< 出埃及記 11 >
1 上主對梅瑟說:「還有一種災禍,我要降在法朗和埃及人身上,以後他必要釋放你們離開此地;他釋放你們的時候,是驅逐你們離開此地。
१मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “मी फारोवर व मिसरावर आणखी एक पीडा आणीन. त्यानंतर फारो तुम्हास येथून जाऊ देईल; तो तुम्हास जाऊ देईल तेव्हा तो तुम्हास सर्वस्वी ढकलून काढून लावील,
2 你要講給百姓聽,叫他們男女各向自己的鄰舍要求金銀之物。」
२तू लोकांच्या कानांत सांगून ठेव की, प्रत्येक पुरुषाने आपल्या शेजाऱ्यापासून व प्रत्येक स्त्रीने आपल्या शेजारणीपासून सोन्याचांदीचे दागिने मागून घ्यावे.”
3 上主使百姓在埃及人前蒙恩,同時梅瑟在埃及國,在法朗的臣僕和百姓眼中,也成了偉大的人物。
३मिसरी लोकांची इस्राएली लोकांवर कृपादृष्टी होईल असे परमेश्वराने केले. मिसराचे सर्व लोक आणि फारोचे सेवक यांच्या दृष्टीने मोशे फार महान पुरुष होता.
४मोशे लोकांस म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, मध्यरात्री मी मिसरातून फिरेन
5 凡埃及國,從坐寶位的法朗的長子,直到推磨的婢女的長子,以及牲畜的一切頭胎,都要死亡。
५आणि तेव्हा मिसराच्या सिंहासनावर विराजमान असलेल्या फारोपासून तो जात्यावर बसणाऱ्या दासीपर्यंत सर्वांचे ज्येष्ठ पुत्र व गुरांचे प्रथम वत्सदेखील मरतील.
6 埃及全國要有大哀號,是從前沒有,以後也不會再有的哀號。
६मिसर देशात पूर्वी कधीही झाला नव्हता आणि भविष्यात कधीही होणार नाही असा मोठा आकांत होईल.
7 至於以色列子民,連狗也不敢向他們和他們的牲畜吠叫,為叫你們知道,上主已將以色列子民和埃及人分開,
७परंतु इस्राएल लोकांवर किंवा त्यांच्या जनावरांवर कुत्रा देखील भुंकणार नाही यावरुन मी परमेश्वर इस्राएली व मिसरांच्यामध्ये कसा भेद ठेवतो हे तुम्हास कळून येईल.
8 以後你的這些臣僕全都要到我跟前,跪下哀求我說:你和那跟從你的百姓都去罷! 然後我才離去。」梅瑟氣憤憤地離開法郎出去了。
८मग हे सर्व तुमचे दास म्हणजे मिसरी लोक माझ्या पाया पडून माझी उपासना करतील. ते म्हणतील, तुम्ही तुमच्या सर्व लोकांसह व परिवारासह येथून निघून जा.” मग त्यानंतर रागाने संतप्त होऊन मोशे फारोला सोडून निघून गेला.
9 上主對梅瑟說:「法朗不聽從你們,使我的奇蹟在埃及國多起來。」
९परमेश्वराने मोशेला म्हटले, “फारो तुमचे ऐकणार नाही मी मिसर देशात पुष्कळ आश्चर्यकारक गोष्टी कराव्यात म्हणून असे होईल.”
10 梅瑟和亞郎在法朗面前行了這些奇蹟;但是上主使法朗的心硬,仍不肯放以色列子民離開自己的國家。
१०आणि मोशे व अहरोन यांनी सर्व आश्चर्ये फारोपुढे केली; परंतु परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि त्याने त्याच्या देशातून इस्राएल लोकांस बाहेर जाऊ दिले नाही.