< 出埃及記 4 >

1 梅瑟回答說:「他們必然不肯相信我,也不肯聽我的話,而對我說:上主沒有顯示給你。」
मग मोशेने उत्तर दिले, “ते माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत व माझे म्हणणे ऐकणार नाहीत; ते म्हणतील, परमेश्वराने तुला दर्शन दिलेलेच नाही.”
2 上主問他說:「你手裏拿的是什麼﹖」他回答說:「一根棍杖。」
परंतु परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझ्या हातात ते काय आहे?” मोशेने उत्तर दिले, “काठी आहे.”
3 上主說:「將棍杖扔在地上! 」他便將棍杖扔在地上,棍杖即刻變成了一條蛇;梅瑟一見,就逃避了。
मग देव म्हणाला, “ती जमिनीवर टाक.” तेव्हा मोशेने तसे केले; आणि त्या काठीचा साप झाला. तेव्हा मोशे घाबरला व त्यापासून पळाला.
4 上主向梅瑟說:「伸手捉著蛇的尾巴! ─他便伸手捉住,那條蛇在他手裏又變成一根棍杖。─
परंतु परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा हात पुढे कर व त्याचे शेपूट धर.” तेव्हा त्याने तसे केले, आपला हात पुढे करून त्यास धरले. तेव्हा त्याच्या हातात तो पुन्हा काठी झाला.
5 好叫他們相信上主,他們主先的天主,亞巴郎的天主,依撒格的天主和雅各伯的天主曾顯示給你。」
“म्हणजे ह्यावरून ते विश्वास धरतील, त्यांचा पूर्वजांचा-अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर याने तुला दर्शन दिले आहे.”
6 上主又對他說:「將你的手插在懷裏! 」他就將手插在懷裏;及至抽出手來,見手上患了癩瘡,向雪那樣白。
मग परमेश्वर त्यास आणखी म्हणाला, “तू तुझा हात तुझ्या छातीवर ठेव,” तेव्हा मोशेने आपला हात आपल्या छातीवर ठेवला; मग त्याने आपला हात बाहेर काढला तेव्हा तो कोडाने बर्फासारखा पांढरा झाला;
7 天主又說:「將你的手再插進懷裏! ─他就把手再插進懷裏;及至從懷裏抽出時,見手已經恢復原狀,像別的肌肉一樣。─
मग देव म्हणाला, “आता पुन्हा तुझा हात तुझ्या छातीवर ठेव.” तेव्हा मोशेने तसे केले. मग त्याने आपला हात छातीवरून काढला तेव्हा तो शरीराच्या इतर भागांप्रमाणे होऊन तो पुन्हा पूर्वीसारखा झाला.
8 如果他們不肯信你,也不信服第一個奇蹟,必定信服第二個奇蹟。
मग परमेश्वर बोलला, “जर ते तुझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत, व पहिल्या चिन्हामुळे तुझा शब्द ऐकणार नाहीत तर दुसऱ्या चिन्हामुळे ते तुझ्यावर विश्वास ठेवतील.
9 如果連這兩個奇蹟也不信,也不聽你的話,你就從尼羅河裏取些水,倒在旱地上;你從河裏取的水必在旱地上變成血。」
ही दोन्ही चिन्हे दाखवल्यावरही त्यांनी जर तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, तर मग नदीचे थोडे पाणी घे आणि ते कोरड्या जमिनीवर ओत; म्हणजे तू नदीतून घेतलेल्या पाण्याचे कोरड्या भूमीवर रक्त होईल.”
10 梅瑟對上主說:「吾主,請原諒! 我不是個有口才的人,以前不是,你向你的僕人說話以後,也不是;我原是笨口結舌的人。」
१०मग मोशे परमेश्वरास म्हणाला, “परंतु हे प्रभू, मी तुला खरे ते सांगतो; मी काही बोलका नाही; मी पूर्वीही नव्हतो आणि आता तुझ्याबरोबर बोलल्यानंतरही नाही. तुला माहित आहे की मी तर मुखाचा व जिव्हेचाही जड आहे.”
11 上主回答他說:「是誰給人一個嘴﹖是誰給人口啞耳聾,眼明眼瞎呢﹖不是我上主嗎﹖
११मग परमेश्वर त्यास म्हणाला, “मनुष्याचे तोंड कोणी केले? मनुष्यास मुका किंवा बहिरा, आंधळा किंवा डोळस कोण करतो? मी परमेश्वरच की नाही?
12 現在你去,我要幫助你說話,指教你該說什麼。」
१२तेव्हा मी सांगतो, तू आता जा. मी तुझ्या मुखाला साहाय्य होईन व तू काय बोलावे हे मी तुला शिकवीन.”
13 梅瑟回答說:「吾主,請原諒! 你要打發誰,就打發誰去吧! 」
१३परंतु मोशे म्हणाला, हे प्रभू! मी तुला विनंती करतो की, तुझ्या इच्छेस येईल त्याच्या हाती त्यास निरोप पाठव.
14 上主向梅瑟發怒說:「不是有你的哥哥肋末人亞郎嗎﹖我知道他是有口才的,他現在正前來迎接你;他見了你,心中必要快樂。
१४मग परमेश्वर मोशेवर रागावला. तो त्यास म्हणाला, “लेवी अहरोन हा तुझा भाऊ आहे ना? त्यास चांगले बोलता येते हे मला माहीत आहे. तो तुला भेटायला येत आहे. तुला पाहून त्यास मनात आनंद होईल.
15 你可向他說話,將你應該說的話放在他口中。我要幫助你,也幫助他說話,指教你們應做什麼。
१५तू त्याच्याबरोबर बोलून त्याच्या मुखात शब्द घाल. मी त्याच्या व तुझ्या मुखांना साहाय्य होईल आणि तुम्ही काय करावे हे तुम्हास शिकवीन.
16 他要代替你向百姓說話,作你的口舌;你對他是代替天主。
१६आणि तो तुझ्यासाठी लोकांशी बोलेल; तो तुझे मुख होईल आणि त्याने काय बोलावे हे सांगणारा तू त्यास देवासारखा होशील.
17 你手中要拿著這根棍杖,用來行奇蹟。」梅瑟回埃及
१७तू आपल्या हाती ही तुझी काठी घे. हिच्या योगे तू चिन्हे करशील.”
18 於是梅瑟起來回到他岳父耶特洛那裏,對他說:「請讓我回到埃及我兄弟那裏,看看他們還健在嗎﹖」耶特洛對梅瑟說:「你平安去罷! 」
१८मग मोशे आपला सासरा इथ्रो याच्याकडे परत गेला. तो त्यास म्हणाला, “मला मिसरातील माझ्या भाऊबंदांकडे जाऊ द्या. ते अद्याप जिवंत आहेत की नाहीत ते मला पाहू द्या.” इथ्रो मोशेला म्हणाला, शांतीने जा.
19 上主在米德揚對梅瑟說:「起身回埃及去! 因為那些想殺害你的人都死了。」
१९मिद्यान प्रांतात असताना परमेश्वर मोशेला म्हणाला, “आता मिसर देशात परत जा. जे लोक तुला ठार मारू पाहत होते ते आता मरण पावले आहेत.”
20 梅瑟遂帶著妻子孩子,叫他們騎在驢上,起身回埃及國去了;梅瑟手中拿著天主的棍杖。
२०तेव्हा मोशेने आपली पत्नी व आपल्या मुलांना गाढवावर बसवले व त्यांना घेऊन तो मिसर देशाला माघारी जायल निघाला. तो देवाची काठी आपल्या हाती घेऊन चालला.
21 上主對梅瑟說:「你回到埃及,要將我交於你行的一切奇蹟,行於法朗面前;但我要使他心硬,不肯放百姓走。
२१परमेश्वर मोशेला म्हणाला, तू मिसरात परत जाशील तेव्हा पाहा, जे सर्व चमत्कार मी तुझ्या हाती ठेवले आहे ते तू फारोपुढे करून दाखव. तथापि मी त्याचे मन कठीण करीन, आणि तो लोकांस जाऊ देणार नाही.
22 你要對法朗說:上主這樣說:以色列是我的長子。
२२मग तू फारोला सांग की, परमेश्वर म्हणतो इस्राएल माझा पुत्र, माझा ज्येष्ठ पुत्र आहे.
23 我命你,讓我的兒子去崇拜我。你若拒絕放他們走,我必要殺你的長子。」
२३परमेश्वर म्हणतो, मी तुला सांगत आहे की “तू माझ्या पुत्राला माझी उपासना करण्याकरता जाऊ दे!” जर तू त्यास जाऊ देण्याचे नाकारशील तर मी तुझ्या ज्येष्ठ पुत्राला ठार मारीन.
24 梅瑟在路上住宿的時候,上主遇著他,要想殺他。
२४मोशे प्रवासात असताना एके ठिकाणी मुक्कामासाठी थांबला. तेव्हा परमेश्वराने मोशेला त्या ठिकाणी गाठून त्यास ठार मारण्याचा प्रयत्न केला.
25 漆頗辣急忙拿了一塊石刀,將他兒子的包皮割下,拿包皮接觸他的腳說:「你真是我的血郎。」
२५परंतु सिप्पोराने एक गारगोटीची धारदार सुरी घेतली व तिने आपल्या मुलाची सुंता केली. मग तिने मुलांची अग्रत्वचा घेतली आणि ती मोशेच्या पायावर ठेवून ती त्यास म्हणाली, “खचीत तू माझा रक्ताने मिळवलेला पती आहेस.”
26 這樣上主就放了他。當時漆頗辣說:「血郎。」是因了割損的原故。
२६तेव्हा परमेश्वराने त्यास पीडण्याचे सोडले. रक्ताने मिळविलेला पती असे तिने सुंतेला उद्देशून म्हटले.
27 其時上主向亞郎說:「你往曠野去迎接梅瑟! 」他就去了。在天主的山旁預見了梅瑟,口親了他。
२७मग परमेश्वराने अहरोनाला सांगितले, “मोशेला भेटायला रानात जा.” तो गेला आणि देवाच्या डोंगरावर जाऊन मोशेला भेटला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले.
28 梅瑟把上主打發他所說的一切話和命他行的奇蹟,都告訴了亞郎。
२८परमेश्वराने त्यास जे सर्वकाही सांगून पाठवले होते ते, जी सर्व चिन्हे करून दाखवायची आज्ञा दिली होती ती मोशेने अहरोनाला सांगितली.
29 梅瑟和亞郎遂去召集了以色列子民所有的長老
२९मग मोशे व अहरोन यांनी जाऊन इस्राएली वंशजांचे सर्व वडीलजन एकत्र जमवले.
30 亞郎講述了上主向梅瑟所說的一切話,也當著百姓行了那些奇蹟;
३०नंतर परमेश्वराने मोशेला जे काही सांगितले होते ते सर्व अहरोनाने लोकांस कळवले; त्यांना चिन्हे करून दाखवली.
31 百姓就都信了,也都高興,因為上主眷顧了以色列子民,也垂念了他們的痛苦。他們遂都俯伏叩拜。
३१तेव्हा लोकांनी विश्वास ठेवला. परमेश्वराने इस्राएली घराण्याची भेट घेऊन त्यांचे दुःख पाहिले आहे हे त्यांनी ऐकले तेव्हा त्यांनी नमन करून त्याची उपासना केली.

< 出埃及記 4 >