< До филип'ян 3 >
1 На останок, браттє моє, радуйтесь у Господї. Те ж саме писати вам менї не противно, для вас же певно.
१शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये आनंद करा. तुम्हास पुन्हा लिहिण्यास मी कंटाळा करीत नाही, पण ते तुमच्या सुरक्षितपणाचे आहे.
2 Остерегайтесь собак, остерегайтесь лихих робітників, остерегайтесь відрізання.
२त्या कुत्र्यांपासून सावध राहा. वाईट काम करणार्यांपासून सावध राहा. केवळ दैहिक सुंता झालेल्या लोकांविषयी सावध राहा.
3 Ми бо обрізаннє, которі духом Богу служимо, і хвалимось в Ісусї Христї, а не в тїлї надіємось,
३कारण आपण जे देवाच्या आत्म्याने देवाची उपासना करतो, जे ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे आणि देहावर विश्वास न ठेवणारे ते आपण सुंता झालेलेच आहोत.
4 хоч і я маю також надїю в тїлї. Коли хто инший думає надіятись у тїлї, то я тим більш, -
४तरी देहावरही भरंवसा ठेवण्यास मला जागा आहे. आपल्याला देहावर भरंवसा ठेवता येईल असे जर दुसऱ्या कोणाला वाटत असेल तर मला तसे अधिक वाटणार.
5 обрізаний восьмого дня, з роду Ізраїлевого, з колїна Веняминового, Євреїн з Євреїв, по закону Фарисей,
५मी तर आठव्या दिवशी सुंता झालेला, इस्राएल लोकातला, बन्यामीन वंशातला, इब्य्रांचा इब्री, नियमशास्त्रदृष्टीने परूशी;
6 по ревности гонив я церкву, по праведности законній непорочен.
६आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा आणि नियमशास्त्रातील नीतिमत्त्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे.
7 Та що було менї надбаннєм, те вважав я за втрату ради Христа.
७तरी मला ज्या गोष्टी लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे.
8 Так оце я все вважаю за втрату ради вищого розуміння Христа Ісуса, Господа мого, ради котрого я все втеряв, і вважаю все за сьміттє, аби придбати Христа,
८इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्वकाही हानी समजतो. त्याच्यासाठी मी सर्व गोष्टींची हानी सोसली आणि मी त्या केरकचरा लेखतो, ह्यासाठी की, मला ख्रिस्त येशू हा लाभ प्राप्त व्हावा.
9 та й явитись у Ньому, не маючи моєї праведности, що від закону, а (маючи) ту, що вірою Христовою (здобуваєть ся), праведність від Бога увірі,
९आणि मी त्याच्याठायी आढळावे आणि माझे नीतिमत्त्व माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगे मिळणारे नीतिमत्त्व नव्हे तर ते ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे, म्हणजे देवाकडून विश्वासाद्वारे मिळणारे नीतिमत्त्व असे असावे.
10 іцоб зрозуміти Його, і силу воскресення Його, і спільність мук Його, приподоблюючись смерти Його,
१०हे अशासाठी आहे की, तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्याचे व त्याच्या दुःखांची सहभागिता ह्यांची, त्याच्या मरणाशी एकरूप होऊन, मी ओळख करून घ्यावी.
11 аби тільки достигнути до воскресення мертвих.
११म्हणजे कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळवावे.
12 Не тим, щоб уже я достиг, або вже був звершений; гоню ж, чи не достигну того, за що і Христос Ісус достиг мене.
१२मी आताच जणू मिळवले आहे किंवा मी आताच पूर्ण झालो आहे असे नाही. पण मी ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या ताब्यात घेतले ते मी आपल्या ताब्यात घ्यावे म्हणून मी त्याच्यामागे लागलो आहे.
13 Браттє, я про себе не думаю, що я вже достиг; одно ж (роблю), забуваючи вже те що позаду, і сягаючи по те, що спереду,
१३बंधूंनो, मी ते आपल्या ताब्यात घेतले असे मानीत नाही पण मी हीच एक गोष्ट करतो की, मागील गोष्टी विसरून जाऊन आणि पुढील गोष्टींवर लक्ष लावून,
14 біжу до мети по нагороду вишнього поклику Божого в Христї Ісусї.
१४ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षिस मिळविण्यासाठी पुढच्या मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो. हेच एक माझे काम.
15 Скільки оце (нас) звершених, се думаймо, і коли що инакше думаєте, то й се Бог вам одкриє.
१५तर जेवढे आपण प्रौढ आहोत, तेवढ्यांनी हीच चित्तवृत्ती ठेवावी आणि तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृत्ती ठेवली, तरी देव तेही तुम्हास प्रकट करील.
16 Тільки ж (те), до чого ми достигли, (єсть) одним правилом жити і те саме думати.
१६तथापि आपण ज्या विचाराने येथवर मजल मारली तिच्याप्रमाणे पुढे चालावे.
17 Приподоблюйтссь до мене, браттє, і вважайте, хто так ходить, яко ж маєте за взір нас.
१७बंधूंनो, तुम्ही सर्वजण माझे अनुकरण करणारे व्हा आणि आम्ही तुम्हास कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात, त्यांच्याकडे लक्ष द्या.
18 (Многі бо ходять, про котрих не раз говорив я вам, тепер же й плачучи говорю, про ворогів хреста Христового,
१८कारण मी तुम्हास, पुष्कळ वेळा, सांगितले आणि आता रडत सांगतो की, पुष्कळजण असे चालतात की, ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत.
19 котрим кінець - погибель, котрим Бог черево, а слава в соромі їх, котрі про земне думають.)
१९नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, त्यांचा निर्लज्जपणा हे त्यांचे भुषण आहे, ते जगिक गोष्टींवर चित्त ठेवतात.
20 Наше бо життє єсть на небесах, звідкіля ждемо і Спасителя, Господа нашого Ісуса Христа,
२०आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे; त्याची आपण वाट पाहत आहोत.
21 котрий переобразить тіло смирення нашого, щоб було подобне тїлу слави Його, по дійству, котрим зможе і покорити собі все.
२१ज्या सामर्थ्याने तो सर्वकाही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्या सामर्थ्यांने तो तुमचे आमचे नीच स्थितीचे शरीर आपल्या गौरवीच्या शरीरासारखे व्हावे म्हणून त्यांचे रूपांतर करील.