< 1 तवा 18 >

1 इसके बाद यूँ हुआ कि दाऊद ने फ़िलिस्तियों को मारा और उनको मग़लूब किया, और जात को उसके क़स्बों समेत फ़िलिस्तियों के हाथ से ले लिया।
यानंतर असे झाले की, दावीदाने पलिष्ट्यांवर स्वारी केली आणि त्यांचा पराभव केला. त्याने पलिष्ट्यांच्या हातातून गथ आणि त्यांची गावे घेतली.
2 उसने मोआब को मारा, और मोआबी दाऊद के फ़रमाँबरदार हो गए और हदिए लाए।
मग त्याने मवाबाचा पराभव केला आणि मवाबी लोक दावीदाचे सेवक झाले आणि त्यास कर देऊ लागले.
3 दाऊद ने ज़ोबाह के बादशाह हदर'एलियाज़र को भी, जब वह अपनी हुकूमत दरिया — ए — फ़रात तक क़ाईम करने गया, हमात में मार लिया।
मग सोबाचा राजा हद्देजर आपल्या राज्याची सीमा फरात नदीपर्यंत स्थिर करण्यास जात असता दावीदाने हमाथाजवळ त्याचा पराभव केला.
4 और दाऊद ने उससे एक हज़ार रथ और सात हज़ार सवार और बीस हज़ार प्यादे ले लिए, और उसने रथों के सब घोड़ों की नालें कटवा दीं, लेकिन उनमें से एक सौ रथों के लिए घोड़े बचा लिए।
दावीदाने त्याच्याकडून एक हजार रथ, सात हजार सारथी, आणि वीस हजार पायदळ एवढे घेतले. दावीदाने रथाच्या जवळपास सर्व घोड्यांच्या शिरा तोडल्या पण त्यातून शंभर रथाचे घोडे मात्र त्याने शाबूत ठेवले.
5 जब दमिश्क़ के अरामी ज़ोबाह के बादशाह हदर'एलियाज़र की मदद करने को आए, तो दाऊद ने अरामियों में से बाइस हज़ार आदमी क़त्ल किए।
जेव्हा दिमिष्क नगरातील अरामी लोक सोबाचा राजा हद्देजर याच्या मदतीला आले, त्यांच्यापैकी बावीस हजार लोकांसही दावीदाने जिवे मारले.
6 तब दाऊद ने दमिश्क़ के अराम में सिपाहियों की चौकियाँ बिठाई, और अरामी दाऊद के फ़रमाँबरदार हो गए और हदिए लाए। और जहाँ कहीं दाऊद जाता ख़ुदावन्द उसे फ़तह बख़्शता था।
नंतर अराममधील दिमिष्कात दावीदाने बस्थान बसविले. अरामी लोक दावीदाचे सेवक होऊन त्यास कर देऊ लागले. अशाप्रकारे दावीद जेथे जेथे जात असे तेथे परमेश्वर त्यास जय देत असे.
7 और दाऊद हदर'एलियाज़र के नौकरों की सोने की ढालें लेकर उनको येरूशलेम में लाया;
हद्देजराच्या सेवकांच्या सोन्याच्या ढाली दावीदाने काढून घेतल्या आणि त्या यरूशलेमेला आणल्या.
8 और हदर'एलियाज़र के शहरों, तिबखत और कून से दाऊद बहुत सा पीतल लाया, जिससे सुलेमान ने पीतल का बड़ा हौज़ और खम्भा और पीतल के बर्तन बनाए।
हद्देजराची नगरे टिमथ आणि कून यातून दावीदाने पुष्कळ पितळही हस्तगत केले. हे पितळ वापरुन नंतर शलमोनाने पितळी समुद्र, गंगाळ व स्तंभ आणि पितळी भांडी बनवली.
9 जब हमात के बादशाह तू'ऊ ने सुना के दाऊद ने ज़ोबाह के बादशाह हदर'एलियाज़र का सारा लश्कर मार लिया,
जेव्हा दावीदाने सोबाचा राजा हद्देजर याच्या सर्व सैन्याचा पराभव केल्याची बातमी तोवू हमाथ नगराचा राजा याने ऐकली.
10 तो उसने अपने बेटे हदूराम को दाऊद बादशाह के पास भेजा ताकि उसे सलाम करे और मुबारक बाद दे, इसलिए के उसने जंग करके हदर'एलियाज़र को मारा क्यूँकि हदर'एलियाज़र तू'ऊ से लड़ा करता था, और हर तरह के सोने और चाँदी और पीतल के बर्तन उसके साथ थे।
१०तेव्हा त्याने हदोराम या आपल्या पुत्राला दावीद राजाचे क्षेमकुशल विचारण्यासाठी आणि त्याचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्याकडे पाठवले, कारण दावीद हद्देजराविरुध्द लढला व त्याचा पराभव केला, तोवू आणि हद्देजर यांच्यात लढाया होतच असत. हदोरामने आपल्याबरोबर सोने, रुपे, पितळ याची भांडी आणली.
11 इनकी भी दाऊद बादशाह ने उस चाँदी और सोने के साथ, जो उसने और सब क़ौमों या'नी अदोम और मोआब और बनी 'अम्मून और फ़िलिस्तियों और 'अमालीक से लिया था, ख़ुदावन्द को नज़्र किया।
११जे सोने रुपे त्याने सर्व राष्ट्रांपासून, अदोम, मवाब, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालेकी यांच्यापासून घेतले होते, ती भांडीही दावीद राजाने परमेश्वरास समर्पिली.
12 और अबीशै। बिन ज़रोयाह ने वादी — ए — शोर में अठारह हज़ार अदोमियों को मारा।
१२सरुवेचा पुत्र अबीशय याने क्षार खोऱ्यात अठरा हजार अदोमी लोकांस मारले.
13 और उसने अदोम में सिपाहियों की चौकियाँ बिठाई, और सब अदूमी दाऊद के फ़रमाँबरदार हो गए। और जहाँ कहीं दाऊद जाता ख़ुदावन्द उसे फ़तह बख़्शता था।
१३अदोमामध्ये अबीशयने मजबूत बस्थान बसविले आणि सर्व अदोमी दावीदाचे सेवक झाले. परमेश्वराने दावीदाला जेथे कोठे तो गेला तेथे त्यास जय मिळवून दिला.
14 तब दाऊद सारे इस्राईल पर हुकूमत करने लगा, और अपनी सारी र'इयत के साथ अद्ल — ओ — इन्साफ़ करता था।
१४दावीदाने सर्व इस्राएलावर राज्य केले आणि त्याने त्याच्या सर्व लोकांचा योग्य न्याय करत असे व नीतिने वागत असे.
15 और योआब बिन ज़रोयाह लश्कर का सरदार था, और यहूसफ़त बिन अख़ीलूद मुवर्रिख़था;
१५सरुवेचा पुत्र यवाब हा दावीदाच्या सैन्याचा मुख्य अधिकारी होता. अहीलुदाचा पुत्र यहोशाफाट अखबारनवीस त्याचा अधिकारी होता.
16 और सदूक़ बिन अख़ीतोब और अबीमलिक बिन अबीयातर काहिन थे, और शौशा मुन्शी था;
१६अहीटूबचा पुत्र सादोक आणि अब्याथारचा पुत्र अबीमलेख याजक होते. शवूशा हा नियमशास्त्र शिक्षक होता.
17 और बिनायाह बिन यहूयदा' करेतियों और फ़लेतियों पर था; और दाऊद के बेटे बादशाह के ख़ास मुसाहिब थे।
१७यहोयादाचा पुत्र बनाया हा करेथी व पलेथी लोकांवरील जबाबदार अधिकारी होता. दावीदाचे पुत्र राजाचे मुख्य सल्लागार होते.

< 1 तवा 18 >