< अब्द 1 >
1 'अबदियाह का ख़्वाब; हम ने ख़ुदावन्द से यह ख़बर सुनी, और क़ौमों के बीच क़ासिद यह पैग़ाम ले गया: कि चलो उस पर हमला करें। खु़दावन्द खु़दा अदोम के बारे में यूँ फ़रमाता है।
१ओबद्याचा दृष्टांत. अदोमाबद्दल प्रभू परमेश्वराने म्हटलेः आम्ही परमेश्वराकडून बातमी ऐकली आणि एक राजदूत राष्ट्रांमध्ये पाठवला आहे. तो म्हणतो, “उठा! आपण त्याच्याविरुध्द लढण्यास उठू.”
2 कि देख मैंने तुझे क़ौमों के बीच हक़ीर कर दिया है, तू बहुत ज़लील है।
२पाहा, मी तुला राष्ट्रांमध्ये लहान करीन, तू खूप तिरस्करणीय आहेस.
3 ऐ चट्टानों के शिगाफ़ों में रहने वाले, तेरे दिल के घमंड ने तुझे धोका दिया है; तेरा मकान ऊँचा है और तू दिल में कहता है, कौन मुझे नीचे उतारेगा?
३जो तू खडकाच्या कपारीत उंच स्थानी आपल्या घरात राहतोस, तू आपल्या मनात म्हणतोस, मला खाली जमिनीवर कोण आणू शकेल? या तुझ्या मनाच्या गर्वाने तुला फसवले आहे.
4 ख़ुदावन्द फ़रमाता है, अगरचे तू 'उक़ाब की तरह ऊँची परवाज़ हो और सितारों में अपना आशियाना बनाए, तोभी मैं तुझे वहाँ से नीचे उतारूँगा।
४परमेश्वर देव, असे म्हणतो, “जरी तू गरुडाप्रमाणे आपले घरटे उंच केले, आणि ताऱ्यांमध्ये तुझे घरटे बांधलेस, तरी मी तुला तेथून खाली आणील.”
5 अगर तेरे घर में चोर आएँ, या रात को डाकू आ घुसें, तेरी कैसी बर्बादी है तो क्या वह हस्ब — ए — ख़्वाहिश ही न लेंगे? अगर अंगूर तोड़ने वाले तेरे पास आएँ, तो क्या कुछ दाने बाक़ी न छोड़ेंगे?
५तू कसा छेदला गेला आहेस! जर तुझ्याकडे चोर आले, तुझ्याकडे रात्री लुटारू आले, तर ते त्यांना पाहिजे तितकेच चोरून घेणार नाहीत का? द्राक्षे गोळा करणारे तुजकडे आले तर ते सरवा नाही का ठेवणार?
6 'ऐसौ का माल कैसा ढूँड निकाला गया, और उसके छुपे हुए ख़ज़ानों की कैसी तलाश हुई!
६एसावाची मालमत्ता कशी लुटण्यात आली आहे आणि त्याचा गुप्त खजिना कसा शोधून काढण्यात आला.
7 तेरे सब हिमायतियों ने तुझे सरहद तक हाँक दिया है, और उन लोगों ने जो तुझ से मेल रखते थे तुझे धोका दिया और मग़लूब किया, और उन्होंने जो तेरी रोटी खाते थे, तेरे नीचे जाल बिछाया; उसमें थोड़े भी होशियार नहीं।
७तुझ्या कराराच्या सर्व मनुष्यांनी तुला तुझ्या सीमेपर्यंत घालवले आहे, तुझ्याबरोबर सल्ला केलेल्या मनुष्यांनी तुला फसवले आहे, आणि ते तुझ्यावर प्रबल झाले आहेत. तुझी भाकर खाणाऱ्यांनी तुझ्यासाठी जाळे पसरले आहे. त्याच्यात काही समजूतदारपणा नाही.
8 ख़ुदावन्द फ़रमाता है, क्या मैं उस दिन अदोम से होशियारों को और 'अक़्लमन्दी को पहाड़ी — ए — 'ऐसौ से हलाक न करूँगा?
८परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी, मी अदोमामधील सुज्ञांचा नाश करीन. एसावाच्या पर्वतातून बुद्धी नष्ट करणार नाही काय?
9 ऐ तीमान, तेरे बहादुर घबरा जाएँगे, यहाँ तक के पहाड़ी — ए — 'ऐसौ के रहने वालों में से हर एक काट डाला जाएगा।
९आणि अरे तेमाना, तुझे सामर्थ्यशाली पुरुष निराश होतील. प्रत्येकाचा वध होऊन एसावाच्या पर्वतातून सर्व नष्ट होतील.
10 उस क़त्ल की वजह और उस जु़ल्म की वजह से जो तू ने अपने भाई या'क़ूब पर किया है, तू शर्मिन्दगी से भरपूर और हमेशा के लिए बर्बाद होगा।
१०तू आपला भाऊ याकोब याच्यावर जो जुलूम केला त्यामुळे लाज तुला झाकील आणि तुझा कायमचा नाश होईल.
11 जिस दिन तू उसके मुख़ालिफ़ों केसाथ खड़ा था, जिस दिन अजनबी उसके लश्कर को ग़ुलाम करके ले गए और बेगानों ने उसके फाटकों से दाखि़ल होकर येरूशलेम पर पर्ची डाली, तू भी उनके साथ था
११ज्या दिवशी तू अलिप्त राहिलास, ज्या दिवशी परक्यांनी त्यांची संपत्ती लुटून नेली, परदेशी त्यांच्या वेशीत शिरून; आणि त्यांनी यरूशलेमेविषयी चिठ्ठ्या टाकल्या; आणि त्या दिवशी तूही त्यातला एक होतास.
12 तुझे ज़रूरी न था कि तू उस दिन अपने भाई की जिलावतनी को खड़ा देखता रहता, और बनी यहूदाह की हलाकत के दिन ख़ुश होता और मुसीबत के रोज़ बड़ी ज़ुबान बकता।
१२परंतु तू आपल्या भावाचा दिवस, त्याच्या विपत्तीचा दिवस पाहू नकोस, आणि तू यहूदाच्या वंशजास नाशाच्या दिवशी आनंद वाटू देऊ नको. संकटाच्या दिवशी तू गर्वाने बोलू नको.
13 तुझे मुनासिब न था कि तू मेरे लोगों की मुसीबत के दिन उनके फाटकों में घुसता, और उनकी मुसीबत के रोज़ उनकी बदहाली को खड़ा देखता रहता, और उनके लशकर पर हाथ बढ़ाता।
१३तू माझ्या लोकांच्या विपत्तीच्या दिवशी त्यांच्या वेशीत शिरू नको, त्यांच्या विपत्तीच्या दिवशी त्यांचे संकट पाहू नको, आणि त्यांच्या विपत्तीच्या दिवशी तू त्यांच्या मालमत्तेला हात लावू नको.
14 तुझे ज़रूरी न था कि घाटी में खड़ा होकर, उसके फ़रारियों को क़त्ल करता, और उस दुख के दिन में उसके बाक़ी थके लोगों को हवाले करता।
१४आणि त्यांच्या पळून जाणाऱ्यांस मारून टाकण्यासाठी चौकात उभा राहू नको संकटाच्या दिवशी त्यांच्या निभावलेल्यांस शत्रूच्या हाती देऊ नको.
15 क्यूँकि सब क़ौमों पर ख़ुदावन्द का दिन आ पहुँचा है। जैसा तू ने किया है, वैसा ही तुझ से किया जाएगा। तेरा किया तेरे सिर पर आएगा।
१५कारण परमेश्वराचा दिवस सर्व राष्ट्राच्या जवळ येऊन ठेपला आहे; तू केले तसे तुला करतील, तुझी करणी तुझ्याच डोक्यावर येऊन उलटेल.
16 क्यूँकि जिस तरह तुम ने मेरे कोह — ए — मुक़द्दस पर पिया, उसी तरह सब कौमें पिया करेंगी, हाँ पीती और निगलती रहेगी; और वह ऐसी होंगी जैसे कभी थीं ही नहीं।
१६कारण तुम्ही जसे माझ्या पवित्र पर्वतावर प्याला तशी सर्व राष्ट्रे सतत पीत राहतील, ते पितील आणि गिळतील आणि ते कधी अस्तित्वात होते की नव्हते, असे होतील.
17 लेकिन जो बच निकलेंगे सिय्यून पहाड़ी पर रहेंगे, और वह पाक होगा और या'क़ूब का घराना अपनी मीरास पर क़ाबिज़ होगा।
१७पण सियोन पर्वतावर काही सुटका मिळालेले असतील. तो पवित्र स्थान असा होईल. आणि याकोबाचे घराणे आपले वतन आपल्या ताब्यात घेईल.
18 तब या'क़ूब का घराना आग होगा, और यूसुफ़ का घराना शो'ला, और 'ऐसौ का घराना फूस; और वह उसमें भड़केंगे और उसको खा जाएँगे, और 'ऐसौ के घराने में से कोई न बचेगा; क्यूँकि ये ख़ुदावन्द का फ़रमान है।
१८याकोबाचे घराणे अग्नी होईल, आणि योसेफाचे घराणे जाळ होईल, आणि एसावाचे घराणे भूस होईल, आणि ते त्यांच्यात पेट घेऊन त्यास खाऊन टाकतील. एसावाच्या घराण्यापैकी एकही उरणार नाही. कारण परमेश्वर असे बोलला आहे.
19 और दख्खिन के रहने वाले पहाड़ी — ए — 'ऐसौ, और मैदान के रहने वाले फ़िलिस्तीन के मालिक होंगे; और वह इफ़्राईम और सामरिया के खेतों पर काबिज़ होंगे, और बिनयमीन जिलआद का वारिस होगा।
१९नेगेबचे लोक एसावाच्या पर्वतावर राहतील डोंगराच्या पायथ्याशी राहणारे लोक पलिष्ट्यांचा देश आपल्या ताब्यात घेतील. ते एफ्राइमाच्या व शोमरोनच्या भूमीवर राहतील, बन्यामीन गिलादाचा ताबा घेईल.
20 और बनी — इस्राईल के लशकर के सब ग़ुलाम, जो कना'नियों में सारपत तक हैं, और येरूशलेम के ग़ुलाम जो सिफ़ाराद में हैं, दखिन के शहरों पर क़ाबिज़ हो जाएँगे।
२०इस्राएल लोकांच्या या सैन्यातील जे बंदिवान झालेले लोक, ते कनान्यांचे सारफथापर्यंतचे प्रदेश आपल्या ताब्यात घेतील, आणि यरूशलेमचे जे बंदिवान सफारदात आहेत ते नेगेबची गावे घेतील.
21 और रिहाई देने वाले सिय्यून की पहाड़ी पर चढ़ेंगे ताकि पहाड़ी — ए — 'ऐसौ की 'अदालत करें, और बादशाही ख़ुदावन्द की होगी।
२१आणि एसावाच्या पर्वताचा न्याय करायला तारणारे सीयोन पर्वतावर चढून जातील आणि राज्य परमेश्वराचे होईल.