< गज़लुल 5 >
1 मै अपने बाग़ में आया हूँ ऐ मेरी प्यारी ऐ मेरी ज़ौजा; मैंने अपना मुर अपने बलसान समेत जमा' कर लिया; मैंने अपना शहद छत्ते समेत खा लिया, मैंने अपनी मय दूध समेत पी ली है। ऐ दोस्तो, खाओ, पियो। पियो! हाँ, ऐ 'अज़ीज़ो, खू़ब जी भर के पियो!
१(स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) माझे बहिणी, माझे वधू, मी माझ्या बागेत गेलो. मी माझा गंधरस व माझी सुगंधी द्रव्ये जमा केली आहेत. मी माझा मध मधाच्या पोळ्यासहीत खाल्ला आहे. मी माझा द्राक्षरस व दूध प्यालो आहे. मित्रांनो, खा. माझ्या प्रियांनो; प्या, मनसोक्त प्या.
2 मैं सोती हूँ, लेकिन मेरा दिल जागता है। मेरे महबूब की आवाज़ है जो खटखटाता है, और कहता है, “मेरे लिए दरवाज़ा खोल, मेरी महबूबा, मेरी प्यारी! मेरी कबूतरी, मेरी पाकीज़ा, क्यूँकि मेरा सिर शबनम से तर है, और मेरी जु़ल्फे़ रात की बूँदों से भरी हैं।”
२(ती तरुणी स्वतःशी बोलते) मी झोपलेली आहे. पण माझे हृदय स्वप्नात जागे आहे. माझा प्रियकर दार वाजवतो आणि म्हणतो, माझे बहिणी, माझ्या प्रिये, माझ्या कबुतरा, माझ्या विमले! माझे डोके दहिवराने ओले झाले आहे. माझे केस रात्रीच्या दवबिंदूने ओलसर झाले आहेत.
3 मैं तो कपड़े उतार चुकी, अब फिर कैसे पहनूँ? मैं तो अपने पाँव धो चुकी, अब उनको क्यूँ मैला करूँ?
३(तरुण स्त्री स्वतःशी बोलते) मी माझा पोषाख काढून टाकला आहे. तो पुन्हा मी कसा अंगात घालू? मी माझे पाय धुतले आहेत. ते मी कसे मळवू?
4 मेरे महबूब ने अपना हाथ सूराख़ से अन्दर किया, और मेरे दिल — ओ — जिगर में उसके लिए हरकत हुई।
४पण माझ्या प्रियकराने फटीतून हात घातला, आणि माझे हृदय त्याच्यासाठी कळवळले.
5 मैं अपने महबूब के लिए दरवाज़ा खोलने को उठी, और मेरे हाथों से मुर टपका, और मेरी उँगलियों से रक़ीक़ मुर टपका, और कु़फ़्ल के दस्तों पर पड़ा।
५माझ्या प्रियकराला दार उघडायला मी उठले. तेव्हा माझ्या हातास दाराच्या कडीवरील गंधरस लागला. माझ्या बोटांवरून त्याचा द्रव गळत होता.
6 मैंने अपने महबूब के लिए दरवाज़ा खोला, लेकिन मेरा महबूब मुड़ कर चला गया था। जब वह बोला, तो मैं बदहवास हो गई। मैंने उसे ढूँडा पर न पाया; मैंने उसे पुकारा पर उसने मुझे कुछ जवाब न दिया।
६मी माझ्या प्रियकरासाठी दार उघडले. पण माझा प्रियकर तोंड फिरवून निघून गेला होता. तो गेला तेव्हा माझा जीव गळून गेला. मी त्यास शोधले पण तो मला सापडला नाही. मी त्यास हाक मारली पण त्याने मला उत्तर दिले नाही.
7 पहरेवाले जो शहर में फिरते हैं, मुझे मिले; उन्होंने मुझे मारा और घायल किया; शहरपनाह के मुहाफ़िज़ों ने मेरी चादर मुझ से छीन ली।
७शहरावर पहारा करणाऱ्या पहारेकऱ्यांना मी दिसले. त्यांनी मला मारले, जखमी केले. कोटावरच्या पहारेकऱ्यांनी माझा अंगरखा घेतला.
8 ऐ येरूशलेम की बेटियो! मैं तुम को क़सम देती हूँ कि अगर मेरा महबूब तुम को मिल जाए, तो उससे कह देना कि मैं इश्क की बीमार हूँ।
८(ती स्त्री त्या शहरातील स्त्रियांशी बोलत आहे) यरूशलेमेच्या कन्यांनो! मी तुम्हास शपथ घालून सांगते, जर तुम्हास माझा प्रियकर सापडला, तर कृपाकरून त्यास सांगा की, मी प्रेमामुळे आजारी झाले आहे.
9 तेरे महबूब को किसी दूसरे महबूब पर क्या फ़ज़ीलत है, ऐ 'औरतों में सब से जमीला? तेरे महबूब को किसी दूसरे महबूब पर क्या फ़ौकियत है? जो तू हम को इस तरह क़सम देती है।
९(त्या शहरातील स्त्रिया त्या तरुणीशी बोलत आहेत) अगे स्त्रियांतील सर्वात सुंदरी! तुझा प्रियकर इतर प्रियकरांहून अधिक चांगला आहे तो कसा काय? तू आम्हास अशी शपथ घालतेस तर तुझ्या प्रियकरांत इतरांपेक्षा अधिक ते काय आहे?
10 मेरा महबूब सुर्ख़ — ओ — सफ़ेद है, वह दस हज़ार में मुम्ताज़ है।
१०(तरुणी त्या शहरातील स्त्रियांशी बोलत आहेत) माझा प्रियकर गोरापान व लालबुंद आहे. तो दहा हजारात श्रेष्ठ आहे.
11 उसका सिर ख़ालिस सोना है, उसकी जुल्फें पेच — दर — पेचऔर कौवे सी काली हैं।
११त्याचे मस्तक शुध्द सोन्याप्रमाणे आहे. त्याचे केस कुरळे आहेत आणि डोंमकावळ्यासारखे काळे आहेत.
12 उसकी आँखें उन कबूतरों की तरह हैं, जो दूध में नहाकर लब — ए — दरिया तमकनत से बैठे हों।
१२त्याचे डोळे झऱ्याजवळच्या कबुतरासारखे आहेत, दुधात धुतलेल्या कबुतरासारखे आहेत, कोदंणात जडलेल्या मोलवान खड्यासारखे आहेत.
13 उसके गाल फूलों के चमन और बलसान की उभरी हुई क्यारियाँ हैं। उसके होंट सोसन हैं, जिनसे रक़ीक़ मुर टपकता है।
१३त्याचे गाल सुगंधी झाडाचे वाफे, सुगंधी फुलझाडांचे ताटवे असे आहेत, अत्तरासाठी वापरण्यात येणाऱ्या फुलांसारखे आहेत. त्याचे ओठ कमलपुष्पाप्रमाणे असून त्यातून गंधरस स्रवतो.
14 उसके हाथ ज़बरजद से आरास्ता सोने के हल्के हैं। उसका पेट हाथी दाँत का काम है, जिस पर नीलम के फूल बने हो।
१४त्याचे हात रत्नांनी जडवलेल्या सोन्याच्या कांबीप्रमाणे आहेत. त्याचे पोट नीलमणी जडवलेल्या मऊ हस्तिदंतफलकासारखे आहे.
15 उसकी टांगे कुन्दन के पायों पर संग — ए — मरमर के खम्बे हैं। वह देखने में लुबनान और खू़बी में रश्क — ए — सरो है।
१५त्याचे पाय सोन्याचा पाया असलेल्या संगमरवरी खांबासारखे आहेत. त्याचे रुप लबानोनासारखे आहे. ते गंधसरू झाडासारखे उत्कृष्ट आहे.
16 उसका मुँह अज़ बस शीरीन है; हाँ, वह सरापा 'इश्क अंगेज़ है। ऐ येरूशलेम की बेटियो, यह है मेरा महबूब, यह है मेरा प्यारा।
१६होय, यरूशलेमेच्या कन्यांनो, माझा प्रियकर हाच माझा सखा आहे. त्याची वाणी सर्वांत गोड आहे. तो सर्वस्वी सुंदर आहे.