरता लिहिले आहे म्हणजे जो नांगरतो त्याने आशेने नांगरावे आणि जो मळणी करतो त्याने आपण वाटेकरी होऊ या आशेने करावी.
Oder sagt er es vielmehr um unsertwillen? Von uns ja steht geschrieben, daß, der da pflügt, soll auf Hoffnung pflügen, und der da drischt,
11 ११ आम्ही तुमच्यात जर आत्मिक गोष्टी पेरल्या आहेत, तर आम्ही तुमच्या दैहिक गोष्टींची कापणी केल्यास त्यामध्ये मोठे काय आहे?
Wenn wir für euch das Geistige gesät haben, ist es da etwas Großes, wenn wir von euch euer Leibliches ernten.
12 १२ जर दुसरे तुमच्यावरील या अधिकाराचे वाटेकरी होतात, तर आम्ही विशेषेकरून का होऊ नये? आणि तरी आम्ही या अधिकाराचा उपयोग केला नाही, पण ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला आम्ही अडखळण करू नये म्हणून, आम्ही सर्व गोष्टी सहन करतो.
Wenn andere dieses Recht bei euch genießen, warum nicht vielmehr wir? Aber wir haben solches Recht nicht angesprochen, sondern halten alles aus, auf daß wir dem Evangelium Christi kein Hindernis bereiten.
13 १३ जे निवास्थानाचा भवनातील पवित्र वस्तूंची सेवा करतात ते भवनातील अन्न खातात आणि जे वेदीपुढे उभे राहतात ते वेदीचे भागीदार होतात, हे तुम्ही जाणत नाही काय?
Wisset ihr nicht, daß die, so für das Heiligtum arbeiten, vom Tempel gespeist werden? die so des Altars warten, ihren Anteil am Altaropfer haben?
14 १४ प्रभूने त्याचप्रमाणे आज्ञा दिली आहे की, जे शुभवर्तमानाची घोषणा करतात त्यांचा शुभवर्तमानावर निर्वाह व्हावा,
Also hat auch der Herr verordnet, daß die, so das Evangelium verkündigen, vom Evangelium leben sollen.
15 १५ पण ह्यातील कोणत्याच गोष्टीचा मी कधी उपयोग केला नाही किंवा माझ्यासाठी तसे करावे म्हणून मी या गोष्टी लिहिल्या नाहीत कारण हे माझे अभिमान मिरवणे कोणी निरर्थक करण्यापेक्षा मला मरणे बरे वाटेल.
Ich aber habe deren nichts angesprochen, ich schreibe das nicht, daß es mit mir also gehalten werden sollte, denn es wäre mir lieber, ich stürbe, als daß mir einer meinen Ruhm zunichte machte.
16 १६ कारण जरी मी शुभवर्तमान सांगतो, तरी अभिमान मिरवण्यास मला कारण नाही कारण मला हे करणे भाग आहे; मी शुभवर्तमान सांगणार नाही, तर मला हाय.
Denn wenn ich das Evangelium predige, habe ich keinen Ruhm, denn ich muß so tun; denn wehe mir, wenn ich es nicht sollte predigen!
17 १७ कारण, मी हे स्वेच्छेने केले, तर मला वेतन मिळेल, पण माझ्या इच्छेविरुद्ध असेल, तर माझ्यावर हा कारभार सोपविला गेला आहे.
Tue ich es gerne, so habe ich Lohn; tue ich es ungern, so bin ich doch mit dem Haushalteramte betraut.
18 १८ तर मग माझे वेतन काय? एवढेच की, मी शुभवर्तमान सांगताना, ते फुकट सांगावे आणि शुभवर्तमानाविषयीच्या माझ्या अधिकाराचा मी दुरुपयोग करू नये.
Was ist denn nun mein Lohn? Daß ich das Evangelium predige und das Evangelium von Christus unentgeltlich gebe, so daß ich bei Verkündigung des Evangeliums nicht mein Recht anspreche.
19 १९ कारण मी सर्वांपासून स्वतंत्र असलो तरी अधिक लोक मिळवावेत म्हणून मी सर्वाचा दास झालो.
Denn obgleich ich frei bin von allen, habe ich mich allen zum Knechte gemacht, auf daß ich desto mehrere gewinne;
20 २० मी यहूद्यांना मिळविण्यास, यहूद्यांना यहुद्यांसारखा झालो; मी नियमशास्त्राधीन नसलो तरी मी नियमशास्त्राधीन असलेले मिळविण्यास, नियमशास्त्राधीन असल्यासारखा झालो.
Und bin den Juden geworden wie ein Jude, auf daß ich Juden gewönne; denen, die unter dem Gesetz stehen, wie einer, der unter dem Gesetz steht,
21 २१ (मी देवाच्या नियमाबाहेर नाही, पण ख्रिस्ताच्या नियमाखाली असल्यामुळे) मी नियमशास्त्राधीन नसलेले मिळविण्यास, नियमशास्त्राधीन नसलेल्यांना नियमशास्त्राधीन नसल्यासारखा झालो.
Den nicht unter dem Gesetz Stehenden bin ich gesetzlos geworden
22 २२ आणि मी दुर्बळ असलेले मिळविण्यास, दुर्बळांना दुर्बळासारखा झालो. मी सर्वांना सर्व झालो आहे, म्हणजे सर्वकाही करून मी कित्येकांचे तारण करावे.
Den Schwachen bin ich geworden wie ein Schwacher, auf daß ich die Schwachen gewönne; ich bin allen alles geworden, auf daß ich irgendwie welche errettete.
23 २३ आणि मी हे सर्वकाही शुभवर्तमानाकरीता करतो, म्हणजे मीही तिच्यात सहभागी व्हावे.
Solches tue ich um des Evangeliums willen, um ein Mitteilhaber an demselben zu werden.
24 २४ शर्यतीत धावणारे सगळेच धावतात पण एकालाच बक्षीस मिळते, हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून असे धावा की, ते तुम्ही मिळवाल.
Wisset ihr nicht, daß die, so auf der Rennbahn laufen, zwar alle laufen, einer aber den Preis erhält? So laufet denn so, daß ihr ihn erhaltet.
25 २५ स्पर्धेसाठी मेहनत करणारा प्रत्येक मनुष्य प्रत्येक गोष्टीत संयमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळविण्यासाठी करतात, पण आपण अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी करतो.
Jedem Wettkämpfer ist Enthaltsamkeit vonnöten. Diese tun es, auf daß sie einen vergänglichen Siegeskranz erlangen, wir aber einen unvergänglichen.
26 २६ म्हणून तसा मी धावतो, निरर्थक नाही, मी तसे मुष्टिप्रहार करतो, हवेवर प्रहार करणार्यासारखे नाही.
Ich laufe denn nicht ins Ungewisse, und kämpfe so, indem ich nicht in die Luft schlage.
27 २७ पण मी माझे शरीर दाबाखाली दास्यात ठेवतो; नाही तर, दुसर्यांना घोषणा केल्यावर मी स्वतः, काही कारणाने, कसोटीस न उतरलेला होईन.
Sondern ich zerschlage mir den Leib und führe ihn gefangen, auf daß ich, indem ich anderen predige, nicht selbst verwerflich werde.