< Nnwom Mu Dwom 4 >

1 Wo ho yɛ fɛ, me dɔfoɔ! Ao, wo ho yɛ fɛ! Wʼaniwa a ɛhyehyɛ wo nkatanimu mu no te sɛ aborɔnoma. Wo nwi te sɛ mpapokuo a wɔresiane Gilead Bepɔ.
(त्या स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) अहा! प्रिये, तू सुंदर आहेस! तू खूप सुंदर आहेस. तुझ्या बुरख्याच्या आतून तुझे डोळे कबुतर असे आहेत. तुझे केस गिलाद पर्वताच्या उतारावरुन जाणाऱ्या शेरड्याच्या कळपाप्रमाणे हेलकावणारे आहेत.
2 Wo se te sɛ nnwankuo a wɔatwitwa wɔn ho nwi foforɔ, a wɔfiri adwareɛ. Wɔnam mmienu mmienu na wɔn mu biara nyɛ ankonam.
लोकर कातरून धुतलेल्या मेंढ्या वर आल्या आहेत, ज्यातल्या प्रत्येकीस जुळे आहे. त्यांच्यापैकी कोणालाही हिरावून घेतलेले नाही. त्याच्या कळपासारखे तुझे दात आहेत.
3 Wʼanofafa te sɛ koogyan ahoma; wʼano yɛ fɛ. Wʼasontorɔ mu a ɛhyɛ wo nkatanimu mu te sɛ ateaa aduaba fa.
तुझे ओठ किरमिजी रंगाच्या धाग्याप्रमाणे आहेत. तुझे मुख सुंदर आहे. तुझ्या बुरख्याच्या आत, तुझे गाल दोन बाजू डाळिंबाच्या दोन फोडींप्रमाणे आहेत.
4 Wo kɔn te sɛ Dawid abantenten, a wɔasi no fɛɛfɛ; na akokyɛm apem sensɛn ho, a ne nyinaa yɛ akofoɔ kyɛm.
तुझी मान दाविदाने शस्रगारासाठी बांधलेल्या मनोऱ्याप्रमाणे आहे. ज्याच्यावर सैनिकांच्या एक हजार ढाली व कवचे लटकत आहेत.
5 Wo nufu mmienu te sɛ atwe mma mmienu, atwe mma ntafoɔ a wɔdidi wɔ sukooko mu.
हरीणीची जी जुळी, जे दोन पाडस कमलपुष्पांच्यामध्ये चरतात त्यांच्यासारखी तुझी दोन वक्षस्थळे आहेत.
6 Ɛnkɔ si sɛ adeɛ bɛkye, ama sunsum adwane no, mɛkɔ kurobo bepɔ ne aduhwam nkokoɔ no so.
दिवस शेवटच्या घटका मोजत आहेत आणि सावल्या दूर पळत आहेत. तेवढ्या वेळात मी त्या गंधरसाच्या पर्वतावर, ऊदाच्या टेकडीवर जाईन.
7 Me dɔfoɔ, wo ho yɛ fɛ papa; wo ho nni ɛdɛm biara.
प्रिये, तू सगळीच फार सुंदर आहेस. तुझ्यात कुठेही काहीही दोष नाही.
8 Ma yɛn mfiri Lebanon, mʼayeforɔ, wo ne me mfiri Lebanon nkɔ. Siane firi Amana atifi bra, firi Senir atifi, Hermon apampam hɔ, firi agyata buo mu ne mmepɔ a asebɔ dɛɛdɛɛ hɔ.
लबोनान मधून माझ्या वधू, तू माझ्याबरोबर ये. लबानोनातून माझ्याबरोबर ये; अमानाच्या शिखरावरुन माझ्याबरोबर ये, सनीर व हर्मोन यांच्या शिखरावरुन माझ्याबरोबर ये, सिंहाच्या गुहेतून, चित्त्याच्या पर्वतावरुन माझ्याबरोबर ये.
9 Woagye mʼakoma abɔ so, me nuabaa, mʼayeforɔ; woagye mʼakoma abɔ so wode wʼani a ɛbɔɔ me soɔ, ne wo kɔnmuadeɛ mu ɔbohemaa baako.
अगे माझ्या बहिणी, माझ्या वधू, तू माझे हृदय हरण केले आहेस. तुझ्या नेत्रकटाक्षाने, तुझ्या गळ्यातल्या हारातील एका रत्नाने तू माझे हृदय चोरले आहेस.
10 Wo dɔ yɛ ahomeka, me nuabaa, mʼayeforɔ! Hwɛ wo dɔ sɔ ani sene bobesa, na wʼaduhwam yɛ hwam sene pɛperɛ biara.
१०माझ्या प्रिये, माझ्या वधू, तुझे प्रेम फार सुंदर आहे. तुझे प्रेम द्राक्षरसापेक्षा चांगले आहे. तुझ्या अत्तराचा वास इतर सुगंधी द्रव्यापेक्षा चांगला आहे.
11 Adɔdɔdeɛ firi wʼano sɛ ɛwokyɛm, mʼayeforɔ; nufosuo ne ɛwoɔ wɔ wo tɛkrɛma ase. Wo ntadeɛ mu hwa te sɛ Lebanon deɛ.
११माझ्या वधू, तुझ्या ओठातून मध गळतो. तुझ्या जिभेखाली मध आणि दूध आहे. तुझ्या कपड्यांना लबानोनाच्या वासासारखा गोड सुवास आहे.
12 Wote sɛ turo a wɔato ano ɛpono mu, me nuabaa, mʼayeforɔ; woyɛ asutire a wɔagye ho ban, asubura a wɔasɔ ano.
१२माझ्या प्रिये, माझ्या वधू, तू तर बंद केलेल्या बागेसारखी आहेस. तू बंद असलेल्या झऱ्यासारखी, शिक्का मारलेल्या कारंज्यासारखी आहेस.
13 Wo nnua yɛ nnuabafuo so ateaa a ɛso aba pa, ahuahaa ne nnuannua,
१३तुझी रोपे मोलवान फुले असलेला डाळिंबाचा मळा अशी आहेत. त्यामध्ये कापराची व जटामांसीची झाडे,
14 nnuannua ne mmɛtire, osiko ne sinamon, a ohwamfufuo nnua hodoɔ, kurobo ne dupapoɔ ne pɛperɛ papa ahodoɔ nyinaa ka ho.
१४मेंदी, जटामांसी, केशर, वेखंड व दालचिनी इत्यादींनी भरलेल्या बागेसारखे आहेत. तुझे अवयव उदाची झाडे, गंधरस व अगरू व इतर सुगंधी झाडांनी भरलेल्या बागेसारखे आहेत.
15 Woyɛ turo mu asubura. Woyɛ ɔtadeɛ a nsuo tene firi mu sane firi Lebanon.
१५तू बागेतल्या कारंज्यासारखी, ताज्या पाण्याच्या विहिरीसारखी, लबानोनाच्या पर्वतावरुन वाहात जाणाऱ्या पाण्यासारखी आहेस.
16 Sɔre, atifi fam mframa! Bra, anafoɔ fam mframa! Bɔ fa me turo mu, sɛdeɛ ɛbɛyɛ a ne hwa no bɛgyegye hɔ. Ma me dɔfoɔ mmra ne turo mu na ɔmmɛka ne nnuaba papa no nhwɛ.
१६(तरुणी आपल्या प्रियकराबरोबर बोलते) उत्तरेकडच्या वाऱ्या, ऊठ! दक्षिणवाऱ्या ये, माझ्या बागेवरुन वाहा. तिचा गोड सुगंध सर्वत्र पसरव. माझा सखा त्याच्या बागेत येवो आणि त्याच्या आवडीची फळे खावो.

< Nnwom Mu Dwom 4 >