< आस्त 7 >
1 तब बादशाह और हामान आए कि आस्तर मलिका के साथ खाएँ — पिएँ।
१तेव्हा राजा आणि हामान राणी एस्तेरकडे मेजवानीला गेले.
2 और बादशाह ने दूसरे दिन मेहमान नवाज़ी पर मयनौशी के वक़्त आस्तर से फिर पूछा, “आस्तर मलिका, तेरा क्या सवाल है? वह मन्ज़ूर होगा। और तेरी क्या दरख़्वास्त है? आधी बादशाहत तक वह पूरी की जाएगी।”
२मेजवानीच्या या दुसऱ्या दिवशी, ते द्राक्षरस घेत असताना, राजाने पुन्हा एस्तेरला विचारले, एस्तेर राणी, “तुझी विनंती काय आहे? ती मान्य केली जाईल. तुझी मागणी काय आहे? ती अर्ध्या राज्याएवढी असली तरी ती मान्य करण्यांत येईल.”
3 आस्तर मलिका ने जवाब दिया, “ऐ बादशाह, अगर मैं तेरी नज़र में मक़्बूल हूँ और बादशाह को मंज़ूर हो, तो मेरे सवाल पर मेरी जान बख़्शी हो और मेरी दरख़्वास्त पर मेरी क़ौम मुझे मिले।
३तेव्हा एस्तेर राणी म्हणाली, “राजा, माझ्यावर आपली कृपादृष्टी झाली असून आपली मर्जी असेल तर मला व माझ्या लोकांसही जिवदान द्यावे. एवढेच माझे मागणे आहे.
4 क्यूँकि मैं और मेरे लोग हलाक और क़त्ल किए जाने, और नेस्त — ओ — नाबूद होने को बेच दिए गए हैं। अगर हम लोग ग़ुलाम और लौंडियाँ बनने के लिए बेच डाले जाते तो मैं चुप रहती, अगरचे उस दुश्मन को बादशाह के नुक़्सान का मु'आवज़ा देने की ताक़त न होती।”
४कारण, आमचा नाश होण्यासाठी, मारले जाण्यासाठी व नाहीसे व्हावे यासाठी मी आणि माझे लोक विकले गेलो आहोत. आमची नुसती गुलाम म्हणून विक्री झाली असती तरी मी गप्प राहिले असते. तरी त्या शत्रूला राजाची हानी भरून देऊ शकले नसते.”
5 तब अख़्सूयरस बादशाह ने आस्तर मलिका से कहा “वह कौन है और कहाँ है जिसने अपने दिल में ऐसा ख़्याल करने की हिम्मत की?”
५तेव्हा राजा अहश्वेरोशाने राणी एस्तेरला विचारले, “असे तुमच्या बाबतीत धाडस करणारा मनुष्य कोण व तो कोठे आहे?”
6 आस्तर ने कहा, वह मुख़ालिफ़ और वह दुश्मन, यही ख़बीस हामान है! “तब हामान बादशाह और मलिका के सामने परेशान हुआ।
६एस्तेर म्हणाली, “तो आपल्या समोरच आहे. हाच तो दृष्ट हामान आमचा शत्रू!” तेव्हा राजा आणि राणीसमोर हामान भयभीत झाला.
7 और बादशाह ग़ुस्सा होकर मयनौशी से उठा, और महल के बाग़ में चला गया; और हामान आस्तर मलिका से अपनी जान बख़्शी की दरख़्वास्त करने को उठ खड़ा हुआ, क्यूँकि उसने देखा कि बादशाह ने मेरे ख़िलाफ़ बदी की ठान ली है।
७राजाला अतिशय संताप आला. द्राक्षरस तसाच टाकून तो उठला आणि बाहेर राजबागेत गेला, पण हामान आपले प्राण वाचवण्याची याचना करत आत राणी एस्तेरजवळ उभा राहिला. राजाने आपले वाईट करण्याचे ठरवले आहे असे त्याने पाहिले.
8 और बादशाह महल के बाग़ से लौटकर मयनौशी की जगह आया, और हामान उस तख़्त के ऊपर जिस पर आस्तर बैठी थी पड़ा था। तब बादशाह ने कहा, क्या यह घर ही में मेरे सामने मलिका पर जब्र करना चाहता है?” इस बात का बादशाह के मुँह से निकलना था कि उन्होंने हामान का मुँह ढाँक दिया।
८मग जेथे द्राक्षरस दिला गेला होता त्या दालनामध्ये, राजा बागेतून येऊन उभा राहिला मेजवानीच्या, ज्या आसनावर एस्तेर बसली होती त्यावर हामानाला पडताना राजाने पाहिले. तेव्हा संतापून राजा म्हणाला, “मी घरात असतानाच राणीवर जबरदस्ती करणार आहेस की काय?” राजा असे म्हणाल्याबरोबर सेवक आत आले आणि त्यांनी हामानाचे तोंड झाकले.
9 फिर उन ख़्वाजासराओं में से जो ख़िदमत करते थे, एक ख़्वाजासरा ख़रबूनाह ने दरख़्वास्त की, “हुज़ूर! इसके अलावा हामान के घर में वह पचास हाथ ऊँची सूली खड़ी है, जिसको हामान ने मर्दकै के लिए तैयार किया जिसने बादशाह के फ़ाइदे की बात बताई।” बादशाह ने फ़रमाया, “उसे उस पर टाँग दो।”
९नंतर हरबोना नावाचा राजाच्या सेवकातील एक अधिकारी, म्हणाला “ज्या मर्दखयाने राजाचे रक्षण करण्यासाठी खबर दिली होती त्याच्यासाठी हामानाच्या घराजवळ पन्नास हात उंचीचा खांब उभारला आहे.” राजा म्हणाला “त्याच खांबावर त्यास फाशी द्या.”
10 तब उन्होंने हामान को उसी सूली पर, जो उसने मर्दकै के लिए तैयार की थी टाँग दिया। तब बादशाह का ग़ुस्सा ठंडा हुआ।
१०तेव्हा मर्दखयासाठी उभारलेल्या खांबावर हामानाला फाशी देण्यात आली. मग राजाचा क्रोध शमला.