< यसा 35 >
1 जंगल और वीराना शादमान होंगे दश्त ख़ुशी करेगा और नरगिस की तरह शगुफ़्ता होगा।
१निर्जन आणि रुक्ष भूमी आनंदी होईल; आणि निर्जल आनंद देईल आणि कमळाप्रमाने बहरेल.
2 उसमें कसरत से कलियाँ निकलेंगी, वह शादमानी से गा कर ख़ुशी करेगा। लुबनान की शौकत और कर्मिल और शारून की ज़ीनत उसे दी जाएगी; वह ख़ुदावन्द का जलाल और हमारे ख़ुदा की हश्मत देखेंगे।
२ते विपुलतेने बहरेल आणि हर्ष व गायन करून आनंद करतील; त्यास लबानोनाचे वैभव, कर्मेल व शारोन याचे सौदर्य दिले जाईल; ते परमेश्वराचे गौरव, आमच्या देवाचे सौदर्य पाहतील.
3 कमज़ोर हाथों को ताक़त और नातवान घुटनों को तवानाई दो।
३दुर्बल हातांना बळकट करा आणि थरथर कापणारे गुडघे घट्ट करा.
4 उनको जो घबराने वाले हैं कहो, हिम्मत बांधो मत डरो देखो तुम्हारा ख़ुदा सज़ा और जज़ा लिए आता है। हाँ, ख़ुदा ही आएगा और तुम को बचाएगा।
४जे भिणाऱ्या हृदयाचे आहेत त्यांना म्हणा, “सामर्थ्यवान व्हा, भिऊ नका;” पाहा, तुमचा देव अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात, देवाच्या भरपाईसह येईल. तो येईल आणि तुमचा उद्धार करील.
5 उस वक़्त अन्धों की आँखें खोली जायेगी और बहरों के कान खोले जाएँगे।
५मग आंधळ्यांचे डोळे उघडतील आणि बहिऱ्यांचे कान ऐकतील.
6 तब लंगड़े हिरन की तरह चौकड़ियाँ भरेंगे और गूँगे की ज़बान गाएगी क्यूँकि वीरान में पानी और दश्त में नदियाँ फूट निकलेंगी।
६नंतर लंगडे हरणाप्रमाणे उड्या मारील आणि मुक्याची जीभ गाणे गाईल. अराबाहून पाण्याचे झरे आणि निर्जन प्रदेशातून पाण्याचे प्रवाह वाहतील.
7 बल्कि सराब तालाब हो जाएगा और प्यासी ज़मीन चश्मा बन जाएगी; गीदड़ों की मान्दों में जहाँ वह पड़े थे ने और नल का ठिकाना होगा।
७मृगजले तलाव आणि तहानलेली जमीन पाण्याचे झरे होईल; कोल्हे राहण्याच्या जागी जेथे ते एकदा निजले, त्या जागी बोरू व लव्हाळे ह्यांसहीत गवत उगवेल.
8 और वहाँ एक शाहराह और गुज़रगाह होगी जो पाक राह कहलाएगी; जिससे कोई नापाक गुज़र न करेगा लेकिन ये मुसाफ़िरों के लिए होगी, बेवक़ूफ़ भी उसमें गुमराह न होंगे।
८तेथील महामार्गाला पवित्रतेचा मार्ग असे म्हणतील. अशुद्ध त्यामध्ये चालणार नाहीत. परंतु जे त्याच्यावर चालतील तो त्यांच्यासाठी आहे, कोणी मूर्ख त्याच्यावरून जाणार नाही.
9 वहाँ शेर बबर न होगा और न कोई दरिन्दा उस पर चढ़ेगा न वहाँ पाया जाएगा; लेकिन जिनका फ़िदया दिया गया वहाँ सैर करेंगे।
९तेथे सिंह नसतील, हिंस्त्र श्वापदे त्यावर चढणार नाहीत; ते तेथे सापडणार नाहीत, परंतु तेथे उद्धारलेले चालतील.
10 और जिनको ख़ुदावन्द ने मख़लसी बख़्शी लौटेंगे और सिय्यून में गाते हुए आएँगे, और हमेशा सुरूर उनके सिरों पर होगा वह ख़ुशी और शादमानी हासिल करेंगे, और ग़म व अंदोह काफू़र हो जाएँगे।
१०परमेश्वराने खंडून घेतलेले माघारी येतील आणि ते सियोनात गायन करीत आणि त्यांच्या मस्तकावर सदासर्वकाळ असणारा आनंद राहील; आनंदाने व हर्षांने ते भरून जातील; दु: ख आणि शोक दूर पळून जातील.