< Yeremia 7 >

1 Yei ne asɛm a ɛfiri Awurade hɔ baa Yeremia nkyɛn:
यिर्मयासाठी परमेश्वराकडून जे वचन आले ते असे, ते म्हणाले:
2 “Gyina Awurade asɔredan no ɛpono ano, na ka saa asɛm yi: “‘Montie Awurade asɛm, mo nnipa a mo wɔ Yuda nyinaa a mofa apono yi ano kɔsom Awurade.
यिर्मया, परमेश्वराच्या घराच्या दारात उभा राहा आणि हे वचन घोषीत कर! “हे यहूदातील लोकहो, जे तुम्ही सर्व परमेश्वराची उपासना करायला या दारातून आत जाता, ते तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका!
3 Yei ne deɛ Asafo Awurade, Israel Onyankopɔn no seɛ: Monsesa mo akwan ne mo nneyɛɛ, na mɛma mo atena ha.
सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, ‘तुम्ही आपली वाट नीट करा आणि चांगले ते करण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही असे केल्यास मी तुम्हास या ठिकाणी राहू देईन
4 Mommfa mo ho nto nnaadaasɛm so na monnka sɛ, “Yei ne Awurade asɔredan, Awurade asɔredan, Awurade asɔredan!”
“परमेश्वराचे मंदिर, परमेश्वराचे मंदिर, परमेश्वराचे मंदिर हे आहे. असे खोटे बोलणाऱ्या वाईट गोष्टींस स्वत: स सोपवून देऊ नकोस.
5 Sɛ mosesa mo akwan ne mo nneyɛɛ nokorɛm, na mone mo ho mo ho di no tenenee mu,
कारण जर तू आपला मार्ग नीट केलास आणि चांगले ते केलेस, जर तू शेजारी आणि मनुष्यांमध्ये पुर्णपणे न्याय केला,
6 sɛ moanhyɛ ɔhɔhoɔ, awisiaa anaa okunafoɔ so, na moanhwie mogya a ɛdi bem angu wɔ ha, na moanni anyame foforɔ akyi ankɔ mo ara ɔsɛeɛ mu a,
जर तू देशात राहणाऱ्याचे, अनाथाचे, आणि विधवेचे शोषण करणार नाहीस, आणि या स्थानात निर्दोष रक्त पाडणार नाहीस आणि स्वत: चे नुकसान करून घ्यायला इतर देवतांच्या मागे चालणार नाहीस,
7 ɛnneɛ mɛma mo atena ha, asase a mede maa mo agyanom afebɔɔ no.
तर या स्थानात, जे राष्ट्र पुरातन काळी तुमच्या या पूर्वजांना मी सर्वकाळासाठी दिला होता, त्यामध्ये मी तुला राहू देईन.
8 Nanso monhwɛ, mode mo ho ato nnaadaa nsɛm a ɛho nni mfasoɔ so.
पाहा! तुम्ही फसव्या गोष्टींवर विश्वास ठेवत आहात, जे तुमची काहीएक मदत करु शकत नाही.
9 “‘Mobɛbɔ korɔno na moadi awu, mobɛbɔ adwaman na moadi adansekurumu, mobɛhye nnuhwam ama Baal na moadi anyame foforɔ a monnim wɔn akyi,
तुम्ही चोरी, खून आणि व्यभिचार आणि खोटी शपथ वाहाल आणि बालमुर्तीस धूप जाळाल आणि ज्या देवांना तुम्ही जाणले नाही त्यांच्या मागे चालाल,
10 na afei, moaba abɛgyina mʼanim wɔ efie a medin da so na moaka sɛ, “Yɛnni ɔhaw,” sɛ moyɛ akyiwadeɛ yi nyinaa a na monni ɔhaw anaa?
१०मग ज्या घरात माझ्या नावाची घोषणा होते, तिथे तुम्ही येऊन माझ्या समोर उभे राहून असे म्हणाल का आम्ही तारले गेलो आहोत? म्हणजे तुम्ही हे सर्व घृणीत काम पुन्हा कराल.
11 Na efie a medin da soɔ yi, abɛyɛ adwotwafoɔ tu ama mo anaa? Nanso megu so rehyɛ! Awurade na ɔseɛ.
११ज्या घराला माझे नाव आहे, ते तुमच्या दृष्टीने दुसरे काही नसून लुटारूंना लपण्याची जागा आहे का? पाहा, माझ्या दृष्टीस असे आले आहे, असे परमेश्वर म्हणतो.
12 “‘Na afei monkɔ Silo, beaeɛ bi a, medii ɛkan bɔɔ atenaeɛ de me Din too so, na monhwɛ deɛ meyɛɛ no ɛsiane me nkurɔfoɔ Israelfoɔ amumuyɛ enti.
१२तर तुम्ही शिलो येथील जे माझे ठिकाण होते तेथे जा, ज्यात पहिल्याने माझे नाव वसविले आणि त्याचे मी आपले लोक, इस्राएल यांच्या दुष्कृत्यांमुळे जे केले ते पाहा.
13 Ɛberɛ a moreyɛ yeinom nyinaa, Awurade na ɔseɛ, mekasa kyerɛɛ mo mpɛn bebree, nanso moantie; mefrɛɛ mo, nanso moannye so.
१३इस्राएलाच्या लोकांनो, तुम्हीही सर्व दुष्कृत्ये करीत होता.” परमेश्वर असे म्हणतो! मी पुन्हा पुन्हा तुमच्याशी बोललो, पण तुम्ही माझे ऐकण्यास नकार दिला. मी तुम्हास बोलाविले, पण तुम्ही उत्तर दिले नाही.
14 Ɛno enti, sɛdeɛ meyɛɛ Silo no, mede bɛyɛ efie a me Din da so no, asɔredan a mode mo ho to so, beaeɛ a mede maa mo ne mo agyanom.
१४म्हणून, शिलोचे जसे मी केले, त्याचप्रकारे ज्या घरास माझे नाव आहे आणि ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता व जे ठिकाण मी तुम्हास व तुमच्या पूर्वजांना दिले तसे करीन.
15 Mɛpam mo afiri mʼanim sɛdeɛ meyɛɛ mo nuanom Efraimfoɔ no.’
१५एफ्राईममधील तुमच्या भावांना मी माझ्यापासून जसे दूर केले, तसे मी तुम्हास माझ्यापासून दूर करीन.
16 “Enti mommmɔ mpaeɛ mma saa nnipa yi, monnsrɛ na monni mma wɔn nso; monnsrɛ me ɛfiri sɛ merentie mo.
१६यिर्मया, तुला सांगतो, या लोकांसाठी प्रार्थना करु नकोस आणि त्यांच्यासाठी याचना व आळवणीही करु नकोस किंवा त्यांच्या मदतीकरिता मला विनवू नकोस. कारण मी तुझी प्रार्थना ऐकणार नाही.
17 Monhunu deɛ wɔreyɛ wɔ Yuda nkuro no mu ne Yerusalem mmɔntene so anaa?
१७ते लोक यहूदा शहरात, आणि यरूशलेमेच्या रस्त्यावर ते काय करीत आहेत हे तुला दिसत नाही काय?
18 Mmɔfra boaboa anyina ano, na agyanom sɔ ogya no ano, mmaa fɔtɔ asikyiresiam de to burodo ma Ɔsoro Hemmaa. Na wɔgu nsã ma anyame foforɔ de hyɛ me abufuo.
१८मला संताप आणावा म्हणून मुले लाकडे गोळा करत आहेत आणि वडील सरपण पेटवत आहे. स्त्रिया आकाशाच्या राणीसाठी कणीक मळत आहे आणि इतर दैवतांना अर्पण करण्यासाठी म्हणून पेयार्पणे ओतत आहेत.
19 Na ɛyɛ me na wɔrehyɛ me abufuo anaa? Awurade na ɔseɛ. Na ɛnyɛ wɔn mmom na wɔreha wɔn ho, hyɛ wɔn ho aniwuo anaa?
१९परमेश्वर असे म्हणतो, ते मला राग आणतात काय? “ते स्वत: लाच संताप आणत आहेत. म्हणजे त्यांच्यावर लाज यावी.
20 “Ɛno enti, deɛ Otumfoɔ Awurade seɛ nie: Wɔbɛhwie mʼabufuo ne mʼabufuhyeɛ agu beaeɛ yi so, agu nnipa ne mmoa, mfuo so nnua ne asase no so aba so, na ɛbɛdɛre a ɛrennum.
२०यास्तव परमेश्वर असे म्हणतो, मी या जागेवर माझा संताप मनुष्यांवर, प्राण्यांवर, झाडांवर आणि पिकांवर येईल, तो जाळून टाकणार आणि कोणीही तो विझवू शकणार नाही.”
21 “‘Yei ne deɛ Asafo Awurade, Israel Onyankopɔn, seɛ: Monkɔ so, momfa mo ɔhyeɛ afɔrebɔ nka mo afɔrebɔ a aka no ho, na mo ankasa monwe ɛnam no!
२१सेनाधीश परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो, तुम्ही आपली होमार्पणे आपल्या यज्ञास जोडा आणि मांस खा.
22 Na ɛberɛ a meyii mo agyanom firii Misraim na mekasa kyerɛɛ wɔn no, manhyɛ wɔn mmara a ɛfa ɔhyeɛ afɔrebɔ ne afɔrebɔ ho nko ara,
२२कारण मी जेव्हा तुमच्या पूर्वजांना मिसरमधून बाहेर आणले, तेव्हा मी त्यांच्या कडे काहीएक मागीतले नाही, मी त्यांना होमार्पणे आणि यज्ञ यांबद्दल आज्ञा दिली नाही.
23 mmom mede saa mmara yi kaa ho: Monyɛ ɔsetie mma me, na mɛyɛ mo Onyankopɔn, na moayɛ me nkurɔfoɔ. Monnante akwan nyinaa a mɛhyɛ mo no so, na asi mo yie.
२३मी त्यांना फक्त पुढील आज्ञा दिली. माझी आज्ञा पाळा मग मी तुमचा देव होईन व तुम्ही माझे लोक व्हाल. तर मी आज्ञा केलेल्या सर्व मार्गात चाला, म्हणजे तुमचे चांगले होईल.
24 Nanso, wɔantie na wɔannyɛ aso; mmom, wɔfiri wɔn akoma bɔne mu yɛɛ asobrakyeɛ. Wɔsane wɔn akyi na wɔankɔ wɔn anim.
२४पण तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही. ते त्यांच्या दुष्ट अंतःकरणाच्या, त्यांच्या स्वतःच्या हट्टी योजनांनुसार जगले. म्हणून ते पुढे येण्याऐवजी मागे गेले.
25 Ɛfiri ɛberɛ a mo agyanom firii Misraim de bɛsi ɛnnɛ yi, da biara da ne ɛberɛ biara mesomaa me nkoa adiyifoɔ baa mo nkyɛn.
२५तुमच्या पूर्वजांनी मिसर सोडला त्या दिवसापासून आजवर मी माझे सेवक तुमच्याकडे पाठवले आहेत. माझे सेवक संदेष्टे आहेत. मी पुन्हा पुन्हा त्यांना तुमच्याकडे पाठवले.
26 Nanso wɔantie me na wɔanyɛ aso. Wɔde asoɔden yɛɛ bɔne boroo wɔn agyanom deɛ so.’
२६पण त्यांनी माझे ऐकले नाही, त्यांनी लक्ष दिले नाही. त्यांनी आपली मान ताठ केली. ते त्यांच्या पूर्वजांपेक्षा अधिक दुष्ट होते
27 “Sɛ moka yeinom nyinaa kyerɛ wɔn a, wɔrentie mo; sɛ mofrɛ wɔn a wɔrennye so.
२७“तर त्यांना हे वचन सांगितले तरी ते तुझे ऐकणार नाहीत. तू त्यांना या गोष्टी घोषीत केल्या तरी ते तुला उत्तर देणार नाहीत.
28 Ɛno enti monka nkyerɛ wɔn sɛ, ‘Yei ne ɔman a ɔnyɛɛ ɔsetie mmaa Awurade, ne Onyankopɔn, na ɔmfaa ntenesoɔ. Nokorɛ asa, na afiri wɔn ano.
२८म्हणून तू त्यांना पुढील गोष्टी सांग. ज्या राष्ट्रांने परमेश्वराचे म्हणजेच त्यांच्या देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत आणि शिक्षा घेतली नाही, ते हेच आहे. सत्यता ही त्यांच्या मुखातून छेदून टाकलेली आहे.
29 Monyi mo tirinwi na monto ngu, montwa agyaadwoɔ wɔ nkokoɔ no so, ɛfiri sɛ Awurade apo, na wagyae saa awoɔ ntoatoasoɔ yi a wɔwɔ na abufuhyeɛ no ase akyi di.
२९हे यरूशलेमे, तुझे केस कापून दूर फेकून दे. उजाड डोंगरमाथ्यावर जाऊन शोकगीत गा. कारण परमेश्वराने रागाच्या भरात या पिढीला नाकारले आणि सोडले आहे.
30 “‘Yudafoɔ ayɛ bɔne mʼani so, sɛdeɛ Awurade seɛ nie. Wɔde ahoni a, ɛyɛ akyiwadeɛ asisi efie a me Din da so de agu ho fi.
३०कारण परमेश्वर असे म्हणतो, यहूदाच्या लोकांस पापे करताना मी पाहिले आहे.” त्यांनी वापरण्यात नसलेल्या गोष्टी, ज्या घराला माझे नाव आहे, ते भ्रष्ट करायला ठेवल्या आहेत.
31 Wɔasisi Tofet sorɔnsorɔmmea wɔ Ben Hinom bɔnhwa mu ɛhɔ na wɔhye wɔn mmammarima ne wɔn mmammaa. Adeɛ a manhyɛ wɔn na amma mʼadwene mu nso.
३१आणि त्यांनी बेन हिन्नोमच्या दरीत तोफेतची उच्चस्थाने बांधली आहेत. त्याठिकाणी ते स्वत: च्या मुलामुलींना अग्नीत जाळण्यासाठी देत असत. अशी आज्ञा मी दिलेली नाही आणि असे काही माझ्या मनातही आले नाही.
32 Ɛno enti, monhwɛ yie na nna no reba, Awurade na ɔseɛ, a wɔremfrɛ hɔ Tofet anaa Hinom Bɔnhwa bio, na mmom, wɔbɛfrɛ no Okum Bɔnhwa, ɛfiri sɛ wɔbɛsie awufoɔ wɔ Tofet kɔsi sɛ ɛhɔ bɛyɛ ma.
३२परमेश्वर असे म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत. “पुन्हा कधीही तोफेत व बेन हिन्नोमची दरी असे म्हटले जाणार नाही, तर तिला ते संहाराची दरी म्हणतील. की आणखी एका मृतालाही पुरण्यास जागा राहणार नाही इतकी वेळ येईपर्यंत ते तोफेतमध्ये मृतांना पुरतील.
33 Na afei saa nnipa yi afunu bɛyɛ aduane ama ewiem nnomaa ne asase so mmoa, na ɛrenka obiara wɔ hɔ a ɔbɛpam wɔn.
३३प्रेते आकाशातील पक्ष्यांचे आणि पृथ्वीवरील पशूस अन्न असे होतील. आणि त्यांना हाकलायला तेथे कोणीही नसेल.
34 Mede ahosɛpɛ ne anigyeɛ nnyegyeɛ, ayeforɔ ne ayeforɔkunu nne a ɛwɔ Yuda nkuro ne Yerusalem mmɔntene so, bɛba awieeɛ ɛfiri sɛ asase no bɛda mpan.’”
३४यहूदाच्या गावांतील व यरूशलेमेच्या रस्त्यांवरील उल्हासाच्या व आनंदाच्या कल्लोळांचा मी शेवट करीन. वधू वरांचा शब्द उमटणार नाही, कारण भूमी ओसाड होईल.”

< Yeremia 7 >