< 1 तवा 20 >
1 फिर नए साल के शुरू' में जब बादशाह जंग के लिए निकलते हैं, योआब ने ताक़तवर लश्कर ले जाकर बनी 'अम्मून के मुल्क को उजाड़ डाला और आकर रब्बा को घेर लिया; लेकिन दाऊद येरूशलेम में रह गया था, और योआब ने रब्बा को घेर करके उसे ढा दिया।
१आणि असे झाले की, राजे लढाईला बाहेर पडतात अशावेळी म्हणजे वर्षारंभी यवाबाने सैन्य घेऊन अम्मोन्यांच्या नगरात शिरले आणि त्यांनी तो देश उद्ध्वस्त केला. मग त्यांनी राब्बा नगराला वेढा घातला. पण दावीद यरूशलेमेमध्येच राहिला. यवाबाने राब्बा नगरावर हल्ला केला व त्यांचा पराभव केला.
2 और दाऊद ने उनके बादशाह के ताज को उसके सिर पर से उतार लिया, और उसका वज़न एक क़िन्तार सोना पाया, और उसमें बेशक़ीमत जवाहर जड़े थे; इसलिए वह दाऊद के सिर पर रखा गया, और वह उस शहर में से बहुत सा लूट का माल निकाल लाया।
२दावीदाने, त्यांच्या राजाच्या डोक्यावरील मुकुट काढला. त्या सोन्याच्या रत्नजडित मुकुटाचे वजन एक किक्कार होते. तो दावीदाच्या डोक्यावर ठेवण्यात आला. त्यांना त्या नगरातून मोठ्या प्रमाणात पुष्कळ लूट मिळाली.
3 उसने उन लोगों को जो उसमें थे, बाहर निकाल कर आरों और लोहे के हींगों और कुल्हाड़ों से काटा, और दाऊद ने बनी 'अम्मून के सब शहरों से ऐसा ही किया। तब दाऊद और सब लोग येरूशलेम को लौट आए।
३त्या नगरातील लोकांस बाहेर काढून त्यांच्याकडून करवती, कुऱ्हाही, लोखंडी दाताळे या हत्यारांनी करायच्या कष्टाच्या कामाला जुंपले. अम्मोन्यांच्या सर्व नगरांमध्ये दावीदाने हेच केले. मग दावीद आणि त्याचे सैन्य यरूशलेमेला परतले.
4 इसके बाद जज़र में फ़िलिस्तियों से जंग हुई; तब हूसाती सिब्बकी ने सफ़्फ़ी को जो पहलवान के बेटों में से एक था क़त्ल किया, और फ़िलिस्ती मग़लूब हुए।
४यानंतर असे झाले की गेजेर येथे इस्राएल लोकांचे पलिष्ट्यांशी युध्द झाले. या लढाईत सिब्बखय हूशाथी याने सिप्पय याला ठार मारले. तो रेफाई वंशातला होता. व पलिष्टी लोक त्यांना शरण आले.
5 और फ़िलिस्तियों से फिर जंग हुई; तब य'ऊर के बेटे इल्हनान ने जाती जूलियत के भाई लहमी को, जिसके भाले की छड़ जुलाहे के शहतीर के बराबर थी, मार डाला।
५पुढे पुन्हा एकदा पलिष्ट्यांशी लढाई झाली. त्यावेळी याईराचा पुत्र एलहानान याने गथच्या गल्याथचा भाऊ लहमी याला ठार केले. ज्याच्या भाल्याची काठी विणकऱ्याच्या तुळईसारखी होती.
6 फिर जात में एक और जंग हुई जहाँ एक बड़ा क़दआवर आदमी था जिसके चौबीस उंगलियाँ, या'नी हाथों में छ: छ: और पाँव में छ: छ: थीं, और वह भी उसी पहलवान का बेटा था।
६गथ येथे पलिष्ट्यांशी पुन्हा एकदा लढाई झाली. या गावात एक मोठा उंच मनुष्य होता. त्याच्या हातापायांना प्रत्येकी सहासहा, अशी एकंदर चोवीस बोटे होती. तोही रेफाईच्या वंशातला होता.
7 जब उसने इस्राईल की फ़ज़ीहत की तो दाऊद के भाई सिमआ के बेटे योनतन ने उसको मार डाला।
७त्याने इस्राएल सैन्याची निंदा केली तेव्हा दावीदाचा भाऊ शिमी याचा पुत्र योनाथानाने त्यास ठार केले.
8 यह जात में उस पहलवान से पैदा हुए थे, और दाऊद और उसके ख़ादिमों के हाथ से क़त्ल हुए।
८ही गथ रेफाईच्या नगरातील संतती होती. आणि ते दावीदाच्या व त्याच्या सैन्याच्या हाताने त्यांना मारण्यात आले.