< २ करि. 1 >
1 १ देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल आणि बंधू तीमथ्य ह्यांजकडून; करिंथ शहरातील देवाच्या मंडळीस व सर्व अखया प्रांतातील सर्व पवित्र जणांस सलाम,
Paulus, ein Apostel Jesu Christi durch den Willen Gottes, und Timotheus, der Bruder, an die Gemeinde Gottes in Korinth, samt allen Heiligen in ganz Achaja:
2 २ देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हास कृपा व शांती असो.
Gruß euch und Friede von Gott unserem Vater und Herrn Jesus Christus!
3 ३ आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता, जो दयाळू पिता व सर्व सांत्वन करणारा देव तो धन्यवादित असो.
Gelobt sei Gott und der Vater unseres Herrn Jesus Christus, der Vater der Barmherzigkeit und der Gott allen Trostes,
4 ४ तो आमच्या सर्व संकटात आमचे सांत्वन करतो; यासाठी की, ज्या सांत्वनाने आमचे स्वतःचे देवाकडून सांत्वन होते. त्या सांत्वनाने आम्ही, जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे.
Der uns tröstet in aller unserer Trübsal, so daß wir auch euch trösten können in aller Trübsal, mit dem Trost, womit wir selbst von Gott getröstet werden.
5 ५ कारण ख्रिस्ताची दुःखे जशी आमच्यावर पुष्कळ येतात तसे ख्रिस्ताकडून आमचे सांत्वनही पुष्कळ होते.
Denn gleichwie wir viel von Christus Leiden haben, also haben wir auch durch Christus des Trostes viel.
6 ६ आणि आम्हावर संकट येते ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे म्हणून येते आणि आम्हास सांत्वन मिळते ते तुमचे सांत्वन व्हावे म्हणून मिळते; म्हणजे असे की, जी दुःखे आम्ही सोशीत आहोत, ती धीराने सहन करण्यास तुम्हास सामर्थ्य मिळते.
Haben wir aber Trübsal, so geschieht es zu eurem Trost und Heil; oder werden wir getröstet, so geschieht es auch zum Trost für euch, der sich wirksamer erweist in Ertragung derselben Leiden, die auch wir erleiden. Auch steht unsere Hoffnung fest euretwegen,
7 ७ आणि तुमच्याविषयीची आमची आशा बळकट आहे कारण आम्ही हे जाणतो की, तुम्ही दुःखांचे भागीदार आहात तसेच सांत्वनाचेही भागीदार आहात.
Weil wir wissen, daß ihr, wie der Leiden, so auch des Trostes teilhaftig seid.
8 ८ बंधूंनो, आमच्यावर आशियात जे संकट आले त्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी आमची इच्छा नाही; ते असे की, आम्ही इतके, शक्तीपलीकडे, अतिशयच दडपले गेलो की, आम्ही आमच्या जिवंत राहण्याविषयीची आशासुद्धा सोडून दिली होती.
Denn wir wollen euch nicht vorenthalten, Brüder, welche Trübsal uns in Asien widerfahren ist, daß wir über die Maßen und über Vermögen beschwert wurden, also, daß wir selbst am Leben verzweifelten;
9 ९ खरोखर आम्हास वाटत होते की, आम्ही मरणारच, पण आम्ही स्वतःवर विश्वास ठेवू नये, तर जो देव मरण पावलेल्यांना उठवतो त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवावा, म्हणून हे घडले.
Und hatten bei uns selbst das Todesurteil gesprochen, auf daß wir nicht auf uns selbst vertraueten, sondern auf den Gott, Der die Toten auferweckt.
10 १० त्याने आम्हास मरणाच्या मोठ्या संकटातून सोडवले, तो आता सोडवत आहे आणि तो आम्हास ह्यापुढेही सोडवील, अशी त्याच्याविषयी आमची आशा आहे.
Der uns von solchem Tode errettet hat und errettet; und wir haben auf Ihn die Hoffnung gesetzt, daß Er auch ferner uns erretten wird,
11 ११ तुम्ही देखील आमच्यासाठी प्रार्थना करून आमचे सहाय्य करावे; मग पुष्कळ लोक आमच्यासाठी उपकार मानतील की त्यांच्या पुष्कळ प्रार्थनांमुळे देवाने आम्हास कृपा दिली आहे.
Indem auch ihr durch euer Gebet uns unterstützt, auf daß für die Gnadengabe, die uns durch vieler Gebet zuteil geworden ist, auch von vielen unsertwegen gedankt werde.
12 १२ आम्हास अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सद्सदविवेकबुद्धीची साक्ष होय. आम्ही मनुष्याच्या ज्ञानाने नव्हे, तर देवाच्या कृपेने, देवाच्या पवित्रतेने व प्रामाणिकपणे जगात आणि विशेषतः तुमच्याशी वागलो.
Denn das ist unser Ruhm, das Zeugnis unseres Gewissens, daß wir in Einfalt und gottgefälliger Lauterkeit
13 १३ कारण तुम्हास वाचता येतात किंवा समजतात, त्यावाचून दुसऱ्या गोष्टी आम्ही तुम्हास लिहीत नाही आणि शेवटपर्यंत तुम्ही नीट समजून घ्याल अशी मी आशा धरतो.
Denn wir schreiben euch nichts anderes, als was ihr leset und auch selbst erkennt, und wie ich hoffe, bis an das Ende erkennen werdet,
14 १४ त्याप्रमाणे तुम्ही काही अंशी आम्हास मान्यता दिली की, जसे आपल्या प्रभू येशूच्या दिवशी तुम्ही आमच्या अभिमानाचा विषय आहा, तसेच आम्ही तुमच्या अभिमानाचा आहोत.
Wie ihr auch zum Teil schon erkannt habt, daß wir euer Ruhm sind, wie auch ihr der unsrige seid, auf den Tag des Herrn Jesus.
15 १५ आणि मी या विश्वासामुळे असे योजले होते की, प्रथम मी तुमच्याकडे यावे, म्हणजे तुम्हास दोन भेटीचा फायदा व्हावा.
Und auf dieses Vertrauen hin wollte ich früher zu euch kommen, auf daß ihr abermals eine Wohltat empfinget,
16 १६ मी मासेदोनियाला जाताना तुम्हास भेटण्याची योजना केली आणि मासेदोनियाहून परत येताना तुमच्याकडे येण्याचे ठरवले आणि त्यानंतर तुम्ही मला यहूदीयाकडे वाटेस लावावे.
Und von euch nach Mazedonien reisen, und wieder von Mazedonien aus zu euch kommen, und mich von euch nach Judäa geleiten lassen.
17 १७ असा विचार करीत असता, मी चंचलपणा केला काय? किंवा मी जे योजतो ते देहाला अनुसरून योजतो काय? म्हणजे मी माझे एकाच वेळेला ‘होय, होय’ आणि ‘नाही, नाही’ असे म्हणतो काय?
Habe ich, als ich diesen Vorsatz faßte, mich des Leichtsinns schuldig gemacht? oder fasse ich meine Vorsätze nach dem Fleisch, so daß das Ja oder Nein bei mir stünde?
18 १८ पण जसा देव विश्वसनीय आहे; तसे आमचे तुमच्याबरोबरचे बोलणे ‘होय’ आणि ‘नाही’ असे नाही.
Aber Gott ist getreu und so war mein Wort an euch nicht Ja und Nein;
19 १९ कारण आम्ही, म्हणजे मी, सिल्वान व तीमथ्य मिळून, तुमच्यात ज्याची घोषणा केली तो देवाचा पुत्र येशू ख्रिस्त होय किंवा नाही असा नव्हता तर त्याच्यात होय अशीच होती.
Denn Gottes Sohn, Jesus Christus, Der unter euch durch uns gepredigt worden ist,
20 २० कारण देवाची सर्व वचने त्याच्यात ‘होय’ अशी आहेत, म्हणून आपण देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे ‘आमेन’ म्हणतो.
Denn so viele Verheißungen Gottes da sind, die sind in Ihm Ja, und in Ihm Amen, zur Verherrlichung Gottes durch uns.
21 २१ आता, जो आम्हास अभिषेक करून तुमच्याबरोबर ख्रिस्तात सुस्थिर करीत आहे तो देव आहे.
Gott aber ist es, Der uns mit euch im Glauben an Jesus Christus befestigt und uns gesalbt hat;
22 २२ तसाच त्याने आपल्यावर शिक्का मारला आहे आणि जो येणार आहे त्याबद्दलची खात्री म्हणून आमच्या अंतःकरणात आपला पवित्र आत्मा हा विसार दिला आहे.
Der uns besiegelt, und das Pfand des Geistes in unsere Herzen gegeben hat.
23 २३ मी देवाला साक्षी होण्यासाठी हाक मरुन आपल्या जीवाची शपथ घेऊन सांगतो की तुमच्याशी कठोर व्यवहार करू नये म्हणून मी करिंथला आलो नाही.
Ich rufe aber Gott zum Zeugen auf über meine Seele, daß ich euch schonen wollte, indem ich nicht nach Korinth gekommen bin.
24 २४ आम्ही तुमच्या विश्वासावर अधिकार गाजवितो असे नाही पण आम्ही तुमच्या आनंदात तुमचे सहकारी आहोत कारण तुम्ही विश्वासाने उभे आहात.
Nicht als ob wir Herrschaft über euren Glauben ansprächen, sondern weil wir Mithelfer eurer Freude sind; denn ihr steht ja fest im Glauben.