< Romans 4 >

1 What then shall we say of Abraham, our ancestor in the flesh?
तर मग आपला पूर्वज अब्राहाम ह्याला दैहिक दृष्ट्या काय मिळाले असे आपण म्हणावे?
2 For if Abraham was justified by works, he has something to be proud of, but not before God.
कारण अब्राहाम कर्मांनी नीतिमान ठरला असता तर त्यास अभिमान मिरवण्यास कारण होते; पण देवापुढे नाही.
3 For what does Scripture say? And Abraham believed God, and it was set down to his account as righteousness.
कारण शास्त्रलेख काय म्हणतो? अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याच्या बाजूकडे नीतिमत्त्व म्हणून गणले गेले.
4 Now if a man earn his pay by his work, it is not counted to him as a favor, but it is paid him as a debt;
आता जो कोणी काम करतो त्याचे वेतन कृपा म्हणून गणले जात नाही, पण देणे म्हणून गणले जाते.
5 but a man who does not "work," but believes in him who justifies the ungodly, has his faith imputed to him for righteousness.
पण जो काही करीत नाही, पण जो धर्माचरण न करणार्‍यास नीतिमान ठरवतो त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा विश्वास त्याच्या बाजूकडे नीतिमत्त्व म्हणून गणला जातो,
6 Just as David also speaks of the blessedness of the man to whom God imputes righteousness apart from actions.
देव ज्याच्या बाजूकडे कर्मांशिवाय नीतिमत्त्व गणतो अशा मनुष्याचा आशीर्वाद दावीद देखील वर्णन करतो; तो असे म्हणतो की,
7 Blessed he says are they whose iniquities have been forgiven, And whose sins have been covered.
‘ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्यांची पापे झाकली गेली आहेत ते धन्य होत.
8 Blessed is the man to whom the Lord will not impute sin.
ज्याच्या हिशोबी परमेश्वर पाप गणीत नाही तो मनुष्य धन्य होय.’
9 Is this blessing, then, for the circumcised alone? or for the uncircumcised also? Abraham’s faith, I say, was imputed to him for righteousness.
मग हा आशीर्वाद सुंता झालेल्यांकरता आहे की, सुंता न झालेल्यांकरताही आहे? कारण आपण असे मानतो की, विश्वास हा अब्राहामाकडे नीतिमत्त्व असा गणण्यात आला होता.
10 How then was it imputed to him? When he was circumcised? or uncircumcised? Not in circumcision, but in uncircumcision;
१०मग तो कसा गणला गेला? त्याची सुंता झाल्यानंतर किंवा सुंता होण्याअगोदर? सुंता झाल्यानंतर नाही, पण सुंता होण्याअगोदर.
11 and he received circumcision as a sign, a seal of the faith- righteousness which he had while he was in uncircumcision; in order that he might be the father of all who believe, even though they are uncircumcised; so that righteousness might be imputed to them.
११आणि, तो सुंता न झालेला होता तेव्हा विश्वासाने त्यास मिळालेल्या नीतिमत्त्वाचा शिक्का म्हणून त्यास सुंता ही खूण मिळाली. म्हणजे जे कोणी विश्वास ठेवतात, ते सुंता न झालेले असले तरी त्याने त्या सर्वांचा पिता व्हावे; म्हणजे त्यांच्याही बाजूकडे नीतिमत्त्व गणले जावे.
12 He is the father of circumcision to those who are not merely circumcised, but who also walk in the steps of that faith of our father Abraham which he held while he was as yet uncircumcised.
१२आणि जे सुंता झालेले आहेत ते केवळ सुंता झालेले आहेत एवढ्यावरून नाही, पण आपला पिता अब्राहाम हा सुंता न झालेला होता तेव्हा त्याच्यात असलेल्या त्याच्या विश्वासास अनुसरुन जे चालतात त्यांचाही त्याने पिता व्हावे.
13 For the promise that he should be heir of the world did not come to Abraham or to his posterity through law, but through faith- righteousness.
१३कारण तू जगाचा वारीस होशील, हे वचन अब्राहामाला किंवा त्याच्या संतानाला नियमशास्त्राच्याद्वारे नव्हते, पण विश्वासाच्या नीतिमत्त्वाच्या द्वारे होते.
14 For if those who are righteous through law are heirs, faith is empty and the promise becomes void.
१४कारण नियमशास्त्रामुळे जे आहेत ते वारीस झाले तर विश्वास निरर्थक आणि वचन निरुपयोगी केले गेले.
15 For law works wrath; but where there is no law, neither is there transgression.
१५कारण नियमशास्त्र क्रोधाला कारण होते. पण जेथे नियमशास्त्र नाही तेथे उल्लंघन नाही.
16 This is why righteousness is of faith, that it may be a free gift; so that the promise stands firm to all Abraham’s posterity; not to his children of his faith. For in the sight of the God in whom he believed, who gives life to the dead, and calls into being that which is not, Abraham is the father of us all both Jews and Gentiles,
१६आणि म्हणून हे वचन विश्वासाद्वारे म्हणजे कृपेने दिलेले आहे; ते ह्यासाठी की, नियमशास्त्रामुळे जे आहेत त्यांनाच ते असावे असे नाही. पण अब्राहामाच्या विश्वासामुळे जे आहेत त्यांनाही, म्हणजे सर्व संतानाला ते खात्रीने असावे. तो आपल्या सर्वांचा पिता आहे.
17 as it is written, I have made you a father of many nations.
१७कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले आहे.’ ज्याच्यावर त्याने विश्वास ठेवला, जो मरण पावलेल्यांना जिवंत करतो आणि अस्तित्वात नसलेल्यांना ते असल्याप्रमाणे बोलावतो त्या देवाच्या दृष्टीपुढे तो असा आहे.
18 For Abraham, hoping against hope, had faith to the end that he might become a father of many nations, according to that which had been spoken, So numberless shall your descendants be.
१८‘तसे तुझे संतान होईल’ या वचनाप्रमाणे त्याने अनेक राष्ट्रांचा पिता व्हावे अशी आशा नसता, त्याने आशेने विश्वास ठेवला.
19 Though he was about a hundred years old, his faith did not fail him when he regarded his own body, now as good as dead. and remembered Sarah’s barrenness.
१९आणि विश्वासात दुर्बळ नसल्यामुळे, तो सुमारे शंभर वर्षांचा असता त्याने आपल्या निर्जीव शरीराकडे व सारेच्या उदराच्या वांझपणाकडे लक्ष दिले नाही.
20 Nor did he with regard to the promise of God waver in unbelief, but he waxed strong in faith, while he gave God glory,
२०त्याने देवाच्या वचनाविषयी अविश्वासाने संशय धरला नाही; तो विश्वासात स्थिर असल्यामुळे देवाला गौरव देत होता.
21 and was fully persuaded that what God had promised, he was able also to perform.
२१आणि त्याची पूर्ण खात्री झाली की, देव आपले अभिवचन पूर्ण करण्यासही तो समर्थ आहे.
22 And so his faith was reckoned to him for righteousness.
२२आणि म्हणून ते त्याच्या बाजूकडे नीतिमत्त्व म्हणून गणले गेले.
23 Now these words were not written simply for his sake, but for us as well.
२३आता ते त्याच्या हिशोबी गणले गेले, हे केवळ त्याच्याकरता लिहिले गेले नाही.
24 For it will be "reckoned for righteousness." to us also, who believe on him that raised from the dead our Lord Jesus;
२४पण आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याला ज्याने मरण पावलेल्यातून उठवले त्याच्यावर आपण विश्वास ठेवला तर तो ते आपल्याही हिशोबी गणले जाणार आहे.
25 who was betrayed to death for our transgressions, and raised again to life for our justification.
२५तो प्रभू येशू आपल्या अपराधांसाठी धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो जिवंत करण्यात आला आहे.

< Romans 4 >