< क़ुजा 7 >
1 तब यरुब्बा'ल या'नी जिदा'ऊन और सब लोग जो उसके साथ थे सवेरे ही उठे, और हरोद के चश्मे के पास डेरा किया, और मिदियानियों की लश्कर गाह उनके उत्तर की तरफ़ कोह — ए — मोरा के मुत्तसिल वादी में थी
१मग यरूब्बाल म्हणजे गिदोन आणि त्याच्याबरोबरचे जे सर्व लोक ह्यांनी सकाळी उठून हरोदा झऱ्याजवळ तळ दिला, आणि मिद्यानी लोकांची छावणी मोरे डोंगराच्या उत्तर खोऱ्यात होती.
2 तब ख़ुदावन्द ने जिदा'ऊन से कहा, तेरे साथ के लोग इतने ज़्यादा हैं, कि मैं मिदियानियों को उनके हाथ में नहीं कर सकता; ऐसा न हो कि इस्राईली मेरे सामने अपने ऊपर फ़ख़्र कर के कहने लगें कि हमारी ताक़त ने हम को बचाया।
२तेव्हा परमेश्वर गिदोनाला म्हणाला, “तुझ्याबरोबर जे सैन्य आहे ते मिद्यानावर मला विजय देण्यास फारच आहेत; अशाप्रकारे इस्राएल मजविरूद्ध अशी बढाई मारून म्हणतील की, आम्ही आमच्या सामर्थ्यानेच वाचलो.
3 इसलिए तू लोगों में सुना सुना कर ऐलान कर दे कि जो कोई तरसान और हिरासान हो, वह लौट कर कोह — ए — जिल'आद से चला जाए'। चुनाचें उन लोगों में से बाइस हज़ार तो लौट गए, और दस हज़ार बाक़ी रह गए।
३तर आता तू लोकांच्या कानी जाईल असे जाहीर करून सांग की, ‘जो कोणी भित्रा आणि घाबरट आहे,’ त्याने गिलाद डोंगरावरून निघून परत माघारी जावे.” तेव्हा लोकांतून बावीस हजार लोक माघारी गेले आणि दहा हजार राहिले.
4 तब ख़ुदावन्द ने जिदा'ऊन से कहा कि लोग अब भी ज़्यादा हैं; इसलिए तू उनको चश्मे के पास नीचे ले आ, और वहाँ मैं तेरी ख़ातिर उनको आज़माऊँगा; और ऐसा होगा कि जिसके बारे में तुझ से कहूँ, 'यह तेरे साथ जाए, वही तेरे साथ जाए; और जिसके हक़ में मैं कहूँ कि यह तेरे साथ न जाए,' वह न जाए।
४मग परमेश्वर गिदोनाला म्हणाला, “अजूनही लोक फार आहेत; तू त्यांना खाली पाण्याजवळ ने, आणि तेथे मी तुझ्यासाठी त्यांची कसोटी घेईन. ज्याच्याविषयी मी तुला सांगेन, त्याने तुझ्याबरोबर यावे तो तुझ्याबरोबर जावो, आणि ज्या प्रत्येकाविषयी मी तुला सांगेन की, त्याने तुझ्याबरोबर न यावे, तो न जावो.”
5 इसलिए वह उन लोगों को चश्मे के पास नीचे ले गया, और ख़ुदावन्द ने जिदा'ऊन से कहा कि जो जो अपनी ज़बान से पानी चपड़ चपड़ कर के कुत्ते की तरह पिए उसको अलग रख, और वैसे ही हर ऐसे शख़्स को जो घुटने टेक कर पिए।
५मग त्याने लोकांस खाली पाण्याजवळ नेले; मग परमेश्वराने गिदोनाला सांगितले, “जसा कुत्रा चाटून पाणी पितो, तसा जो कोणी आपल्या जिभेने चाटून पाणी पिईल त्यास तू एकीकडे ठेव; आणि जो कोणी पाणी पिण्यास आपल्या गुडघ्यावर टेकेल त्यास एकीकडे ठेव.”
6 इसलिए जिन्होंने अपना हाथ अपने मुँह से लगा कर चपड़ चपड़ कर के पिया वह गिनती में तीन सौ शख़्स थे, और बाक़ी सब लोगों ने घुटने टेक कर पानी पिया।
६तेव्हा जे आपला हात आपल्या तोंडाकडे नेऊन चाटीत प्याले, ते पुरुष मोजले, ते तीनशे होते, आणि बाकीचे सर्व लोक पाणी प्यावयास आपल्या गुडघ्यावर टेकले.
7 तब ख़ुदावन्द ने जिदा'ऊन से कहा कि मैं इन तीन सौ आदमियों के वसीले से जिन्होंने चपड़ चपड़ कर के पिया तुम को बचाऊँगा, और मिदियानियों को तेरे हाथ में कर दूँगा; और बाक़ी सब लोग अपनी अपनी जगह को लौट जाएँ।
७नंतर परमेश्वराने गिदोनाला सांगितले, “जे तीनशे पुरुष पाणी चाटून प्याले त्यांच्याकडून मी तुम्हाला सोडवीन, आणि मिद्यानाला तुझ्या हाती देईन; यास्तव बाकीच्या सर्व लोकांस आपल्या ठिकाणी जाऊ दे.”
8 तब उन लोगों ने अपना — अपना खाना और नरसिंगा अपने अपने हाथ में लिया; और उसने सब इस्राईली आदमियों को उनके डेरों की तरफ़ रवाना कर दिया पर उन तीन सौ आदमियों रख लिया; और मिदियानियों की लश्कर गाह उसके नीचे वादी में थी।
८तेव्हा त्या लोकांनी त्यांच्या हाती अन्नसामग्री व त्यांची रणशिंगे घेतली, आणि त्याने इस्राएलाची बाकीची सर्व माणसे त्यांच्या तंबूकडे पाठवली; केवळ ती तीनशे माणसे ठेवली. तेव्हा मिद्यान्यांचा तळ त्यांच्या खाली खिंडीत होता.
9 और उसी रात ख़ुदावन्द ने उससे कहा, उठ, और नीचे लश्कर गाह में उतर जा: क्यूँकि मैंने उसे तेरे क़ब्ज़ा में कर दिया है।
९आणि त्या रात्री असे झाले की परमेश्वराने त्यास सांगितले, “तू उठून खाली तळावर जा, कारण मी तो तुझ्या हाती दिला आहे.
10 लेकिन अगर तू नीचे जाते डरता है, तो तू अपने नौकर फ़ूराह के साथ लश्कर गाह में उतर जा,
१०आणि जर तुला खाली जायला भीती वाटत असली तर आपला सेवक पुरा यालाबरोबर घेऊन खाली तळाजवळ जा.
11 और तू सुन लेगा कि वह क्या कह रहे हैं; इसके बाद तुझ को हिम्मत होगी कि तू उस लश्कर गाह में उतर जाए। चुनाँचे वह अपने नौकर फ़ूराह को साथ लेकर उन सिपाहियों के पास जो उस लश्कर गाह के किनारे थे गया।
११आणि ते जे बोलतील, ते तू ऐक; म्हणजे तुझे हात बळकट होतील आणि तू उतरून तळावर जाशील. तेव्हा तळात जे हत्यारबंद होते,” त्यांच्या काठापर्यंत तो आपला सेवक पुरा याला घेऊन खाली गेला.
12 और मिदियानी और 'अमालीकी और मशरिक़ के लोग कसरत से वादी के बीच टिड्डियों की तरह फैले पड़े थे; और उनके ऊँट कसरत की वजह से समुन्दर के किनारे की रेत की तरह बेशुमार थे।
१२तेव्हा मिद्यानी व अमालेकी व पूर्वेकडल्या सर्व प्रजा खिंडीत टोळाच्या दाट थव्याप्रमाणे पसरल्या होत्या, आणि त्यांचे उंट मोजता येणार नाही इतके जास्त होते; ते संख्येने समुद्राच्या काठावरल्या वाळूच्या कणांप्रमाणे असंख्य होते.
13 और जब जिदा'ऊन पहुँचा तो देखो, वहाँ एक शख़्स अपना ख़्वाब अपने साथी से बयान करता हुआ कह रहा था, “देख, मैंने एक ख़्वाब देखा है कि जौ की एक रोटी मिदियानी लश्कर गाह में गिरी और लुढ़कती हुई डेरे के पास पहुँची, और उससे ऐसी टकराई कि वह गिर गया और उसको ऐसा उलट दिया कि वह डेरा फ़र्श हो गया।”
१३मग गिदोन गेला आणि पाहा, कोणी आपल्या सोबत्याला असे स्वप्न सांगत होता की, “पाहा, मी एक स्वप्न पाहिले, सातूची गोल भाकर मिद्यानी तळात घरंगळत येऊन एका तंबूपर्यंत आली आणि तिने असा जोराचा धक्का दिला की, तो तंबू पडला आणि उलटून भुई सपाट झाला.”
14 तब उसके साथी ने जवाब दिया कि यह यूआस के बेटे जिदा'ऊन इस्राईली आदमी की तलवार के 'अलावा और कुछ नहीं; ख़ुदा ने मिदियान की और सारे लश्कर को उसके क़ब्ज़े में कर दिया है।
१४तेव्हा त्याच्या सोबत्याने उत्तर दिले की, “इस्राएली मनुष्य योवाशाचा पुत्र गिदोन याची ही तलवार! तिच्याशिवाय हे दुसरे काही नाही; देवाने मिद्यान व सर्व तळ त्याच्या हाती दिला आहे.”
15 जब जिदा'ऊन ने ख़्वाब का मज़मून और उसकी ता'बीर सुनी तो सिज्दा किया, और इस्राईली लश्कर में लौट कर कहने लगा, “उठो, क्यूँकि ख़ुदावन्द ने मिदियानी लश्कर को तुम्हारे क़ब्ज़े में कर दिया है।”
१५तेव्हा असे झाले की गिदोनाने ते स्वप्न व त्याचा अर्थ ऐकल्यावर नमन करून प्रार्थना केली; मग तो इस्राएली तळावर माघारी येऊन बोलला, “तुम्ही उठा, कारण की परमेश्वराने मिद्यानी तळ तुमच्या हाती दिला आहे.”
16 और उसने उन तीन सौ आदमियों के तीन ग़ोल किए, और उन सभों के हाथ में एक एक नरसिंगा, और उसके साथ एक एक खाली घड़ा दिया हर घड़े के अन्दर एक मशाल थी।
१६तेव्हा त्याने त्या तीनशे मनुष्यांच्या विभागून तीन टोळ्या केल्या, आणि त्यांना सर्व कर्णे दिले आणि रिकामे मडके देऊन त्या मडक्यांमध्ये दिवे दिले होते.
17 और उसने उनसे कहा कि मुझे देखते रहना और वैसा ही करना; और देखो, जब मैं लश्कर गाह के किनारे जा पहुँचूँ, तो जो कुछ मैं करूँ तुम भी वैसा ही करना।
१७तेव्हा त्याने त्यांना सांगितले, “तुम्ही माझ्याकडे पाहा आणि मी करतो तसे करा; आता पाहा, मी छावणीच्या काठी जातो, जसे मी करतो तसे तुम्ही करा.
18 जब मैं और वह सब जो मेरे साथ हैं। नरसिंगा फूंकें, तो तुम भी लश्कर गाह की हर तरफ़ नरसिंगे फूँकना और ललकारना, “यहोवा की और जिदा'ऊन की तलवार।”
१८म्हणजे जेव्हा मी कर्णा वाजवीन, तेव्हा, मी आणि माझ्याबरोबर असणारे सर्व संपूर्ण छावणीच्या चहुकडे कर्णे वाजवीत म्हणा, परमेश्वरासाठी व गिदोनासाठी.”
19 इसलिए बीच के पहर के शुरू' में जब नए पहरे वाले बदले गए, तो जिदा'ऊन और वह सौ आदमी जो उसके साथ थे लश्कर गाह के किनारे आए; और उन्होंने नरसिंगे फूँके और उन घड़ों को जो उनके हाथ में थे तोड़ा।
१९तेव्हा गिदोन व त्याच्याबरोबर असणारे जे शंभर माणसे, ती मध्य प्रहराच्या आरंभी, नुकतेच मिद्यानी पहारेकरी बदली करत होते तेव्हा, छावणीच्या कडेला गेले; मग त्यांनी कर्णे वाजवले, आणि आपल्या हातातली मडकी फोडली.
20 और उन तीनों ग़ोलों ने नरसिंगे फूँके और घड़े तोड़े और मशालों को अपने बाएँ हाथ में और नरसिंगों को फूँकने के लिए अपने दहने हाथ में ले लिया और चिल्ला उठे कि यहोवा की और जिदा'ऊन की तलवार।
२०असे त्या तिन्ही टोळ्यांनी कर्णे वाजवले, आणि मडकी फोडली; “मग दिवे आपल्या डाव्या हाती आणि वाजवायचे कर्णे आपल्या उजव्या हाती धरले, आणि परमेश्वराची तलवार व गिदोनाची तलवार, अशी गर्जना केली.”
21 और यह सब के सब लश्कर गाह के चारों तरफ़ अपनी अपनी जगह खड़े हो गए, तब सारा लश्कर दौड़ने लगा और उन्होंने चिल्ला चिल्लाकर उनको भगाया।
२१तेव्हा ते छावणीच्या चोहोकडून आपापल्या ठिकाणी उभे राहिले; आणि छावणीतल्या सर्व मिद्यानी लोकांनी पलायन केले. ते मोठ्याने आरोळी मारीत दूर पळाले.
22 और उन्होंने तीन सौ नरसिंगों को फूँका, और ख़ुदावन्द ने हर शख़्स की तलवार उसके साथी और सब लश्कर पर चलवाई और सारा लश्कर सरीरात की तरफ़ बैत — सित्ता तक और तब्बात के क़रीब अबील महोला की सरहद तक भागा।
२२ती तीनशे माणसे तर कर्णे वाजवीत होती, या प्रकारे परमेश्वराने मिद्यानांच्या छावणीत प्रत्येकाची तलवार त्याच्या आपापल्या साथीदारावर आणि सैन्याच्या विरूद्ध चालवली; आणि सरेरा येथल्या बेथ-शिट्टा तेथपर्यंत, आणि आबेल-महोलाच्या सीमेपर्यंत टब्बाथास सैन्य पळून गेले.
23 तब इस्राईली आदमी नफ़्ताली और आशर औरमनस्सी की सरहदों से जमा' होकर निकले और मिदियानियों का पीछा किया।
२३मग नफताली, व आशेर, व मनश्शे यांतली इस्राएली माणसे एकत्रित येऊन त्यांनी मिद्यान्यांचा पाठलाग केला.
24 और जिदा'ऊन ने इफ़्राईम के तमाम पहाड़ी मुल्क में क़ासिद रवाना किए और कहला भेजा कि मिदियानियों के मुक़ाबिले को उतर आओ, और उनसे पहले पहले दरिया — ए — यरदन के घाटों पर बैतबरा तक क़ाबिज़ हो जाओ। तब सब इफ़ाईमी जमा' होकर दरिया — ए — यरदन के घाटों पर बैतबरा तक क़ाबिज़ हो गए।
२४गिदोनाने एफ्राईमाच्या सर्व डोंगराळ प्रदेशात जासूद पाठवून सांगितले की, “तुम्ही खाली जाऊन बेथ-बारापर्यंत यार्देन नदीवर नियंत्रण मिळवा आणि मिद्यानी लोकांस आडवा.” म्हणून एफ्राईमाचे सर्व लोक एकत्र आले आणि त्यांनी बेथ-बारापर्यंत यार्देन नदी पार करण्याच्या सर्व वाटा रोखून धरल्या.
25 और उन्होंने मिदियान के दो सरदारों 'ओरेब और ज़ईब को पकड़ लिया, और 'ओरेब को 'ओरेब की चट्टान पर और ज़ईब को ज़ईब के कोल्हू के पास क़त्ल किया; और मिदियानियों को दौड़ाया और 'ओरेब और ज़ईब के सिर यरदन पार जिदा'ऊन के पास ले आए।
२५त्यांनी ओरेब व जेब हे मिद्यान्यांचे दोन सरदार पकडले. ओरेबाला त्यांनी ओरेबाच्या खडकावर ठार मारले, आणि जेबाला जेबाच्या द्राक्षकुंडात ठार मारले. त्यांनी मिद्यान्यांचा पाठलाग गेला व ओरेब व जेब ह्यांची मुंडकी यार्देनेच्या पलीकडे असलेल्या गिदोनाकडे आणली.