< यसा 12 >

1 और उस वक़्त तू कहेगा, ऐ ख़ुदावन्द मैं तेरी तम्जीद करूँगा; कि अगरचे तू मुझ से नाख़ुश था, तोभी तेरा क़हर टल गया और तूने मुझे तसल्ली दी।
त्या दिवशी तू म्हणशील, “हे परमेश्वरा, मी तुला धन्यवाद देतो यासाठी की तू माझ्यावर कोप केला होता, तो तुझा कोप निवळला आहे वर तू माझे सांत्वन केले आहे.
2 “देखो, ख़ुदा मेरी नजात है; मैं उस पर भरोसा करूँगा और न डरूँगा, क्यूँकि याह — यहोवाह मेरा ज़ोर और मेरा सरोद है और वह मेरी नजात हुआ है।”
पाहा, देव माझे तारण आहे; मी त्याजवर भाव ठेवीतो व भिणार नाही, कारण परमेश्वर, होय परमेश्वर माझे बल व गीत आहे. तो माझे तारण झाला आहे.”
3 फिर तुम ख़ुश होकर नजात के चश्मों से पानी भरोगे।
तुम्ही आनंदाने तारण कुपातून पाणी काढाल.
4 और उस वक़्त तुम कहोगे, ख़ुदावन्द की तम्जीद करो, उससे दू'आ करो लोगों के बीच उसके कामों का बयान करो, और कहो कि उसका नाम बुलन्द है।
त्या दिवशी तुम्ही म्हणाल, “परमेश्वरास धन्यवाद द्या व त्याच्या नावाचा धावा करा; लोकांमध्ये त्याची कृत्ये जाहीर करा; त्याचे नाम थोर आहे अशी घोषणा करा.
5 “ख़ुदावन्द की मदह सराई करो; क्यूँकि उसने जलाली काम किये जिनको तमाम दुनिया जानती है।
परमेश्वरास गा, कारण त्याने गौरवी कृत्ये केली आहेत; हे सर्व पृथ्वीवर माहीत होवो.
6 ऐ सिय्यून की बसनेवाली, तू चिल्ला और ललकार; क्यूँकि तुझमें इस्राईल का क़ुद्दूस बुज़ुर्ग है।”
अगे सीयोन निवासिनी गजर कर आणि आनंदाने आरोळी मार, कारण इस्राएलाचा पवित्र तो तुझ्याठायी थोर आहे.”

< यसा 12 >