< Psalmi 48 >
1 Koraha bērnu dziesma. Dziedātāju vadonim. Tas Kungs ir liels un ļoti teicams mūsu Dieva pilsētā Viņa svētā kalnā.
१कोरहाच्या पुत्राचे स्तोत्रगीत. आमच्या देवाच्या नगरात, त्याच्या पवित्र पर्वतावर, परमेश्वर थोर आणि परमस्तुत्य आहे.
2 Jauki paceļas Ciānas kalns, visas zemes prieks, ziemeļa pusē, tā lielā Ķēniņa pilsēta.
२सियोन डोंगर, जो थोर राजाची नगरी आहे, पृथ्वीच्या बाजूस आहे, त्याचे सौंदर्य उच्चतेवर, सर्व पृथ्वीवर आनंद आणते.
3 Dievs viņas pilīs ir atzīts par patvērumu.
३देवाने तिच्या राजमहालांमध्ये आपणास आश्रयदुर्ग असे प्रगट केले आहे.
4 Jo redzi, ķēniņi sapulcējās un atnāca kopā;
४कारण, पाहा, राजे एकत्र येत आहेत, ते एकत्र येऊन चढाई करून आले.
5 Tie redzēja un brīnījās, tie iztrūcinājās un steidzās projām.
५त्यांनी पाहिले आणि ते विस्मित झाले. ते निराश झाले आणि पळत सुटले.
6 Drebēšana tos tur aizņēma, mokas tā kā sievu bērnu sāpēs.
६भयाने त्यांना गाठले, भीतीने त्यांचा थरकाप झाला. प्रसवणाऱ्या स्रीच्या वेदनांप्रमाणे त्यांना वेदना लागल्या.
7 Tu sadauzi lielos jūras kuģus caur austriņu.
७पूर्वेकडच्या वाऱ्याने तू तार्शीशाची जहाजे मोडलीस.
8 Tā kā bijām dzirdējuši, tā to esam redzējuši Tā Kunga Cebaot pilsētā, mūsu Dieva pilsētā. Dievs to stiprinās mūžīgi. (Sela)
८होय, आम्ही ती गोष्ट ऐकली पण आम्ही ते सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नगरात, आमच्या देवाच्या नगरात घडत असलेले पाहिले. देव ते शहर सदैव सामर्थ्यवान बनवतो.
9 Ak Dievs, mēs pieminam Tavu žēlastību Tavā svētā namā.
९देवा, आम्ही तुझ्या मंदिरात तुझ्या प्रेमदयेचा विचार करतो.
10 Ak Dievs, tā kā Tavs vārds, tāpat ir Tava slava līdz pasaules galam, Tava labā roka ir taisnības pilna.
१०देवा, जसे तुझे नाव आहे, तशी तुझी किर्ती पृथ्वीच्या शेवटापर्यंत आहे.
11 Lai Ciānas kalns priecājās un Jūda meitas lai līksmojās Tavu tiesu labad.
११तुझ्या न्याय कृत्यांमुळे, सियोन पर्वत आनंद करो, यहूदाची कन्या हर्ष करोत.
12 Ejat ap Ciānu un apmetaties ap viņu, skaitiet viņas torņus.
१२सियोने भोवती फिरा, शहर बघा, तिचे बुरुज मोजा.
13 Liekat vērā viņas mūrus, apraugāt viņas augstos namus, ka pēcnākamiem radiem to varat izteikt.
१३उंच भिंती बघा, सियोनेच्या राजवाड्याचे वर्णन करा. नंतर तुम्ही पुढच्या पिढीला त्याबद्दल सांगू शकाल.
14 Jo šis Dievs ir mūsu Dievs mūžīgi mūžam. Viņš mūs vadīs līdz mūža galam.
१४कारण हा देव, आमचा देव, सदासर्वकाळ आहे. तो सर्वकाळ आमचा मार्गदर्शक होईल.