< गिन 32 >
1 और बनी रूबिन और बनी जद्द के पास चौपायों के बहुत बड़े बड़े ग़ोल थे। इसलिए जब उन्होंने या'ज़ेर और जिल'आद के मुल्कों को देखा कि यह मक़ाम चौपायों के लिए बहुत अच्छे हैं,
१रऊबेन आणि गाद या घराण्यांकडे गुरांढोरांची खूप खिल्लारे होते. त्यांनी याजेर व गिलाद येथील जमिनी पाहिल्या. ही जमीन आपल्या गुरांढोरांसाठी चांगली आहे असे त्यांना वाटले.
2 तो उन्होंने जाकर मूसा और इली'एलियाज़र काहिन और जमा'अत के सरदारों से कहा कि,
२म्हणून रऊबेन व गाद यांच्या घराण्यातील लोक मोशेकडे आले. ते मोशे, याजक एलाजार आणि लोकांचे पुढारी यांच्याशी बोलले.
3 'अतारात और दीबोन और या'ज़ेर और निमरा और हस्बोन, इली'आली और शबाम और नबू और बऊन,
३अटारोथ, दीबोन, याजेर, निम्रा, हेशबोन, एलाले, सबाम, नबो व बौन.
4 या'नी वह मुल्क जिस पर ख़ुदावन्द ने इस्राईल की जमा'अत को फ़तह दिलाई है, चौपायों के लिए बहुत अच्छा है और तेरे ख़ादिमों के पास चौपाये हैं।
४ह्यांचा जो प्रांत परमेश्वराने इस्राएलाच्या लोकांसाठी देवाने जी जमीन जिंकली ती गुरांढोरांसाठी खूप चांगली आहे आणि तुझ्या दासांजवळ गुरेढोरे आहेत.
5 इसलिए अगर हम पर तेरे करम की नज़र है तो इसी मुल्क को अपने ख़ादिमों की मीरास कर दे, और हम को यरदन पार न ले जा।
५जर आम्हावर तुझी कृपादृष्टी असेल तर तो प्रदेश आम्हास वतन करून देण्यात यावा. आम्हास यार्देन नदीच्या पलिकडे नेऊ नको.
6 मूसा ने बनी रूबिन और बनी जद्द से कहा, “क्या तुम्हारे भाई लड़ाई में जाएँ और तुम यहीं बैठे रहो?
६रऊबेन आणि गादच्या घराण्यातील लोकांस मोशे म्हणाला, तुमचे भाऊबंद लढाईस जातील तेव्हा तुम्ही येथेच बसून राहणार का?
7 तुम क्यूँ बनी — इस्राईल को पार उतर कर उस मुल्क में जाने से, जो ख़ुदावन्द ने उन को दिया है, बेदिल करते हो?
७जो देश परमेश्वराने इस्राएल लोकांस दिला आहे तेथे उतरून जाण्याकरता त्यांचे मन का निरूत्साहित करीत आहात?
8 तुम्हारे बाप दादा ने भी, जब मैंने उनको क़ादिस बरनी' से भेजा कि मुल्क का हाल दरियाफ़्त करें तो ऐसा ही किया था।
८तुमच्या वाडवडिलांनी हीच गोष्ट माझ्याबाबतीत केली होती. कादेश-बर्ण्याला मी काही हेरांना जमीन बघण्यासाठी पाठवले.
9 क्यूँकि जब वह वादी — ए — इस्काल में पहुँचे और उस मुल्क को देखा, तो उन्होंने बनी — इस्राईल को बे — दिल कर दिया, ताकि वह उस मुल्क में जो ख़ुदावन्द ने उनको 'इनायत किया न जाएँ।
९ते लोक अष्कोल खोऱ्यापर्यंत गेले. त्यांनी जमीन बघितली आणि त्या लोकांनी इस्राएल लोकांस परमेश्वराने दिलेल्या प्रदेशात जाण्याच्या इच्छेपासून परावृत केले.
10 और उसी दिन ख़ुदावन्द का ग़ज़ब भड़का और उसने क़सम खाकर कहा, कि
१०परमेश्वर त्या लोकांवर खूप रागावला. त्याने शपथ घेतली आणि म्हणाला,
11 उन लोगों में से जो मिस्र से निकल कर आये हैं बीस बरस और उससे ऊपर — ऊपर की उम्र का कोई शख़्स उस मुल्क को नहीं देखने पाएगा, जिसके देने की क़सम मैंने अब्रहाम और इस्हाक़ और या'क़ूब से खाई; क्यूँकि उन्होंने मेरी पूरी पैरवी नहीं की।
११मिसर देशातून आलेल्या वीस वर्षांवरील कोणत्याही मनुष्यास हा प्रदेश बघू दिला जाणार नाही. मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांना वचन दिले होते. त्यांना मी ही जमीन द्यायचे कबूल केले होते. परंतु त्यांनी मला मनापासून अनुसरले नाही. म्हणून त्यांना हा प्रदेश मिळणार नाही.
12 मगर युफ़ना क़िन्ज़ी का बेटा कालिब और नून का बेटा यशू'अ उसे देखेंगे, क्यूँकि उन्होंने ख़ुदावन्द की पूरी पैरवी की है।
१२फक्त कनिज्जी यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा हे मनापासून परमेश्वरास अनुसरले.
13 सो ख़ुदावन्द का क़हर इस्राईल पर भड़का और उसने उनकी वीरान में चालीस बरस तक आवारा फिराया, जब तक कि उस नसल के सब लोग जिन्होंने ख़ुदावन्द के सामने गुनाह किया था, नाबूद न हो गए।
१३परमेश्वर इस्राएल लोकांवर खूप रागावला होता. परमेशवराच्यादृष्टीने त्यांनी वाईट कृत्ये केली त्यांची सर्व पिढी नष्ट होईपर्यंत त्यांना चाळीस वर्षे रानात भटकावयास लावले.
14 और देखो, तुम जो गुनाहगारों की नसल हो, अब अपने बाप दादा की जगह उठे हो, ताकि ख़ुदावन्द के क़हर — ए — शदीद की इस्राईलियों पर ज़्यादा कराओ।
१४आणि आता तुमच्या वाडवडिलांनी जी गोष्ट केली तीच तुम्ही करीत आहात. पाप्यांनो परमेश्वराने त्याच्या इस्राएल लोकांवर आणखी रागवावे अशी तुमची इच्छा आहे का?
15 क्यूँकि अगर तुम उस की पैरवी से फिर जाओ तो वह उनको फिर वीरान में छोड़ देगा, और तुम इन सब लोगों को हलाक कराओगे।”
१५जर तुम्ही परमेश्वराची भक्ति करायचे सोडले तर परमेश्वर इस्राएल लोकांस अधिक काळ रानात ठेवील आणि नंतर तुम्ही त्या सर्व लोकांचा नाश कराल.
16 तब वह उसके नज़दीक आकर कहने लगे, हम अपने चौपायों के लिए यहाँ भेड़साले और अपने बाल — बच्चों के लिए शहर बनाएँगे,
१६पण रऊबेनाच्या आणि गादच्या घराण्यातील लोक मोशेकडे गेले. ते म्हणाले, आम्ही या जागेवर आमच्या मुलांसाठी शहरे आणि आमच्या जनावरांसाठी गोठे उभारू.
17 लेकिन हम ख़ुद हथियार बाँधे हुए तैयार रहेंगे के बनी — इस्राईल के आगे आगे चलें, जब तक कि उनको उनकी जगह तक न पहुँचा दें; और हमारे बाल — बच्चे इस मुल्क के बाशिन्दों की वजह से फ़सीलदार शहरों में रहेंगे।
१७त्यामुळे आमची मुले याठिकाणी वस्ती करणाऱ्या इतर लोकांपासून सुरक्षित राहतील. पण आम्ही इस्राएलाच्या इतर लोकांस मदत करण्यासाठी आनंदाने येऊ. आम्ही त्यांना त्यांच्या प्रदेशात आणू.
18 और हम अपने घरों को फिर वापस नहीं आएँगे जब तक बनी — इस्राईल का एक — एक आदमी अपनी मीरास का मालिक न हो जाए।
१८इस्राएलातील प्रत्येकाला त्याचे वतन मिळाल्याशिवाय आम्ही परतणार नाही.
19 और हम उनमें शामिल होकर यरदन के उस पार या उससे आगे, मीरास न लेंगे क्यूँकि हमारी मीरास यरदन के इस पार पश्चिम की तरफ़ हम को मिल गई।”
१९यार्देनेच्या अलीकडे पूर्वेस आम्हास आमचे वतन प्राप्त झाले म्हणून आम्ही यार्देनेच्या पलीकडे व पुढे त्यांच्याबरोबर वतन घेणार नाही.
20 मूसा ने उनसे कहा, अगर तुम यह काम करो और ख़ुदावन्द के सामने हथियारबन्द होकर लड़ने जाओ,
२०तेव्हा मोशे त्यांना म्हणाला, जर तुम्ही या सर्व गोष्टी केल्या तर हा प्रदेश तुमचा होईल. परंतु तुमच्या सैनिकांनी परमेश्वरासमोर लढाईत उतरले पाहिजे.
21 और तुम्हारे हथियार बन्द जवान ख़ुदावन्द के सामने यरदन पार जाएँ, जब तक कि ख़ुदावन्द अपने दुश्मनों को अपने सामने से दफ़ा' न करे,
२१आणि तो आपणापुढून आपले शत्रू वतनातून घालवीन आणि देश परमेश्वरापुढे हस्तगत होईल तुमच्या सैन्याने यार्देन नदी पार करून शत्रू सैन्याला या प्रदेशातून हाकलले पाहीजे.
22 और वह मुल्क ख़ुदावन्द के सामने क़ब्ज़े में न आ जाए; तो इसके बाद तुम वापस आओ, फिर तुम ख़ुदावन्द के सामने और इस्राईल के आगे बेगुनाह ठहरोगे और यह मुल्क ख़ुदावन्द के सामने तुम्हारी मिल्कियत हो जाएगा।
२२आणि तर तो देश त्याच्या ताब्यात आल्यावर तुम्ही परत याल. नंतर परमेश्वराकडे आणि इस्राएलाकडे तुम्ही निरपराधी असाल. तर हा देश परमेश्वरापुढे तुमचे वतन असा होईल.
23 लेकिन अगर तुम ऐसा न करो तो तुम ख़ुदावन्द के गुनाहगार ठहरोगे; और यह जान लो कि तुम्हारा गुनाह तुम को पकड़ेगा।
२३पण जर तुम्ही या गोष्टी केल्या नाहीत तर तुम्ही परमेश्वराविरूद्ध पाप कराल आणि तुमच्या पापाबद्दल तुम्हास शासन होईल याची खात्री बाळगा.
24 इसलिए तुम अपने बाल बच्चों के लिए शहर और अपनी भेड़ — बकरियों के लिए भेड़साले बनाओ; जो तुम्हारे मुँह से निकला है वही करो।”
२४तुमच्या मुलांसाठी शहरे वसवा आणि जनावरांसाठी गोठे बांधा. पण तुम्ही वचन दिल्याप्रमाणे सारे काही करा.
25 तब बनी जद्द और बनी रूबिन ने मूसा से कहा कि “तेरे ख़ादिम, जैसा हमारे मालिक का हुक्म है वैसा ही करेंगे।
२५नंतर रऊबेन आणि गादच्या कुटुंबातील लोक मोशेला म्हणाले, आम्ही तुझे नोकर आहोत. तू आमचा मालक आहेस म्हणून तू जे सांगतोस ते आम्ही करु.
26 हमारे बाल बच्चे और हमारी बीवियाँ, हमारी भेड़ बकरियाँ और हमारे सब चौपाये जिल'आद के शहरों में रहेंगे;
२६आमच्या स्त्रिया, मुले, शेरडेमेंढरे आणि सर्व गुरेढोरे गिलाद शहरात राहतील.
27 लेकिन हम जो तेरे ख़ादिम हैं, इसलिए हमारा एक — एक हथियारबन्द जवान ख़ुदावन्द के सामने लड़ने को पार जाएगा, जैसा हमारा मालिक कहता है।”
२७पण आम्ही, तुझे नोकर यार्देन नदी पार करु. आम्ही परमेश्वरापुढे लढाईस जाऊ. जसे आमचा धनी सांगत आहे.
28 तब मूसा ने उनके बारे में इली'एलियाज़र काहिन और नून के बेटे यशू'अ और इस्राईली क़बाइल के आबाई ख़ान्दानों के सरदारों को वसीयत की
२८याप्रमाणे त्यांनी वचन दिले. ते मोशे, याजक एलाजार, नूनाचा मुलगा यहोशवा आणि इस्राएलचे सर्व वंशाचे प्रमुख या सर्वांनी ते ऐकले.
29 और उनसे यह कहा कि “अगर बनी जद्द और बनी रूबिन का एक — एक मर्द ख़ुदावन्द के सामने तुम्हारे साथ यरदन के पार हथियारबन्द होकर लड़ाई में जाए और उस मुल्क पर तुम्हारा क़ब्ज़ा हो जाए, तो तुम जिल'आद का मुल्क उनकी मीरास कर देना।
२९मोशे त्यांना म्हणाला, गाद आणि रऊबेनचे लोक यार्देन नदी पार करतील. ते लढाईत परमेश्वराच्यापुढे चालतील. ते तुम्हास प्रदेश जिंकायला मदत करतील आणि तुम्ही गिलादाचा प्रदेश त्यांच्या वाटेचा भाग म्हणून द्याल.
30 लेकिन अगर वह हथियार बाँध कर तुम्हारे साथ पार न जाएँ, तो उनको भी मुल्क — ए — कना'न ही में तुम्हारे बीच मीरास मिले।”
३०पण ते तुमच्या सैन्याबरोबर जाण्यात अपयशी ठरले तर कनानमध्ये तुमच्यामध्ये त्यांना वतन मिळेल.
31 तब बनी जद्द और बनी रूबिन ने जवाब दिया, जैसा ख़ुदावन्द ने तेरे ख़ादिमों को हुक्म दिया है, हम वैसा ही करेंगे।
३१गाद आणि रऊबेनच्या लोकांनी उत्तर दिले व म्हणाले, “आम्ही परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही करण्याचे वचन देतो.”
32 हम हथियार बाँध कर ख़ुदावन्द के सामने उस पार मुल्क — ए — कना'न को जाएँगे, लेकिन यरदन के इस पार ही हमारी मीरास रहे।”
३२आम्ही स्वतः सशस्र होऊन परमेश्वरापुढे पलीकडे कनान देशात जाऊ. पण आमचे वतन यार्देन नदीच्या पूर्वेला असावे.
33 तब मूसा ने अमोरियों के बादशाह सीहोन की मम्लकत और बसन के बादशाह 'ओज की मम्लकत को, या'नी उनके मुल्कों को और शहरों को जो उन अतराफ़ में थे, और उस सारी नवाही के शहरों को बनी जद्द और बनी रूबिन और मनस्सी बिन यूसुफ़ के आधे क़बीले को दे दिया।
३३तेव्हा मोशेने गादाचे वंशज, रऊबेनाचे वंशज आणि योसेफाचा मुलगा मनश्शे याचा अर्धा वंश अमोऱ्याचा राजा सीहोन याच्या राज्याचा व बाशानाचा राजा ओग याच्या राज्याचा देश दिला. देश, नगरे व त्यामध्ये आजुबाजूच्या प्रदेशातील नगरे दिली.
34 तब बनी जद्द ने तब बनी जद्द ने दिबोन और 'अतारात और अरो'ईर,
३४गादच्या लोकांनी दीबोन, अटारोथ, अरोएर,
35 और 'अतारात, शोफ़ान, और या'ज़ेर, और युगबिहा,
३५अटारोथ-शोफान, याजेर यागबहा,
36 और बैत निमरा, और बैत हारन, फ़सीलदार शहर और भेड़साले बनाए।
३६बेथ-निम्रा आणि बेथ-हारान ही शहरे वसवली. त्यांनी शहराभोवती तटबंदी उभारली आणि त्यांच्या जनावरांसाठी गोठे बांधले.
37 और बनी रूबिन ने हस्बोन, और इली'आली, और करयताइम,
३७रऊबेनच्या लोकांनी हेशबोन, एलाले, किर्याथाईम.
38 और नबो, और बालम'ऊन के नाम बदलकर उनको और शिबमाह को बनाया, और उन्होंने अपने बनाए हुए शहरों के दूसरे नाम रख्खे।
३८नबो व बाल-मौन आणि सिब्मा ही शहरे वसवली. त्यांनी पुन्हा वसवलेल्या शहरांना जुनीच नावे दिली. पण नेबो आणि बाल-मोनचे नांव त्यांनी बदलले.
39 और मनस्सी के बेटे मकीर की नसल के लोगों ने जाकर जिल'आद को ले लिया, और अमोरियों को जो वहाँ बसे हुए थे निकाल दिया।
३९माखीरच्या कुटुंबातील लोक गिलादाला गेले माखीर मनश्शेचा मुलगा होता. त्यांनी त्या शहराचा पराभव केला. तेथे राहणाऱ्या अमोरी लोकांस घालवले.
40 तब मूसा ने जिल'आद मकीर बिन मनस्सी को दे दिया। तब उसकी नसल के लोग वहाँ सुकूनत करने लगे।
४०मोशेने गिलाद मनश्शेच्या कुटुंबातील माखीराला दिले. म्हणून त्याचे कुटुंब तेथे राहिले.
41 और मनस्सी के बेटे याईर ने उस नवाही की बस्तियों की जाकर ले लिया और उनका नाम हव्वहत या'ईर रख्खा
४१मनश्शेच्या कुटुंबातील याईर याने छोट्या शहरांचा पराभव केला. नंतर त्याने त्यांना याईराची शहरे असे म्हटले.
42 और नूबह ने कनात और उसके देहात को अपने क़ब्ज़े में कर लिया और अपने ही नाम पर उस का भी नाम नूबह रख्खा।
४२नोबाहाने कनाथ व त्याच्या आसपासच्या छोट्या शहरांचा पराभव केला. नंतर त्याने त्या जागेला आपले नाव दिले.