< 2 सला 14 >
1 और शाह — ए — इस्राईल यहूआख़ज़ के बेटे यूआस के दूसरे साल से शाह — ए — यहूदाह यूआस का बेटा अमसियाह सल्तनत करने लगा।
१इस्राएलचा राजा, यहोआहाज याचा मुलगा योवाश याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी, योवाशाचा मुलगा अमस्या यहूदावर राज्य करू लागला.
2 वह पच्चीस बरस का था जब सल्तनत करने लगा, और उसने येरूशलेम में उन्तीस बरस सल्तनत की। उसकी माँ का नाम यहू'अद्दान था जो येरूशलेम की थी
२अमस्या राज्य करु लागला तेव्हा, पंचवीस वर्षांचा होता; अमस्याने यरूशलेमामध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यहोअदान होते; ती यरूशलेमची होती.
3 उसने वह काम किया जो ख़ुदावन्द की नज़र में नेक था, तोभी अपने बाप दाऊद की तरह नहीं; बल्कि उसने सब कुछ अपने बाप यूआस की तरह किया।
३परमेश्वराच्या दृष्टीने जे उचित तेच अमस्याने केले, तरीही त्याचा बाप दावीद याच्या सारखे नाही. आपले वडिल योवाश यानी जे केले, तेच सर्व त्याने केले.
4 क्यूँकि ऊँचे मक़ाम ढाए न गए, लोग अभी ऊँचे मक़ामों पर क़ुर्बानी करते और ख़ुशबू जलाते थे।
४तरी उंचवट्यावरील पूजास्थळे नष्ट केली नव्हती. लोक त्याठिकाणी अजूनही यज्ञ करीत व धूप जाळीत होते.
5 जब सल्तनत उसके हाथ में मज़बूत हो गई, तो उसने अपने उन मुलाज़िमों को जिन्होंने उसके बाप बादशाह को क़त्ल किया था जान से मारा।
५आणि असे झाले की, त्याचा बाप जो राजा होता त्या राज्यावर त्याची चांगली पकड असातानाच, आपल्या वडिलांचे मारेकरी असलेल्या अधिकाऱ्यांचा त्याने वध केला.
6 लेकिन उसने उन क़ातिलों के बच्चों को जान से न मारा; क्यूँकि मूसा की शरी'अत की किताब में, जैसा ख़ुदावन्द ने फ़रमाया, लिखा है: “बेटों के बदले बाप न मारे जाएँ, और न बाप के बदले बेटे मारे जाएँ, बल्कि हर शख़्स अपने ही गुनाह की वजह से मरे।”
६परंतु त्या मारेकऱ्यांच्या मुलांना त्याने मारले नाही, त्याऐवजी त्याने मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे केले, परमेश्वराने जी आज्ञा केली की: “मुलांच्या गुन्ह्या करता आई-वडीलांना मृत्युदंड देता कामा नये. तसेच, आईवडीलांनी जे केले त्याबद्दल मुलांना मारले जाऊ नये. त्याऐवजी अपराधाचे शासन अपराध करणाऱ्यालाच व्हावे.”
7 उसने वादी — ए — शोर में दस हज़ार अदूमी मारे और सिला' को जंग करके ले लिया, और उसका नाम युक़तील रख्खा जो आज तक है।
७त्याने मिठाच्या खोऱ्यात दहाहजार अदोम्यांना मारले, या व्यतिरिक्त या लढाईत सेला नगर त्याने घेतले आणि त्याचे नाव “यकथेल” ठेवले. अजूनही ते त्याच नावाने ओळखले जाते.
8 तब अमसियाह ने शाह — ए — इस्राईल यहूआस — बिन — यहूआख़ज़ — बिन — याहू के पास क़ासिद रवाना किए और कहला भेजा “ज़रा आ तो, हम एक दूसरे का मुक़ाबला करें।”
८त्यानंतर येहूचा मुलगा यहोआहाज याचा मुलगा, इस्राएलाचा राजा योवाश याच्याकडे अमस्याने संदेश पाठवला. त्यामध्ये असे म्हटले होते, “ऊठ, समोरासमोर एकमेकांना भिडून आपण लढू.”
9 और शाह — ए — इस्राईल यहूआस ने शाह — ए — यहूदाह अमसियाह को कहला भेजा, लुबनान के ऊँट — कटारे ने लुबनान के देवदार को पैग़ाम भेजा, “अपनी बेटी की मेरे बेटे से शादी कर दे; इतने में एक जंगली जानवर जो लुबनान में था गुज़रा, और ऊँट — कटारे को रौंद डाला।
९तेव्हा इस्राएलाचा राजा योवाशाने यहूदाचा राजा अमस्या याला निरोप पाठवून म्हटले की, “लबानोनातल्या काटेरी झुडुपाने लबानोनातल्या गंधसरुच्या वृक्षाला निरोप पाठवला की, तुझी मुलगी माझ्या मुलाला पत्नी करून दे.” पण लबानोनातल्या एका वन्यपशूने वाटेने जाताना त्या काटेरी झुडुपाला तुडवून टाकले.
10 तू ने बेशक अदोम को मारा, और तेरे दिल में गु़रूर बस गया है; इसलिए उसी की डींग मार और घर ही में रह, तू क्यूँ नुक़्सान उठाने को छेड़ — छाड़ करता है; जिससे तू भी दुख़ उठाए और तेरे साथ यहूदाह भी?”।
१०“तू अदोमचा पराभव केलास हे खरे, म्हणून तुझ्या मनाने तुला उंचावले आहे. तू त्याविषयी गौरव करीत घरी राहा, तू पडशील आणि तुझ्याबरोबर यहूदाचाही पाडाव होईल असा तू अरिष्टांशी झगडा का करावा?”
11 लेकिन अमसियाह ने न माना। तब शाह — ए — इस्राईल यहूआस ने चढ़ाई की, और वह और शाह — ए — यहूदाह अमसियाह बैतशम्स में जो यहूदाह में है, एक दूसरे के सामने हुए।
११परंतू अमस्याने काही ऐकले नाही. म्हणून इस्राएलचा राजा योवाश याने हल्ला केला, तो व यहूदाचा राजा अमस्या हे यहूदाच्या बेथ-शेमेश येथे एकमेकांसमोर भेटले.
12 और यहूदाह ने इस्राईल के आगे शिकस्त खाई, और उनमें से हर एक अपने ख़ेमे को भागा।
१२इस्राएलने यहूदाचा पराभव केला. आणि प्रत्येक मनुष्य आपापल्या घरी पळाले.
13 लेकिन शाह — ए — इस्राईल यहूआस ने शाह — ए — यहूदाह अमसियाह — बिन — यहूआस — बिन — अख़ज़ियाह को बैत — शम्स में पकड़ लिया और येरूशलेम में आया, और येरूशलेम की दीवार इफ़्राईम के फाटक से कोने वाले फाटक तक, चार सौ हाथ के बराबर ढा दी।
१३इस्राएलचा राजा योवाश याने अहज्याचा मुलगा यहोआश याचा मुलगा अमस्या, यहूदाचा राजा, याला बेथ-शेमेश येथे पकडून त्यास यरूशलेमेस नेले. यरूशलेमेत आल्यावर त्याने यरूशलेमेच्या तटबंदीला एफ्राईमाच्या दरवाज्यापासून कोपऱ्यातील दरवाजापर्यंत जवळ-जवळ चारशे फुटांची भींत पाडून टाकली.
14 और उसने सब सोने और चाँदी की, और सब बर्तनों को जो ख़ुदावन्द की हैकल और शाही महल के ख़ज़ानों में मिले, और कफ़ीलों को भी साथ लिया और सामरिया को लौटा।
१४त्याने परमेश्वराच्या मंदिरातील आणि राजवाड्याच्या खजिन्यातील सोने, चांदी आणि सर्व पात्रे योवाशाने लुटली. आणि ओलीस ठेवण्याकरीता माणसे घेऊन मग तो शोमरोनास परतला.
15 यहूआस के बाक़ी काम जो उसने किए और उसकी क़ुव्वत, और जैसे शाह — ए — यहूदाह अमसियाह से लड़ा, इसलिए क्या वह इस्राईल के बादशाहों की तवारीख़ की किताब में लिखा नहीं?
१५यहूदाचा राजा अमस्या याच्याशी झालेल्या या लढाईतील पराक्रमाबरोबरच योवाशाने केलेल्या इतर महान कृत्यांचीही नोंद “इस्राएलच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात केलेली आहे.
16 और यहूआस अपने बाप दादा के साथ सो गया और इस्राईल के बादशाहों के साथ सामरिया में दफ़न हुआ, और उसका बेटा युरब'आम उसकी जगह बादशाह हुआ।
१६नंतर योहोआश आपल्या पूर्वजांबरोबर झोपी गेला आणि शोमरोनात इस्राएलांच्या राजांबरोबर त्यास पुरण्यात आले. योवाशानंतर त्याचा मुलगा यराबाम त्याच्याजागी गादीवर आला.
17 और शाह — ए — यहूदाह यूआस का बेटा अमसियाह शाह — ए — इस्राईल यहूआख़ज़ के बेटे यहूआस के मरने के बाद पन्द्रह बरस जीता रहा।
१७यहोआहाज याचा मुलगा योवाश, इस्राएलचा राजा याच्या मृत्यूनंतर, योवाशाचा मुलगा अमस्या, यहूदाचा राजा पंधरा वर्षे जगला.
18 अमसियाह के बाक़ी काम, इसलिए क्या वह यहूदाह के बादशाहों की तवारीख़ की किताब में लिखा नहीं?
१८अमस्याने केलेल्या सर्व थोर कृत्यांची नोंद “यहूदाच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात केलेली आहे.
19 और उन्होंने येरूशलेम में उसके ख़िलाफ़ साज़िश की, इसलिए वह लकीस को भागा; लेकिन उन्होंने लकीस तक उसका पीछा करके वहीं उसे क़त्ल किया।
१९त्यांनी यरूशलेमामध्ये अमस्याविरुध्द कट केला, तेव्हा तो लाखीश येथे पळाला. पण त्यांनी त्यांच्यामागे लाखीशास माणसे पाठवून तेथे त्यास जिवे मारले.
20 और वह उसे घोड़ों पर ले आए, और वह येरूशलेम में अपने बाप — दादा के साथ दाऊद के शहर में दफ़न हुआ।
२०त्यांनी त्यास घोड्यावर लादून आणले, आणि यरूशलेमेत दाविदाच्या नगरात त्यास त्याच्या पूर्वजांच्या सोबत पुरले.
21 और यहूदाह के सब लोगों ने अज़रियाह' को जो सोलह बरस का था, उसके बाप अमसियाह की जगह बादशाह बनाया।
२१यहूदाच्या सर्व लोकांनी त्याचा बाप अमस्या ह्याच्या जागी अजऱ्याला राजा केले. अजऱ्या तेव्हा सोळा वर्षांचा होता.
22 और बादशाह के अपने बाप — दादा के साथ सो जाने के बाद उसने ऐलात को बनाया, और उसे फिर यहूदाह की मुल्क में दाख़िल कर लिया।
२२राजा अमस्याच्या त्याच्या पूर्वजांबरोबर निजल्यानंतर. अजऱ्याने एलाथची पुन्हा उभारणी केली आणि एलाथ यहूदाच्या स्वाधीन केले.
23 शाह — ए — यहूदाह यूआस के बेटे अमसियाह के पन्द्रहवें बरस से शाह — ए — इस्राईल यूआस का बेटा युरब'आम सामरिया में बादशाही करने लगा; उसने इकतालिस बरस बादशाही की।
२३यहूदाचा राजा, योवाशाचा मुलगा अमस्या याच्या पंधराव्या वर्षापासून इस्राएलाचा राजा योवाश याचा मुलगा यराबाम शोमरोनांत राज्य करू लागला. त्याने एक्केचाळीस वर्षे राज्य केले.
24 उसने ख़ुदावन्द की नज़र में गुनाह किया; वह नबात के बेटे युरब'आम के उन सब गुनाहों से, जिनसे उसने इस्राईल से गुनाह कराया, बाज़ न आया।
२४त्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले. नबाटचा मुलगा यराबाम याची पापे, जी त्याने इस्राएलाला करायला लावली त्यातील कोणत्याही पापापासून तो फिरला नाही.
25 और उसने ख़ुदावन्द इस्राईल के ख़ुदा के उस बात के मुताबिक़, जो उसने अपने बन्दे और नबी यूनाह — बिन — अमित्ते के ज़रिए' जो जात हिफ़्र का था फ़रमाया था, इस्राईल की हद को हमात के मदख़ल से मैदान के दरिया तक फिर पहुँचा दिया।
२५त्याने इस्रएलाच्या लेबो-हमाथपासून अराबाच्या समुद्रापर्यंत भूमी परत घेतली. गथ-हेफेर मधला संदेष्टा अमित्तयाचा मुलगा योना याला इस्राएलच्या परमेश्वराने सांगितले त्याप्रमाणेच हे घडले.
26 इसलिए कि ख़ुदावन्द ने इस्राईल के दुख़ को देखा कि वह बहुत सख़्त है', क्यूँकि न तो कोई बन्द किया हुआ, न आज़ाद छूटा हुआ रहा और न कोई इस्राईल का मददगार था।
२६इस्राएलचे दु: ख फार कडू आहे. दास काय व स्वतंत्र काय, सर्वच अडचणीत आलेले आहेत, आणि इस्राएलाला साहाय्य करणारा कोणीच नाही असे परमेश्वराने पाहिले.
27 और ख़ुदावन्द ने यह तो नहीं फ़रमाया था कि मैं इस ज़मीन पर से इस्राईल का नाम मिटा दूँगा; इसलिए उसने उनको यूआस के बेटे युरब'आम के वसीले से रिहाई दी।
२७आणि इस्राएलचे नाव आकाशाखालून पुसून टाकू असे परमेश्वर म्हणाला नाही. त्याऐवजी परमेश्वराने योवाशाचा मुलगा यराबाम याच्यामार्फत इस्राएलाला तारले.
28 युरब'आम के बाक़ी काम और सब कुछ जो उसने किया और उसकी क़ुव्वत, या'नी क्यूँकर उसने लड़ कर दमिश्क़ और हमात को जो यहूदाह के थे, इस्राईल के लिए वापस ले लिया, इसलिए क्या वह इस्राईल के बादशाहों की तवारीख़ की किताब में लिखा नहीं?
२८“इस्राएलच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात यराबामाच्या पराक्रमांची नोंद आहे. त्याचा पराक्रम, तो कसा लढला आणि दिमिष्क आणि हमाथ त्याने इस्राएलच्या भूमीला कशी घेतले. ही नगरे यहूदाच्या ताब्यात होती.
29 और युरब'आम अपने बाप — दादा, या'नी इस्राईल के बादशाहों के साथ सो गया; और उसका बेटा ज़करियाह उसकी जगह बादशाह हुआ।
२९यराबाम आपल्या पूर्वज इस्राएलचे राजे यांच्याबरोबर निजला, आणि यराबामाचा मुलगा जखऱ्या राजा म्हणून गादीवर आला.