< ज़बूर 72 >
1 ऐ ख़ुदा! बादशाह को अपने अहकाम और शहज़ादे को अपनी सदाक़त 'अता फ़रमा।
१हे देवा, तू राजाला आपले न्यायाचे निर्णय, राजाच्या मुलाला आपले न्यायीपण दे.
2 वह सदाक़त से तेरे लोगों की, और इन्साफ़ से तेरे ग़रीबों की 'अदालत करेगा।
२तुझ्या लोकांचा नीतीने न्याय करो, आणि तुझ्या गरीब लोकांचा न्यायनिवाडा न्यायाने करो.
3 इन लोगों के लिए पहाड़ों से सलामती के, और पहाड़ियों से सदाक़त के फल पैदा होंगे।
३पर्वत लोकांसाठी शांती उत्पन्न करतील; टेकड्या न्यायीपणा उत्पन्न करतील.
4 वह इन लोगों के गरीबों की 'अदालत करेगा; वह मोहताजों की औलाद को बचाएगा, और ज़ालिम को टुकड़े टुकड़े कर डालेगा।
४तो लोकांतील गरीबांचा न्याय करील; गरजवंताच्या मुलांना तारील, आणि जुलूम करणाऱ्यांचे तुकडे करील.
5 जब तक सूरज और चाँद क़ाईम हैं, लोग नसल — दर — नसल तुझ से डरते रहेंगे।
५जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे, तोपर्यंत सर्व पिढ्यानपिढ्या ते तुझा आदर करतील.
6 वह कटी हुई घास पर मेंह की तरह, और ज़मीन को सेराब करने वाली बारिश की तरह नाज़िल होगा।
६जसा कापलेल्या गवतावर पाऊस पडतो, तशी पृथ्वीला भिजवणारी पावसाची सर उतरून येईल.
7 उसके दिनों में सादिक बढ़ेंगे, और जब तक चाँद क़ाईम है ख़ूब अमन रहेगा।
७त्याच्या दिवसात नितिमानाची भरभराट होवो, आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती होईल.
8 उसकी सल्तनत समन्दर से समन्दर तक और दरिया — ए — फ़रात से ज़मीन की इन्तिहा तक होगी।
८समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि त्या नदीपासून ते पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्याची सत्ता राहो.
9 वीरान के रहने वाले उसके आगे झुकेंगे, और उसके दुश्मन ख़ाक चाटेंगे।
९अरण्यात राहणारे त्याच्यासमोर नमन करोत; त्याचे शत्रू धूळ चाटोत.
10 तरसीस के और जज़ीरों के बादशाह नज़रें पेश करेंगे, सबा और सेबा के बादशाह हदिये लाएँगे।
१०तार्शीश आणि बेटांचे राजे खंडणी देवोत; शबा आणि सबाच्या राजांना त्याच्यासाठी भेटी आणोत.
11 बल्कि सब बादशाह उसके सामने सर्नगूँ होंगे कुल क़ौमें उसकी फरमाबरदार होंगी।
११खरोखर, सर्व राजे त्याच्यापुढे नमन करोत; सर्व राष्ट्रे त्याची सेवा करोत;
12 क्यूँकि वह मोहताज को जब वह फ़रियाद करे, और ग़रीब की जिसका कोई मददगार नहीं छुड़ाएगा।
१२कारण त्याने धावा करणाऱ्या गरजवंताला, आणि गरीबाला दुसरा कोणी मदतनीस नाही त्यास मदत केली आहे.
13 वह ग़रीब और मुहताज पर तरस खाएगा, और मोहताजों की जान को बचाएगा।
१३तो गरीब आणि गरजवंतांवर दया करील, आणि गरजवंताचा जीव तो तारील.
14 वह फ़िदिया देकर उनकी जान को ज़ुल्म और जब्र से छुड़ाएगा और उनका खू़न उसकी नज़र में बेशक़ीमत होगा।
१४तो त्यांचा जुलूम आणि हिंसाचारापासून त्यांचा जीव खंडून घेईल, आणि त्यांचे रक्त त्याच्या दृष्टीने मौलवान आहे.
15 वह ज़िन्दा रहेंगे और सबा का सोना उसको दिया जाएगा। लोग बराबर उसके हक़ में दुआ करेंगे: वह दिनभर उसे दुआ देंगे।
१५राजा जगेल, त्यास शबाचे सोने दिले जावो. लोक त्याच्यासाठी नेहमी प्रार्थना करो; देव त्यास दिवसभर आशीर्वाद देवो.
16 ज़मीन में पहाड़ों की चोटियों पर अनाज को अफ़रात होगी; उनका फल लुबनान के दरख़्तों की तरह झूमेगा; और शहर वाले ज़मीन की घास की तरह हरे भरे होंगे।
१६तेथे पृथ्वीत पर्वत कळसावर विपुल धान्य येवो; तिचे पीक लबानोन झाडासारखे वाऱ्याच्या झुळकेने डुलोत आणि नगरातले लोक पृथ्वीच्या गवतासारखी भरभराटीस येवो.
17 उसका नाम हमेशा क़ाईम रहेगा, जब तक सूरज है उसका नाम रहेगा; और लोग उसके वसीले से बरकत पाएँगे, सब क़ौमें उसे खु़शनसीब कहेंगी।
१७राजाचे नाव सर्वकाळ टिकून राहो; सूर्य आहे तोपर्यंत त्याचे नाव पुढे चालू राहो; त्याच्यात लोक आशीर्वादित होतील; सर्व राष्ट्रे त्यास धन्य म्हणतील.
18 खु़दावन्द ख़ुदा इस्राईल का खु़दा, मुबारक हो! वही 'अजीब — ओ — ग़रीब काम करता है।
१८परमेश्वर देव, इस्राएलाचा देव, धन्यवादित असो, तोच फक्त आश्चर्यकारक गोष्टी करतो.
19 उसका जलील नाम हमेशा के लिए सारी ज़मीन उसके जलाल से मा'मूर हो। आमीन सुम्मा आमीन!
१९त्याचे गौरवशाली नाव सर्वकाळ धन्यवादित असो आणि सर्व पृथ्वी त्याच्या गौरवाने भरली जावो. आमेन आणि आमेन.
20 दाऊद बिन यस्सी की दु'आएँ तमाम हुई।
२०इशायाचा मुलगा दावीद याच्या प्रार्थना इथे संपल्या.