< Psalmi 47 >
1 Koraha bērnu dziesma. Dziedātāju vadonim. Plaukšķinājiet priecīgi, visi ļaudis, un gavilējiet Dievam ar priecīgu balsi.
१कोरहाच्या पुत्राचे स्तोत्रगीते अहो सर्व लोकहो! तुम्ही टाळ्या वाजवा. विजयोत्सवाने देवाचा जयजयकार करा.
2 Jo Tas Kungs, tas visuaugstais, ir bijājams, liels ķēniņš pa visu zemi.
२कारण परात्पर परमेश्वर भय धरण्यास योग्य आहे; तो सर्व पृथ्वीवर थोर राजा आहे.
3 Viņš sadzīs tautas apakš mums, un ļaudis apakš mūsu kājām.
३तो लोकांस आमच्या ताब्यात देतो, आणि राष्ट्रांना आमच्या पायाखाली आणतो.
4 Viņš mums izrauga mūsu mantojumu, Jēkaba godību, ko Viņš mīļo. (Sela)
४त्याने आमचे वतन आमच्यासाठी निवडले आहे, ज्या याकोबावर त्याने प्रीती केली तो त्याचे वैभव आहे.
5 Dievs uzkāpj ar gavilēšanu, Tas Kungs ar skaņu bazūni.
५जयघोष होत असता देव वर गेला, परमेश्वर तुतारीच्या आवाजात वर गेला.
6 Dziediet Dievam, dziedājiet; dziediet mūsu Ķēniņam, dziedājiet.
६देवाला स्तुतिगान गा, स्तुतिस्तवने गा; आमच्या राजाची स्तुतिगीते गा, स्तुतिगीते गा.
7 Jo Dievs ir Ķēniņš pār visu zemi, dziediet Viņam dziesmu.
७कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे; त्याची स्तुतीपर गाणे उमजून गा.
8 Dievs valda pār pagāniem, Dievs sēž uz Sava svētā krēsla.
८देव राष्ट्रांवर राज्य करतो; देव आपल्या पवित्र सिंहासनावर बसला आहे.
9 Tautu lielkungi sapulcējušies par tautu Ābrahāma Dievam, jo zemes varenie pieder Dievam; Viņš ir ļoti paaugstināts.
९अब्राहामाच्या देवाच्या लोकांचे अधिपती एकत्र जमले आहेत; कारण पृथ्वीवरील ढाली देवाच्या आहेत. तो अत्यंत उंच आहे.