< 2 सला 3 >

1 और शाह — ए — यहूदाह यहूसफ़त के अठारहवें बरस से अख़ीअब का बेटा यहूराम सामरिया में इस्राईल पर बादशाहत करने लगा, और उसने बारह साल बादशाहत की।
यहूदाचा राजा यहोशाफाट याच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी, अहाबाचा मुलगा योराम शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला; त्याने बारा वर्षे राज्य केले.
2 और उसने ख़ुदावन्द के ख़िलाफ़ गुनाह किया; लेकिन अपने बाप और अपनी माँ की तरह नहीं, क्यूँकि उसने बा'ल के उस सुतून को जो उसके बाप ने बनाया था दूर कर दिया।
यहोरामाने परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट अशी कृत्ये केली, पण आपल्या आई-वडिलांसारखे त्याने केले नाही; त्याने त्याच्या वडिलांनी बआलमूर्तीच्या पूजेसाठी केलेला स्तंभ काढून टाकला.
3 तोभी वह नबात के बेटे युरब'आम के गुनाहों से, जिनसे उसने इस्राईल से गुनाह कराया था लिपटा रहा, और उनसे अपने आपको अलग न किया।
असे असले तरी नबाटचा मुलगा यराबाम ज्याने इस्राएलास पाप करायला लावले, त्याच्या पापास तो चिकटून राहिला. ती त्याने सोडली नाहीत.
4 मोआब का बादशाह मीसा बहुत भेड़ बकरियाँ रखता था, और इस्राईल के बादशाह को एक लाख बर्रों और एक लाख मेंढों की ऊन देता था।
आता मवाबाचा राजा मेशा कळपांचा धनी होता. तो इस्राएलाच्या राजाला एक लक्ष मेंढया आणि एक लक्ष एडके लोकरींसूद्धा देत असे.
5 लेकिन जब अख़ीअब मर गया, तो मोआब का बादशाह इस्राईल के बादशाह से बाग़ी हो गया।
पण अहाबाच्या मूत्यूनंतर, मवाबाच्या राजाने इस्राएलाच्या राजाविरूद्ध बंड केले.
6 उस वक़्त यहूराम बादशाह ने सामरिया से निकलकर सारे इस्राईल का जाएज़ा लिया।
त्या वेळेस राजा योराम शोमरोन मधून बाहेर पडला आणि त्याने सर्व इस्राएल लोकांस एकत्र केले.
7 और उसने जाकर यहूदाह के बादशाह यहूसफ़त से पुछवा भेजा,' “मोआब का बादशाह मुझ से बाग़ी हो गया है; इसलिए क्या तू मोआब से लड़ने के लिए मेरे साथ चलेगा?” उसने जवाब दिया, “मैं चलूँगा; क्यूँकि जैसा मैं हूँ। वैसा ही तू है, और जैसे मेरे लोग वैसे ही तेरे लोग, और जैसे मेरे घोड़े वैसे ही तेरे घोड़े हैं।”
यहूदाचा राजा यहोशाफाट याच्याकडे त्याने असा निरोप पाठवला की, “मवाबाच्या राजाने माझ्याविरुध्द बंड केले आहे. तू माझ्याबरोबर मवाबाविरूद्ध लढाईला येशील काय?” यहोशाफाटाने सांगितले, “होय, मी जरुर येईन, जसा तू तसा मी, जसे तुझे लोक तसे माझे लोक, जसे तुझे घोडे तसे माझे घोडे.”
8 तब उसने पूछा, “हम किस रास्ते से जाएँ?” उसने जवाब दिया, “अदोम के रास्ते से।”
नंतर तो बोलला “कोणत्या वाटेने हल्ला करायला जायचे?” यावर, “अदोमच्या वाळवंटाच्या दिशेने” असे यहोशाफाट ने सांगितले.
9 चुनाँचे इस्राईल के बादशाह और यहूदाह के बादशाह और अदोम के बादशाह निकले; और उन्होंने सात दिन की मन्ज़िल का चक्कर काटा, और उनके लश्कर और चौपायों के लिए, जो पीछे पीछे आते थे, कहीं पानी न था।
मग इस्राएलचा राजा, यहूदा आणि अदोमाच्या राजाबरोबर चालत सात दिवसाच्या वाटेचा फेरा केल्यावर, तिथे त्यांच्या सैन्याला, घोड्यांना, तसेच त्यांच्याबरोबरची जनावरे याकरिता पाणी सापडले नाही.
10 और इस्राईल के बादशाह ने कहा, “अफ़सोस कि ख़ुदावन्द ने इन तीन बादशाहों को इकट्ठा किया है, ताकि उनको मोआब के बादशाह के हवाले कर दे।”
१०तेव्हा इस्राएलाचा राजा यहोराम म्हणाला, “हे काय आहे? मवाबांच्या हातून पराभव पत्करावा म्हणून परमेश्वराने आम्हा तीन राजांना एकत्र आणले काय?”
11 लेकिन यहूसफ़त ने कहा, “क्या ख़ुदावन्द के नबियों में से कोई यहाँ नहीं है, ताकि उसके वसीले से हम ख़ुदावन्द की मर्ज़ी मा'लूम करें?” और इस्राईल के बादशाह के ख़ादिमों में से एक ने जवाब दिया, “इलीशा' — बिन — साफ़त यहाँ है, जो एलियाह के हाथ पर पानी डालता था।”
११परंतू यहोशाफाट म्हणाला, “ज्याच्याकडून आपण परमेश्वराचा सल्ला घ्यावा असा येथे परमेश्वराचा एखादा संदेष्टा नाही काय?” तेव्हा इस्राएलाच्या राजाच्या एका सेवकाने उत्तर दिले, “शाफाटाचा मुलगा अलीशा इथेच आहे, जो एलीयाच्या हातावर पाणी घालत असे.”
12 यहूसफ़त ने कहा, “ख़ुदावन्द का कलाम उसके साथ है।” तब इस्राईल के बादशाह और यहूसफ़त और अदोम के बादशाह उसके पास गए।
१२यहोशाफाट म्हणाला, “परमेश्वराचे वचन त्याच्या सोबत आहे.” तेव्हा इस्राएलाचा राजा व यहोशाफाट आणि अदोमचा राजा खाली त्याच्याकडे गेले.
13 तब इलीशा' ने इस्राईल के बादशाह से कहा, “मुझ को तुझ से क्या काम? तू अपने बाप के नबियों और अपनी माँ के नबियों के पास जा।” पर इस्राईल के बादशाह ने उससे कहा, “नहीं, नहीं, क्यूँकि ख़ुदावन्द ने इन तीनों बादशाहों को इकट्ठा किया है, ताकि उनको मोआब के हवाले कर दे।”
१३अलीशा इस्राएलाच्या राजाला म्हणाला, “तुझे माझे काय आहे? तू आपल्या वडिलांच्या किंवा आईच्या संदेष्ट्यांकडे जा.” तेव्हा इस्राएलाच्या राजा अलीशाला म्हणाला, “नाही, कारण परमेश्वराने आम्हा तीन राजांना एकत्र आणले, ह्यासाठी की मवाबाकडून आम्ही पराभूत व्हावे.”
14 इलीशा' ने कहा, “रब्ब — उल — अफ़वाज की हयात की क़सम, जिसके आगे मैं खड़ा हूँ, अगर मुझे यहूदाह के बादशाह यहूसफ़त की हुज़ूरी के नज़दीक न होता, तो मैं तेरी तरफ़ नज़र भी न करता और न तुझे देखता।
१४अलीशा म्हणाला, “ज्या परमेश्वराच्या सान्निध्यात मी उभा राहतो, तो सैन्याचा परमेश्वर जिवंत आहे. जर यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याच्या उपस्थितीचा मी आदर केला नसता, तर खरोखर मी तुझी दखल घेतली नसती व तुझ्याकडे पाहिलेही नसते.
15 लेकिन ख़ैर, किसी बजाने वाले को मेरे पास लाओ।” और ऐसा हुआ कि जब उस बजाने वाले ने बजाया, तो ख़ुदावन्द का हाथ उस पर ठहरा।
१५तेव्हा आता एखादा वीणावादक माझ्याकडे आणा.” आणि असे झाले की वीणावादक वाजवत असता, परमेश्वराचा हात अलीशावर आला.
16 तब उसने कहा, “ख़ुदावन्द यूँ फ़रमाता है, इस जंगल में ख़न्दक़ ही ख़न्दक़ खोद डालो।
१६मग अलीशा म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो: या कोरड्या नदीच्या खोऱ्यात जागोजागी खणून ठेवा.
17 क्यूँकि ख़ुदावन्द यूँ फ़रमाता है, 'तुम न हवा आती देखोगे और न पानी आते देखोगे, तोभी ये वादी पानी से भर जाएगी, और तुम भी पियोगे और तुम्हारे मवेशी और तुम्हारे जानवर भी।
१७कारण परमेश्वर असे म्हणतो, तुम्हास वारा, पाऊस काही दिसणार नाही पण तरीही हे खोरे पाण्याने भरुन जाईल, आणि तुम्ही प्याल, तुम्ही व तुमच्या जनावरांनाही पाणी मिळेल.
18 और ये ख़ुदावन्द के लिए एक हल्की सी बात है; वह मोआबियों को भी तुम्हारे हाथ में कर देगा।
१८कारण हे तर परमेश्वराच्या दृष्टीने सोपे आहे. तो तुम्हास मवाबांवरही विजय मिळवून देईल.
19 और तुम हर फ़सीलदार शहर और उम्दा शहर क़ब्ज़ा लोगे, और हर अच्छे दरख़्त को काट डालोगे, और पानी के सब चश्मों को भर दोगे, और हर अच्छे खेत को पत्थरों से ख़राब कर दोगे।”
१९प्रत्येक तटबंदीच्या व चांगल्या बंदोबस्त असलेल्या अशा निवडक नगरांवर तुम्ही हल्ला कराल. प्रत्येक चांगला वृक्ष तुम्ही तोडून टाकाल, पाण्याचे झरे, विहिरी बुजवून टाकाल. दगडफेक करून चांगल्या शेतांची नासाडी कराल.”
20 इसलिए सुबह को क़ुर्बानी पेश करने के वक़्त ऐसा हुआ, कि अदोम की राह से पानी बहता आया और वह मुल्क पानी से भर गया।
२०मग सकाळी, अर्पणाच्या वेळी, अदोमाच्या बाजूने पाण्याचा लोंढा आला आणि देश पाण्याने भरला.
21 जब सब मोआबियों ने ये सुना कि बादशाहों ने उनसे लड़ने के लिए चढ़ाई की है, तो वह सब जो हथियार बाँधने के क़ाबिल थे, और उम्र दराज़ भी, इकट्ठे होकर सरहद पर खड़े हो गए;
२१राजे आपल्यावर हल्ला करायला आले आहेत हे मवाबाच्या लोकांनी ऐकले तेव्हा, त्यांनी आपल्याकडच्या युध्दात उतरता येण्याजोग्या सर्व पुरुषांना एकत्र केले. युध्दासाठी सज्ज होऊन ते सीमेवर जाऊन थांबले.
22 और वह सुबह सवेरे उठे और सूरज पानी पर चमक रहा था, और मोआबियों को वह पानी जो उनके सामने था, ख़ून की तरह सुर्ख़ दिखाई दिया।
२२ते लोक त्या दिवशी भल्या पहाटे उठले तेव्हा उगवत्या सूर्याची लाली पाण्यात प्रतिबिंबित होती. मवाबी लोकांस त्यांच्या विरूद्ध दिशेला असलेले पाणी दिसले असता, ते त्यांना रक्तासारखे लाल दिसले.
23 तब वह कहने लगे, “ये तो खू़न है; वह बादशाह यक़ीनन हलाक हो गए हैं, और उन्होंने आपस में एक दूसरे को मार दिया है। इसलिए अब ऐ मोआब, लूट को चल।”
२३ते म्हणाले, “हे रक्त आहे! या राजांची नक्कीच आपापसात लढाई झालेली दिसते, त्यांनी परस्परांना मारले! तर आता मवाब्यांनो त्यांना लुटायला चला.”
24 जब वह इस्राईल की लश्करगाह में आए, तो इस्राईलियों ने उठकर मोआबियों को ऐसा मारा कि वह उनके आगे से भागे; पर वह आगे बढ़ कर मोआबियों को मारते मारते उनके मुल्क' में घुस गए।
२४मवाबी लोक इस्राएलांच्या छावणीपाशी आले असता, इस्राएल लोकांनी बाहेर येऊन मवाबी सैन्यावर हल्ला केला. तेव्हा मवाबी लोक पळत सुटले व इस्राएल लोक त्यांच्या प्रदेशातही त्यांना मारत गेले.
25 और उन्होंने शहरों को गिरा दिया, और ज़मीन के हर अच्छे ख़ित्ते' पर सभी ने एक एक पत्थर डालकर उसे भर दिया, और उन्होंने पानी के सब चश्में बन्द कर दिए, और सब अच्छे दरख़्त काट डाले, सिर्फ़ हरासत के पहाड़ ही के पत्थरों को बाक़ी छोड़ा, पर गोफ़न चलाने वालों ने उसको भी जा घेराऔर उसे मारा।
२५इस्राएल लोकांनी त्यांची नगरे उध्वस्त केली, त्यांच्या प्रत्येक शेतांत दगडांचा मारा करून ते बुजवले. त्यांनी पाण्याच्या सर्व विहिरी बुजवल्या व सर्व चांगली झाडे तोडून टाकली केली. फक्त कीर-हरेसमधे त्यांनी त्यांचे दगड राहू दिले. पण गोफण चालवणाऱ्या सैन्यांनी त्या नगरावर हल्ला केला.
26 जब मोआब के बादशाह ने देखा कि जंग उसके लिए निहायत सख़्त हो गई, तो उसने सात सौ तलवार वाले मर्द अपने साथ लिए, ताकि सफ़ चीर कर अदोम के बादशाह तक जा पहुँचे; पर वह ऐसा न कर सके।
२६या लढाईला तोंड देणे आपल्याला जड जात आहे हे मवाबाचा राजा मेशाने जाणले. तेव्हा त्याने तलवारधारी सातशे निवडक माणसे बरोबर घेतली आणि वेढा फोडून अदोमाच्या राजाला तो मारायला निघाला पण त्यास ते जमले नाही.
27 तब उसने अपने पहलौठे बेटे को लिया, जो उसकी जगह बादशाह होता, और उसे दीवार पर सोख़्तनी क़ुर्बानी के तौर पर पेश किया। यूँ इस्राईल पर बड़ा ग़ज़ब हुआ; तब वह उसके पास से हट गए और अपने मुल्क को लौट आए।
२७मग मवाबाच्या राजाने आपल्या थोरल्या मुलाला बरोबर घेतले, जो त्यानंतर त्याच्या गादीवर बसणार होता. नगराच्या तटबंदीच्या भिंतीवर या राजाने आपल्या मोठ्या मुलाचा यज्ञात बली दिला. तेव्हा इस्राएलवर मोठा कोप झाला. मग ते मवाबाचा राजा मेशा याला सोडून आपल्या देशात परत आले.

< 2 सला 3 >