< एज्रा 4 >
1 जब यहूदाह और बिनयमीन के दुश्मनों ने सुना कि वह जो ग़ुलाम हुए थे, ख़ुदावन्द इस्राईल के ख़ुदा के लिए हैकल को बना रहे हैं;
१यहूदा आणि बन्यामीन यांचे काही शत्रू होते. त्यांनी ऐकले की, बंदिवासातून आलेले लोक इस्राएलाचा देव परमेश्वर याचे मंदिर बांधत आहेत.
2 तो वह ज़रुब्बाबुल और आबाई क़बीलों के सरदारों के पास आकर उनसे कहने लगे कि हम को भी अपने साथ बनाने दो; क्यूँकि हम भी तुम्हारे ख़ुदा के तालिब हैं जैसे तुम हो, और हम शाह — ए — असूर असरहद्दून के दिनों से जो हम को यहाँ लाया, उसके लिए क़ुर्बानी पेश करते हैं।
२तेव्हा ते जरुब्बाबेल आणि घराण्यांचे प्रमुख यांच्याकडे येऊन म्हणाले, “आम्हासही तुम्हासोबत बांधकाम करु द्या. तुमच्याप्रमाणेच आम्हीही तुमच्या देवाला शोधतो. आणि अश्शूरचा राजा एसरहद्दोन याने आम्हास या जागी आणल्यापासून तुमच्या देवासाठी आम्ही अर्पण करीत आलो आहोत.”
3 लेकिन ज़रुब्बाबुल और यशू'अ और इस्राईल के आबाई ख़ानदानों के बाक़ी सरदारों ने उनसे कहा कि तुम्हारा काम नहीं, कि हमारे साथ हमारे ख़ुदा के लिए घर बनाओ, बल्कि हम खुद ही मिल कर ख़ुदावन्द इस्राईल के ख़ुदा के लिए उसे बनाएँगे, जैसा शाह — ए — फ़ारस ख़ोरस ने हम को हुक्म किया है।
३पण जरुब्बाबेल, येशूवा आणि त्यांच्या वडिलांच्या घराण्याचे प्रमुख त्यांना म्हणाले, “तुम्ही नव्हे तर इस्राएलचा देव परमेश्वर याचे मंदिर फक्त आम्हासच बांधायचे आहे. पारसाचा राजा कोरेश याची तशी आज्ञा आहे.”
4 तब मुल्क के लोग यहूदाह के लोगों की मुखालिफ़त करने और बनाते वक़्त उनको तकलीफ़ देने लगे।
४त्या देशाचे लोक यहूदी लोकांचे हात कमजोर करू लागले. ते बांधकामाविषयी यहूदी लोकांस भीती घालू लागले.
5 और शाह — ए — फ़ारस ख़ोरस के जीते जी, बल्कि शाह — ए — फ़ारस दारा की सल्तनत तक उनके मक़सदों को रद करने के लिए उनके ख़िलाफ़ सलाहकारों को उजरत देते रहे।
५पारसाच्या कोरेश राजाची सर्व कारकीर्द संपून दारयावेश राजा सत्तेवर येईपर्यंत त्यांची योजना उधळून लावण्यासाठी ते वकीलाला लाचही देत.
6 और अख़्सूयरस के हुकूमत के ज़माने, या'नी उसकी सल्तनत के शुरू' में उन्होंने यहूदाह और येरूशलेम के बाशिन्दों की शिकायत लिख भेजी।
६नंतर अहश्वेरोशाच्या राज्याच्या सुरवातीलाच त्यांनी यहूदा व यरूशलेम यातल्या राहणाऱ्यांविरूद्ध आरोप पत्र लिहून पाठवले.
7 फिर अरतख़शशता के दिनों में बिशलाम और मित्रदात और ताबिएल और उसके बाक़ी साथियों ने शाह — ए — फ़ारस अरतख़शशता को लिखा। उनका ख़त अरामी हुरूफ़ और अरामी ज़बान में लिखा था।
७अर्तहशश्ताच्या दिवसात बिश्लाम, मिथ्रदाथ, ताबेल व त्यांचे साथीदार यांनी पारसाच्या राजाला पत्र लिहिले. हे पत्र अरामी लिपीत लिहीले असून व अरामी भाषांतरीत केले होते.
8 रहूम दीवान और शम्सी मुन्शी ने अरतख़शाशता बादशाह को येरूशलेम के ख़िलाफ़ यूँ ख़त लिखा।
८यानंतर मुख्य सेनापती रहूम आणि लेखक शिमशय यांनी यरूशलेम येथील लोकांविरूद्ध अर्तहशश्त राजाला लिहीले.
9 इसलिए रहूम दीवान और शम्सी मुन्शी और उनके बाक़ी साथियों ने जो दीना और अफ़ार — सतका और तरफ़ीला और फ़ारस और अरक और बाबुल और सोसन और दिह और 'ऐलाम के थे,
९मुख्य अधिकारी रहूम, लेखक शिमशय आणि त्यांचे बाकीचे सहभागी दिनाई लोक, टर्पली, अफर्शी, अर्खवी, बाबेली, सुसा येथील एलामी, यांनी एक पत्र लिहिले;
10 और बाक़ी उन कौमों ने जिनको उस बुज़ुर्ग — ओ — शरीफ़ असनफ़्फ़र ने पार लाकर शहर — ए — सामरिया और दरिया के इस पार के बाक़ी 'इलाक़े में बसाया था, वगै़रा वग़ैरा इसको लिखा।
१०आणि, जे त्यांना जाऊन मिळाले ज्यांना आसनपर या थोर आणि बलाढ्य राजाने शोमरोनात आणि नदीच्या प्रदेशात आणून वसवलेले होते.
11 उस ख़त की नक़ल जो उन्होंने अरतख़शशता बादशाह के पास भेजा। ये है: “आपके ग़ुलाम, या'नी वह लोग जो दरिया पार रहते हैं, वग़ैरा।
११जे पत्र त्यांनी राजा अर्तहशश्त यास पाठवले त्याची प्रत हीच आहे: “नदीच्या प्रदेशात राहणारे आम्ही तुमचे सेवक:
12 बादशाह को मा'लूम हो कि यहूदी लोग जो हुज़ूर के पास से हमारे बीच येरूशलेम में आए हैं, वह उस बाग़ी और फ़सादी शहर को बना रहे हैं; चुनाँचे दीवारों को ख़त्म और बुनियादों की मरम्मत कर चुके हैं।
१२राजा अर्तहशश्त यास, आम्ही तुम्हास कळवू इच्छितो की, तुम्ही पाठवून दिलेले यहूदी कैदी येथे यरूशलेमेस आले आहेत. ते बंडखोर नगर बांधत आहे. त्यांनी भिंतीचे काम पूर्ण केले आहे आणि पायाची दुरुस्ती केली आहे.
13 इसलिए बादशाह को मा'लूम हो जाए कि अगर ये शहर बन जाए और फ़सील तैयार हो जाए, तो वह ख़िराज चुंगी, या महसूल नहीं देंगे और आख़िर बादशाहों को नुक्सान होगा।
१३आता राजाला हे समजावे की, जर हे नगर बांधले आणि हे भिंतीचे काम पूर्ण झाले की, ते लोक तुम्हास खंडणी व कर देणार नाहीत, परंतु त्यामुळे राजाची हानी होईल.
14 इसलिए चूँकि हम हुज़ूर के दौलतख़ाने का नमक खाते हैं और मुनासिब नहीं कि हमारे सामने बादशाह की तहक़ीर हो, इसलिए हम ने लिखकर बादशाह को ख़बर दी है।
१४खचित आम्ही राजाचे मीठ खातो. कारण राजाचा कोणताही अपमान झालेला पाहणे आम्हास योग्य वाटत नाही. म्हणून आम्ही तुला कळवीत आहोत.
15 ताकि हुज़ूर के बाप — दादा के दफ़्तर की किताब से मा'लूम की जाए, तो उस दफ़्तर की किताब से हुज़ूर को मा'लूम होगा और यक़ीन हो जाएगा कि ये शहर फ़ितना अंगेज है जो बादशाहों और सूबों को नुक़सान पहुँचाता रहा है; और पुराने ज़माने से उसमें फ़साद खड़ा करते रहे हैं। इसी वजह से ये शहर उजाड़ दिया गया था।
१५तुझ्या पित्याच्या नोंद-पुस्तकात शोधून पाहा आणि त्यावरुन हे नगर बंडखोर आहे राजांना व प्रांताला उपद्रव करणारे आहे आणि पुरातन काळापासून यामध्ये लोक बंड करीत असत. या कारणासाठी त्या नगराचा नाश करण्यात आला होता.
16 और हम बादशाह को यक़ीन दिलाते हैं कि अगर ये शहर तामीर हो और इसकी फ़सील बन जाए, तो इस सूरत में हुज़ूर का हिस्सा दरिया पार कुछ न रहेगा।”
१६आम्ही राजाला कळवतो की, हे नगर आणि त्यासभोवतालची भिंत बांधून पूर्ण झाली की नदीच्या पलीकडे तुमचे काहीच राहणार नाही.”
17 तब बादशाह ने रहूम दीवान और शम्सी मुन्शी और उनके बाक़ी साथियों को, जो सामरिया और दरिया पार के बाक़ी मुल्क में रहते हैं यह जवाब भेजा कि “सलाम वगै़रा।
१७यावर राजाने पुढील उत्तर पाठवले रहूम, शिमशय आणि त्याचे शोमरोनातले साथीदार व नदीच्या पलीकडे राहणारे बाकीचे लोक, “यांना शांती असो.
18 जो ख़त तुम ने हमारे पास भेजा, वह मेरे सामने साफ़ साफ़ पढ़ा गया।
१८तुम्ही पाठवलेल्या पत्राचा अनुवाद करून मला वाचून दाखवण्यात आले.
19 और मैंने हुक्म दिया और मा'लूमात की गयी, और मा'लूम हुआ कि इस शहर ने पुराने ज़माने से बादशाहों से बग़ावत की है, और फ़ितना और फ़साद उसमें होता रहा है।
१९याकरीता मी चौकशी करण्याचा आदेश दिला आणि तेव्हा असा शोध लागला की, मागील दिवसात राजाच्या विरूद्ध बंड करीत आणि त्यामध्ये बंड व फितुरी केल्याचे प्रकार तेथे सतत घडत आले आहेत.
20 और येरूशलेम में ताक़तवर बादशाह भी हुए हैं जिन्होंने दरिया पार के सारे मुल्क पर हुकूमत की है, और ख़िराज, चुंगी और महसूल उनको दिया जाता था।
२०यरूशलेमेवर पराक्रमी राजांनी राज्य केले आणि नदीपलीकडच्या सर्व देशावर अधिकार करीत होते. त्या राजांना लोक कर व खंडणी देत असत.
21 इसलिए तुम हुक्म जारी करो कि ये लोग काम बन्द करें और ये शहर न बने, जब तक मेरी तरफ़ से फ़रमान जारी न हों।
२१आता तुम्ही त्या लोकांस काम थांबवण्याचा हुकूम दिला पाहिजे. मी आज्ञा देईपर्यंत या नगराचे बांधकाम होऊ नये.
22 ख़बरदार, इसमें सुस्ती न करना; बादशाहों के नुक्सान के लिए ख़राबी क्यूँ बढ़ने पाए?”
२२तर हे करण्याची हयगय करू नका म्हणून काळजीपूर्वक राहा. राजाचे नुकसान होईपर्यंत हानी का वाढू द्यावी?”
23 इसलिए जब अरतख़शशता बादशाह के ख़त की नक़ल रहूम और शम्सी मुन्शी और उनके साथियों के सामने पढ़ी गई, तो वह जल्द यहूदियों के पास येरूशलेम को गए, और अपनी ताक़त से उनको रोक दिया।
२३मग राजा अर्तहशश्तने पाठवलेले फर्मान रहूम, शिमशय आणि त्यांच्याबरोबरचे लोक यांना वाचून दाखवण्यात आली. त्यांचे साथीदार ताबडतोब यरूशलेममधील यहूद्याकडे गेले आणि त्यांनी सक्तीने बांधकाम थांबवले.
24 तब ख़ुदा के घर का जो येरूशलेम में है काम बन्द हुआ, और शाह — ए — फ़ारस दारा की सल्तनत के दूसरे बरस तक बन्द रहा।
२४त्यामुळे यरूशलेममधील मंदिराचे काम स्थगित झाले. पारसाचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षापर्यंत ते तसेच राहिले.