< नहे 11 >
1 और लोगों के सरदार येरूशलेम में रहते थे; और बाक़ी लोगों ने पर्ची डाली कि हर दस शख़्सों में से एक को शहर — ए — पाक, येरूशलेम, में बसने के लिए लाएँ; और नौ बाक़ी शहरों में रहें।
१इस्राएली लोकांचे नेते जे यरूशलेम नगरात राहत होते आणि बाकीच्या लोकांपैकी दहातल्या एकाने पवित्र यरूशलेम नगर येथे रहावे आणि उरलेल्या नऊ जणांनी आपापल्या गावी वस्ती करावी असे ठरवण्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या.
2 और लोगों ने उन सब आदमियों को, जिन्होंने ख़ुशी से अपने आपको येरूशलेम में बसने के लिए पेश किया दुआ दी।
२आणि जे लोक स्वखुशीने यरूशलेमेमध्ये राहायला तयार झाले. त्यांना लोकांनी आशीर्वाद दिले.
3 उस सूबे के सरदार, जो येरूशलेम में आ बसे ये हैं; लेकिन यहूदाह के शहरों में हर एक अपने शहर में अपनी ही मिल्कियत में रहता था, या'नी अहल — ए — इस्राईल और काहिन और लावी और नतीनीम, और सुलेमान के मुलाज़िमों की औलाद।
३जे प्रांताचे अधिकारी यरूशलेमात राहिले ते हेच होते. पण काही इस्राएल लोक, याजक, लेवी, मंदिराचे सेवेकरी व शलमोनाच्या सेवकांचे वंशज यहूदातील आपआपल्या नगरामध्ये व वतनात राहत होते.
4 और येरूशलेम में कुछ बनी यहूदाह और कुछ बनी बिनयमीन रहते थे। बनी यहूदाह में से, 'अतायाह बिन 'उज्ज़ियाह बिन ज़करियाह बिन अमरियाह बिन सफ़तियाह बिन महललएल बनी फ़ारस में से;
४यरूशलेमेमध्ये काही यहूदी आणि बन्यामीनी घराण्यातील व्यक्ती राहत होत्या. यरूशलेमामध्ये आलेले यहूदाचे वंशज पुढीलप्रमाणेः उज्जीयाचा पुत्र अथाया, जखऱ्याचा पुत्र, अमऱ्याचा पुत्र आणि अमऱ्या शफाट्याचा. शफाट्या महललेलचा. महललेल हा पेरेसचा वंशज.
5 और मा'सियाह बिन बारूक बिन कुलहोज़ा, बिन हजायाह, बिन 'अदायाह, बिन यूयरीब बिन ज़करियाह बिन शिलोनी।
५बारूखचा पुत्र मासेया (बारुख हा कोल-होजचा पुत्र, कोलहोजे हजायाचा पुत्र, हजाया अदायाचा, अदाया योयारीबचा, योयारीब जखऱ्याचा आणि जखऱ्या शिलोनीचा पुत्र.)
6 सब बनी फ़ारस जो येरूशलेम में बसे चार सौ अठासठ सूर्मा थे।
६पेरेसचे सर्व पुत्र जे यरूशलेमामध्ये राहत होते त्यांची संख्या चारशे अडुसष्ट होती. हे सर्व शूर पुरुष होते.
7 और ये बनी बिनयमीन हैं, सल्लू बिन मुसल्लाम बिन यूऐद बिन फ़िदायाह बिन क़ूलायाह बिन मासियाह बिन एतीएल बिन यसायाह।
७यरूशलेमामध्ये राहायला गेलेले बन्यामीनचे वंशज असेः मशुल्लामचा पुत्र सल्लू (मशुल्लाम योएदाचा पुत्र, योएद पदायाचा, पदाया कोलायाचा पुत्र, कोलाया मासेयाचा, मासेया ईथीएलचा आणि ईथीएल यशायाचा)
8 फिर जब्बै सल्लै और नौ सौ अट्ठाईस आदमी।
८यशायाच्या पाठोपाठ गब्बई आणि सल्लाई होते. ते एकंदर नवशे अठ्ठावीस जण होते.
9 और यूएल बिन ज़िकरी उनका नाज़िम था, और यहूदाह बिन हस्सनूह शहर के हाकिम का नाइब था।
९जिख्रीचा पुत्र योएल त्यांचा प्रमुख होता आणि हसनुवाचा पुत्र यहूदा, हा यरूशलेम नगराचा दुय्यम अधिकारी होता.
10 काहिनों में से यदा'याह बिन यूयरीब और यकीन,
१०याजकांपैकीः योयारीबचा पुत्र यदया, याखीन,
11 शिरायाह बिन ख़िलक़ियाह बिन मुसल्लाम बिन सदोक़ बिन मिरायोत बिन अख़ितोब, ख़ुदा के घर का नाज़िम,
११हिल्कीयाचा पुत्र सराया (हिल्कीया मशुल्लामचा पुत्र, मशुल्लाम सादोकाचा, सादोक मरायोथचा, मरायोथ अहीटूबचा. अहीटूब देवाच्या मंदिराचा अधिक्षक होता.)
12 और उनके भाई जो हैकल में काम करते थे, आठ सौ बाईस; और 'अदायाह बिन यरोहाम, बिन फ़िल्लियाह बिन अम्ज़ी बिन ज़क़रियाह, बिन फ़शहूर बिन मलकियाह,
१२आणि त्यांचे आठशे बावीस भाऊबंद मंदिराचे काम करत होते. आणि यरोहामाचा पुत्र अदाया (यरोहाम पलल्याचा पुत्र. पलल्या अम्सीचा, जखऱ्याचा पुत्र, जखऱ्या पशहूरचा आणि पशहूर मल्कीयाचा).
13 और उसके भाई आबाई ख़ान्दानों के रईस, दो सौ बयालीस; और अमसी बिन 'अज़्राएल बिन अख़सी बिन मसल्लीमोत बिन इम्मेर,
१३मल्कीयाचे दोनशे बेचाळीस हे सर्वजण आपापल्या पितृकुळांचे प्रमुख होते अजरेलचा पुत्र अमशसइ अजरेल अहजईचा पुत्र, अहजई मशिल्लेमोतचा, मशिल्लेमोथ इम्मेरचा
14 और उनके भाई ज़बरदस्त सूर्मा, एक सौ अट्ठाईस; और उनका सरदार ज़बदीएल बिन हजदूलीम था।
१४आणि इम्मेरचे एकशे अठ्ठावीस हे सर्व शूर सैनिक होते. हगदोलीमचा पुत्र जब्दीएल त्यांचा अधिकारी होता.
15 और लावियों में से, समा'याह बिन हुसूक बिन 'अज़रिक़ाम बिन हसबियाह बिन बूनी;
१५लेवी पुढीलप्रमाणेः हश्शूबचा पुत्र शमाया, हश्शूब अज्रीकामचा पुत्र, अज्रीकाम हशब्याचा, हशब्या बुन्नीचा
16 और सब्बतै और यूज़बाद लावियों के रईसों में से, ख़ुदा के घर के बाहर के काम पर मुक़र्रर थे;
१६शब्बथई आणि योजाबाद हे दोघे लेव्यांचे प्रमुख होते आणि देवाच्या मंदिराबाहेरच्या कारभाराचे ते प्रमुख होते.
17 और मत्तनियाह बिन मीका बिन ज़ब्दी बिन आसफ़ सरदार था, जो दुआ के वक़्त शुक्रगुज़ारी शुरू' करने में पेशवा था; और बक़बूक़ियाह उसके भाइयों में से दूसरे दर्जे पर था, और 'अबदा बिन सम्मू' बिन जलाल बिन यदूतून।
१७मत्तन्या, हा मीखाचा पुत्र मीखा जब्दीचा आणि जब्दी आसाफचा. आसाफ गानवृंदाचा प्रमुख होता. ईशस्तुती आणि प्रार्थनागीते म्हणताना तो आरंभ करी व लोक पाठोपाठ म्हणत व बकबुक्या भाऊबंदांमध्ये त्याचा अधिकार दुसरा होता आणि शम्मूवाचा पुत्र अब्दा, शम्मूवा गालालाचा पुत्र, गालाल यदूथूनाचा
18 पाक शहर में कुल दो सौ चौरासी लावी थे।
१८या पवित्र नगरात दोनशे चौऱ्याऐंशी लेवी राहायला गेले.
19 और दरबान 'अक़्क़ब, तलमून और उनके भाई जो फाटकों की निगहबानी करते थे, एक सौ बहतर थे।
१९यरूशलेमामध्ये गेलेले द्वारपाल असेः अक्कूब, तल्मोन आणि त्यांचे भाऊबंद एकशे बहात्तर होते.
20 और इस्राईलियों और काहिनों और लावियों के बाक़ी लोग यहूदाह के सब शहरों में अपनी — अपनी मिल्कियत में रहते थे।
२०बाकीचे इस्राएली लोक आणि याजक तसेच लेवी यहूदाच्या वेगवेगळया नगरांमध्ये आपापल्या वडिलोपार्जित वतनांमध्ये राहिले.
21 लेकिन नतीनीम 'ओफ़ल में बसे हुए थे; और ज़ीहा और जिसफ़ा नतीनीम पर मुक़र्रर थे।
२१मंदिराचे सेवेकरी ओफेल टेकडीवर राहत. सीहा आणि गिश्पा हे या सेवेकऱ्यांचे प्रमुख होते.
22 और उज़्ज़ी बिन बानी बिन हसबियाह बिन मत्तनियाह बिन मीका जो आसफ़ की औलाद या'नी गानेवालों में से था, येरूशलेम में उन लावियों का नाज़िम था, जो ख़ुदा के घर के काम पर मुक़र्रर थे।
२२बानीचा पुत्र उज्जी हा यरूशलेममधील लेवीचा प्रमुख होता. बानी हशब्याचा, हशब्या मत्तन्याचा, मत्तन्या मीखाचा पुत्र. उज्जी हा आसाफचा वंशज. आसाफचे वंशज गायक असून देवाच्या मंदिरातील सेवेची जबाबदारी त्यांच्यावर होती.
23 क्यूँकि उनके बारे में बादशाह की तरफ़ से हुक्म हो चुका था, और गानेवालों के लिए हर रोज़ की ज़रूरत के मुताबिक़ मुक़र्ररा रसद थी।
२३ते राजाज्ञा पाळत. गायकांनी दररोज काय करायचे ते आज्ञेत सांगितलेले असे.
24 और फ़तहयाह बिन मशेज़बेल जो ज़ारह बिन यहूदाह की औलाद में से था, र'इयत के सब मुआ'मिलात के लिए बादशाह के सामने रहता था।
२४राजाचा हुकूम काय आहे हे पथह्या लोकांस सांगत असे. पथह्या हा मशेजबेल याचा पुत्र. मशेजबेल जेरहच्या वंशातला होता. जेरह यहूदाचा पुत्र.
25 रहे गाँव और उनके खेत, इसलिए बनी यहूदाह में से कुछ लोग क़रयत — अरबा' और उसके क़स्बों में, और दीबोन और उसके क़स्बों में, और यक़बज़ीएल और उसके गाँवों में रहते थे;
२५यहूदातील काही लोक ज्या खेड्यात आणि आपल्या शेतामध्ये राहत ती अशीः किर्याथ-आर्बात व त्याच्या आसपासची खेडी. दिबोन आणि त्याच्या भोवतालची खेडी. यकब्सेल आणि त्या भोवतालची खेडी,
26 और यशू'अ और मोलादा और बैत फ़लत में,
२६आणि येशूवा, मोलादा, बेथ-पेलेत ही नगरे व त्यांच्या आसपासची खेडी,
27 और हसर — सू'आल और बैरसबा' और उसके कस्बों में,
२७हसर-शुवाल, बैर-शेबा आणि त्यांच्या भोवतालची खेडी.
28 और सिक़लाज और मक़ुनाह और उस के कस्बों में
२८सिकलाग, मकोना व त्यांच्या भोवतालची गावे,
29 और 'ऐन — रिम्मोन और सुर'आह में, और यरमूत में,
२९एन-रिम्मोन, सरा, यर्मूथ
30 ज़नोआह, 'अदूल्लाम, और उनके गाँवों में; लकीस और उसके खेतों में, 'अज़ीक़ा और उसके क़स्बों में, यूँ वह बैरसबा' से हिनूम की वादी तक डेरों में रहते थे।
३०जानोहा, अदुल्लम ही नगरे आणि त्यांच्या आसपासची खेडी, लाखीश आणि त्याच्या भोवतालची शेतीवाडी, अजेका आणि त्याभोवतीची खेडी. अशाप्रकारे यहूदाचे लोक बैर-शेबापासून हिन्नोमच्या खोऱ्यापर्यंतच्या भागात राहत होते.
31 बनी बिनयमीन भी जिबा' से लेकर आगे मिकमास और 'अय्याह और बैतएल और उसके क़स्बों में,
३१गिबातील बन्यामीनच्या कुळातले वंशज मिखमाश, अया, बेथेल ही नगरे व त्या भोवतालची खेडी
32 और 'अन्तोत और नूब और 'अननियाह,
३२अनाथोथ, नोब, अनन्या,
33 और हासूर और रामा और जितेम,
३३हासोर, रामा, गित्तइम,
34 और हादीद और ज़िबोईम और नबल्लात,
३४हादीद, सबोइम, नबल्लट,
35 और लूद और ओनू, या'नी कारीगरों की वादी में रहते थे।
३५लोद, ओना आणि कारागिरांचे खोरे येथे राहत होते.
36 और लावियों में से कुछ फ़रीक़ जो यहूदाह में थे, वह बिनयमीन से मिल गए।
३६लेवीच्या कुळातील यहूदाचे काही गट बन्यामीनांच्या प्रदेशात गेले.