< हबक़् 3 >
1 शिगायूनोत के सुर पर हबक़्क़ूक़ नबी की दु'आ:
१संदेष्टा हबक्कूकची शिगयोनोथावर प्रार्थनाः
2 ऐ ख़ुदावन्द, मैंने तेरी शोहरत सुनी, और डर गया; ऐ ख़ुदावन्द, इसी ज़माने में अपने काम को पूरा कर। इसी ज़माने में उसको ज़ाहिर कर; ग़ज़ब के वक़्त रहम को याद फ़रमा।
२परमेश्वरा, मी तुझी वार्ता ऐकली, आणि मी भयभीत झालो. हे परमेश्वर, तू आपले कार्य या समयामध्ये पुनर्जीवित कर; या समयामध्ये ते माहित करून दे. तुझ्या क्रोधात आमच्यावर दया करण्याची आठवण ठेव.
3 ख़ुदा तेमान से आया, और कु़द्दूस फ़ारान के पहाड़ से। उसका जलाल आसमान पर छा गया, और ज़मीन उसकी ता'रीफ़ से मा'मूर हो गई।
३तेमानाहून देव येत आहे, पारान पर्वतावरून पवित्र परमेश्वर येत आहे, सेला. परमेश्वराचे वैभव स्वर्ग झाकते, आणि त्याच्या स्तुतीने पृथ्वी भरली.
4 उसकी जगमगाहट नूर की तरह थी, उसके हाथ से किरनें निकलती थीं, और इसमें उसकी क़ुदरत छिपी हुई थी,
४त्याच्या हातातली किरणे प्रकाशासारखी चमकत होते आणि परमेश्वराने तेथे त्याचे सामर्थ्य ठेवले आहे.
5 बीमारी उसके आगे — आगे चलती थी, और आग के तीर उसके क़दमों से निकलते थे।
५रोगराई त्याच्या मुखासमोरून गेली, आणि मरी त्याच्या पायांजवळून निघते.
6 वह खड़ा हुआ और ज़मीन थर्रा गई, उसने निगाह की और क़ौमें तितर — बितर हो गईं। अज़ली पहाड़ टुकड़े — टुकड़े हो गए; पुराने टीले झुक गए, उसके रास्ते अज़ली हैं।
६तो उभा राहिला आणि पृथ्वी मापली; त्याने पाहिले आणि राष्ट्रांचा थरकाप झाला. सर्वकाळच्या पर्वतांचेसुद्धा तुकडे होऊन ते विखरले गेले आणि सर्वकाळच्या टेकड्या खाली नमल्या, त्याचा मार्ग सदासर्वकाळ आहे.
7 मैंने कूशन के खे़मों को मुसीबत में देखा: मुल्क — ए — मिदियान के पर्दे हिल गए।
७कूशानचे तंबू संकटात असलेले मी पाहिले, मिद्यान देशातील कनाती भीतीने कापत होत्या.
8 ऐ ख़ुदावन्द, क्या तू नदियों से बेज़ार था? क्या तेरा ग़ज़ब दरियाओं पर था? क्या तेरा ग़ज़ब समन्दर पर था कि तू अपने घोड़ों और फ़तहयाब रथों पर सवार हुआ?
८परमेश्वरा, तू नद्यांवर रागावला होतास का? झऱ्यांवर तुझा राग होता का? समुद्रावर तू भडकला होता का? म्हणूनच तू आपल्या घोड्यांवर आणि आपल्या तारणाच्या रथांवर आरुढ झाला होतास काय?
9 तेरी कमान ग़िलाफ़ से निकाली गई, तेरा 'अहद क़बाइल के साथ उस्तवार था। (सिलाह) तूने ज़मीन को नदियों से चीर डाला।
९तू आपले धनुष्य गवसणी बाहेर काढले आहे; तू आपल्या धनुष्यावर बाण चढवला आहे! (सेला). तू पृथ्वीला नद्यांद्वारे दुभागले आहे.
10 पहाड़ तुझे देखकर काँप गए: सैलाब गुज़र गए; समन्दर से शोर उठा, और मौजें बुलन्द हुई।
१०पर्वत तुला पाहून वेदनेमध्ये वितळले! जलप्रवाह त्याच्यावरून चालला आहे; खोल समुद्राने आवाज उंचावला आहे, समुद्राने आपला हात उंचावला आहे.
11 तेरे उड़ने वाले तीरों की रोशनी से, तेरे चमकीले भाले की झलक से, चाँद — ओ — सूरज अपने बुर्जों में ठहर गए।
११चंद्र व सूर्य आपल्या जागी स्तब्ध झालेत, त्यांचे तेज लोपले. तुझे बाण सुटत असता त्यांच्या तेजाने, आणि तुझ्या झळकत्या भाल्याच्या चकाकीने ते दूर गेले आहेत!
12 तू ग़ज़बनाक होकर मुल्क में से गुज़रा; तूने ग़ज़ब से क़ौमों को पस्त किया।
१२तू रागाच्या भरात पृथ्वीवरून चाल केली आणि क्रोधाने राष्ट्रे पायाखाली तुडविलीस.
13 तू अपने लोगों की नजात की ख़ातिर निकला, हाँ, अपने मम्सूह की नजात की ख़ातिर तूने शरीर के घर की छत गिरा दी, और उसकी बुनियाद बिल्कुल खोद डाली।
१३तू तुझ्या लोकांच्या तारणासाठी, तुझ्या अभिषिक्ताच्या तारणासाठी पुढे गेलास! तू दुष्टाच्या घराचा माथा छिन्नविछिन्न केला आहे, व त्याचा पाया मानेपर्यंत उघडा केला आहे, सेला!
14 तूने उसी की लाठी से उसके बहादुरों के सिर फोड़े; वह मुझे बिखेरने को हवा के झोके की तरह आए, वह ग़रीबों को तन्हाई में निगल जाने पर ख़ुश थे।
१४ते प्रचंड वादळाप्रमाणे आम्हास पांगवण्यास आले असता, तू त्यांचेच भाले त्यांच्या सैनिकांच्या डोक्यात भोसकले, गरीब मनुष्यास एकांतात खाऊन टाकावे, ह्यामध्ये त्यांची तृप्तता होती.
15 तू अपने घोड़ों पर सवार होकर समन्दर से, हाँ, बड़े सैलाब से पार हो गया।
१५पण तू तुझ्या घोड्यांना समुद्रातून कूच करायला लावलेस, त्यामुळे समुद्र घुसळला गेला.
16 मैंने सुना और मेरा दिल दहल गया, उस शोर की वजह से मेरे लब हिलने लगे; मेरी हड्डियाँ बोसीदा हो गईं, और मैं खड़े — खड़े काँपने लगा। लेकिन मैं सुकून से उनके बुरे दिन का मुन्तज़िर हूँ, जो इकट्ठा होकर हम पर हमला करते हैं।
१६मी ऐकले तेव्हा माझे अंग थरथरले, माझे ओठ आवाजाने कापले! माझी हाडे कुजण्यास सुरूवात झाली आहे, आणि मी आपल्या ठिकाणी कापत आहे. म्हणून मी धीराने नाशाच्या दिवसाची, शत्रू आमच्यावर हल्ला करील, त्या दिवसाची वाट पाहत आहे.
17 अगरचे अंजीर का दरख़्त न फूले, और डाल में फल न लगें, और जै़तून का फल ज़ाय' हो जाए, और खेतों में कुछ पैदावार न हो, और भेड़ख़ाने से भेड़ें जाती रहें, और तवेलों में जानवर न हों,
१७जरी अंजिराच्या झाडांनी फळ दिले नाही आणि द्राक्षवेलींना काही उपज आले नाही, जैतूनाच्या झाडाच्या उपजाने जरी निराशा झाली आणि शेतांतून अन्न उगवले नाही, कळप वाड्यातून नाहीसे झाले असले, गोठ्यात गाई-गुरे उरली नसली,
18 तोभी मैं ख़ुदावन्द से ख़ुश रहूँगा, और अपनी नजात बख़्श ख़ुदा से खु़श वक़्त हूँगा।
१८तरी मी परमेश्वराठायी आनंद करीन, माझ्या तारणाऱ्या देवाजवळ उल्लास करीन.
19 ख़ुदावन्द ख़ुदा, मेरी ताक़त है; वह मेरे पैर हिरनी के से बना देता है, और मुझे मेरी ऊँची जगहों में चलाता है।
१९प्रभू परमेश्वर माझे बळ आहे, तो माझे पाय हरणींच्या पायासारखे करतो, आणि तो मला माझ्या उंचस्थानावर चालवील. (मुख्य वाजवणाऱ्यासाठी, माझ्या तंतुवाद्यावरचे गायन.)