< नहे 12 >
1 वह काहिन और लावी जो ज़रुब्बाबुल बिन सियालतिएल और यशू'अ के साथ गए, सो ये हैं: सिरायाह, यरमियाह, एज्रा,
१शल्तीएलाचा पुत्र जरुब्बाबेल आणि येशूवा यांच्याबरोबर ते जे याजक आणि लेवी आले ते हे आहेतः सराया, यिर्मया, एज्रा,
2 अमरियाह, मल्लूक, हत्तूश,
२अमऱ्या, मल्लूख हत्तूश,
3 सिकनियाह, रहूम, मरीमोत,
३शखन्या, रहूम मरेमोथ.
5 मियामीन, मा'दियाह, बिल्जा,
५मियामीन, माद्या, बिलगा,
6 समा'याह और यूयरीब, यदा'याह
६शमाया, योयारीब, यदया.
7 सल्लू, 'अमुक़ ख़िलक़ियाह, यदा'याह, ये यशू'अ के दिनों में काहिनों और उनके भाईयों के सरदार थे
७सल्लू आमोक, हिल्कीया, यदया, हे लोक येशूवाच्या कारकिर्दीत, याजक आणि त्यांचे नातलग यांचे प्रमुख होते.
8 और लावी ये थे: यशू'अ, बिनवी, क़दमिएल सरीबियाह यहूदाह और मत्तिनियाह जो अपने भाइयों के साथ शुक्रगुज़ारी पर मुक़र्रर था;
८लेवी असेः येशूवा, बिन्नुई, कदमीएल, शेरेब्या, यहूदा, आणि मत्तन्या, हे लोक तसेच मत्तन्याचे नातेवाईक देवाच्या स्तुती स्तोत्रांचे प्रमुख होते.
9 और उनके भाई बक़बूक़ियाह और 'उन्नी उनके सामने अपने — अपने पहरे पर मुक़र्रर थे।
९बकबुक्या आणि उन्नी हे त्यांचे नातलग होते. देवाच्या स्तुतीस्तोत्रांच्या वेळी हे दोघे त्यांच्या पलीकडे उभे राहत.
10 और यशू'अ से यूयक़ीम पैदा हुआ, और यूयक़ीम से इलियासिब पैदा हुआ, और इलियासब से यूयदा' पैदा हुआ,
१०येशूवा योयाकीमचा पिता. योयाकीम एल्याशीबाचा जन्मदाता. एल्याशीबाचा पुत्र योयादा.
11 और यूयदा' से यूनतन पैदा हुआ, और यूनतन से यद्दू' पैदा हुआ,
११योयादाने योनाथानाला जन्म दिला आणि योनाथानाने यद्दवाला.
12 और यूयक़ीम के दिनों में ये काहिन आबाई ख़ान्दानों के सरदार थे: सिरायाह से मिरायाह; यरमियाह से हननियाह;
१२योयाकीमच्या काळात याजकांच्या घराण्यांचे मुख्य असलेले लोक पुढील प्रमाणे: सरायाच्या घराण्याचा प्रमुख मराया. यिर्मयाच्या घराण्याचा प्रमुख हनन्या
13 एज्रा से मुसल्लाम; अमरियाह से यहूहनान;
१३एज्राच्या घराण्याचा प्रमुख मशुल्लाम. अमऱ्याच्या घराण्याचा प्रमुख यहोहानान.
14 मलकू से यूनतन, सबनियाह से यूसुफ़;
१४मल्लूखीच्या घराण्याचा प्रमुख योनाथान शबन्याच्या घराण्याचा प्रमुख योसेफ.
15 हारिम से 'अदना; मिरायोत से ख़लक़ै;
१५हारीमच्या घराण्याचा प्रमुख अदना. मरामोथच्या घराण्याचा प्रमुख हेलकइ.
16 इद्दू से ज़करियाह; जिन्नतून से मुसल्लाम:
१६इद्दोच्या घराण्याचा प्रमुख जखऱ्या. गिन्नथोनच्या घराण्याचा प्रमुख मशुल्लाम.
17 अबियाह से ज़िकरी; मिनयमीन से' मौ'अदियाह से फ़िल्ती;
१७अबीयाच्या घराण्याचा प्रमुख जिख्री. मिन्यामीन आणि मोवद्या यांच्या घराण्याचा प्रमुख पिल्तय.
18 बिलजाह से सम्मू'आ; समा'याह से यहूनतन;
१८बिलगाच्या घराण्याचा प्रमुख शम्मूवा शमायाच्या घराण्याचा प्रमुख यहोनाथान.
19 यूयरीब से मत्तने; यदा'याह से 'उज़्ज़ी;
१९योयारीबच्या घराण्याचा प्रमुख मत्तनय. यदयाच्या घराण्याचा प्रमुख उज्जी.
20 सल्लै से कल्लै; 'अमोक से इब्र;
२०सल्लू याच्या घराण्याचा प्रमुख कल्लय आमोकच्या घराण्याचा प्रमुख एबेर
21 ख़िलक़ियाह से हसबियाह; यदा'याह से नतनीएल।
२१हिल्कीयाच्या घराण्याचा प्रमुख हशब्या यदयाच्या घराण्याचा प्रमुख नथनेल.
22 इलियासब और यूयदा' और यूहनान और यद्दू' के दिनों में, लावियों के आबाई ख़ान्दानों के सरदार लिखे जाते थे; और काहिनों के, दारा फ़ारसी की सल्तनत में।
२२एल्याशीब, योयादा, योहानान व यद्दवा यांच्या काळात जे लेव्यांच्या आणि याजकांच्या घराण्यांचे प्रमुख होते त्यांची नावे पारसी राजा दारयावेश याच्या कारकिर्दीत लिहून ठेवलेली आहेत.
23 बनी लावी के आबाई ख़ान्दानों के सरदार यूहनान बिन इलियासब के दिनों तक, तवारीख़ की किताब में लिखे जाते थे।
२३लेवी घराण्यातील वंशजांच्या कुटुंबप्रमुखांची नावे एल्याशीबाचा पुत्र योहानान याच्या काळापर्यंत इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत.
24 और लावियों के रईस: हसबियाह, सरीबियाह और यशू'अ बिन क़दमीएल, अपने भाइयों के साथ आमने सामने बारी — बारी से मर्द — ए — ख़ुदा दाऊद के हुक्म के मुताबिक़ हम्द और शुक्रगुज़ारी के लिए मुक़र्रर थे।
२४लेव्यांचे प्रमुख असे होतेः हशब्या, शेरेब्या, कदमीएलचा पुत्र येशूवा, आणि त्यांचे भाऊ देवाची गौरव गीते आणि स्तोत्रे गाण्यासाठी त्यांच्या पलीकडे उभे राहत. समूह समुहाने दाद देत कारण देवाचा मनुष्य दावीद याची तशीच आज्ञा होती.
25 मत्तनियाह और बक़बूक़ियाह और अब्दियाह और मुसल्लाम और तलमून और अक़्क़ूब दरबान थे, जो फाटकों के मख़ज़नों के पास पहरा देते थे।
२५दरवाजांच्या पलीकडच्या कोठारांवर पहारे करणाऱ्या द्वारपालांची नावे अशी: मत्तन्या, बकबुक्या, ओबद्या, मशुल्लाम, तल्मोन अक्कूब,
26 ये यूयक़ीम बिन यशू'अ बिन यूसदक़ के दिनों में, और नहमियाह हाकिम और एज्रा काहिन और फ़कीह के दिनों में थे।
२६हे द्वारपाल योयाकीमच्या कारकिर्दीत सेवेत होते. योयाकीम हा येशूवाचा पुत्र आणि येशूवा योसादाकाचा. नहेम्या हा अधिकारी आणि एज्रा हा याजक व लेखक यांच्याच काळात द्वारपाल होते.
27 और येरूशलेम की शहरपनाह की तक़्दीस के वक़्त, उन्होंने लावियों को उनकी सब जगहों से ढूंड निकाला कि उनको येरूशलेम में लाएँ, ताकि वह ख़ुशी — ख़ुशी झाँझ और सितार और बरबत के साथ शुक्रगुज़ारी करके और गाकर तक़दीस करें।
२७यरूशलेमची तटबंदीची भिंत लोकांनी समर्पण केली. त्यांनी सर्व लेव्यांना यरूशलेमेला एकत्र आणले. यरूशलेमची भिंत अर्पण करायच्या समारंभासाठी हे लेवी आपापल्या गावांहून आले. देवाची स्तुतीगीते आणि धन्यवादगीते गाण्यासाठी ते आले. त्यांनी झांजा, सतार व वीणा ही वाद्ये वाजवली.
28 इसलिए गानेवालों की नसल के लोग येरूशलेम को आस — पास के मैदान से और नतूफ़ातियों के देहात से,
२८शिवाय सर्व गायक देखील यरूशलेम भोवतालच्या नटोफाथी प्रांतातून यरूशलेमेला आले.
29 और बैत — उल — जिलजाल से भी, और जिबा' और 'अज़मावत के खेतों से इकट्ठे हुए; क्यूँकि गानेवालों ने येरूशलेम के चारों तरफ़ अपने लिए देहात बना लिए थे।
२९नटोफा, बेथ-गिलगाल, गिबा आणि अजमावेथ ही ती गावे होत. यरूशलेम भोवतालच्या प्रदेशात या गायकांनी आपल्यासाठी ही छोटी गावे वसवली होती.
30 और काहिनों और लावियों ने अपने आपको पाक किया, और उन्होंने लोगों को और फाटकों को और शहरपनाह को पाक किया।
३०नंतर याजक व लेवी यांनी समारंभपूर्वक स्वत: चे शुध्दीकरण केले. त्यानंतर त्यांनी बाकीचे लोक, वेशी, यरूशलेमची भिंत यांनाही शुद्ध करण्याचा समारंभ केला.
31 तब मैं यहूदाह के अमीरों को दीवार पर लाया, और मैंने दो बड़े ग़ोल मुक़र्रर किए जो हम्द करते हुए जुलूस में निकले। एक उनमें से दहने हाथ की तरफ़ दीवार के ऊपर — ऊपर से कूड़े के फाटक की तरफ़ गया,
३१यहूदाच्या नेत्यांना मी वर जाऊन तटबंदीवर थांबायला सांगितले आणि देवाला धन्यवाद देण्यासाठी गायकांचे दोन मोठे वृंदही मी नेमले. त्यातील एक गट राखेच्या ढिगाच्या वेशीकडे उजवीकडे असलेल्या भिंतीवर गेला.
32 और ये उनके पीछे — पीछे गए, या'नी हुसा'याह और यहूदाह के आधे सरदार।
३२होशया आणि यहूदाचे निम्मे अधिकारी त्यांच्या मागोमाग गेले,
33 'अज़रियाह, एज्रा और मुसल्लाम,
३३आणि अजऱ्या, एज्रा, मशुल्लाम,
34 यहूदाह और बिनयमीन और समा'याह और यरमियाह,
३४यहूदा, बन्यामीन, शमाया, यिर्मया हे ही त्यांच्या पाठोपाठ गेले.
35 और कुछ काहिनज़ादे नरसिंगे लिए हुए, या'नी ज़करियाह बिन यूनतन, बिन समा'याह, बिन मत्तिनियाह, बिन मीकायाह, बिन ज़क्कूर बिन आसफ़;
३५काही याजकांचे पुत्र त्यांच्यापाठोपाठ रणशिंग वाजवत भिंतीकडे निघाले. जखऱ्या देखील त्यांच्यामागे निघाला. आसाफाचा पुत्र जक्कूर, जक्कूरचा पुत्र मिखाया, मिखायाचा पुत्र मत्तन्या, मत्तन्याचा पुत्र शमाया, शमायाचा पुत्र योनाथान, योनाथानाचा पुत्र जखऱ्या.
36 और उसके भाई समा'याह और 'अज़रएल, मिल्ले, जिल्लै, मा'ऐ, नतनीएल और यहूदाह और हनानी, मर्द — ए — ख़ुदा दाऊद के बाजों को लिए हुए जाते थे और एज्रा फ़क़ीह उनके आगे — आगे था।
३६आसाफचे भाऊ म्हणजे शमाया, अजरेल, मिललई, गिललई, माई नथनेल, यहूदा, हनानी हे ही वाद्ये घेऊन निघाले. ही वाद्ये देवाचा मनुष्य दावीद याने केली होती. एज्रा हा लेखक त्यांच्यापुढे होता.
37 और वह चश्मा फाटक से होकर सीधे आगे गए, और दाऊद के शहर की सीढ़ियों पर चढ़कर शहरपनाह की ऊँचाई पर पहुँचे, और दाऊद के महल के ऊपर होकर पानी फाटक तक पूरब की तरफ़ गए।
३७झऱ्याच्या वेशीपाशी ते पोहोंचले. पायऱ्या चढून ते दावीदनगरापर्यंत गेले. नगराच्या तटबंदीच्या भिंतीवर ते होते. दावीदाच्या घरावरुन चालत जाऊन ते पाण्याच्या वेशीकडे गेले.
38 और शुक्रगुज़ारी करनेवालों का दूसरा ग़ोल और उनके पीछे — पीछे मैं और आधे लोग उनसे मिलने को दीवार पर तनूरों के बुर्ज के ऊपर चौड़ी दीवार तक
३८स्तुती गाणाऱ्या गायकांचा दुसरा गट दुसऱ्या दिशेला, डावीकडे निघाला. भिंतीच्यावर ते पोहोचेपर्यंत मी त्यांच्या पाठोपाठ होतो. अर्धे लोकही त्यांच्या मागोमाग गेले. भटृयांच्या दुर्गावरुन ते रुंद कोटाकडे गेले.
39 और इफ़्राईमी फाटक के ऊपर पुराने फाटक और मछली फाटक, और हननएल के बुर्ज और हमियाह के बुर्ज पर से होते हुए भेड़ फाटक तक गए; और पहरेवालों के फाटक पर खड़े हो गए।
३९मग ते पुढील वेशींवरुन गेले. एफ्राईमाची वेस जुनी वेस, मत्स्यवेस. हनानेल बुरूज आणि हमया बुरूज यांच्यावरुन ते पुढे गेले. मेंढरांच्या वेशीपर्यंत जाऊन पहाऱ्याच्या वेशीजवळ ते थांबले.
40 तब शुक्रगुज़ारी करनेवालों के दोनों ग़ोल और मैं और मेरे साथ आधे हाकिम ख़ुदा के घर में खड़े हो गए।
४०मग स्तुती गाणाऱ्या गायकांचे दोन्ही समूह देवाच्या मंदिरात आपापल्या जागी गेले. मी माझ्या जागी निम्म्या अधिकाऱ्यांसमवेत उभा राहिलो. अधिकाऱ्यांपैकी निम्म्यांनी मंदिरातील आपापल्या जागा घेतल्या.
41 और काहिन इलियाक़ीम, मासियाह, बिनयमीन, मीकायाह, इलीयू'ऐनी, ज़करियाह, हननियाह नरसिंगे लिए हुए थे;
४१मग याजक आपापल्या जागी उभे राहिले: एल्याकीम, मासेया, मिन्यामीन, मिखाया, एल्योएनाई, जखऱ्या, हनन्या या याजकांजवळ त्यांचे रणशिंग होते.
42 और मासियाह और समा'याह और एलियाज़र और 'उज़्ज़ी और यूहहनान और मल्कियाह और 'ऐलाम और एज्रा अपने सरदार गानेवाले, इज़रखियाह के साथ बलन्द आवाज़ से गाते थे।
४२मग मासेया, शमाया, एलाजार, उज्जी, यहोहानान, मल्खीया, एलाम व एजेर हे याजक मंदिरात आपापल्या जागी उभे राहिले. मग यिज्रह्याच्या अधिपत्याखाली या दोन्ही गायक गटांनी गायनाला सुरुवात केली.
43 और उस दिन उन्होंने बहुत सी क़ुर्बानियाँ चढ़ाईं और उसी दिन ख़ुशी की क्यूँकि ख़ुदा ने ऐसी ख़ुशी उनको बख़्शी कि वह बहुत ख़ुश हुए; और 'औरतों और बच्चों ने भी ख़ुशी मनाई। इसलिए येरूशलेम की ख़ुशी की आवाज़ दूर तक सुनाई देती थी।
४३या खास दिवशी याजकांनी बरेच यज्ञ केले आणि आनंदोत्सव केला, सर्वजण अतिशय आनंदात होते. कारण देवाने सर्वांना आनंदीत केले होते. स्त्रिया आणि बालकेसुध्दा अतिशय हर्षभरित झाली होती. दूरवरच्या लोकांसही यरूशलेम मधला आनंदाचा जल्लोष ऐकू येत होता.
44 उसी दिन लोग ख़ज़ाने की, और उठाई हुई क़ुर्बानियों और पहले फलों और दहेकियों की कोठरियों पर मुक़र्रर हुए, ताकि उनमें शहर शहर के खेतों के मुताबिक़, जो हिस्से काहिनों और लावियों के लिए शरा' के मुताबिक़ मुक़र्रर हुए उनको जमा' करें क्यूँकि बनी यहूदाह काहिनों और लावियों की वजह से जो हाज़िर रहते थे ख़ुश थे।
४४त्यादिवशी भांडार, अर्पणे, प्रथमफळे दशांश यांच्या कोठारांवर अर्पणे गोळा करण्यासाठी लोकांच्या नेमणुका केल्या. त्या अर्पणातील काही भाग याजक व लेवी यांच्यासाठी नियमशास्त्राप्रमाणे होता. समोर उभ्या असलेल्या याजक व लेवी यांच्यासाठी यहूदातील लोकांनी आनंद केला.
45 इसलिए वह अपने ख़ुदा के इन्तज़ाम और तहारत के इन्तज़ाम की निगरानी करते रहे; और गानेवालों और दरबानों ने भी दाऊद और उसके बेटे सुलेमान के हुक्म के मुताबिक़ ऐसा ही किया।
४५याजक आणि लेवी यांनी देवासाठी करायची ती सर्व कृत्ये केली. लोकांच्या शुद्धीकरणाचे विधी पार पाडले. दावीद आणि शलमोन यांच्या आज्ञेवरून गायक व द्वारपाल यांनी आपली कामगिरी बजावली.
46 क्यूँकि पुराने ज़माने से दाऊद और आसफ़ के दिनों में एक सरदार मुग़न्नी होता था, और ख़ुदा की हम्द और शुक्र के गीत गाए जाते थे।
४६फार पूर्वी, दावीदाच्या आणि आसाफाच्या काळी गायकांचे प्रमुख नेमले होते आणि त्याच्याजवळ देवाची स्तुतीगीते आणि धन्यवादगीते होती.
47 और तमाम इस्राईल ज़रुब्बाबुल के और नहमियाह के दिनों में हर रोज़ की ज़रूरत के मुताबिक़ गानेवालों और दरबानों के हिस्से देते थे; यूँ वह लावियों के लिए चीज़ें मख़्सूस करते, और लावी बनी हारून के लिए मख़्सूस करते थे।
४७अशाप्रकारे जरुब्बाबेल आणि नहेम्या यांच्या काळात समस्त इस्राएली लोकांनी गायक आणि द्वारपाल यांच्यासाठी रोजच्या रोज लागेल ते दिले. इतर लेव्यांसाठीही लोकांनी काही भाग बाजूला ठेवला. आणि अहरोनाच्या वंशजांसाठी लेव्यांनी काही भाग वेगळा ठेवला.