< ज़बूर 52 >
1 ऐ ज़बरदस्त, तू शरारत पर क्यूँ फ़ख़्र करता है? ख़ुदा की शफ़क़त हमेशा की है।
१दाविदाचे स्तोत्र हे सामर्थ्यवान पुरुषा, तू वाईट गोष्टींचा अभिमान का बाळगतोस? देवाच्या कराराची विश्वसनियता प्रत्येक दिवशी येते.
2 तेरी ज़बान महज़ शरारत ईजाद करती है; ऐ दग़ाबाज़, वह तेज़ उस्तरे की तरह है।
२अरे कपटाने कार्य करणाऱ्या, तुझी जीभ धारदार वस्तऱ्यासारखी नाशाची योजना करते.
3 तू बदी को नेकी से ज़्यादा पसंद करता है, और झूट को सदाक़त की बात से।
३तुला चांगल्यापेक्षा वाईटाची, आणि प्रामाणिकपणे बोलण्यापेक्षा असत्याची अधिक आवड आहे.
4 ऐ दग़ाबाज़ ज़बान! तू मुहलिक बातों को पसंद करती है।
४तू कपटी जीभे, तुला दुसऱ्यांचा नाश करणारे शब्द आवडतात.
5 ख़ुदा भी तुझे हमेशा के लिए हलाक कर डालेगा; वह तुझे पकड़ कर तेरे ख़ेमे से निकाल फेंकेगा, और ज़िन्दों की ज़मीन से तुझे उखाड़ डालेगा। (सिलाह)
५त्याप्रमाणे देव तुझा सर्वकाळ नाश करील; तो तुला वर घेऊन जाईल आणि आपल्या तंबूतून उपटून बाहेर काढेल आणि तुला जिवंताच्या भूमीतून मुळासकट उपटून टाकील.
6 सादिक़ भी इस बात को देख कर डर जाएँगे, और उस पर हँसेंगे,
६नितीमानसुद्धा ते पाहतील आणि घाबरतील; ते त्याच्याकडे पाहून हसतील आणि म्हणतील,
7 कि देखो, यह वही आदमी है जिसने ख़ुदा को अपनी पनाहगाह न बनाया, बल्कि अपने माल की ज़यादती पर भरोसा किया, और शरारत में पक्का हो गया।
७पाहा, या मनुष्याने देवाला आपले आश्रयस्थान केले नाही, पण आपल्या विपुल संपत्तीवर भरवसा ठेवला, आणि आपल्या दुष्टपणात स्वतःला पक्के केले.
8 लेकिन मैं तो ख़ुदा के घर में जैतून के हरे दरख़्त की तरह हूँ। मेरा भरोसा हमेशा से हमेशा तक ख़ुदा की शफ़क़त पर है।
८पण मी तर देवाच्या घरात हिरव्यागार जैतून झाडासारखा आहे; माझा देवाच्या कराराच्या विश्वसनीयतेवर सदासर्वकाळ आणि कायम भरवसा आहे.
9 मैं हमेशा तेरी शुक्रगुज़ारी करता रहूँगा, क्यूँकि तू ही ने यह किया है; और मुझे तेरे ही नाम की आस होगी, क्यूँकि वह तेरे पाक लोगों के नज़दीक खू़ब है।
९कारण ज्या गोष्टी तू केल्या आहेत, त्यासाठी मी तुझ्या विश्वासणाऱ्यांच्या समक्षेत सर्वकाळ तुझे उपकार मानीन. आणि तुझ्या नावात आशा ठेवली आहे कारण ते चांगले आहे.