< 1 समु 23 >
1 और उन्होंने दाऊद को ख़बर दी कि “देख, फ़िलिस्ती क़'ईला से लड़ रहे हैं और खलिहानों को लूट रहे हैं।”
१तेव्हा कोणी दावीदाला सांगितले की, पाहा पलिष्टी कईल्याशी लढतात व खळी लुटत आहेत.
2 तब दाऊद ने ख़ुदावन्द से पूछा कि “क्या मैं जाऊँ और उन फ़िलिस्तियों को मारूं?” ख़ुदावन्द ने दाऊद को फ़रमाया, “जा फ़िलिस्तियों को मार और क़'ईला को बचा।”
२म्हणून दावीदाने परमेश्वरास विचारले, तो म्हणाला, “मी जाऊन त्या पलिष्ट्यांना मारून कईल्याचे रक्षण करू काय?” मग परमेश्वर दावीदाला म्हणाला, जा पलिष्टयांना मारून कईल्याचे रक्षण कर.
3 और दाऊद के लोगों ने उससे कहा कि “देख, हम तो यहीं यहूदाह में डरते हैं, तब हम क़'ईला को जाकर फ़िलिस्ती लशकरों का सामना करें तो कितना ज़्यादा न डर लगेगा?”
३तेव्हा दावीदाच्या मनुष्यांनी म्हटले, “पाहा आम्हास येथे यहूदात भय आहे; मग आम्ही कईल्यांकडे पलिष्टांच्या सैन्यावर चालून गेलो तर ते कितीतरी अधिक धोकादायक होईल!”
4 तब दाऊद ने ख़ुदावन्द से फिर सवाल किया, ख़ुदावन्द ने जवाब दिया कि “उठ क़'ईला को जा क्यूँकि मैं फ़िलिस्तियों को तेरे क़ब्ज़े में कर दूँगा।”
४मग दावीदाने आणखी परमेश्वरास विचारले, आणि परमेश्वराने उत्तर देऊन म्हटले, “उठून खाली कईल्याकडे जा, कारण मी पलिष्ट्यांस तुझ्या हाती देईन.”
5 इसलिए दाऊद और उसके लोग क़'ईला को गए और फ़िलिस्तियों से लड़े और उनकी मवाशी ले आए और उनको बड़ी खूँरेज़ी के साथ क़त्ल किया, यूँ दाऊद ने क़'ईलियों को बचाया।
५मग दावीद व त्याची माणसे कईला येथे जाऊन पलिष्ट्यांशी लढली आणि त्यांनी त्यांची गुरेढोरे नेली व त्यांचा मोठा वध केला; असे दावीदाने कईलकरास तारले.
6 जब अख़ीमलिक का बेटा अबीयातर दाऊद के पास क़'ईला को भागा तो उसके हाथ में एक अफ़ूद था जिसे वह साथ ले गया था।
६त्यानंतर असे झाले की, अहीमलेखाचा मुलगा अब्याथार दावीदाकडे कईला येथे पळून गेला तेव्हा त्याने आपल्या हाती एफोद आणले.
7 और साऊल को ख़बर हुई कि दाऊद क़'ईला में आया है इसलिए साऊल कहने लगा कि “ख़ुदा ने उसे मेरे क़ब्ज़े में कर दिया क्यूँकि वह जो ऐसे शहर में घुसा है, जिस में फाटक और अड़बंगे हैं तो क़ैद हो गया है।”
७दावीद कईल्याला गेला असे कोणी सांगितले; “तेव्हा शौल म्हणाला, परमेश्वराने तुला माझ्या हाती दिले आहे. कारण वेशीच्या व अडसराच्या नगरात शिरून तो कोंडला गेला आहेस.”
8 और साऊल ने जंग के लिए अपने सारे लश्कर को बुला लिया ताकि क़'ईला में जाकर दाऊद और उसके लोगों को घेर ले।
८मग कईल्याकडे उतरावे आणि दावीदाला व त्याच्या मनुष्यांना वेढा घालावा म्हणून शौलाने सर्व लोकांस लढाईला बोलावले.
9 और दाऊद को मा'लूम हो गया कि साऊल उसके ख़िलाफ़ बुराई की तदबीरें कर रहा है, इसलिए उसने अबीयातर काहिन से कहा कि “अफ़ूद यहाँ ले आ।”
९आपल्याबद्दल शौल वाईट योजीत आहे, हे दावीदाला कळले म्हणून तो अब्याथार याजकाला म्हणाला, “एफोद इकडे आण.”
10 और दाऊद ने कहा, ऐ ख़ुदावन्द इस्राईल के ख़ुदा तेरे बन्दे ने यह क़त'ई सुना है कि साऊल क़'ईला को आना चाहता है ताकि मेरी वजह से शहर को बरबाद करदे।
१०मग दावीद म्हणाला, “हे परमेश्वरा इस्राएलाच्या देवा शौल माझ्यामुळे नगराचा नाश करायला कईल्यावर येऊ पाहत आहे असे तुझ्या सेवकाने खचित ऐकले आहे;
11 तब क्या क़'ईला के लोग मुझको उसके हवाले कर देंगे? क्या साऊल जैसा तेरे बन्दे ने सुना है आएगा? ऐ ख़ुदावन्द इस्राईल के ख़ुदा मैं तेरी मिन्नत करता हूँ कि तू अपने बन्दे को बता दे “ख़ुदावन्द ने कहा, वह आएगा।”
११तर कईलकर मला शौलाच्या हाती देतील काय? तुझ्या सेवकाने ऐकल्याप्रमाणे शौल खाली येईल काय? हे परमेश्वरा इस्राएलाच्या देवा मी तुला विंनती करतो, हे तू आपल्या सेवकाला सांग.” परमेश्वर बोलला, “तो खाली येईल.”
12 तब दाऊद ने कहा कि “क्या क़'ईला के लोग मुझे और मेरे लोगों को साऊल के हवाले कर देंगे?” ख़ुदावन्द ने कहा, “वह तुझे हवाले कर देंगे।”
१२मग दावीद म्हणाला कईलकर मला व माझ्या मनुष्यांना शौलाच्या हाती देतील काय? परमेश्वर बोलला, ते तुला त्याच्या हाती देतील.
13 तब दाऊद और उसके लोग जो क़रीबन छ: सौ थे उठकर क़'ईला से निकल गए और जहाँ कहीं जा सके चल दिए और साऊल को ख़बर मिली कि दाऊद क़'ईला से निकल गया तब वह जाने से बाज़ रहा।
१३मग दावीद व त्याची माणसे उठून कईल्यांतून निघून गेली; ती सुमारे सहाशे माणसे होती. त्यांना जेथे जायला मिळाले तेथे ती गेली; तेव्हा दावीद कईल्यातून पळाला असे शौलाला कोणी सांगितले आणि त्याने तिकडे जायचे सोडले.
14 और दाऊद ने वीराने के क़िलों' में सुकूनत की और दश्त ऐ ज़ीफ़ के पहाड़ी मुल्क में रहा, और साऊल हर रोज़ उसकी तलाश में रहा, लेकिन ख़ुदावन्द ने उसको उसके क़ब्ज़े में हवाले न किया।
१४आणि दावीद रानातील गडामध्ये राहू लागला. तो जीफ रानात डोंगराळ प्रदेशात राहू लागला. शौल नित्य त्याचा शोध करीत गेला, परंतु परमेश्वराने त्यास त्याच्या हाती दिले नाही.
15 और दाऊद ने देखा कि साऊल उसकी जान लेने को निकला है, उस वक़्त दाऊद दश्त — ए — ज़ीफ़ के बन में था।
१५आपला जीव घ्यायला शौल निघाला आहे असे दावीदाने पाहिले आणि दावीद जीफ रानातील एका झाडीत होता;
16 और साऊल का बेटा यूनतन उठकर दाऊद के पास बन में गया और ख़ुदा में उसका हाथ मज़बूत किया।
१६शौलाचा मुलगा योनाथान उठून झाडीत दावीदाकडे गेला आणि त्याने त्याचा हात परमेश्वराच्याठायी सबळ केला.
17 उसने उससे कहा, “तू मत डर क्यूँकि तू मेरे बाप साऊल के हाथ में नहीं पड़ेगा और तू इस्राईल का बादशाह होगा और में तुझ से दूसरे दर्जे पर हूँगा, यह मेरे बाप साऊल को भी मा'लूम है।”
१७तो त्यास म्हणाला, “भिऊ नको कारण माझा बाप शौल याच्या हाती तू लागणार नाहीस. तू तर इस्राएलावर राजा होशील आणि तुझ्याजवळ मीच पहिला तुझा सहाय्यक होईन हे माझा बाप शौलही जाणतो.”
18 और उन दोनों ने ख़ुदावन्द के आगे 'अहद ओ पैमान किया और दाऊद बन में ठहरा रहा, और यूनतन अपने घर को गया।
१८तेव्हा त्या दोघांनी परमेश्वराच्यासमोर करार केला. मग दावीद झाडीत राहिला व योनाथान आपल्या घरी गेला.
19 तब ज़ीफ़ के लोग जिबा' में साऊल के पास जाकर कहने लगे, “क्या दाऊद हमारे बीच कोहे हकीला के बन के क़िलों' में जंगल के जुनूब की तरफ़ छिपा नही है?
१९जीफी लोक शौलाकडे गिबा येथे येऊन म्हणाले, “यशीमोनाच्या दक्षिणेकडे हकीला डोंगरातील झाडीत गडामध्ये दावीद आम्हाजवळ लपून राहिला आहे की नाही?
20 इसलिए अब ऐ बादशाह तेरे दिल को जो बड़ी आरजू आने की है उसके मुताबिक़ आ और उसको बादशाह के हाथ में हवाले करना हमारा ज़िम्मा रहा।”
२०तर आता हे राजा, खाली येण्याच्या आपल्या सर्व मनोरथप्रमाणे खाली ये, म्हणजे त्यास राजाच्या हाती देणे हे आमचे काम असेल.”
21 तब साऊल ने कहा, “ख़ुदावन्द की तरफ़ से तुम मुबारक हो क्यूँकि तुमने मुझ पर रहम किया।
२१तेव्हा शौल म्हणाला, “तुम्हास परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल कारण तुम्ही माझ्यावर दया केली आहे.
22 इसलिए अब ज़रा जाकर सब कुछ और पक्का कर लो और उसकी जगह को देख, कर जान लो कि उसका ठिकाना कहाँ है, और किसने उसे वहाँ देखा है, क्यूँकि मुझ से कहा, गया है कि वह बड़ी चालाकी से काम करता है।
२२मी तुम्हास विनंती करतो तुम्ही जा आणखी मन लावून त्याचा माग काढा आणि तेथे त्यास कोणी पाहिले याची माहिती काढून पाहा कारण तो फार चतुराईने वागतो असे मला कळाले आहे.
23 इसलिए तुम देख भाल कर जहाँ — जहाँ वह छिपा करता है उन ठिकानों का पता लगा कर ज़रूर मेरे पास फिर आओ और मैं तुम्हारे साथ चलूँगा और अगर वह इस मुल्क में कहीं भी हो तो में उसे यहूदाह के हज़ारों हज़ार में से ढूँड निकालूँगा।”
२३तर जेथे तो लपून राहतो त्या सर्व लपण्याच्या जागा पाहून त्यांची खात्री करून घ्या, मग खरे वर्तमान घेऊन माझ्याकडे परत या; त्यानंतर मी तुम्हाबरोबर जाईन आणि असे होईल की, तो त्या मुलुखात असला तर मी त्यास यहूदाच्या सर्व हजारांतून त्यास हुडकून काढीन.”
24 इसलिए वह उठे और साऊल से पहले ज़ीफ़ को गए लेकिन दाऊद और उसके लोग म'ऊन के वीराने में थे जो जंगल के जुनूब की तरफ़ मैदान में था।
२४मग ते उठले आणि शौलापुढे जीफाकडे गेले; परंतु दावीद व त्याची माणसे यशीमोनाच्या दक्षिणेकडे मावोनाच्या रानात अराबात होती.
25 और साऊल और उसके लोग उसकी तलाश में निकले और दाऊद को ख़बर पहुँची, इसलिए वह चट्टान पर से उतर आया और म'ऊन के वीराने में रहने लगा, और साऊल ने यह सुनकर म'ऊन के वीराने में दाऊद का पीछा किया।
२५शौल व त्याची माणसे त्याचा शोध करायला आली. हे कोणी दावीदाला सांगितले, म्हणून तो खडकावरून उतरून मावोनाच्या रानात राहिला हे ऐकून शौल मावोनाच्या रानात दावीदाच्या मागे लागला.
26 और साऊल पहाड़ की इस तरफ़ और दाऊद और उसके लोग पहाड़ की उस तरफ़ चल रहे थे, और दाऊद साऊल के ख़ौफ़ से निकल जाने की जल्दी कर रहा, था इसलिए कि साऊल और उसके लोगों ने दाऊद को और उसके लोगों को पकड़ने के लिए घेर लिया था।
२६शौल डोंगराच्या एका बाजूने चालला आणि दावीद व त्याची माणसे डोंगराच्या दुसऱ्या बाजूने चालली आणि दावीदाने शौलापासून पळायला घाई केली कारण शौल व त्याची माणसे, दावीदाला आणि त्याच्या मनुष्यांना धरायला घेरीत होती.
27 लेकिन एक क़ासिद ने आकर साऊल से कहा कि “जल्दी चल क्यूँकि फ़िलिस्तियों ने मुल्क पर हमला किया है।”
२७परंतु एक निरोप्या शौलाकडे येऊन म्हणाला, लवकर ये कारण पलिष्ट्यांनी देशावर घाला घातला आहे.
28 इसलिए साऊल दाऊद का पीछा छोड़ कर फ़िलिस्तियों का मुक़ाबिला करने को गया इसलिए उन्होंने उस जगह का नाम सिला'हम्मख़ल्कोत रख्खा।
२८तेव्हा शौल दावीदाचा पाठलाग सोडून पलिष्ट्यांवर चाल करून गेला. याकरिता त्या जागेचे नाव सेला हम्मालकोथ म्हणजे निसटून जाण्याचा खडक असे पडले.
29 और दाऊद वहाँ से चला गया और 'ऐन जदी के क़िलों' में रहने लगा।
२९मग दावीद तेथून वर जाऊन एन-गेदीच्या गडामध्ये राहिला.