< हिज़ि 16 >
1 फिर ख़ुदावन्द का कलाम मुझ पर नाज़िल हुआ:
१मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला.
2 कि ऐ आदमज़ाद! येरूशलेम को उसके नफ़रती कामों से आगाह कर,
२मानवाच्या मुला, त्यांच्या किळस वाण्या कृत्याबद्दल यरूशलेमेस बजावून सांग.
3 और कह, ख़ुदावन्द ख़ुदा येरूशलेम से यूँ फ़रमाता है: तेरी विलादत और तेरी पैदाइश कनान की सरज़मीन की है; तेरा बाप अमूरी था और तेरी माँ हित्ती थी।
३असे जाहीर कर परमेश्वर देव यरूशलेमेला असे म्हणतो, तुझी सुरुवात आणि जन्म सुध्दा कनान देशात झाला आहे, तुझा बाप आमोरी आणि आई हित्ती होती.
4 और तेरी पैदाइश का हाल यूँ है कि जिस दिन तू पैदा हुई तेरी नाफ़ काटी न गई, और न सफ़ाई के लिए तुझे पानी से गु़स्ल मिला, और न तुझ पर नमक मला गया, और तू कपड़ों में लपेटी न गई।
४तू जन्मला त्या दिवशी तुझी नाळ कापली नाही, तुला पाण्याने स्वच्छ केले नाही, किंवा मिठ लावून चोपडले नाही, किंवा बाळंत्याने गुंडळले नाही, तुझा जन्म झाला त्या दिवशी तुझा तिव्र तिटकारा येऊन तुला उघड्यावर फेकून दिले.
5 किसी की आँख ने तुझ पर रहम न किया कि तेरे लिए यह काम करे और तुझ पर मेहरबानी दिखाए बल्कि तू अपनी विलादत के दिन बाहर मैदान में फेंकी गई, क्यूँकि तुझ से नफ़रत रखते थे।
५कुणाच्या डोळ्यात तुझ्याबद्दल करुणा दिसली नाही, ज्या दिवशी तुझा जन्म झाला, तुला मोकळ्या जागेत फेकून दिले.
6 तब मैंने तुझ पर गुज़र किया और तुझे तेरे ही ख़ून में लोटती देखा, और मैंने तुझे जब तू अपने खू़न में आग़िश्ता थी कहा, 'जीती रह! हाँ, मैंने तुझ खू़न आलूदा से कहा, 'जीती रह!
६पण मी तुझ्या जवळून जातांना तुला रक्तबंबाळ पाहिले; आणि मी तुझ्या ओघळणाऱ्या रक्ताला जीवन बोललो.
7 मैंने तुझे चमन के शगूफ़ों की तरह हज़ार चन्द बढ़ाया, इसलिए तू बढ़ीं, और कमाल और जमाल को पहुँची तेरी छातियाँ उठीं और तेरी ज़ुल्फें बढ़ीं लेकिन तू नंगी और बरहना थी।
७मी तुला भूमीतील रोपासारखे पेरले. तू बहुगुणीत झालीस. आणि मोठी झालीस, व तू आभुषणांचा दागीना झालीस, तुला उर फुटले आणि केस दाट झाले, तू बिनवस्त्र होती.
8 फिर मैंने तेरी तरफ़ गुज़र किया और तुझ पर नज़र की, और क्या देखता हूँ कि तू 'इश्क़ अंगेज़ उम्र को पहुँच गई है; फिर मैंने अपना दामन तुझ पर फैलाया और तेरी बरहनगी को छिपाया, और क़सम खाकर तुझ से 'अहद बाँधा ख़ुदावन्द ख़ुदा फ़रमाता है और तू मेरी हो गई।
८मी पुन्हा तुझ्या जवळून गेलो, तेव्हा वेळ तुझ्या प्रेमाच्या विकासाची होती, तेव्हा मी तुझ्यावर पांघरुन घालून तुझी नग्नता झाकली. मग मी शपथ वाहून तुझ्याशी करार केला. परमेश्वर देव म्हणतो, या कराराने तू माझी झाली आहेस.
9 फिर मैंने तुझे पानी से गु़स्ल दिया, और तेरा खू़न बिल्कुल धो डाला और तुझ पर 'इत्र मला।
९मी पाण्याने तुला धुतले, आणि तेलाने तुला मळले.
10 और मैंने तुझे ज़र — दोज़ लिबास से मुलब्बस किया, और तुख़स की खाल की जूती पहनाई, नफ़ीस कतान से तेरा कमरबन्द बनाया और तुझे सरासर रेशम से मुलब्बस किया।
१०तुला नक्षीकाम केलेले कापड घातले, तुझ्या पायात कातड्याचे जोडे घातले, तुझ्या डोक्याला चांगले रेशमाचे मुलायम कापड घातले.
11 मैंने तुझे ज़ेवर से आरास्ता किया, तेरे हाथों में कंगन पहनाए और तेरे गले में तौक़ डाला।
११त्यानंतर मी तुला दागिन्यांनी सजवले, तुझ्या हातात कडे घातले आणि गळ्यात साखळी घातली.
12 और मैंने तेरी नाक में नथ और तेरे कानों में बालियाँ पहनाई, और एक खू़बसूरत ताज तेरे सिर पर रख्खा।
१२मी तुला नथ घातली आणि कानात बाळी घातली व सुंदर मुकुट तुझ्या डोक्यात घातला.
13 और तू सोने — चाँदी से आरास्ता हुई, और तेरी पोशाक कतानी और रेशमी और चिकन — दोज़ी की थी; और तू मैदा और शहद और चिकनाई खाती थी, और तू बहुत खू़बसूरत और इक़बालमन्द मलिका हो गई।
१३तुला सोन्यारुप्याने सजवीले, तुला रेशमाच्या कापडाचा व नक्षीकाम केलेला पेहराव घातला, तुला जेवणास मधपोळी तेलासह असत. तू अति सुंदर होतीस कारण तुला दिलेल्या तेजाने तू अप्रतीम होतीस असे परमेश्वर देव म्हणतो.
14 और क़ौम — ए — 'आलम में तेरी खू़बसूरती की शोहरत फैल गई, क्यूँकि, ख़ुदावन्द ख़ुदा फ़रमाता है, कि तू मेरे उस जलाल से जो मैंने तुझे बख़्शा कामिल हो गई थी।
१४तुझ्या देखणे पणाची चर्चा सर्व राष्ट्रात पसरली, ती तुला परिपूर्ण मोहून टाकणारी आहे, जी मी तुला दिली असे परमेश्वर देव म्हणतो.
15 लेकिन तूने अपनी खू़बसूरती पर भरोसा किया और अपनी शोहरत के वसीले से बदकारी करने लगी, और हर एक के साथ जिसका तेरी तरफ़ गुज़र हुआ ख़ूब फ़ाहिशा बनी और उसी की हो गई।
१५पण तू आपल्या देखणेपणावर विसंबून राहीली आणि वेश्या कर्म केले, ये जा करणाऱ्यांशी तू वेश्या कर्म केले, त्यांनी तुझे सोंदर्य लुटले.
16 तूने अपनी पोशाक से अपने ऊँचे मक़ाम मुनक़्क़श और आरास्ता किए, और उन पर ऐसी बदकारी की, कि न कभी हुई और न होगी।
१६मग तू आपले विविध रंगी कपड्यांनी उच्च स्थाने सजवली, कधी झाली नाही व कधी केली जाणार नाही असे वेश्या कर्म तू केलेस.
17 और तूने अपने सोने — चाँदी के नफ़ीस ज़ेवरों से जो मैंने तुझे दिए थे, अपने लिए मर्दों की मूरतें बनाई और उनसे बदकारी की।
१७मी दिलेल्या शोभेच्या सोन्याचांदीच्या दागीन्यांची तू पुरुष प्रतिमा बनवीली आणि त्यांच्या बरोबर तू वेश्या कर्म केले.
18 और अपनी ज़र — दोज़ पोशाकों से उनको मुलब्बस किया, और मेरा 'इत्र और ख़ुशबू उनके सामने रख्खा।
१८तू त्यांना नक्षीकाम केलेली वस्त्रे घातली त्यांनी तू सुगंधी तेलाचा धुप चढवला.
19 और मेरा खाना जो मैंने तुझे दिया, या'नी मैदा और चिकनाई और शहद जो मैं तुझे खिलाता था, तूने उनके सामने ख़ुशबू के लिए रख्खा: ख़ुदावन्द ख़ुदा फ़रमाता है कि यूँ ही हुआ।
१९भाकर, पिठ, तेल, मध मी तुला दिले व तुला खाऊ घातले ते तुझ्यापुढे सुवासीक अर्पण असे होते. असे घडले प्रभू परमेश्वर देव जाहीर पणे सांगतो.
20 और तूने अपने बेटों और अपनी बेटियों को, जिनको तूने मेरे लिए पैदा किया लेकर उनके आगे कु़र्बान किया, ताकि वह उनको खा जाएँ, क्या तेरी बदकारी कोई छोटी बात थी,
२०मग तुझ्या पुत्र कन्यांना जे माझ्यापासून जन्मले त्यांना तू खाऊन टाकण्यासाठी अर्पण केले आणि वेश्याकर्म केलेस.
21 कि तूने मेरे बच्चों को भी ज़बह किया और उनको बुतों के लिए आग के हवाले किया?
२१तू मूर्तीच्यापुढे माझ्या लेकरांना अग्नीने जाळून खाक केले व त्यांचे अग्नीअर्पण केले.
22 और तूने अपनी तमाम मकरूहात और बदकारी में अपने बचपन के दिनों को, जब कि तू नंगी और बरहना अपने खू़न में लोटती थी, कभी याद न किया।
२२तुझे सर्व किळसवाणे व वेश्याकर्म तू कुमारी असतांना नग्न होऊन रक्तात लोळत होती याचे स्मरण तुला झाले नाही.
23 'और ख़ुदावन्द ख़ुदा फ़रमाता है कि अपनी इस सारी बदकारी के 'अलावा अफ़सोस! तुझ पर अफ़सोस!
२३तुला हाय हाय असो! असे परमेश्वर देव जाहीर करतो, या सर्व दुष्टपणात आणखी भर,
24 तूने अपने लिए गुम्बद बनाया और हर एक बाज़ार में ऊँचा मक़ाम तैयार किया।
२४तू आपल्यासाठी संस्कार गृह बांधले, व सार्वजनिक असे पवित्र ठिकाण उभे केले
25 तूने रास्ते के हर कोने पर अपना ऊँचा मक़ाम ता'मीर किया, और अपनी खू़बसूरती को नफ़रत अंगेज़ किया, और हर एक राह गुज़र के लिए अपने पाँव पसारे और बदकारी में तरक़्क़ी की।
२५तू पवित्र ठिकाण आपल्यासाठी प्रत्येक रस्त्यावर उभे केले आणि तुझे सौंदर्य जाहीर केले, तू आपले पाय पसरुन आपल्या मना प्रमाणे वेश्या कर्म केले.
26 तूने अहल — ए — मिस्र और अपने पड़ोसियों से जो बड़े क़दआवर हैं बदकारी की और अपनी बदकारी की ज़्यादती से मुझे ग़ज़बनाक किया।
२६तू मिसर देशाच्या लोकांशी, शेजाऱ्यांशी जे वासनाधुंद त्यांच्या सोबत वेश्या कर्म केले त्याचा मला राग येतोय.
27 फिर देख, मैंने अपना हाथ तुझ पर चलाया और तेरे वज़ीफ़े को कम कर दिया, और तुझे तेरी बदख़्वाह फ़िलिस्तियों की बेटियों के क़ाबू में कर दिया जो तेरी ख़राब चाल चलन से शर्मिन्दा होती थीं।
२७बघ मी माझा हात तुझ्यावर उचलीन व तुझी उपासमार करीन तुझ्या शत्रुंचा हात तुझ्यावर पडेल व पलिष्ट्यांच्या कन्या तुझ्या वासनाधुंदपणाची तुझी लाज काढतील.
28 फिर तूने अहल — ए — असूर से बदकारी की, क्यूँकि तू सेर न हो सकती थी; हाँ, तूने उन से भी बदकारी की लेकिन तोभी तू आसूदा न हुई।
२८तू अश्शूरांशी वेश्या काम केले कारण त्यांने तू समाधानी झाली नाहीस. तू समाधान होईपर्यंत वेश्या काम करीत होतीस.
29 और तूने मुल्क — ए — कन'आन से कसदियों के मुल्क तक अपनी बदकारी को फैलाया, लेकिन इस से भी सेर न हुई।
२९तू व्यापाऱ्यांच्या म्हणजे खास्द्यांच्या देशात बरेच वेश्या काम केले किंबहूना यानेही तुझे समाधान झाले नाही.
30 ख़ुदावन्द ख़ुदा फ़रमाता है, तेरा दिल कैसा बे — इख़्तियार है कि तू यह सब कुछ करती है, जो बेलगाम फ़ाहिशा 'औरत का काम है,
३०तुझे हृदय इतके कमजोर का? “असे परमेश्वर प्रभू देव जाहीरपणे सांगतो” तू स्वतःच्या मना प्रमाणे निर्लज्ज स्त्री सारखे सर्व काही केले.
31 इसलिए कि तू हर एक सड़क के सिरे पर अपना गुम्बद बनाती है, और हर एक बाज़ार में अपना ऊँचा मक़ाम तैयार करती है, और तू कस्बी की तरह नहीं क्यूँकि तू उजरत लेना बेकार जानती है।
३१रस्त्यावर, प्रत्येक नाक्यावर तू संस्कार गृह बांधले व सार्वजनिक ठिकाणी पवित्र ठिकाण उभे केलेस, तू वेश्याकमाई घेतली नाही व वेश्येचा रिवाज मोडला.
32 बल्कि बदकार बीवी की तरह है, जो अपने शौहर के बदले गै़रों को कु़बूल करती है।
३२तू जारीण आपल्या पतीच्या ऐवजी परक्या पुरुषाशी जारकर्म केले.
33 लोग सब कस्बियों को हदिए देते हैं; लेकिन तू अपने यारों को हदिए और तोहफ़े देती है, ताकि वह चारों तरफ़ से तेरे पास आएँ और तेरे साथ बदकारी करें।
३३लोक प्रत्येक वेश्येला धन देतात, पण तू आपल्या जारकर्म्यांना उलट पक्षी मोबदला देतेस, तुझ्याशी वेश्या कर्म करावे म्हणून सर्व बाजूने तू त्यांना लाच देतेस.
34 और तू बदकारी में और 'औरतों की तरह नहीं, क्यूँकि बदकारी के लिए तेरे पीछे कोई नहीं आता। तू उजरत नहीं लेती बल्कि ख़ुद उजरत देती है, इसलिए तू अनोखी है।
३४म्हणून तुझ्यात व इतर स्त्रियात फरक आहे, कुणी तुझ्या बरोबर झोपण्यास तयार होत नाही जोपर्यंत तू त्यास मोबदला देत नाही, तो तुला काही धन देत नाही.
35 इसलिए ऐ बदकार, तू ख़ुदावन्द का कलाम सुन,
३५परमेश्वर देवाचा शब्द तू हे जारीण ऐक.
36 ख़ुदावन्द ख़ुदा यूँ फ़रमाता है: कि चूँकि तेरी नापाकी बह निकली और तेरी बरहनगी तेरी बदकारी के ज़रिए' जो तूने अपने यारों से की, और तेरे सब नफ़रती बुतों की वजह से और तेरे बच्चों के खू़न की वजह से जो तूने उनके आगे पेश किया, ज़ाहिर हो गई।
३६असे परमेश्वर देव म्हणतो, कारण तू आपल्या वासनेची ओतणी करुण निर्लज्जता तुझ्या वेश्याकर्माने जारकर्म्यावर व मूर्तीपुढे उघडी केली, आणि तू आपल्या लेकरांचे रक्त मूर्तीला वाहीले;
37 इसलिए देख, मैं तेरे सब यारों को तू लज़ीज़ थी, और उन सब को जिनको तू चाहती थी और उन सबको जिनसे तू कीना रखती है जमा' करूँगा; मैं उनको चारों तरफ़ से तेरी मुख़ालिफ़त पर जमा' करूँगा और उनके आगे तेरी बरहनगी खोल दूँगा ताकि वह तेरी तमाम बरहनगी देखें।
३७यास्तव पहा! तुझे चाहाते व द्वेष्टे सर्वांना जमा करून तुझी लाज परराष्ट्री पुढे उघडी करेल व ते तुझी नग्नता सर्व बाजूने बघतील.
38 और मैं तेरी ऐसी 'अदालत करूँगा जैसी बेवफ़ा और ख़ूनी बीवी की और मैं ग़ज़ब और ग़ैरत की मौत तुझ पर लाऊँगा।
३८तुझ्या जारकर्माचे व तू सांडलेल्या रक्ता बद्दल शासन मी तुला करीन व माझ्या रागाने व त्वेषाने तुझे रक्त सांडेल.
39 और मैं तुझे उनके हवाले कर दूँगा, और वह तेरे गुम्बद और ऊँचे मक़ामों को मिस्मार करेंगे और तेरे कपड़े उतारेंगे और तेरे ख़ुशनुमा ज़ेवर छीन लेंगे, और तुझे नंगी और बरहना छोड़ जाएँगे।
३९तुला मी त्यांच्या हाती सोपवेन व ते तुझे सर्व घरे पाडून टाकतील तुझे वस्त्र, दागिने हुसकावून तुला उघडी नागडी करतील.
40 वह तुझ पर एक हुजूम चढ़ा लाएँगे, और तुझे संगसार करेंगे और अपनी तलवारों से तुझे छेद डालेंगे।
४०मग ते तुझ्या विरुध्द लोक जमा करून तुला धोंडमार करतील व तलवारीने तुझे तुकडे करतील.
41 और वह तेरे घर आग से जलाएँगे और बहुत सी 'औरतों के सामने तुझे सज़ा देंगे, और मैं तुझे बदकारी से रोक दूँगा और तू फिर उजरत न देगी।
४१ते तुझ्या घराला जाळून टाकतील अनेक स्त्रियांच्या डोळ्यादेखत तुझ्यावर शासन केले जाईल, मी तुझे वेश्या कर्म बंद करेन, आणि आता तू कुणालाही मोबदला देणार नाहीस.
42 तब मेरा क़हर तुझ पर धीमा हो जाएगा, और मेरी गै़रत तुझ से जाती रहेगी; और मैं तस्कीन पाऊँगा और फिर ग़ज़बनाक न हूँगा।
४२मग माझा राग तुझ्या वरचा थंड होईल; मग माझा राग निघून जाईल, मी शांत होईन व पुन्हा कोपणार नाही.
43 चूँकि तूने अपने बचपन के दिनों को याद न किया, और इन सब बातों से मुझ को फ़रोख़्त किया, इसलिए ख़ुदावन्द ख़ुदा फ़रमाता है, देख, मैं तेरी बदराही का नतीजा तेरे सिर पर लाऊँगा और तू आगे को अपने सब घिनौने कामों के 'अलावा ऐसी बदज़ाती नहीं कर सकेगी।
४३कारण तू आपल्या तरुणपणात माझी आठवण केली नाहीस आणि मला क्रोधावीष्ट केलेस. बघ तुझ्या वाईट कृत्याचे परीणाम मी तुझ्या शिरी घेऊन येईन; असे परमेश्वर देव जाहीर करतो, म्हणून आता यापुढे तू वाईट वेश्या काम करणार नाहीस.
44 देख, सब मिसाल कहने वाले तेरे बारे में यह मिसाल कहेंगे, कि 'जैसी माँ, वैसी बेटी।
४४बघ! तुला अनुसरुन जे कोणी म्हणी वापरतील, जशी आई आपल्या मुलीसाठी आहे
45 तू अपनी उस माँ की बेटी है जो अपने शौहर और अपने बच्चों से घिन खाती थी, और तू अपनी उन बहनों की बहन है जो अपने शौहरों और अपने बच्चों से नफ़रत रखती थीं; तेरी माँ हित्ती और तेरा बाप अमूरी था।
४५तू आपल्या आईची मुलगी आहेस, जिने आपल्या पतीचा व लेकराचा तिरस्कार केला व तुझ्या आपल्या बहीणीने बहीणीच्या पतीच्या व तिच्या लेकरांचा तिरस्कार केला, तुझी आई हित्ती आणि तुझा बाप आमोरी आहे.
46 और तेरी बड़ी बहन सामरिया है जो तेरी बाईं तरफ़ रहती है, वह और उसकी बेटियाँ, और तेरी छोटी बहन जो तेरी दहनी तरफ़ रहती हैं, सदूम और उसकी बेटियाँ हैं।
४६तुझी मोठी बहीण शोमरोनी आणि तिची कन्या पूर्वेकडे वस्तीला आहे त्यापैकी एक सदोम आहे.
47 लेकिन तू सिर्फ उनकी राह पर नहीं चली और सिर्फ़ उन ही के जैसे घिनौने काम नहीं किए, क्यूँकि यह तो अगरचे छोटी बात थी, बल्कि तू अपनी तमाम चाल चलन में उनसे बदतर हो गई।
४७आता तिच्या पावलावर पाऊल टाकून तिरस्कार करु नको; जरी या थोडक्या बाबी आहेत तरी देखील तू होती त्याहून तुझे मार्ग वाईट आहेत.
48 ख़ुदावन्द ख़ुदा फ़रमाता है, मुझे अपनी हयात की क़सम कि तेरी बहन सदूम ने ऐसा नहीं किया, न उसने न उसकी बेटियों ने जैसा तूने और तेरी बेटियों ने किया है।
४८परमेश्वर देव जाहीर करतो की सदोम तुझी बहीण आणि तुझी मुलगी, तू आपल्या बहिणीप्रमाणे वाईट कृत्ये केली नाहीस.
49 देख, तेरी बहन सदूम की तक़्सीर यह थी, गु़रूर और रोटी की सेरी और राहत की कसरत उसमें और उसकी बेटियों में थी; उसने ग़रीब और मोहताज की दस्तगीरी न की।
४९पाहा! सदोम या तुझ्या बहिणीचे हे पातक आहे. ती आपल्या फुरसतीत सर्व बाबतीत उध्दट, निष्काळजी, करुणाहीन, होती. तिने व तिच्या मुलीने गरजू व गरीबांना मदतीचा हात पुढे केला नाही.
50 वह मग़रूर थीं और उन्होंने मेरे सामने घिनौने काम किए, इसलिए जब मैंने देखा तो उनको उखाड़ फेंका।
५०ती उध्दट आणि किळसवाणी कार्य तिने माझ्या पुढे केले आहे, तुझ्या देखत मी तुला हुसकावून दिले आहे.
51 और सामरिया ने तेरे गुनाहों के आधे भी नहीं किए, तूने उनके बदले अपनी मकरूहात को फ़िरावान किया है, और तूने अपनी इन मकरूहात से अपनी बहनों को बेक़ुसूर ठहराया है।
५१शोमरोनाने तुझ्या सारखे निम्मे पाप केले नाही, त्यांनी केलेल्या पापापेक्षा तू अनेक किळस वाणे पापे केलीस, तू दाखवलेस की तुझी बहीण तुझ्याहून सरळ आहे कारण सर्व ओंगाळ कर्म तू केलेले आहेस.
52 फिर तू ख़ुद जो अपनी बहनों को मुजरिम ठहराती है, इन गुनाहों की वजह से जो तूने किए जो उनके गुनाहों से ज़्यादा नफ़रतअंगेज़ हैं, मलामत उठा; वह तुझ से ज़्यादा बेकु़सूर हैं। इसलिए तू भी रूस्वा हो और शर्म खा, क्यूँकि तूने अपनी बहनों को बेकु़सूर ठहराया है।
५२विशेषत; तू आपली स्वतःची लाज दाखवलीस; या मार्गाने तू आपल्या बहीणीपेक्षा उत्तम आहेस हे दर्शविले, तू केलेल्या पापाने सर्व किळसवाणे कार्य तू केलेले आहेस, तुझी बहीण तुझ्याहून उत्तम आहे, विशेषत; तू आपली लाज उघडी केली, या मानाने तुझी बहीण तुझ्या मानाने उत्तम आहे.
53 'और मैं उनकी ग़ुलामी को बदल दूँगा, या'नी सदूम और उसकी बेटियों की ग़ुलामी को और सामरिया और उसकी बेटियों की ग़ुलामी की, और उनके बीच तेरे ग़ुलामों की ग़ुलामी को,
५३यास्तव मी तुझे भविष्य सामान्य स्थितीत आणेन, सदोमाचे भविष्य आणि तुझ्या बहिणीचे आणि शोमरोनाचे व तिच्या बहीणीचे भविष्यपण त्यांच्यापैकी असेल.
54 ताकि तू अपनी रूस्वाई उठाए और अपने सब कामों से शर्मिंदा हो, क्यूँकि तू उनके लिए तसल्ली के ज़रिए' है।
५४या सर्वांचा लेखा जोखा तुला आपली लज्जा उघडी केली जाईल; आणि या मार्गाने तुझे सांत्वन केले जाईल.
55 तेरी बहनें सदूम और सामरिया, अपनी अपनी बेटियों के साथ अपनी पहली हालत पर बहाल हो जाएँगी, और तू और तेरी बेटियाँ अपनी पहली हालत पर बहाल हो जाओगी।
५५म्हणून सदोम व तुझ्या बहिणीची पूर्वीच्या स्थितीहून सामान्य स्थिती आणेन. मग शोमरोन व तिच्या मुलीची स्थिती मी सामान्य करेन.
56 तू अपने ग़ुरूर के दिनों में, अपनी बहन सदूम का नाम तक ज़बान पर न लाती थी।
५६जेव्हा तू घमंडी होतीस सदोम तुझ्या बहीणीचे नाव मुखातून उच्चारण केले नव्हते.
57 उससे पहले कि तेरी शरारत फ़ाश हुई, जब अराम की बेटियों ने और उन सब ने जो उनके आस — पास थीं तुझे मलामत की, और फ़िलिस्तियों की बेटियों ने चारों तरफ़ से तेरी हिकारत की।
५७तुझा दुष्टपणा जेव्हा प्रकट झाला. पण तू आता अदोमाचे कन्ये तिरस्कारणीय बाब आहेस आणि सभोवतालच्या पलिष्टीच्या कन्येसाठी असलेले सर्व लोक तिरस्कार करतील.
58 ख़ुदावन्द फ़रमाता है, तूने अपनी बदज़ाती और घिनौने कामों की सज़ा पाई।
५८तू तुझी लज्जा दाखवली आणि तुझे तिरस्करणीय कृती केली असे परमेश्वर देव जाहीर करत आहे.
59 “क्यूँकि ख़ुदावन्द ख़ुदा यूँ फ़रमाता है: कि मैं तुझ से जैसा तूने किया वैसा ही सुलूक करूँगा, इसलिए कि तूने क़सम को बेकार जाना और 'अहद शिकनी की।
५९प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, मी इतरांशी जसा वागलो तसा मी तुझ्याशी वागेन ज्यांनी शपथेचा तिरस्कार केला व करार मोडला.
60 लेकिन मैं अपने उस 'अहद को जो मैंने तेरी जवानी के दिनों में तेरे साथ बाँधा, याद रख्खूँगा और हमेशा का 'अहद तेरे साथ क़ायम करूँगा।
६०तुझ्या तरुणपणात केलेल्या माझ्या कराराचे मी सर्वदा स्मरण करीन आणि मी सर्व काही कराराच्या द्वारे स्थापीत करेन.
61 और जब तू अपनी बड़ी और छोटी बहनों को कु़बूल करेगी, तब तू अपनी राहों को याद करके शर्मिंदा होगी और मैं उनको तुझे दूँगा कि तेरी बेटियाँ हों, लेकिन यह तेरे 'अहद के मुताबिक़ नहीं।
६१मग तुला तुझ्या मार्गाची आठवण होईल आणि आपल्या थोरल्या बहिणीची व धाकट्या बहिणीबद्दल लज्जीत होशील, तू तुझी मुलगी त्यांना देईल पण तुझ्या करारामुळे नव्हे.
62 और मैं अपना 'अहद तेरे साथ क़ायम करूँगा, और तू जानेगी कि ख़ुदावन्द मैं हूँ।
६२तुझ्या सोबत करार स्थापीत करेल, मग तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे.
63 ताकि तू याद करे और शर्मिंदा हो और शर्म के मारे फिर कभी मुँह न खोले, जब कि मैं सब कुछ जो तूने किया मु'आफ़ कर दूँ, ख़ुदावन्द ख़ुदा फ़रमाता है।”
६३या बाबीमुळे तुला सर्व काही स्मरण होईल आणि त्याची लाज वाटेल तू केलेल्या सर्व कर्माची मी तुला क्षमा केली, “असे परमेश्वर देव जाहीर करत आहे.”