< इस्त 27 >
1 फिर मूसा ने बनी — इस्राईल के बुज़ुर्गों के साथ हो कर लोगों से कहा कि “जितने हुक्म आज के दिन मैं तुमको देता हूँ उन सब को मानना।
१मग मोशे आणि इस्राएलमधील वडीलजन, यांनी लोकांस आज्ञापीले कि, “आज मी देणार असलेल्या सर्व आज्ञा पाळा.
2 और जिस दिन तुम यरदन पार हो कर उस मुल्क में जिसे ख़ुदावन्द तेरा ख़ुदा तुझको देता है पहुँचो, तो तू बड़े — बड़े पत्थर खड़े करके उन पर चूने की अस्तरकारी करना;
२तुमचा देव परमेश्वर देणार असलेल्या प्रदेशात तुम्ही लवकरच यार्देन नदी ओलांडून जाणार आहात. त्यादिवशी मोठे धोंडे ऊभारा आणि त्यांच्यावर चुन्याचा लेप लावा.
3 और पार हो जाने के बाद इस शरी'अत की सब बातें उन पर लिखना, ताकि उस वा'दे के मुताबिक़ जो ख़ुदावन्द तेरे बाप — दादा के ख़ुदा ने तुझ से किया, उस मुल्क में जिसे ख़ुदावन्द तेरा ख़ुदा तुझको देता है या'नी उस मुल्क में जहाँ दूध और शहद बहता है तू पहुँच जाये।
३त्या धोंडयावर या आज्ञा आणि शिकवणी लिहून काढा. यार्देन नदी उतरुन जाल त्यादिवशी हे करा. नंतरच परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे, तो देणार असलेल्या त्या दुधामधाच्या भूमीत पाऊल टाका. परमेश्वर, तुमच्या पूर्वजांचा देव ह्याने हा प्रदेश तुम्हास देण्यासाठी वचन दिले आहे.
4 इसलिए तुम यरदन के पार हो कर उन पत्थरों को जिनके बारे में मैं तुमको आज के दिन हुक्म देता हूँ, कोह — ए — 'ऐबाल पर नस्ब करके उन पर चूने की अस्तरकारी करना।
४यार्देन नदी ओलांडून गेल्यावर माझ्या आजच्या आज्ञा पाळा. एबाल पर्वतावर चुन्याचा लेप केलेल्या शिला उभारा.
5 और वहीं तू ख़ुदावन्द अपने ख़ुदा के लिए पत्थरों का एक मज़बह बनाना, और लोहे का कोई औज़ार उन पर न लगाना।
५तसेच तुमचा देव परमेश्वर ह्यासाठी एक दगडी वेदी तयार करा. दगड फोडण्यासाठी लोखंडी हत्यार वापरु नका.
6 और तू ख़ुदावन्द अपने ख़ुदा का मज़बह बे तराशे पत्थरों से बनाना, और उस पर ख़ुदावन्द अपने ख़ुदा के लिए सोख़्तनी क़ुर्बानियाँ पेश करना।
६वेदी अखंड, न घडलेल्या दगडाची असावी. आणि त्यावर आपला देव परमेश्वरा ह्याला होमबली अर्पण करा.
7 और वहीं सलामती की क़ुर्बानियाँ अदा करना और उनको खाना और ख़ुदावन्द अपने ख़ुदा के सामने ख़ुशी मनाना।
७तेथे शांत्यर्पणांचे यज्ञ करून भोजन करा. व आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आनंद करा.
8 और उन पत्थरों पर इस शरी'अत की सब बातें साफ़ — साफ़ लिखना।”
८मग धोंड्यावर नियमशास्त्राची सर्व वचने स्वच्छ अक्षरात लिहून काढा.”
9 फिर मूसा और लावी काहिनों ने सब बनी — इस्राईल से कहा, ऐ इस्राईल, ख़ामोश हो जा और सुन, तू आज के दिन ख़ुदावन्द अपने ख़ुदा की क़ौम बन गया है।
९मग मोशे आणि लेवी याजक इस्राएल लोकांशी बोलले. मोशे म्हणाला, हे इस्राएला, शांत रहा! आणि ऐक! आज तू तुझा देव परमेश्वर ह्याच्या प्रजेतील झालास.
10 इसलिए तू ख़ुदावन्द अपने ख़ुदा की बात सुनना और उसके सब आईन और अहकाम पर जो आज के दिन मैं तुझको देता हूँ 'अमल करना।”
१०तेव्हा परमेश्वर सांगतो त्याप्रमाणे वाग. मी आज देतो त्या त्याच्या सर्व आज्ञा आणि नियम पाळ.
11 और मूसा ने उसी दिन लोगों से ताकीद करके कहा कि;
११त्याच दिवशी मोशेने लोकांस हेही सांगितले,
12 “जब तुम यरदन पार हो जाओ, तो कोह — ए — गरिज़ीम पर शमौन, और लावी, और यहूदाह, और इश्कार, और यूसुफ़, और बिनयमीन खड़े हों और लोगों को बरकत सुनाएँ।
१२ते यार्देन नदी पार करून जातील तेव्हा शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, योसेफ व बन्यामीन या गोत्रांना आशीर्वाद देण्यासाठी गरिज्जीम डोंगरावर उभे रहावे.
13 और रूबिन, और जद्द, और आशर, और ज़बूलून, और दान, और नफ़्ताली कोह — ए — 'ऐबाल पर खड़े होकर ला'नत सुनाएँ।
१३तसेच रऊबेन, गाद, आशेर, जबुलून, दान व नफताली या गोत्रांनी शाप वाचून दाखवण्यासाठी एबाल डोंगरावर उभे रहावे.
14 और लावी बलन्द आवाज़ से सब इस्राईली आदमियों से कहें कि:
१४लेवींनी सर्व इस्राएलास मोठ्याने असे सांगावे,
15 'ला'नत उस आदमी पर जो कारीगरी की सन'अत की तरह खोदी हुई या ढाली हुई मूरत बना कर जो ख़ुदावन्द के नज़दीक मकरूह है, उसको किसी पोशीदा जगह में नस्ब करे। और सब लोग जवाब दें और कहें, 'आमीन।
१५“मूर्ती घडवून तिची गुप्तपणे स्थापना करणारा शापित असो.” या मूर्ती म्हणजे कोणा कारागीराने लाकूड, दगड किंवा धातू यांच्यापासून घडवलेल्या असतात. परमेश्वरास अशा गोष्टींचा वीट आहे! तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
16 'ला'नत उस पर जो अपने बाप या माँ को हक़ीर जाने। और सब लोग कहें, 'आमीन।
१६“नंतर लेवींनी लोकांस सांगावे आपल्या आईवडीलांचा अनादर दाखवणारी कृत्ये करतो तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
17 'ला'नत उस पर जो अपने पड़ोसी की हद के निशान को हटाये। और सब लोग कहें, 'आमीन।
१७परत लेवींनी म्हणावे, “शेजाऱ्याच्या शेताची हद्द दाखवणारी खूण जो सरकवतो तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
18 'ला'नत उस पर जो अन्धे को रास्ते से गुमराह करे। और सब लोग कहें, 'आमीन।
१८लेवींना म्हणावे, “आंधळ्याला फसवून त्याचा रस्ता चुकवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे.
19 'ला'नत उस पर जो परदेसी और यतीम और बेवा के मुक़द्दमे को बिगाड़े।” और सब लोग कहें, 'आमीन।
१९लेवींनी म्हणावे “परकीय, अनाथ, आणि विधवा यांच्याबाबतीत न्यायीपणाने न वागणारे शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
20 'ला'नत उस पर जो अपने बाप की बीवी से मुबाश्रत करे, क्यूँकि वह अपने बाप के दामन को बेपर्दा करता है। और सब लोग कहें, 'आमीन।
२०लेवींनी म्हणावे “वडीलांच्या पत्नीशी (सख्ख्या किंवा सावत्र आईशी) शरीरसंबंध ठेवून वडीलांच्या तोंडाला काळे फासणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
21 'ला'नत उस पर जो किसी चौपाए के साथ जिमा'अ करे। और सब लोग कहें, 'आमीन।
२१लेवींनी म्हणावे “पशूशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
22 'ला'नत उस पर जो अपनी बहन से मुबाश्रत करे, चाहे वह उसके बाप की बेटी हो चाहे माँ की। और सब लोग कहें, 'आमीन।
२२लेवींनी म्हणावे, “सख्ख्या अथवा सावत्र बहिणीशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
23 'ला'नत उस पर जो अपनी सास से मुबाश्रत करे। और सब लोग कहें, 'आमीन।
२३लेवींनी म्हणावे, “सासूशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.”
24 'ला'नत उस पर जो अपने पड़ोसी को पोशीदगी में मारे। और सब लोग कहें, 'आमीन।
२४लेवींनी म्हणावे, “दुसऱ्याचा खून करणारा तो जरी पकडला गेला नाही तरी शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.”
25 'लानत उस पर जो बे — गुनाह को क़त्ल करने के लिए इनाम ले। और सब लोग कहें, 'आमीन।
२५लेवींनी म्हणावे, “निरपराध व्यक्तीला ठार मारण्यासाठी जो पैसे घेतो तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.”
26 'ला'नत उस पर जो इस शरी'अत की बातों पर 'अमल करने के लिए उन पर क़ाईम न रहे।” और सब लोग कहें, 'आमीन।
२६लेवींनी म्हणावे, “जो ही नियमशात्राची वचने मान्य करीत नाही, आचरणात आणत नाही तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.”