< यसा 30 >
1 ख़ुदावन्द फ़रमाता है, “उन बाग़ी लड़कों पर अफ़सोस जो ऐसी तदबीर करते हैं जो मेरी तरफ़ से नहीं, और 'अहद — ओ — पेमान करते हैं जो मेरी रूह की हिदायत से नहीं; ताकि गुनाह पर गुनाह करें।
१परमेश्वर असे म्हणतो, “बंडखोर मुलांना हायहाय हे. ते योजना करतात, त्या माझ्यापासून नाही; ते दुसऱ्या राष्ट्राबरोबर युती करतात, पण त्या माझ्या आत्म्याच्या मार्गदर्शनाने नाही, अशी ती पापाने पापाची भर घालतात.
2 वह मुझ से पू छे बग़ैर मिस्र को जाते हैं ताकि फ़िर'औन के पास पनाह लें और मिस्र के साये में अम्न से रहें।
२ते फारोकडे संरक्षण मागण्याकरिता आणि त्याच्या छायेत आश्रय घेण्याकरता मला न विचारता मिसरकडे खाली उतरून जातात.
3 लेकिन फ़िर'औन की हिमायत तुम्हारे लिए ख़जालत होगी और मिस्र के साये में पनाह लेना तुम्हारे वास्ते रुस्वाई होगा।
३यास्तव फारोचे संरक्षण हे तुम्हास लाज आणि मिसरमधील आश्रय हे तुमच्या साठी मानखंडणा असे होईल.
4 क्यूँकि उसके सरदार जुअन में हैं और उसके कासिद हनीस में जा पहुँचे।
४तुमचे अधिकारी सोअनला आणि तुमचे दूत हानेसला गेले आहेत.
5 वह उस क़ौम से जो उनको कुछ फ़ाइदा न पहुँचा सके, और मदद ओयारी नहीं बल्कि खजालत और मलामत का ज़रि'आ हो शर्मिन्दा होंगे।”
५कारण ते मदत करू न शकणाऱ्या, जे साहाय्य किंवा हित करणारे नाहीत तर लाज व निंदा असे आहेत त्यांच्यामुळे ते सर्व लाजवले जातील.”
6 दक्खिन के जानवरों के बारे में दुख और मुसीबत की सरज़मीन में, जहाँ से नर — ओ — मादा शेर — ए — बबर और अफ़'ई और उड़नेवाले आग के साँप आते हैं वह अपनी दौलत गधों की पीठ पर, और अपने ख़ज़ाने ऊँटों के कोहान पर लाद कर उस क़ौम के पास ले जाते हैं जिससे उनको कुछ फ़ायदा न पहुँचेगा।
६नेगेबमधल्या प्राण्यांविषयी घोषणा संदेश: आपले काही चांगले करता न येणाऱ्या लोकांकडे, संकटाच्या आणि धोक्याच्या प्रदेशातून, सिंहीण व सिंह, विषारी साप आणि आग्या उडता सर्प, ते आपले धन गाढवांच्या खांद्यावर व आपली संपत्ती उंटाच्या पाठीवर घालून नेतात.
7 क्यूँकि मिस्रियों की मदद बातिल और बेफ़ायदा होगी, इसी वजह से मैंने उसे, राहब कहा जो सुस्त बैठी है।
७मिसरच्या मदतीला काही किंमत नाही. म्हणून मी मिसरला स्वस्थ बसणारा रहाब असे नाव दिले.
8 अब जाकर उनके सामने इसे तख़्ती पर लिख और किताब में लिख ताकि आइन्दा हमेशा से हमेशा तक क़ाईम रहे।
८आता तू त्यांच्या उपस्थितीत पाटीवर लिही आणि पुस्तकावरही कोरून ठेव, अशासाठी की पुढल्या काळासाठी साक्षी म्हणून ते साठून राहील.
9 क्यूँकि यह बाग़ी लोग और झूठे फ़र्ज़न्द हैं, जो ख़ुदावन्द की शरी'अत को सुनने से इन्कार करते हैं;
९कारण हे बंडखोर लोक आहेत, खोटे मुले, मुले जी परमेश्वराची शिकवणूक ऐकण्यास नकार देतात.
10 जो गै़बबीनों से कहते हैं, ग़ैबबीनी न करो, और नबियों से, कि “हम पर सच्ची नबुव्वतें ज़ाहिर न करो, हम को ख़ुशगवार बातें सुनाओ, और हम से झूठी नबुव्वत करो,
१०ते पाहणाऱ्यांना म्हणतात, “तुम्ही पाहू नका.” आणि भविष्यवाद्याला म्हणता, “आमच्या जवळ सरळ भविष्य सांगू नको; आम्हास बऱ्या वाटतील, आवडतील अशाच गोष्टी सांग, कपटी भविष्ये सांग.
11 रास्ते से बाहर जाओ, रास्ते से बरगश्ता हो, और इस्राईल के क़ुद्दूस को हमारे बीच से ख़त्म करो।”
११मार्गातून बाजूला फिर, वाटेतून बाजूला फिर, इस्राएलाच्या पवित्र देवाला आमच्यापासून दूर घेऊन जा.”
12 फिर इस्राईल का क़ुददूस यूँ फ़रमाता है, “चूँकि तुम इस कलाम को हक़ीर जानते, और ज़ुल्म और कजरवी पर भरोसा रखते, और उसी पर क़ाईम हो;
१२यामुळे इस्राएलचा पवित्र असे म्हणतो, “कारण तुम्ही हा संदेश नाकारता आणि जुलूम व कपट यांवर विसंबून राहता.
13 इसलिए यह बदकिरदारी तुम्हारे लिए ऐसी होगी जैसे फटी हुई दीवार जो गिरना चाहती है ऊँची उभरी हुई दीवार जिसका गिरना अचानक एक दम में हो।
१३म्हणून हा अन्याय तुम्हास, जसा तुटलेला भाग पडण्यास तयार असतो, जसा उंच भिंतीमध्ये फुगवटा असतो, ज्याचे पडणे अकस्मात एकाएकी होते त्यासारखा होईल.
14 वह इसे कुम्हार के बर्तन की तरह तोड़ डालेगा, इसे बे दरेग़ चकनाचूर करेगा; चुनाँचे इसके टुकड़ों में एक ठीकरा भी न मिलेगा जिसमें चूल्हे पर से आग उठाई जाए, या होज़ से पानी लिया जाए।”
१४कुंभाराची मडकी फोडावी तसे तो ते फोडून त्याचे तुकडे करील, तो त्यास सोडणार नाही. आणि त्याचे तुकडे चुलीतून विस्तव घ्यायला किंवा डबक्यातून पाणी उपसायला खापरही ठेवणार नाही.”
15 क्यूँकि ख़ुदावन्द यहोवाह, इस्राईल का क़ुददूस यूँ फ़रमाता है, कि वापस आने और ख़ामोश बैठने में तुम्हारी सलामती है; ख़ामोशी और भरोसे में तुम्हारी ताक़त है।” लेकिन तुम ने यह न चाहा।
१५कारण परमेश्वर, माझा प्रभू, इस्राएलचा पवित्र देव असे म्हणतो, “तुम्ही फिरणार आणि शांत रहाल, तर तुम्ही तराल. तुमची माझ्यामध्ये शांतता आणि विश्वास हीच शक्ती आहे.” पण तुम्ही इच्छुक नव्हते.
16 तुम ने कहा, नहीं, हम तो घोड़ों पर चढ़ के भागेंगे; इसलिए तुम भागोगे; और कहा, हम तेज़ रफ़्तार जानवरों पर सवार होंगे; फिर तुम्हारा पीछा करनेवाले तेज़ रफ़्तार होंगे।
१६तुम्ही म्हणता, नाही! कारण आम्ही घोड्यांवर बसून पळू, म्हणून तुम्हास पळावे लागेल. आणि आम्ही चपळ घोड्यांवर स्वार होऊन जाऊ, पण जे तुमच्या पाठीस लागतील ते पण चपळ होतील.
17 एक की झिड़की से एक हज़ार भागेंगे पाँच की झिडकी से तुम ऐसा भागोगे कि तुम उस 'अलामत की तरह जो पहाड़ की चोटी पर और उस निशान की तरह जो कोह पर नसब किया गया हो रह जाओगे।
१७एकाने धमकी दिल्यास तुमची हजारो माणसे पळून जातील. पाच जणांच्या धमकीने तुम्ही पळून जाल. पर्वताच्या शिखरावर ध्वजस्तंभासारखे किंवा डोंगरावरच्या झेंड्यासारखे तुम्ही शिल्लक उराल तोपर्यंत असे होईल.
18 तोभी ख़ुदावन्द तुम पर मेहरबानी करने के लिए इन्तिज़ार करेगा, और तुम पर रहम करने के लिए बुलन्द होगा। क्यूँकि ख़ुदावन्द इन्साफ़ करने वाला ख़ुदा है, मुबारक हैं वह सब जो उसका इन्तिज़ार करते हैं।
१८तरीही परमेश्वर तुमच्यावर दया करावी म्हणून वाट पाहील. तुम्हावर दया दाखवावी म्हणून तो उंचावला जाईल, कारण परमेश्वर न्यायाचा देव आहे, जे सर्व त्याची वाट पाहतात ते आशीर्वादीत आहेत.
19 क्यूँकि ऐ सिय्यूनी क़ौम, जो येरूशलेम में बसेगी, तो फिर न रोएगी; वह तेरी फ़रियाद की आवाज़ सुन कर यक़ीनन तुझ पर रहम फ़रमाएगा; वह सुनते ही तुझे जवाब देगा।
१९कारण यरूशलेम येथे सियोनेत लोक राहतील आणि तू पुन्हा कधीही रडणार नाहीस. खचित तो तुझ्या रडण्याचा आवाज होताच तुझ्यावर दया करील, जेव्हा ते ऐकल, तो तुला उत्तर देईल.
20 और अगरचे ख़ुदावन्द तुझ को तंगी की रोटी और मुसीबत का पानी देता है, तोभी तेरा मु'अल्लिम फिर तुझ से रूपोश न होगा; बल्कि तेरी ऑखें उसको देखेंगी।
२०जरी परमेश्वर तुला संकटाची भाकर आणि दु: खाचे पाणी देईल, तरी तुझे शिक्षक पुन्हा लपू शकणार नाही, तर तुझे डोळे तुझ्या शिक्षकांना पाहतील.
21 और जब तू दहनी या बाँई तरफ़ मुड़े, तो तेरे कान तेरे पीछे से यह आवाज़ सुनेंगे, कि “राह यही है, इस पर चल।”
२१जेव्हा तुम्ही डावीकडे किंवा उजवीकडे वळाल तर तुझे कान तुझ्यामागून वाणी ऐकतील, “हा मार्ग बरोबर आहे. तुम्ही या मार्गात चालावे.”
22 उस वक़्त तू अपनी खोदी हुई मूरतों पर मढ़ी हुई चाँदी, और ढाले हुए बुतों पर चढ़े हुए सोने को नापाक करेगा। तू उसे हैज़ के लते की तरह फेंक देगा तू उसे कहेगा, निकल दूर हो।
२२तुम्ही आपल्या चांदीच्या कोरीव मूर्तीचा मुलामा व आपल्या सोन्याच्या ओतीव मूर्तीची मढवणी तुम्ही विटाळवाल. तुम्ही त्या देवांना मासिकपाळीच्या कपड्याप्रमाणे फेकून द्याल. तुम्ही त्यांना म्हणाल, “येथून निघून जा.”
23 तब वह तेरे बीज के लिए जो तू ज़मीन में बोए, बारिश भेजेगा; और ज़मीन की अफ़ज़ाइश की रोटी का ग़ल्ला, 'उम्दा और कसरत से होगा। उस वक़्त तेरे जानवर वसी' चरागाहों में चरेंगे।
२३तुम्ही जे बी भूमीत पेराल त्यासाठी पाऊस तो देईल आणि भूमीतून मुबलक अशी भाकर देईल. आणि पिके विपुल होईल. त्या दिवसात तुझी गुरे मोठ्या कुरणांमध्ये चरतील.
24 और बैल और जवान गधे जिनसे ज़मीन जोती जाती है, लज़ीज़ चारा खाएँगे जो बेल्चे और छाज से फटका गया हो।
२४आणि बैल व गाढव जे नांगरतात ते सुपाने व दांताळ्याने उफणलेल्या धान्याचे आंबवण खातील.
25 और जब बुर्ज गिर जाएँगे और बड़ी ख़ूँरेज़ी होगी, तो हर एक ऊँचे पहाड़ और बुलन्द टीले पर चश्मे और पानी की नदियाँ होंगी।
२५आणि वधाच्या मोठ्या दिवशी बुरुज खाली पडतील. तेव्हा उंच पर्वतावर व प्रत्येक उंच डोंगरावर पाण्याचे झरे व ओघ वाहतील.
26 और जिस वक़्त ख़ुदावन्द अपने लोगों की शिकस्तगी को दुरुस्त करेगा और उनके ज़ख़्मों को अच्छा करेगा; तो चाँद की चाँदनी ऐसी होगी जैसी सूरज की रोशनी, और सूरज की रोशनी सात गुनी बल्कि सात दिन की रोशनी के बराबर होगी।
२६त्यावेळी, चंद्राचा प्रकाश सूर्यप्रकाशाप्रमाणे प्रखर होईल आणि सूर्यप्रकाश जसा सात दिवसाचा प्रकाश तसा सात पट होईल. परमेश्वर त्याच्या जखमी लोकांस मलमपट्टी करील आणि माराने झालेल्या त्यांच्या जखमा बऱ्या करील तेव्हा असे घडेल.
27 देखो ख़ुदावन्द दूर से चला आता है, उसका ग़ज़ब भड़का और धुंवें का बादल उठा उसके लब क़हर आलूदा और उसकी ज़बान भसम करने वाली आग की तरह है।
२७पाहा! परमेश्वराचे नाव त्याच्या क्रोधाने जळते, व दाट धुराच्या लोटाने दुरवरून येत आहे, त्याचे ओठ क्रोधाने भरले आहेत आणि त्याची जीभ खाऊन टाकणाऱ्या अग्नीप्रमाणे आहे.
28 उसका दम नदी के सैलाब की तरह है, जो गर्दन तक पहुँच जाए; वह क़ौमों को हलाकत के छाज में फटकेगा और लोगों के जबड़ों में लगाम डालेगा, ताकि उनको गुमराह करे।
२८त्याचा श्वास जणूकाय नदीच्या जोराच्या प्रवाहासारखा आहे जो मानेपर्यंत चढत आहे, अशासाठी की नाशाच्या चाळणीने राष्ट्रांना चाळावे, आणि त्याचा श्वास लोकांच्या तोंडामध्ये बहकविणारा लगाम राहील.
29 तब तुम गीत गाओगे, जैसे उस रात गाते हो जब मुक़द्दस 'ईद मनाते हो; और दिल की ऐसी ख़ुशी होगी जैसी उस शख़्स की जो बाँसुरी लिए हुए खिरामान हो कि ख़ुदावन्द के पहाड़ में इस्राईल की चट्टान के पास जाए।
२९जसे पवित्र सण पाळण्याच्या रात्रीप्रामाणे तुमचे गीत होते. आणि जसा कोणी परमेश्वराच्या डोंगरावर इस्राएलाच्या खडकाकडे जाताना पावा वाजवत जातो तसा तुम्हास आनंद होईल.
30 क्यूँकि ख़ुदावन्द अपनी जलाली आवाज़ सुनाएगा, और अपने क़हर की शिद्दत और आतिश — ए — सोज़ान के शो'ले, और सैलाब और आँधी और ओलों के साथ अपना बाज़ू नीचे लाएगा।
३०परमेश्वर आपला वैभवी आवाज लोकांस ऐकू जाऊ देईल आणि वारा, पाऊस व गारपीट सह क्रोधाविष्ट व अग्नी यांनी तो आपला भुज चालवील.
31 हाँ ख़ुदावन्द की आवाज़ ही से असूर तबाह हो जाएगा वह उसे लठ से मारेगा।
३१परमेश्वराचा आवाज ऐकून अश्शूर विखुरला जाईल. तो त्यास आपल्या काठीने मारील.
32 और उस क़ज़ा के लठ की हर एक ज़र्ब जो ख़ुदावन्द उस पर लगाएगा, दफ़ और बरबत के साथ होगी और वह उससे सख़्त लड़ाई लड़ेगा।
३२आणि काठीचा जो प्रत्येक फटका परमेश्वर त्याच्यावर मारील तो, डफ व वीणा वाजत असताना होईल, आणि हात खाली वर करीत युद्धांमध्ये तो त्यांच्याशी लढेल.
33 क्यूँकि तूफ़त मुद्दत से तैयार किया गया है; हाँ, वह बादशाह के लिए गहरा और वसी' बनाया गया है; उसका ढेर आग और बहुत सा ईधन है, और ख़ुदावन्द की साँस गन्धक के सैलाब की तरह उसको सुलगाती है।
३३पूर्वीपासून तोफेत तयार करून ठेवले आहे. ते राजासाठी तयार केले आहे, ते पुष्कळ खोल आणि रूंद केले आहे. त्याच्या चीतेसाठी विस्तव आणि खूप लाकडे असे आहे. परमेश्वराचा श्वास जळत्या गंधकाच्या प्रवाहाप्रमाणे त्यास पेटवतो.