< हिज़ि 23 >

1 और ख़ुदावन्द का कलाम मुझ पर नाज़िल हुआ:
परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला,
2 कि 'ऐ आदमज़ाद, दो 'औरतें एक ही माँ की बेटियाँ थीं।
मानवाच्या मुला, दोन स्त्रिया एकाच आईच्या मुली होत्या.
3 उन्होंने मिस्र में बदकारी की, वह अपनी जवानी में बदकार बनी वहाँ उनकी छातियाँ मली गईं और वहीं उनकी दोशीज़गी के पिस्तान मसले गए।
त्यांनी आपल्या तारुण्याच्या दिवसात मिसरात वेश्या कर्म केले. त्यांची स्तने चुरली व कुमारी असतांना त्यांच्या छातीला गोंजारण्यात आले.
4 उनमें से बड़ी का नाम ओहोला और उसकी बहन का नाम ओहोलीबा था वह दोनों मेरी हो गईं और उनसे बेटे बेटियाँ पैदा हुए और उनके यह नाम ओहोला और ओहोलीबा सामरिया व येरूशलेम हैं।
त्यांची नावे अहला थोरली व अहलीबा धाकटीचे नाव आहे, ते माझे झाले आहेत आणि त्यांनी पुत्राला व कन्येला जन्म दिला. त्यांच्या नावाचा अर्थ येणे प्रमाणे आहे. अहला म्हणजे, शोमरोन आणि ओहलीबा म्हणजे यरूशलेम.
5 और ओहोला जब कि वह मेरी थी, बदकारी करने लगी और अपने यारों पर या'नी असूरियों पर जो पड़ोसी थे, 'आशिक़ हुई।
परंतू अहला जेव्हा ती माझी होती तेव्हापासून तिने वेश्या कर्म केले; तिच्या प्रियकरांशी ती वासनेने कामसक्त झाली होती, अश्शूरांच्या हाती ते सत्ता असलेले होते.
6 वह सरदार और हाकिम और सबके सब दिल पसन्द जवाँ मर्द और सवार थे, जो घोड़ों पर सवार होते और अर्गवानी पोशाक पहनते थे।
राजधिकाऱ्याने जांभळी वस्त्रे परिधान केली होती. जे सर्व पुरुषात बलवान व देखणे होते, त्यातील सगळे घोड्यावर स्वार होऊन आले आहेत.
7 और उसने उन सबके साथ जो असूर के बरगुज़ीदा मर्द थे बदकारी की, और उन सबके साथ जिनसे वह 'इश्कबाज़ी करती थी, और उनके सब बुतों के साथ नापाक हुई।
तिने स्वत: ला वेश्याकामासाठी त्यांना सर्वात उत्तम अश्शूरी देऊन टाकले, तिने स्वत: ला काम संतप्तेने प्रत्येकासोबत स्वत: ला अशुद्ध केले, तिने मुर्तीसोबत तिने कामसंतप्त पणा केला.
8 उसने जो बदकारी मिस्र में की थी उसे न छोड़ा, क्यूँकि उसकी जवानी में वह उससे हम — अगोश हुए और उन्होंने उसकी दोशीज़्गी के पिस्तानों को मसला और अपनी बदकारी उस पर उण्डेल दी।
तिने मिसरात कुठलाही वेश्याकर्म मागे ठेवला नाही, जेव्हा ती कुमारी होती तेव्हा ते तिच्या सोबत झोपले, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा तिच्या कुमारीपणात स्तनांना दाबले त्यांनी पहिल्यांना तिच्या सोबत संभोग केला.
9 इसलिए मैंने उसे उसके यारों या'नी असूरियों के हवाले कर दिया जिन पर वह मरती थी।
यास्तव मी तिला तिच्या प्रियकरांच्या हाती दिले अश्शूर ज्यांनी तिच्याशी व्यभिचार केला.
10 उन्होंने उसको बरहना किया और उसके बेटों — बेटियों को छीन लिया और उसे तलवार से क़त्ल किया; इसलिए वह 'औरतों में अंगुश्त नुमा हुई क्यूँकि उन्होंने उसे 'अदालत से सज़ा दी।
१०त्यांनी तिला नग्न केले. त्यांनी तिच्या मुला मुलींना नेऊन तलवारीने मारुन टाकले, ती स्त्रियांमध्ये निंदेचा विषय झाली, यामुळे तिचा न्याय निवाडा करण्यात आला.
11 'और उसकी बहन ओहोलीबा ने यह सब कुछ देखा, लेकिन वह शहवत परस्ती में उससे बदतर हुई और उसने अपनी बहन से बढ़ कर बदकारी की।
११तिची बहिण अहलीबा हिने हे पाहिले, पण तिने आपल्या बहिणीहून अधिक व्यभिचार केला आणि वेश्याकर्म केले.
12 वह असूरियों पर 'आशिक़ हुई जो सरदार और हाकिम और उसके पड़ोसी थे, जो भड़कीली पोशाक पहनते और घोड़ों पर सवार होते और सबके सब दिल पसन्द जवान मर्द थे।
१२अश्शूरांशी तिने व्यभिचार केला, अधिपती, नायब अधिपती, भरदार पोषाख घातलेले, घोड्यावर बसणारे सरदार व सर्व देखण्या तरुणांशी तिने व्यभिचार केला.
13 और मैंने देखा, कि वह भी नापाक हो गई; उन दोनों की एक ही चाल चलन थी।
१३मी पाहिले तिने स्वत: ला अपवित्र केले. त्या दोघी बहिणींनी एकसमान कार्य केले.
14 और उसने बदकारी में तरक़्क़ी की क्यूँकि जब उसने दीवार पर मर्दों की सूरतें देखीं, या'नी कसदियों की तस्वीरें जो शन्गर्फ़ से खिंची हुई थीं,
१४मग तिने आपल्या व्यभिचाराच्या कारवाया अजून वाढवल्या. तिने भिंतीवर रेखाटलेले चित्र काढले, तिने खास्द्यांची लाल रंगाने आकृती रेखाटली.
15 जो पटकों से कमरबस्ता और सिरों पर रंगीन पगड़ियाँ पहने थे, और सब के सब देखने में हाकिम अहल — ए — बाबुल की तरह थे जिनका वतन कसदिस्तान है।
१५आपल्या कमेरेस बंद घालून रंगीबेरंगी फेटे घालून ते सर्व रथात खास्दी देशातील बाबेलाच्या अधिकाऱ्यासारखी दिसत असून आपल्या जन्मभूमित होती.
16 तो देखते ही वह उन पर मरने लगी, और उनके पास कसदिस्तान में क़ासिद भेजे।
१६जशी तिची नजर जाच्यावर गेली त्याच्याशी तिने व्यभिचार केला म्हणून तिने खास्द्यांच्या देशात निरोप्या पाठवला.
17 तब अहल — ए — बाबुल उसके पास आकर 'इश्क़ के बिस्तर पर चढ़े, और उन्होंने उससे बदकारी करके उसे आलूदा किया और वह उनसे नापाक हुई, तो उसकी जान उनसे बेज़ार हो गई।
१७मग बाबेल तिच्या पलंगावर जाऊन तिच्याशी व्यभिचार केला आणि त्याने तिच्याशी वेश्याकर्म केले व स्वत: ला अशुद्ध केले, तिने आपले मन त्याजवरुन दूर केले.
18 तब उसकी बदकारी 'ऐलानिया हुई और उसकी बरहनगी बेसत्र हो गई; तब मेरी जान उससे बेज़ार हुई जैसी उसकी बहन से बेज़ार हो चुकी थी।
१८तिने आपल्या व्यभिचाराचा खेळ मांडला व आपली लाज उघडी केली, जसे माझे मन तिच्या बहिणीहून मन दूर झाले तसे तिच्या वरुन मन दूर झाले.
19 तोभी उसने अपनी जवानी के दिनों की याद करके जब वह मिस्र की सरज़मीन में बदकारी करती थी, बदकारी पर बदकारी की।
१९मग तिने आपल्या व्यभिचाऱ्याच्या कारवाया अधिक वाढवल्या आहेत, तिला तिचे स्मरण होऊन तिने व्यभिचार अधिक वाढवला, जेव्हा तिने मिसरात आपला व्यभिचाराचा स्वभाव ठेवला.
20 इसलिए वह फिर अपने उन यारों पर मरने लगी, जिनका बदन गधों के जैसा बदन और जिनका इन्ज़ाल घोड़ों के जैसा इन्ज़ाल था।
२०तेव्हा तिने आपल्या प्रियकरांशी व्यभिचार केला, ज्यांचे अवयव गाढवाच्या अवयवासारखे होते, व माज घोड्या सारखे होते.
21 इस तरह तूने अपनी जवानी की शहवत परस्ती को, जबकि मिस्री तेरी जवानी की छातियों की वजह से तेरे पिस्तान मलते थे, फिर याद किया।
२१पुन्हा त्यांनी लज्जास्पद आपल्या तारुण्यात गैरवर्तन केले जेव्हा मिसऱ्यांनी तिचे स्तन गोंजारले.
22 इसलिए ऐ ओहोलीबा ख़ुदावन्द ख़ुदा यूँ फ़रमाता है: कि “देख, मैं उन यारों को जिनसे तेरी जान बेज़ार हो गई है उभारूंगा कि तुझ से मुख़ालिफ़त करें, और उनको बुला लाऊँगा कि तुझे चारों तरफ़ से घेर लें।
२२यास्तव अहलीबे परमेश्वर देव म्हणतो, “पहा, मी तुझ्या प्रियकरांना तुझ्याविरूद्ध करीन; ज्यांच्या हून तुझे मन दूर झाले आहे त्या सर्वांना तुझ्याविरूद्ध सभोवतालच्या लोकांस करीन.
23 अहल — ए — बाबुल और सब कसदियों को फ़िकू़द और शो'अ और को'अ और उनके साथ तमाम असूरियों को, सब के सब दिल पसन्द जवाँ मर्दों को, सरदारों और हाकिमों को, और बड़े बड़े अमीरों और नामी लोगों को जो सबके सब घोड़ों पर सवार होते हैं तुझ पर चढ़ा लाऊँगा।
२३बाबेलचे तरुण सर्व खास्दी, पकोड, शोआ, व कोआ येथील लोक व अश्शूरी तरुण पुरुष जे देखणे तरुण, अधिकारी, प्रमुख अधिकारी, पराक्रमी मंत्री व सरदार घोड्यावर बसणारे आहेत त्यांना तुझ्याविरूद्ध उभा करीन.
24 और वह असलह — ए — जंग और रथों और छकड़ों और उम्मतों के गिरोह के साथ तुझ पर हमला करेंगे, और ढाल और फरी पकड़ कर और खू़द पहनकर चारों तरफ़ से तुझे घेर लेंगे; मैं 'अदालत उनको सुपुर्द करूँगा, और वह अपने क़ानून के मुताबिक़ तेरा फ़ैसला करेंगे।
२४ते तुझ्या विरुध्द शस्त्रे, रथ, वाहने, घेऊन येतील. ते मोठे कवच, ढाली, शिरस्त्राण सभोवताली घेऊन येतील तुला शासन करण्याची संधी त्यांना देईन आणि ते तुझ्या कृत्यासाठी तुला शिक्षा करतील.
25 और मैं अपनी गै़रत को तेरी मुख़ालिफ़ बनाऊँगा और वह ग़ज़बनाक होकर तुझ से पेश आयेंगे और तेरी नाक और तेरे कान काट डालेंगे और तेरे बाक़ी लोग तलवार से मारे जाएँगे। वह तेरे बेटे और बेटियों को पकड़ लेंगे और तेरा बक़िया आग से भसम होगा।
२५मी माझा राग त्यांच्यावर रोखीन मी त्वेषाने त्यांचा समाचार घेईन ते तुझे कान नाक कापून टाकतील, उरलेले तलवारीने पडतील, तुझ्या पुत्र कन्येला ते घेऊन जातील, व तुझ्या संतानाला अग्नी खाऊन टाकील.
26 वह तेरे कपड़े भी उतार लेंगे और तेरे नफ़ीस ज़ेवर लूट ले जायेंगे
२६ते तुझे कपडे काढून टाकतील व दागिनेही घेऊन जातील.
27 और मैं तेरी शहवत परस्ती और तेरी बदकारी जो तूने मुल्क — ए — मिस्र में सीखी मौकू़फ़ करूँगा, यहाँ तक कि तू उनकी तरफ़ फिर आँख न उठाएगी और फिर मिस्र को याद न करेगी।
२७मग मी तुझा सर्व लज्जास्पद स्वभाव व मिसरातील वेश्यावर्तन तुझ्यापासून दूर करेन. तुझ्याकडे त्यांचे डोळे फार काळ लागून रहाणार नाही, तू मिसराबद्द्ल फार काळ विचार करणार नाही.
28 'क्यूँकि ख़ुदावन्द ख़ुदा यूँ फ़रमाता है: कि देख, मैं तुझे उनके हाथ में जिनसे तुझे नफ़रत है, हाँ, उन्हीं के हाथ में जिनसे तेरी जान बेज़ार है दे दूँगा।
२८यास्तव परमेश्वर देव असे म्हणतो, पाहा! ज्यांचा तू द्वेष करतेस मी तुला त्यांच्या हाती देईन, ज्यांच्यावरुन तुझे मन दूर झाले त्यांच्या हाती मी तुला देईन.
29 और वह तुझ से नफ़रत के साथ पेश आएँगे, और तेरा सब माल जो तूने मेहनत से पैदा किया है छीन लेंगे और तुझे 'ऊरियान और बरहना छोड़ जायेंगे यहाँ तक कि तेरी शहवत परस्ती — ओ — ख़बासत और तेरी बदकारी फ़ाश हो जाएगी।
२९क्रोधाने ते तुझ्याशी सौदा करतील; ते तुझे पद हिरावून घेतील व उघडे नागडे करून काहीच परत करणार नाही, वेश्याकर्माची लाज उघडी केली जाईल, लज्जास्पद स्वभाव, रसमिसळ भाव जाहीर केला जाईल.
30 यह सब कुछ तुझ से इसलिए होगा कि तूने बदकारी के लिए दीगर क़ौम का पीछा किया और उनके बुतों से नापाक हुई।
३०या सर्वकाही बाबी तुझ्या वेश्या कामासाठी केले जाईल तू मुर्तीसोबत राष्ट्रांना अशुद्ध केलेस.
31 तू अपनी बहन के रस्ते पर चली, इसलिए मैं उसका प्याला तेरे हाथ में दूँगा।
३१तू तुझ्या बहिणीच्या मार्गाने चाललीस, म्हणून मी शिक्षेचा प्याला तिच्या हाती सोपवून देईन.
32 ख़ुदावन्द ख़ुदा यूँ फ़रमाता है: कि तू अपनी बहन के प्याले से जो गहरा और बड़ा है पियेगी तेरी हँसी होगी और तू ठठ्ठों में उड़ाई जाएगी, क्यूँकि उसमें बहुत सी समाई है।
३२प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, तू तुझ्या बहिणीचा प्याला पिणार आहेस, जो खोल व मोठा आहे, तू मस्करीचा व उपहासाचा विषय बनशील या प्याल्यात मोठा भरणा असेल.
33 तू मस्ती और सोग से भर जाएगी; वीरानी और हैरत का प्याला, तेरी बहन सामरिया का प्याला है।
३३तू मद्यपानाने व दुःखाने भरली जाशील व भिती, धुळधाण हा प्याल्या शोमरोन तुझ्या बहिणीचा आहे.
34 तू उसे पियेगी और निचोड़ेगी और उसकी ठेकरियाँ भी चबाई जाएगी, और अपनी छातियाँ नोचेगी क्यूँकि मैं ही ने यह फ़रमाया है, ख़ुदावन्द ख़ुदा फ़रमाता है।
३४तू पिणार व नाल्यात रिकामे सोडशील, तुझे अनेक तुकडे केले जातील आणि तुझ्या स्तनांचे अनेक तुकडे केले जातील. असे मी जाहीर करतो, मी परमेश्वर देव जाहीर करत आहे.
35 फिर ख़ुदावन्द यूँ फ़रमाता है, कि चूँकि तू मुझे भूल गई और मुझे अपनी पीठ के पीछे फेंक दिया इसलिए अपनी बदज़ाती और बदकारी की सज़ा उठा।”
३५यास्तव प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, कारण तू मला विसरलास व मला मागे फेकून दिलेस तसेच स्वत: ला उंच करून आपला लाजीरवाणा जारकर्मी स्वभाव प्रकट केला.”
36 फिर ख़ुदावन्द ने मुझे फ़रमाया: कि 'ऐ आदमज़ाद, क्या तू ओहोला और ओहोलीबा पर इल्ज़ाम न लगाएगा? तू उनके घिनौने काम उन पर ज़ाहिर कर।
३६परमेश्वर देव मला म्हणाला, “मानवाच्या मुला, तू अहला आणि अहलीबा यांचा न्याय करशील काय? म्हणून त्यांना त्यांचे किळसवाणे मार्ग सादर कर,
37 क्यूँकि उन्होंने बदकारी की और उनके हाथ ख़ूनआलूदा हैं हाँ उन्होंने अपने बुतों से बदकारी की और अपने बेटों को जो मुझ से पैदा हुए आग से गुज़ारा कि बुतों की नज़र होकर हलाक हों।
३७जेव्हापासून त्यांनी व्यभिचार मुर्तीसोबत केला व त्यांच्या संतानांना पुढे वारशाने दिला व पिऊन टाकणाऱ्या अग्नीसाठी भगदड पाडले.
38 इसके 'अलावा उन्होंने मुझ से यह किया कि उसी दिन उन्होंने मेरे हैकल को नापाक किया, और मेरे सबतों की बेहुर्मती की।
३८आणि त्यांनी सतत माझ्याशी असेच वर्तन ठेवले, त्यांनी माझे स्थान अपवित्र केले आणि त्याच दिवशी त्यांनी माझा शब्बाथात भेसळ केली.
39 क्यूँकि जब वह अपनी औलाद को बुतों के लिए ज़बह कर चुकीं, तो उसी दिन मेरे हैकल में दाख़िल हुई, ताकि उसे नापाक करें और देख, उन्होंने मेरे घर के अन्दर ऐसा काम किया।
३९जेव्हा मूर्तीसाठी त्यांनी आपल्या मुलाबाळांचे तुकडे केले, त्याच दिवशी ते माझ्या स्थानी येऊन माझा शब्बाथ भेसळ केला मग पाहा! त्यांनी माझ्या घरात हेच केले.
40 बल्कि तुम ने दूर से मर्द बुलाए जिनके पास क़ासिद भेजा, और देख, वह आए जिनके लिए तूने गु़स्ल किया और आँखों में काजल लगाया और बनाओ सिंगार किया;
४०लांबून आलेल्या लोकांस तू बाहेर पाठवून दिले तू निरोप्याला पाठवलेस आता पाहा ते खरोखर येतील ज्यांची तू आंघोळ घालशील डोळ्यात अंजन घातलेस व दागीन्यांनी आपणास नटवीले.
41 और तू नफ़ीस पलंग पर बैठी और उसके पास दस्तरख़्वान तैयार किया, और उस पर तूने मेरी ख़ुशबू और मेरा 'इत्र रख्खा।
४१वेल बुट्टीदार पलंगावर आणि त्याज पुढे मेज मांडला व त्यावर सुगंधी द्रव्य व तेल मांडले.
42 और एक 'अय्याशी जमा'अत की आवाज़ उसके साथ थी और आम लोगों के 'अलावा वीरान से शराबियों को लाए और उन्होंने उनके हाथों में कंगन और सिरों पर ख़ुशनुमा ताज पहनाए।
४२मग लोकांच्या गर्दीच्या आवाजात काळजी करणारे होते आणि रानातून मद्यपी, नालायक लोकांस जंगलातून आणण्यात आले. त्यांनी आपल्या हातात कडे घातले होते व मस्तकावर मुकुट घातला होता.
43 “तब मैंने उसके ज़रिए' जो बदकारी करते करते बुढ़िया हो गई थीं, कहा, अब यह लोग उससे बदकारी करेंगे और वह उनसे करेगी।
४३मग मी त्यांना एक झिजून गेलेली व्यभिचाराच्या कृत्यांबद्दल सांगितले, ‘आता ते तिच्याशी व ती त्यांच्याशी जारकर्म करील.’
44 और वह उसके पास गए जिस तरह किसी कस्बी के पास जाते हैं, उसी तरह वह उन बदज़ात 'औरतों, ओहोला और ओहोलीबा के पास गए।
४४ते जसे वेश्येकडे जातात तसे ते अहला व अहलीबा या दोषी वेश्येकडे गेले.
45 लेकिन सादिक़ आदमी उन पर वह फ़तवा देंगे जो बदकार और खू़नी 'औरतों पर दिया जाता है, क्यूँकि वह बदकार 'औरतें हैं और उनके हाथ खू़न आलूदा हैं।”
४५पण धार्मिक लोक तिच्या व्यभिचारासाठी व रक्तपातासाठी तिच्या हातून घडलेल्या पातकांचा न्याय निवाडा करतील.
46 क्यूँकि ख़ुदावन्द ख़ुदा यूँ फ़रमाता है: कि “मैं उन पर एक गिरोह चढ़ा लाऊँगा, और उनको छोड़ दूँगा कि इधर — उधर धक्के खाती फिरें और ग़ारत हों।
४६प्रभू परमेश्वर म्हणतो, मी त्याजवर लोकसमुदाय आणून दहशत घालीन व ते आतंक, लुटमार करतील.
47 और वह गिरोह से उनको पथराव करेगी और अपनी तलवारों से क़त्ल करेगी, उनके बेटों — बेटियों को हलाक करेगी और उनके घरों को आग से जला देगी।
४७मग लोकसमुदाय त्यांना धोंडमार करतील व तलवारीने त्यांचे तुकडे करतील, त्यांच्या मुलाबाळांना मारुन टाकतील व त्यांच्या घरांना जाळून टाकतील.
48 यूँ मैं बदकारी को मुल्क से ख़त्म करूँगा ताकि सब 'औरतें 'इबरत पज़ीर हों और तुम्हारी तरह बदकारी न करें।
४८मी भूमीतील लज्जास्पद स्वभाव काढून टाकीन व सर्व स्त्रियांना शिस्त लावीन यापुढे ते वेश्याकर्म करणार नाहीत.
49 और वह तुम्हारे बुराई का बदला तुम को देंगे, और तुम अपने बुतों के गुनाहों की सज़ा का बोझ उठाओगे, ताकि तुम जानों कि ख़ुदावन्द ख़ुदा मैं ही हूँ।”
४९मग त्यांचे लज्जास्पद वर्तन तुझ्याविरुध्द करीन तू मुर्तीसोबत केलेल्या पापाचे फळ भोगशील मग यामार्गाने तुला कळेल मी परमेश्वर देव आहे.”

< हिज़ि 23 >