< Job 23 >
1 Saa tog Job til Orde og svarede:
१नंतर ईयोबने उत्तर दिले व तो म्हणाला,
2 Ogsaa i Dag er der Trods i min Klage, tungt ligger hans Haand paa mit Suk!
२“तरीही मी आज कडवटपणे तक्रार करीन? कारण माझा त्रास माझ्या विलापाहून भारी आहे.
3 Ak, vidste jeg Vej til at finde ham, kunde jeg naa hans Trone!
३देवाला कुठे शोधावे ते मला माहीत असते तर मी त्याच्या ठिकाणापर्यंत जाऊन पोहचलो असतो
4 Da vilde jeg udrede Sagen for ham og fylde min Mund med Beviser,
४मी देवाला माझी फिर्याद सांगितली असती. माझ्या मुखाने सतत वाद घातला असता.
5 vide, hvad Svar han gav mig, skønne, hvad han sagde til mig!
५त्याने माझ्या युक्तिवादाला कसे प्रत्युतर दिले असते ते मला कळले असते. तो मला काय म्हणाला ते मी लक्षात घेतले असते.
6 Mon han da satte sin Almagt imod mig? Nej, visselig agted han paa mig;
६त्याच्या महान सामर्थ्याने त्याने माझ्याविरुध्द वाद केला असता का? नाही; तर त्याने माझ्याकडे लक्ष दिले असते.
7 da gik en oprigtig i Rette med ham, og jeg bjærged for evigt min Ret.
७तेथे सरळ मनुष्यांनी त्याच्याशी वाद केला असता. म्हणजे मी माझ्या न्यायाधीशापासुन सुटलो असतो.
8 Men gaar jeg mod Øst, da er han der ikke, mod Vest, jeg mærker ej til ham;
८पाहा, मी पूर्वेकडे गेलो, पण तो तीथे नव्हता, मी पश्चिमेकडे गेलो, पण मी त्यास पाहीले नाही.
9 jeg søger i Nord og ser ham ikke, drejer mod Syd og øjner ham ej.
९उत्तरेकडे तो कार्य करीत असला, तरी मला तो दिसू शकत नाही. आणि दक्षिणेकडेही, जेथे तो स्वतःस लपवितो त्यामुळे तेथेही तो मला दिसत नाही.
10 Thi han kender min Vej og min Vandel, som Guld gaar jeg frem af hans Prøve.
१०परंतु माझा मार्ग त्यास कळाला आहे, जेव्हा तो माझी परीक्षा घेतो, तेव्हा मी सोन्यासारखा असेन.
11 Min Fod har holdt fast ved hans Spor, hans Vej har jeg fulgt, veg ikke derfra,
११त्याच्या पावलावर माझी पावले पडत आहेत, मी त्याचा मार्ग धरला आहे व त्यापासून वळालो नाही.
12 fra hans Læbers Bud er jeg ikke veget, hans Ord har jeg gemt i mit Bryst.
१२मी त्याच्या ओठांच्या आज्ञेचे पालन करण्यापासुन मागे वळालो नाही, मी संपत्ती प्रमाणे माझ्या हृदयात देवाच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द ठेवले आहेत.
13 Men han gjorde sit Valg, hvem hindrer ham Han udfører, hvad hans Sjæl attraar.
१३परंतु देव कधी बदलत नाही, त्यास कोण बदलेल. त्याच्या मनाच्या ईच्छेप्रमाणे तो करतो.
14 Thi han fuldbyrder, hvad han bestemte, og af sligt har han meget for.
१४कारण तो माझ्यासाठी त्याचा हूकुम चालवितो, माझ्यासाठी त्याच्या बऱ्याच योजना आहेत.
15 Derfor forfærdes jeg for ham og gruer ved Tanken om ham.
१५यास्तव, मी त्याच्या उपस्थीतीला घाबरतो, जेव्हा मी त्याच्याबद्दल विचार करतो, मला त्याची भीती वाटते.
16 Ja, Gud har nedbrudt mit Mod, forfærdet mig har den Almægtige;
१६त्यामुळे देवाने माझे हृदय कमजोर केले आहे, आणि सर्वशक्तिमानाने मला भयभीत केले आहे.
17 thi jeg gaar til i Mørket, mit Aasyn dækkes af Mulm.
१७काय मी अंधकाराने काढून टाकला गेलो नाही काय? आणि गडद अंधकाराने माझे मुख झाकले गेले नाही काय.”