< यसा 56 >
1 ख़ुदावन्द फ़रमाता है कि 'अद्ल को क़ाईम रख्खो, और सदाक़त को 'अमल में लाओ, क्यूँकि मेरी नजात नज़दीक है और मेरी सदाक़त ज़ाहिर होने वाली है।
१परमेश्वर असे म्हणतो, जे योग्य आहे ते करा, जे न्याय्य आहे ते करा; कारण माझे तारण आणि प्रामाणिकपणा प्रगट व्हावयास जवळ आहे.
2 मुबारक है वह इंसान, जो इस पर 'अमल करता है और वह आदमज़ाद जो इस पर क़ाईम रहता है, जो सबत को मानता और उसे नापाक नहीं करता, और अपना हाथ हर तरह की बुराई से बाज़ रखता है।
२जो मनुष्य हे करतो आणि तो घट्ट धरून राहतो. तो शब्बाथ पाळतो, तो अपवित्र करत नाही आणि वाईट करण्यापासून आपला हात आवरून धरतो तो आशीर्वादित आहे.
3 और बेगाने का फ़र्ज़न्द जो ख़ुदावन्द से मिल गया हरगिज़ न कहे, ख़ुदावन्द मुझ को अपने लोगों से जुदा कर देगा; और ख़ोजा न कहे, कि “देखो, मैं तो सूखा दरख़्त हूँ।”
३जो विदेशी परमेश्वराचा अनुयायी झाला आहे त्याने असे म्हणू नये, परमेश्वर कदाचित आपल्या लोकांपासून मला वेगळे करील. षंढाने असे म्हणू नये पाहा, मी झाडासारखा शुष्क आहे.
4 क्यूँकि ख़ुदावन्द यूँ फ़रमाता है, कि “वह ख़ोजे जो मेरे सबतों को मानते हैं और उन कामों को जो मुझे पसन्द हैं इख्तियार करते हैं
४कारण परमेश्वर म्हणतो, जे षंढ माझे शब्बाथ पाळतात आणि मला आवडणाऱ्या गोष्टी निवडतात आणि माझा करार घट्ट धरून राहतात.
5 मैं उनको अपने घर में और अपनी चार दीवारी के अन्दर, ऐसा नाम — ओ — निशान बख़्शूँगा जो बेटों और बेटियों से भी बढ़ कर होगा; मैं हर एक को एक अबदी नाम दूँगा जो मिटाया न जाएगा।
५त्यांना आपल्या घरात आणि आपल्या भींतीच्या आत मुले व मुलीपेक्षा जे उत्तम असे स्मारक देईल. मी त्यांना सर्वकाळ राहणारे स्मारक देईल जे छेदून टाकले जाणार नाही.
6 'और बेगाने की औलाद भी जिन्होंने अपने आपको ख़ुदावन्द से पैवस्ता किया है कि उसकी ख़िदमत करें, और ख़ुदावन्द के नाम को 'अज़ीज़ रख्खें और उसके बन्दे हों, वह सब जो सबत को हिफ़्ज़ करके उसे नापाक न करें और मेरे 'अहद पर क़ाईम रहें;
६जे विदेशीही परमेश्वराची सेवा करण्यासाठी आणि परमेश्वराच्या नावावर प्रीती करतात, त्याच्या आराधनेसाठी स्वतःहून त्याच्याशी जोडले आहेत, जे प्रत्येकजण शब्बाथ पाळतात आणि तो अपवित्र करण्यापासून जपतात आणि माझे करार घट्ट धरून ठेवतात
7 मैं उनको भी अपने पाक पहाड़ पर लाऊँगा और अपनी 'इबादतगाह में उनको शादमान करूँगा और उनकी सोख़्तनी क़ुर्बानियाँ और उनके ज़बीहे मेरे मज़बह पर मक़बूल होंगे; क्यूँकि मेरा घर सब लोगों की 'इबादतगाह कहलाएगा।”
७त्यांना मी आपल्या पवित्र पर्वतावर आणीन आणि प्रार्थनेच्या घरात मी त्यांना आनंदीत करीन; त्यांची होमार्पणे आणि त्यांची अर्पणे माझ्या वेदीवर मान्य होतील, कारण माझ्या घराला सर्व राष्ट्रांचे प्रार्थनेचे घर म्हणतील.
8 ख़ुदावन्द ख़ुदा, जो इस्राईल के तितर — बितर लोगों को जमा' करनेवाला है, यूँ फ़रमाता है, कि “मैं उनके सिवा जो उसी के होकर जमा' हुए हैं, औरों को भी उसके पास जमा' करूँगा।”
८ही प्रभू परमेश्वराची घोषणा आहे, जो इस्राएलाच्या घालवलेल्यास जमवतोः मी अजून इतरासही गोळा करून त्यांच्यात मिळवीन.
9 ऐ दश्ती हैवानो, तुम सब के सब खाने को आओ! हाँ, ऐ जंगल के सब दरिन्दो।
९रानातील सर्व वन्य पशूंनो, जंगलातील सर्व पशूंनो या व खाऊन टाका!
10 उसके निगहबान अन्धे हैं, वह सब जाहिल हैं, वह सब गूँगे कुत्ते हैं जो भौंक नहीं सकते, वह ख़्वाब देखनेवाले हैं जो पड़े रहते हैं और ऊँघते रहना पसन्द करते हैं।
१०त्यांचे सर्व पहारेकरी आंधळे आहेत; त्यांना समजत नाही; ते सर्व मुके कुत्रे आहेत; ते भुंकू शकत नाहीः ते स्वप्न पाहणारे, पडून राहणारे व निद्राप्रीय आहेत.
11 और वह लालची कुत्ते हैं जो कभी सेर नहीं होते। वह नादान चरवाहे हैं, वह सब अपनी अपनी राह को फिर गए; हर एक हर तरफ़ से अपना ही नफ़ा' ढूंडता है।
११त्या कुत्र्यांची भूक मोठी आहे; त्यांना कधीच पुरेसे मिळत नाही; ते विवेकहीन मेंढपाळ आहेत; ते सर्व आपापल्या मार्गाकडे, प्रत्येकजण लोभाने अन्यायी मिळकतीकडे वळले आहेत.
12 हर एक कहता है, तुम आओ, मैं शराब लाऊँगा, और हम ख़ूब नशे में चूर होंगे; और कल भी आज ही की तरह होगा बल्कि इससे बहुत बेहतर।
१२ते म्हणतात, “या, चला आपण द्राक्षरस आणि मद्य पिऊ; आजच्यासारखा उद्याचा दिवस होईल, तो दिवस मोजण्यास अशक्य असा महान होईल.”