< 1 समु 21 >

1 और दाऊद नोब में अख़ीमलिक काहिन के पास आया; और अख़ीमलिक दाऊद से मिलने को काँपता हुआ आया और उससे कहा, “तू क्यूँ अकेला है, और तेरे साथ कोई आदमी नहीं?”
दावीद नोब शहरात अहीमलेख याजकाजवळ आला आणि अहीमलेख कापत कापत दावीदाला भेटायला आला व त्यास म्हणाला, “तू एकटा का आलास आणि तुझ्याबरोबर कोणी का नाही?”
2 दाऊद ने अख़ीमलिक काहिन से कहा कि “बादशाह ने मुझे एक काम का हुक्म करके कहा है, कि जिस काम पर मैं तुझे भेजता हूँ, और जो हुक्म मैंने तुझे दिया है वह किसी शख़्स पर ज़ाहिर न हो इस लिए मैंने जवानों को फु़लानी जगह बिठा दिया है।
तेव्हा दावीद अहीमलेख याजकाला म्हणाला, “राजाने मला काही काम करायला आज्ञापिले आहे आणि त्याने असे म्हटले की, ज्या कामाविषयी मी तुला पाठवतो व जे मी तुला आज्ञापिले आहे ते कोणाला समजू देऊ नको; तरुणांनी अमक्या अमक्या ठिकाणी असावे म्हणून मी त्यांना नेमले आहे.
3 इसलिए अब तेरे यहाँ क्या है? मेरे हाथ में रोटियों के पाँच टुकड़े या जो कुछ मौजूद हो दे।”
तर आता तुझ्या हातात काय आहे? पाच भाकरी किंवा जे काही असेल ते मला माझ्या हाती दे.”
4 काहिन ने दाऊद को जवाब दिया “मेरे यहाँ 'आम रोटियाँ तो नहीं लेकिन पाक रोटियाँ हैं; बशर्ते कि वह जवान 'औरतों से अलग रहे हों।”
तेव्हा याजकाने दावीदाला उत्तर देऊन म्हटले, “माझ्याजवळ काही सामान्य भाकर नाही तर पवित्र भाकर आहे; जर तरुणांनी आपणांस स्त्रीयांपासून दूर राखले असेल तर ती घ्यावी.”
5 दाऊद ने काहिन को जवाब दिया “सच तो यह है कि तीन दिन से 'औरतें हमसे अलग रहीं हैं, और अगरचे यह मा'मूली सफ़र है तोभी जब मैं चला था तब इन जवानों के बर्तन पाक थे, तो आज तो ज़रूर ही वह बर्तन पाक होंगे।”
दावीदाने याजकाला उत्तर देऊन म्हटले, “खचित हे तीन दिवस झाले मी निघालो तेव्हापासून स्त्रिया आम्हापासून दूर आहेत, त्या तरुणांची पात्रे पवित्रच आहेत; हा प्रवास जरी सर्वसामान्य होता तरी, आज त्यांची शरीरे किती अधिक प्रमाणात पवित्र असतील.”
6 तब काहिन ने पाक रोटी उसको दी क्यूँकि और रोटी वहाँ नहीं थी, सिर्फ़ नज़र की रोटी थी, जो ख़ुदावन्द के आगे से उठाई गई थी ताकि उसके बदले उस दिन जब वह उठाई जाए गर्म रोटी रख्खी जाए।
मग याजकाने त्यास पवित्र भाकर दिली. कारण ताजी ऊन भाकर ठेवावी म्हणून जी समक्षतेची भाकर परमेश्वराच्या समोरून त्या दिवशी काढलेली होती, तिच्यावाचून दुसरी भाकर तेथे नव्हती.
7 और वहाँ उस दिन साऊल के ख़ादिमों में से एक शख़्स ख़ुदावन्द के आगे रुका हुआ था, उसका नाम अदोमी दोएग था। यह साऊल के चरवाहों का सरदार था।
त्या दिवशी शौलाच्या चाकरातील एक पुरुष तेथे परमेश्वराच्या पुढे थांबवलेला असा होता; त्याचे नाव दवेग; तो अदोमी होता; तो शौलाच्या गुराख्यांचा मुख्य होता.
8 फिर दाऊद ने अख़ीमलिक से पूछा “क्या यहाँ तेरे पास कोई नेज़ह या तलवार नहीं? क्यूँकि मैं अपनी तलवार और अपने हथियार अपने साथ नहीं लाया क्यूँकि बादशाह के काम की जल्दी थी।”
दावीद अहीमलेखाला म्हणाला, “येथे तुझ्याजवळ भाला किंवा तलवार नाही काय? राजाचे काम निकडीचे आहे म्हणून मी आपल्या हाती आपली तलवार किंवा आपली शस्त्रे घेतली नाहीत.”
9 उस काहिन ने कहा, कि “फ़िलिस्ती जोलियत की तलवार जिसे तूने एला की वादी में क़त्ल किया कपड़े में लिपटी हुई अफ़ूद के पीछे रख्खी है, अगर तु उसे लेना चाहता है तो ले, उसके 'अलावा यहाँ कोई और नहीं है।” दाऊद ने कहा, “वैसे तो कोई है ही नहीं, वही मुझे दे।”
तेव्हा याजक म्हणाला, “गल्याथ पलिष्टी ज्याला तू एलाच्या खोऱ्यात जिवे मारले त्याची तलवार पाहा ती एफोदाच्या मागे वस्त्रात गुंडाळलेली आहे. ती तू घेणार तर घे कारण तिच्यावाचून दुसरी येथे नाही.” दावीद म्हणाला, “तिच्यासारखी दुसरी नाही ती मला दे.”
10 और दाऊद उठा, और साऊल के ख़ौफ़ से उसी दिन भागा और जात के बादशाह अकीस के पास चला गया।
१०त्या दिवशी दावीद उठला व शौलाच्या भीतीमुळे पळून गथाचा राजा आखीश याच्याकडे गेला.
11 और अकीस के मुलाज़िमों ने उससे कहा, “क्या यही उस मुल्क का बादशाह दाऊद नहीं? क्या इसी के बारे में नाचते वक़्त गा — गा कर उन्होंने आपस में नहीं कहा था कि साऊल ने तो हज़ारों को लेकिन दाऊद ने लाखों को मारा?”
११तेव्हा आखीशाचे दास त्यास म्हणाले, “हा दावीद देशाचा राजा आहे की नाही: शौलाने हजार व दावीदाने दहा हजार मारले आहेत; असे ते त्याच्याविषयी एकमेकांना गाऊन म्हणत नाचत होते की नाही?”
12 दाऊद ने यह बातें अपने दिल में रख्खीं और जात के बादशाह अकीस से निहायत डरा।
१२दावीद हे शब्द आपल्या मनात ठेवून गथाचा राजा आखीश याच्यापुढे पार भ्याला.
13 इसलिए वह उनके आगे दूसरी चाल चला और उनके हाथ पड़ कर अपने को दीवाना सा बना लिया, और फाटक के किवाड़ों पर लकीरें खींचने और अपनी थूक को अपनी दाढ़ी पर बहाने लगा।
१३मग त्याच्यापुढे त्याने आपली वर्तणूक पालटून त्यांच्यासमोर वेड घेतले आणि तो कवाडाच्या फळ्यांवर रेघा मारू लागला व आपली लाळ आपल्या दाढीवर गाळू लागला.
14 तब अकीस ने अपने नौकरों से कहा, “लो यह आदमी तो दीवाना है, तुम उसे मेरे पास क्यूँ लाए?
१४तेव्हा आखीश आपल्या दासांना म्हणाला, “पाहा हा वेडा आहे हे तुम्हास दिसते तर कशासाठी तुम्ही त्यास माझ्याकडे आणले आहे?
15 क्या मुझे दीवानों की ज़रूरत है जो तुम उसको मेरे पास लाए हो कि मेरे सामने दीवाना पन करे? क्या ऐसा आदमी मेरे घर में आने पाएगा?”
१५माझ्याकडे वेडीमाणसे कमी आहेत म्हणून तुम्ही याला माझ्याकडे वेडेपण करायला आणले? याने माझ्या घरात यावे काय?”

< 1 समु 21 >