< आमाल 10 >

1 क़ैसरिया शहर में कुर्नेलियुस नाम एक शख़्स था। वह सौ फ़ौजियोंका सूबेदार था, जो अतालियानी कहलाती है।
कर्नेल्य नावाचा मनुष्य कैसरीयामध्ये राहत होता, तो इटलीक नावाच्या पलटणीत शताधिपती होता.
2 वो दीनदार था, और अपने सारे घराने समेत ख़ुदा से डरता था, और यहूदियों को बहुत ख़ैरात देता और हर वक़्त ख़ुदा से दुआ करता था
कर्नेल्य हा भक्तीमान असून आपल्या कुटुंबासह देवाचे भय बाळगणारा होता; तो गोरगरिबांना पुष्कळसा दानधर्म करीत असे आणि तो नेहमी देवाची प्रार्थना करीत असे.
3 उस ने तीसरे पहर के क़रीब रोया में साफ़ साफ़ देखा कि ख़ुदा का फ़रिश्ता मेरे पास आकर कहता है, “कुर्नेलियुस!”
एके दिवशी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास, कर्नेल्याला दृष्टांत झाला, त्याने तो स्पष्टपणे पाहिला, त्या दृष्टांतांत देवाचा एक दूत त्याच्याकडे आला आणि त्यास म्हणाला, “कर्नेल्या!”
4 उसने उस को ग़ौर से देखा और डर कर कहा ख़ुदावन्द क्या है? उस ने उस से कहा, तेरी दु'आएँ और तेरी ख़ैरात यादगारी के लिए ख़ुदा के हुज़ूर पहुँची।
कर्नेल्य देवदूताकडे पाहून भयभीत होऊन आणि म्हणाला. “काय आहे, प्रभू?” देवदूत कर्नेल्याला म्हणाला, “देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे, ज्या गोष्टी तू गरीबांना दिल्या आहेत, त्या देवाने पाहिल्या आहेत देवाला तुझी आठवण आहे.”
5 अब याफ़ा में आदमी भेजकर शमौन को जो पतरस कहलाता है, बुलवा ले।
तू यापो गावी माणसे पाठीव आणि शिमोन नावाच्या मनुष्यास घेऊ नये, शिमोनाला पेत्र असे सुद्धा म्हणतात.
6 वो शमौन दब्बाग़ के यहाँ मेहमान है, जिसका घर समुन्दर के किनारे है।
तो शिमोन नावाच्या चांभाराच्या घरी राहत आहे त्याचे घर समुद्रकिनारी आहे.
7 और जब वो फ़रिश्ता चला गया जिस ने उस से बातें की थी, तो उस ने दो नौकरों को और उन में से जो उसके पास हाज़िर रहा करते थे, एक दीनदार सिपाही को बुलाया।
कर्नेल्याशी बोलणे झाल्यावर देवदूत निघून गेला नंतर कर्नेल्याने त्याचे दोन विश्वासू नोकर व एका धर्मशील शिपायाला बोलावून घेतले.
8 और सब बातें उन से बयान कर के उन्हें याफ़ा में भेजा।
कर्नेल्याने या तिघांना घडलेले सर्वकाही सांगितले आणि त्यांना यापोला पाठवले.
9 दूसरे दिन जब वो राह में थे, और शहर के नज़दीक पहुँचे तो पतरस दोपहर के क़रीब छत पर दुआ करने को चढ़ा।
दुसऱ्या दिवशीही माणसे यापो गावाजवळ आली, ती दुपारची वेळ होती, त्याचवेळी प्रार्थना करावयास पेत्र गच्चीवर गेला.
10 और उसे भूख लगी, और कुछ खाना चहता था, लेकिन जब लोग तैयारी कर रहे थे, तो उस पर बेख़ुदी छा गई।
१०पेत्राला भूक लागली होती, त्यास काही खावेसे वाटले, ते पेत्रासाठी जेवणाची तयारी करीत असता पेत्राला तंद्री लागली.
11 और उस ने देखा कि आस्मान खुल गया और एक चीज़ बड़ी चादर की तरह चारों कोनों से लटकती हुई ज़मीन की तरफ़ उतर रही है।
११आणि आपल्यासमोर आकाश उघडले असून मोठ्या चांदव्यासारखे चार कोपरे धरून सोडलेली एक चादर पृथ्वीवर उतरत आहे असा दृष्टांत त्यास झाला.
12 जिसमें ज़मीन के सब क़िस्म के चौपाए, कीड़े मकोड़े और हवा के परिन्दे हैं।
१२त्यामध्ये पृथ्वीवरील सर्वप्रकारचे चालणारे, सरपटणारे, आकाशात उडणारे पक्षी होते.
13 और उसे एक आवाज़ आई कि ऐ पतरस, “उठ ज़बह कर और खा,”
१३नंतर एक वाणी पेत्राने ऐकली, “पेत्रा, ऊठ; यापैकी कोणताही प्राणी मारून खा.”
14 मगर पतरस ने कहा, “ऐ ख़ुदावन्द हरगिज़ नहीं क्यूँकि में ने कभी कोई हराम या नापाक चीज़ नहीं खाई।”
१४पण पेत्र म्हणाला, “मी तसे कधीच करणार नाही, प्रभू जे अशुद्ध व अपवित्र आहे असे कोणतेही अन्न मी कधी खाल्लेले नाही.”
15 फिर दूसरी बार उसे आवाज़ आई, कि “जिनको ख़ुदा ने पाक ठहराया है तू उन्हें हराम न कह”
१५पण ती वाणी त्यास पुन्हा म्हणाली, “देवाने या गोष्टी शुद्ध केल्या आहेत, त्यांना अशुद्ध म्हणू नकोस.”
16 तीन बार ऐसा ही हुआ, और फ़ौरन वो चीज़ आसमान पर उठा ली गई।
१६असे तीन वेळा घडले; मग ते पात्र आकाशात वर घेतले गेले.
17 जब पतरस अपने दिल में हैरान हो रहा था, कि ये रोया जो में ने देखी क्या है, तो देखो वो आदमी जिन्हें कुर्नेलियुस ने भेजा था, शमौन के घर पूछ कर के दरवाज़े पर आ खड़े हुए।
१७पेत्र भयचकित होऊन या दृष्टांताचा अर्थ काय असावा याविषयी विचार करू लागला, ज्या लोकांस कर्नेल्याने पाठवले होते, त्यांना शिमोनाचे घर सापडले ते दाराजवळ उभे होते.
18 और पुकार कर पूछने लगे कि शमौन जो पतरस कहलाता है? “यही मेहमान है।”
१८त्यांनी विचारले, “शिमोन पेत्र येथेच राहतो काय?”
19 जब पतरस उस ख़्वाब को सोच रहा था, तो रूह ने उस से कहा देख तीन आदमी तुझे पूछ रहे हैं।
१९पेत्र या दृष्टांताविषयीच विचार करत असतांना, आत्मा त्यास म्हणाला, “ऐक, तीन माणसे तुला शोधीत आहेत.
20 पस, उठ कर नीचे जा और बे — खटके उनके साथ हो ले; क्यूँकि मैं ने ही उनको भेजा है।
२०ऊठ आणि पायऱ्या उतरून खाली जा, कारण मीच त्यांना पाठवले आहे, काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा.”
21 पतरस ने उतर कर उन आदमियों से कहा, “देखो जिसको तुम पूछते हो वो मैं ही हूँ तुम किस वजह से आये हो।”
२१मग पेत्र खाली त्या मनुष्यांकडे गेला, तो म्हणाला, “तुम्ही ज्याचा शोध करीत आहात तो मीच आहे, तुम्ही येथे का आलात?”
22 उन्होंने कहा, “कुर्नेलियुस सूबेदार जो रास्तबाज़ और ख़ुदा तरस आदमी और यहूदियों की सारी क़ौम में नेक नाम है उस ने पाक फ़रिश्ते से हिदायत पाई कि तुझे अपने घर बुलाकर तुझ से कलाम सुने।”
२२ती माणसे म्हणाली, “एका पवित्र देवदूताने तुम्हास आमंत्रित करण्याविषयी कर्नेल्याला सांगितले होते कर्नेल्य हा शताधिपती आहे, तो नीतिमान मनुष्य आहे तो देवाची उपासना करतो, सर्व यहूदी लोक त्याचा आदर करतात, तुम्हास घरी बोलावून तुमचे शब्द ऐकावेत असे देवदूताने त्यास सांगितले आहे.”
23 पस उस ने उन्हें अन्दर बुला कर उनकी मेहमानी की, और दूसरे दिन वो उठ कर उनके साथ रवाना हुआ, और याफ़ा में से कुछ भाई उसके साथ हो लिए।
२३पेत्राने त्यांना आत बोलावून घेतले व रात्रभर मुक्काम करण्यास सांगितले, दुसऱ्या दिवशी पेत्र तयार झाला व त्या तीन मनुष्याबरोबर गेला, यापो येथील काही बंधूही पेत्राबरोबर गेले.
24 वो दूसरे रोज़ क़ैसरिया में दाख़िल हुए, और कुर्नेलियुस अपने रिश्तेदारों और दिली दोस्तों को जमा कर के उनकी राह देख रहा था।
२४दुसऱ्या दिवशी पेत्र कैसरीया शहरात आला, कर्नेल्य त्याची वाट पाहत होता, त्याने आपले जवळचे मित्र व नातेवाईक यांनाही आपल्या घरी जमा केले होते.
25 जब पतरस अन्दर आने लगा तो ऐसा हुआ कि कुर्नेलियुस ने उसका इस्तक़बाल किया और उसके क़दमों में गिर कर सिज्दा किया।
२५जेव्हा पेत्र आत गेला, तेव्हा कर्नेल्य त्यास भेटला, कर्नेल्याने पेत्राच्या पाया पडून आदराने त्यास नमन केले.
26 लेकिन पतरस ने उसे उठा कर कहा, “खड़ा हो, मैं भी तो इंसान हूँ।”
२६पण पेत्र म्हणाला, “उभा राहा, मी तुझ्यासारखाच मनुष्य आहे.”
27 और उससे बातें करता हुआ अन्दर गया और बहुत से लोगों को इकट्ठा पा कर।
२७पेत्र त्याच्याशी बोलत घरात गेला आणि आतमध्ये बरेच लोक जमलेले त्याने पाहिले.
28 उनसे कहा तुम तो जानते हो कि यहूदी को ग़ैर क़ौम वाले से सोहबत रखना या उसके यहाँ जाना ना जायज़ है मगर ख़ुदा ने मुझ पर ज़ाहिर किया कि मैं किसी आदमी को नजिस या नापाक न कहूँ।
२८पेत्र त्या लोकांस म्हणाला, “तुम्ही हे जाणता की, यहूदी मनुष्याने इतर विदेशी लोकांच्या घरी जाणे किंवा त्यांच्याशी संबंध ठेवणे हे यहूदी नियमाला धरुन नाही, पण देवाने मला दाखविले आहे की, मी इतर मनुष्यमात्राला अशुद्ध किंवा अपवित्र मानू नये.
29 इसी लिए जब मैं बुलाया गया तो बे' उज़्र चला आया, पस अब मैं पूछता हूँ कि मुझे किस बात के लिए बुलाया है?
२९याच कारणासाठी जेव्हा हे लोक मला बोलावण्यास आले, तेव्हा मी त्यांच्याशी वाद घातला नाही, आता, कृपाकरून मला सांगा, तुम्ही मला येथे का बोलावले?”
30 कुर्नेलियुस ने कहा “इस वक़्त पूरे चार रोज़ हुए कि मैं अपने घर तीसरे पहर दुआ कर रहा था। और क्या देखता हूँ। कि एक शख़्स चमकदार पोशाक पहने हुए मेरे सामने खड़ा हुआ।”
३०कर्नेल्य म्हणाला, “चार दिवसांपूर्वी, माझ्या घरांमध्ये मी प्रार्थना करीत होतो, बरोबर याच वेळेला म्हणजे दुपारचे तीन वाजता मी प्रार्थना करीत होतो, अचानक एक मनुष्य माझ्यासमोर उभा राहिला, त्याने लखलखीत, चमकदार कपडे घातले होते.”
31 और कहा कि ऐ'कुर्नेलियुस तेरी दुआ सुन ली गई और तेरी ख़ैरात की ख़ुदा के हुज़ूर याद हुई।
३१तो मनुष्य म्हणाला, “कर्नेल्या देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे, गरीब लोकांस ज्या वस्तू तू दिल्या आहेत ते देवाने पाहिले आहे, देव तुझी आठवण करतो.
32 पस किसी को याफ़ा में भेज कर शमौन को जो पतरस कहलाता है अपने पास बुला, वो समुन्दर के किनारे शमौन दब्बाग़ के घर में मेहमान है।
३२म्हणून यापो या शहरी काही माणसे पाठव व शिमोन पेत्राला बोलावून घे, पेत्र हा शिमोन चांभाराच्या घरी राहत आहे आणि त्याचे घर समुद्राच्या जवळ आहे.
33 पस उसी दम में ने तेरे पास आदमी भेजे और तूने ख़ूब किया जो आ गया, अब हम सब ख़ुदा के हुज़ूर हाज़िर हैं ताकि जो कुछ ख़ुदावन्द ने फ़रमाया है उसे सुनें।
३३तेव्हा मी लागलीच तुम्हास निरोप पाठविला, तुम्ही येथे आलात ही तुमची मोठी कृपा आहे, तेव्हा आम्हास जे काही सांगण्याची आज्ञा प्रभूने तुम्हास दिली आहे, ते ऐकण्यासाठी आम्ही सर्व आता येथे देवासमोर जमलेले आहोत.”
34 पतरस ने ज़बान खोल कर कहा, अब मुझे पूरा यक़ीन हो गया कि ख़ुदा किसी का तरफ़दार नहीं।
३४पेत्राने बोलायला सुरुवात केली मला आता हे खरोखर समजले आहे की, “देवाला प्रत्येक मनुष्य सारखाच आहे.
35 बल्कि हर क़ौम में जो उस से डरता और रास्तबाज़ी करता है, वो उसको पसन्द आता है।
३५प्रत्येक राष्ट्रात जो कोणी त्याची भक्ती करतो आणि योग्य ते करतो, त्यास देव स्वीकारतो, व्यक्ती कोणत्या देशाची आहे, हे महत्त्वाचे नाही.
36 जो कलाम उस ने बनी इस्राईल के पास भेजा, जब कि ईसा मसीह के ज़रिए जो सब का ख़ुदा है, सुलह की ख़ुशख़बरी दी।
३६देव इस्राएली लोकांशी बोलला, देवाने त्यांना सुवार्ता पाठविली की, येशू ख्रिस्ताद्वारे शांती जगात आली आहे, येशू सर्वांचा प्रभू आहे.
37 इस बात को तुम जानते हो जो यूहन्ना के बपतिस्मे की मनादी के बाद गलील से शुरू होकर तमाम यहूदिया सूबा में मशहूर हो गई।
३७सगळ्या यहूदीया प्रांतात काय घडले हे तुम्हा सर्वांना माहीत आहे, त्याची सुरुवात योहानाने लोकांस बाप्तिस्म्याविषयी गालील प्रांतात जो संदेश दिला, त्याने झाली.
38 कि ख़ुदा ने ईसा नासरी को रूह — उल — क़ुद्दूस और क़ुदरत से किस तरह मसह किया, वो भलाई करता और उन सब को जो इब्लीस के हाथ से ज़ुल्म उठाते थे शिफ़ा देता फिरा, क्यूँकि ख़ुदा उसके साथ था।
३८नासरेथच्या येशूविषयी तुम्हास माहिती आहे, देवाने त्यास पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला, येशू सगळीकडे लोकांसाठी चांगल्या गोष्टी करीत गेला, जे लोक दुष्ट आत्म्याने पछाडले होते त्यांना येशूने बरे केले, कारण देव त्याच्याबरोबर होता.
39 और हम उन सब कामों के गवाह हैं, जो उस ने यहूदियों के मुल्क और येरूशलेम में किए, और उन्हों ने उस को सलीब पर लटका कर मार डाला।
३९येशूने संपूर्ण यहूदीया प्रांतात आणि यरूशलेम शहरात जे जे केले त्या सर्व गोष्टी आम्ही पाहिल्या आणि आम्ही त्याचे साक्षीदार आहोत, पण येशूला मारण्यात आले, लाकडाच्या वधस्तंभावर त्यांनी त्यास टांगून मारले.
40 उस को ख़ुदा ने तीसरे दिन जिलाया और ज़ाहिर भी कर दिया।
४०परंतु देवाने तिसऱ्या दिवशी त्यास जिवंत केले देवाने येशूला लोकांस स्पष्ट पाहू दिले.
41 न कि सारी उम्मत पर बल्कि उन गवाहों पर जो आगे से ख़ुदा के चुने हुए थे, या'नी हम पर जिन्हों ने उसके मुर्दों में से जी उठने कि बाद उसके साथ खाया पिया।
४१परंतु सर्वच माणासांनी येशूला पाहिले नाही, देवाने त्यांना अगोदरच साक्षीदार म्हणून निवडले होते, त्यांनीच त्यास पाहिले, ते साक्षीदार आम्ही आहोत येशू मरणातून उठविला गेल्यानंतर आम्ही त्याच्याबरोबर अन्नपाणी सेवन केले.
42 और उस ने हमें हुक्म दिया कि उम्मत में ऐलान करो और गवाही दो कि ये वही है जो ख़ुदा की तरफ़ से ज़िन्दों और मुर्दों का मुन्सिफ़ मुक़र्रर किया गया।
४२येशूने आम्हास ‘लोकांस उपदेश करायला सांगितले, जिवंतांचा आणि मरण पावलेल्यांचा न्याय करण्यासाठी देवाने त्यास आपल्याला आहे’ हे सांगण्यासाठी त्याने आम्हास आज्ञा केली.
43 इस शख़्स की सब नबी गवाही देते हैं, कि जो कोई उस पर ईमान लाएगा, उस के नाम से गुनाहों की मु'आफ़ी हासिल करेगा।
४३जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो, त्यास क्षमा केली जाईल, येशूच्या नावामध्ये देव त्या व्यक्तीच्या पापांची क्षमा करील, सर्व संदेष्टे हे खरे आहे असे म्हणतात.”
44 पतरस ये बातें कह ही रहा था, कि रूह — उल — क़ुद्दूस उन सब पर नाज़िल हुआ, जो कलाम सुन रहे थे।
४४पेत्र हे बोलत असतानाच त्याचे बोलणे ऐकत बसलेल्या सर्व लोकांवर पवित्र आत्मा उतरला.
45 और पतरस के साथ जितने मख़्तून ईमानदार आए थे, वो सब हैरान हुए कि ग़ैर क़ौमों पर भी रूह — उल — क़ुद्दूस की बख़्शिश जारी हुई।
४५यहूदी सुंता झालेले विश्वास ठेवणारे जे पेत्राबरोबर आले होते, ते चकित झाले, यहूदी नसलेल्या लोकांवरसुद्धा पवित्र आत्माच्या दानाचा वर्षाव झाला आहे, यामुळे ते चकित झाले.
46 क्यूँकि उन्हें तरह तरह की ज़बाने बोलते और ख़ुदा की तारीफ़ करते सुना; पतरस ने जवाब दिया।
४६आणि यहूदी नसलेल्या लोकांस निरनिराळ्या भाषा बोलताना आणि देवाची स्तुती करताना यहूदी लोकांनी ऐकले.
47 “क्या कोई पानी से रोक सकता है, कि बपतिस्मा न पाएँ, जिन्हों ने हमारी तरह रूह — उल — क़ुद्दूस पाया?”
४७मग पेत्र म्हणाला, “या लोकांस पाण्याने बाप्तिस्मा देण्यास आपण नकार देऊ शकत नाही, ज्याप्रमाणे आम्हास मिळाला, त्याचप्रमाणे त्यांनाही पवित्र आत्मा मिळाला आहे.”
48 और उस ने हुक्म दिया कि उन्हें ईसा मसीह के नाम से बपतिस्मा दिया जाए इस पर उन्हों ने उस से दरख़्वास्त की कि चन्द रोज़ हमारे पास रह।
४८म्हणून पेत्राने कर्नेल्य, त्याचे नातेवाईक आणि मित्र यांना येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा देण्याची आज्ञा केली, मग पेत्राने आणखी काही दिवस त्यांच्याबरोबर रहावे अशी त्या लोकांनी त्यास विनंती केली.

< आमाल 10 >