< Єремія 5 >
1 Помандруйте по вулицях Єрусалиму, і розгля́ньтеся та розпізна́йте, і на майда́нах його пошукайте: чи не зна́йдете там люди́ни, чи нема там такого, що чинить за правом, що правди шукає, — то Я їм проба́чу!
१परमेश्वर म्हणतो, “यरूशलेमच्या रस्त्यावरुन धावा, सभोवती पाहा आणि या गोष्टींचा विचार करा. नगरातील चव्हाटे शोधा. सत्याचा शोध घेणारा आणि न्यायीपणाने चालणारा, असा कोणी एक मनुष्य जरी आढळला, तरी मी यरूशलेमेची क्षमा करीन.
2 Коли ж вони кажуть: „ Як живий Господь“, то справді клянуться неправдою.
२परमेश्वर जिवंत आहे, जरी ते असे म्हणतात ती ते खोटी शपथ वाहत आहेत.”
3 Хіба ж о́чі Твої не для правди, о Господи? Ура́зив Ти їх, але їм не боли́ть, понищив Ти їх, та відмовились узяти поу́ку вони, обличчя свої поробили від скелі тверді́шими, відмо́вилися наверну́тись!
३हे परमेश्वरा, तुझे डोळे सत्याकडे पाहत नाहीत काय? तू लोकांस मारलेस पण त्यांना वेदना झाल्या नाहीत. तू त्यांना पूर्णपणे पराभूत केले, तरी त्यांनी शिक्षा घेण्याचे नकारले. त्यांनी आपले मुख खडकांपेक्षा कठीण केले आहे, कारण त्यांनी पश्चातप करण्याचे नकारले आहे.
4 А Я думав: Це про́сті лиш люди, безглу́зді, — вони бо не знають дороги Господньої, права Бога свого́.
४तेव्हा मी म्हणालो, “खचित ते गरिब आहेत. ते मूर्ख आहेत, कारण त्यांना परमेश्वराचा मार्ग व आपल्या देवाचा नियम माहीत नाही.
5 Піду́ но собі до вельмо́жних і з ними помо́влю, — бо знають доро́гу Господню вони, право Бога свого, — та й вони усі ра́зом зламали ярмо́, а шле́ї пірва́ли!
५म्हणून मी महत्वाच्या लोकांकडे जाऊन त्यांना देवाचा संराष्ट्र घोषीत करीन. कारण त्यांना कमीत कमी परमेश्वराचा आपल्या देवाचा नियम तर माहीत आहे.” पण त्यांनी तर एकमताने जू मोडले आहे आणि तो साखळदंड तोडला आहे जो त्यांना देवासोबत बांधून होता.
6 Тому лев лісови́й їх поб'є, погубить їх вовк степови́й, панте́ра чига́є на їхні міста́: кожен, хто вийде із них, пошмато́ваний буде, бо помно́жились їхні гріхи́, їхні відсту́пства числе́нними стали!
६म्हणून गर्द झाडीतून सिंह त्यांच्यावर हल्ला करेल, जंगलातील लांडगा त्यांना ठार मारील. चित्ता त्यांच्या शहराविरूद्ध येईल. जो कोणी शहरातून बाहेर जाईल तो फाडण्यात येईल. कारण त्यांची पापे बहूतपट झालीत, आणि त्यांचे अविश्वासू कृत्ये फार झाली आहेत.
7 Хіба через це Я проба́чу тобі: твої діти Мене полишили, і присяга́ються тим, хто не Бог. Я їх нагодува́в, а вони чужоло́жать і на́товпом ходять до дому блудниці,
७मी या लोकांस का क्षमा करावी? तुझ्या मुलांनी माझा त्याग केला आणि त्यांनी जे देव नाही त्यांच्या शपथा वाहिल्या. मी त्यांना भरपूर खाऊ घातले, परंतू त्यांनी व्यभिचार केला आणि वारांगनेच्या घराचा मार्ग पकडला.
8 воло́чаться, мов жеребці́ відгодо́вані: кожен ірже́ до жони свого бли́жнього.
८भरपूर खाद्य खाणाऱ्या व समागमाला तयार असणाऱ्या घोड्यांप्रमाणे ते मोकाट फिरत होते. प्रत्येक पुरुष त्याच्या शेजाऱ्याच्या पत्नीसाठी किंकाळला.
9 Чи ж оцього Я не покараю? говорить Господь. І хіба над наро́дом, як цей, не помсти́ться душа Моя?
९तेव्हा मी त्यांना शिक्षा नाही करावी काय? असे परमेश्वर म्हणतो, असल्या राष्ट्रांविषयी माझ्या अंत: करणात सूड उमटू नये का?
10 Зберіться на мури його та й пони́щте, але́ не вчиня́йте кінця́ їм! Усуньте підпо́ри його, бо вони не для Господа,
१०तिच्या द्राक्षवेलींच्या माळीवर चढून जा आणि नाश कर, परंतू त्यांचा संपूर्ण नाश करु नकोस. तिच्या द्राक्षवेलीची काटछाट कर, कारण ती द्राक्षवेल परमेश्वराकडून नाही.
11 бо зра́джуючи, Мене зра́див Ізраїлів дім та дім Юдин, говорить Госпо́дь.
११कारण यहूदा व इस्राएल घराण्याने माझा फार विश्वासघात केला आहे, असे परमेश्वर म्हणतो.
12 Вони відцура́лися Господа та говорили: „Немає Його, й зло не при́йде на нас, — ні меча, ані го́лоду ми не побачимо!“
१२त्यांनी मला नाकार दिला, ते म्हणाले; “तो खरा नाही, अरीष्ट आम्हांवर नाही येणार, किंवा आम्ही तलवार व दुष्काळ पाहणार नाही.
13 А пророки поро́бляться вітром, і немає в них слова Господнього, — отак їм поро́блено буде!
१३संदेष्टे हे पोकळ वाऱ्या प्रमाणे होतील आणि परमेश्वराचे वचन आम्हांला घोषीत करायला कोणीच नाही. त्यांच्या धमक्या त्यांच्यावरच येवो.”
14 Тому́ вирікає отак Господь Бог Савао́т: За те, що гово́рите слово таке́, ось Я в у́ста твої вкладу слово Своє за огонь, а наро́д цей — то дро́ва, — і він пожере́ їх!
१४यास्तव सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “तू हे बोलला याकारणास्तव पाहा, मी जे शब्द तुझ्या मुखात घालत आहे, ते आगीप्रमाणे असतील आणि हे लोक लाकडाप्रमाणे असतील. कारण ती आग त्यांना खाऊन टाकील.
15 Ось Я приведу́ іздале́ка наро́да на вас, о доме Ізраїлів, каже Госпо́дь, — це сильний наро́д, старода́вній це люд, люд, що мови його ти не знаєш, і не зрозумієш, що він говори́тиме.
१५पाहा! परमेश्वर असे म्हणतो, हे इस्राएलाच्या घराण्या, मी दूरुन एक राष्ट्र आणतो, ते शक्तीशाली राष्ट्र आहे. ते प्राचीन राष्ट्र आहे. त्या राष्ट्रांतील भाषा तुला माहीत नाहीत. किंवा ते काय बोलतात ते तू समजू शकणार नाही.
16 Його сагайда́к, як відчи́нений гріб, усі хоро́брі вони.
१६त्यांचे भाते उघड्या थडग्यांप्रमाणे आहेत. ते सर्व सैनिक आहेत.
17 І він пожере́ твоє жни́во та хліб твій, поїсть він синів твоїх та дочок твоїх, худобу дрібну́ та худобу велику твою пожере́, з'їсть твого́ виноградника й фіґу твою́, понищить мече́м тверди́нні міста твої, на які ти наді́єшся.
१७तुझे पीक व तुझी भाकर जी तुझ्या मुलांना व तुझ्या मुलींनी खावी ती ते खाऊन टाकतील, ते तुझी मेंढरे व तुझी गुरे ते खाऊन टाकतील. ते तुझी द्राक्षेवली आणि अंजीर झाडे खाऊन टाकतील. त्यांच्या तलवारीच्या जोरावर ते तुमच्या मजबूत शहरांचा नाश करतील, ज्याच्यावर तुम्ही विसंबून होता.”
18 Та й за тих днів, — говорить Госпо́дь, — не зроблю́ Я із вами кінця́!
१८“पण तरीही त्या दिवसात मी तुमचा पूर्णपणे शेवट करणार नाही. असे परमेश्वर म्हणतो.
19 І буде, як скажуть: За́ що Господь, Бог наш зробив нам усе це? то ти скажеш до них: Як Мене ви покинули, і служите в вашому кра́ї бога́м чужозе́мним, так чужи́нцям служити ви будете в кра́ї не вашому!
१९हे असे घडणार, जेव्हा तू, इस्राएल आणि यहूदा असे म्हणेल की, आपल्या परमेश्वर देवाने आम्हासोबत या सर्व गोष्टी का केल्या? तेव्हा यिर्मया तू त्यांना असे म्हण, ‘ज्याप्रकारे तुम्ही परमेश्वरास सोडून आपल्या देशात परक्या देवांची सेवा केली, त्याचप्रकारे जो राष्ट्र तुमचा नाही त्यामध्ये तुम्ही परक्यांची सेवा कराल.”
20 Сповістіть в домі Якова це, та оголосіть це в Юдеї, говорить Господь.
२०याकोबाच्या घराण्याला ही वार्ता कळव आणि यहूदाला हे ऐकू दे.
21 Почуй же оце, ти наро́де безумний й безсердий, який має очі — й не бачить, має вуха — й не чує!
२१मूर्ख लोकांनो, जे तुम्हास डोळे असून पाहत नाही व कान असून ऐकत नाही ते तुम्ही हे ऐका.
22 Чи Мене ви боятись не бу́дете, — каже Господь, чи тремтіти не будете перед лицем Моїм? Мене, що пісок покла́в за границю для моря, за вічну межу́, якої воно не пере́йде: хоч повста́нуть, та не перемо́жуть, і шумі́тимуть хвилі його, але не пересту́плять її!
२२परमेश्वर म्हणतो, तुम्ही भीत नाही काय? किंवा माझ्यापुढे तुम्ही भीतीने थरथर कापत नाही काय? मी सनातन नियमाने समुद्राच्याविरूद्ध वाळूची सीमा घातली आहे, जेणेकरून त्याने उल्लंघन करू नये. जरी समुद्र उठतो आणि खाली पडतो, तरी त्याच्याने उल्लंघवत नाही. जरी त्याच्या लाटा गर्जतात, तरी त्या ओलांडून जात नाही.
23 А серце в наро́да цього неслухня́не та непокі́рне, відпа́ли вони та й пішли.
२३पण हे लोक दुराग्रही हृदयाचे आहेत, जे बंडखोर होऊन दूर गेले आहे.
24 І не сказали вони в своїм серці: Біймося ж Господа, нашого Бога, який дає дощ, дощ ранній та пізній ча́су його, стереже́ нам уста́влені тижні для жнив.
२४यहूदातील लोक आपल्या हृदयात म्हणत नाहीत, परमेश्वर आपला देव, जो योग्य वेळेला आगोटीचा व वळवाचा पाऊस पाडतो. आणि आमच्याकरता नेमलेले आठवडे राखतो, त्याचे भय आपण धरू या.
25 Ваші провини оце відхилили, а ваші гріхи́ від вас стри́мали цеє добро́.
२५तुमच्या अन्यायाने या गोष्टी तुमच्यापासून राखून ठेवल्या आहेत. तुमच्या पापांनी तुम्हापासून चांगले ते आवरून धरले आहे.
26 Бо в наро́ді Моєму безбожники є, — чига́ють вони, немов той птахоло́в, вони сі́тки розста́вили, хапа́ють людей.
२६कारण माझ्या लोकात काही दुष्ट मनुष्य आढळतात. दबा धरणाऱ्या फासेपारध्यांप्रमाणे ते एखद्यावर नजर ठेवतात. ते जाळे पसरतात आणि लोकांस पकडतात.
27 Як клі́тка, напо́внена пта́хами, так доми́ їхні повні ома́ни, — тому́ повиро́стали та збагати́лись вони!
२७पक्ष्यांनी पिंजरे भरावेत तशी ह्यांची घरे कपटांनी भरलेली आहेत. म्हणून ते श्रीमंत व मोठे झाले आहेत.
28 Потовсті́ли вони та погла́дшали, переступа́ють також міру злого, справедливо вони не судили сирі́тського су́ду, — і мають пово́дження! — і не помагають убогим у їхній справі.
२८ते पुष्ट झाले आहेत, स्वस्थ मनुष्यासारखे ते चकाकतात. त्यांनी दुष्टपणाची सर्व बंधने पार केली आहेत. ते लोकांच्या आणि अनाथांच्या विनंतींना समर्थन करत नाहीत. त्यांची भरभराट झाली आहे परंतू ते गरीबांचा न्याय न्यायीपणाने करत नाही.
29 Чи ж оцьо́го Я не покараю? говорить Господь. І хіба над наро́дом, як цей, не помсти́ться душа Моя?
२९परमेश्वर असे म्हणतो, या गोष्टींमुळे मी त्यांना शिक्षा नाही करावी का? “अशा राष्ट्रांवर मी माझा सूड नाही उगवणार का?
30 Чудне́ та страшне́ стало в кра́ї:
३०देशात अत्याचार व भयानक घटना घडल्या आहेत.
31 пророки віщу́ють неправду, при помочі їхній панують священики, і наро́д Мій оце так кохає! І що зробите ви, як кінець тому при́йде?
३१भविष्यवादी खोटेपणाने भविष्य सांगतात, आणि याजक त्यांच्या शक्तीने अधिकार गाजवतात. ते काम ते करणार नाहीत. आणि माझ्या लोकांस हे प्रिय आहे! पण शेवटी काय होणार?”